खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सरस्वतीपूजन अगदी सुरेख आहे. मोत्याची सरस्वती तर सुंदरच आहे पण ताटातले ते मोराचे आच्छादन पण मस्त आहे (कसलं आहे ते समजलं नाही) हिरव्या साडीवर ते लाल फूल पण खूप उठून दिसतंय.

पण आत प्रसादाचे मात्र अगदी भातुकलीसारखे थोडे थोडे पदार्थ वाढलेले असतात >>> संकेतानुसार नैवेद्य दाखवणार्‍या व्यक्तीने ताटात वाढलेले सगळे संपवायचे असते. अनेकवेळा नैवेद्य घरातले लहान मूल दाखवते. मग त्याला संपवायला (किंवा त्याच्याकडून / तिच्याकडून संपवून घ्यायला Happy ) सोपे जावे म्हणून सगळे पदार्थ थोडे थोडे वाढले जातात. नैवेद्य दाखवणारा खादाड असेल आणि त्याला विशिष्ट पदार्थांवर ताव मारायचा असेल तर तो नैवेद्याच्या ताटात सगळे पदार्थ थोडे थोडे वाढून घेतो मग त्याला हव्या त्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारता येतो Wink

ताटातले ते मोराचे आच्छादन पण मस्त आहे (कसलं आहे ते समजलं नाही) >>> पुजा थाली वरचे डीजाईन आहे मिनाकारी का काहीतरी म्हणतात.
धन्यवाद Happy

हे बाँबे ( Angry ) सँडवीच म्हणजे नक्की काय असतं ? खुद्द मुंबईत तरी असल्या नावाचा पदार्थ कधी बघितल्याचे आठवत नाही. इतर शहरात मात्र हमखास असतो हा पदार्थ.

मी सांगली वालचंदला होतो. तेव्हा तिथे एक वडापावची गाडी होती. त्यावर लिहिले असायचे. मुंबईचा वडापाव
एकदाच खाल्ला. पुन्हा कधी गेलो नाही

मी पण थायलंड ला १ हॉटेलात सिंगापूर नूडल्स खाल्ल्या Happy Wink काही नाही नॉरमल नूडल्स होत्या भाज्या घालून.
सिंगापूर मधल्या सपक असतात उलट..नावात खरंच काही नसतं

… खुद्द मुंबईत तरी असल्या नावाचा पदार्थ कधी बघितल्याचे आठवत नाही. इतर शहरात मात्र हमखास असतो …

रस्तोरस्ती गल्लोगल्ली असतो हो मुंबईत आणि उपनगरातही. रस्त्यावरच्या शेकडो स्टॉलपासून ते ताज होटलच्या छापिल मेन्यूपर्यंत ! चक्क विलिंग्ड्न क्लब ते महालक्ष्मी रेसकोर्सच्या गॉलप्स पर्यंत. मागच्याच महिन्यात फोर्ट भागात खाल्ला. फार आवडीचा पदार्थ.

आणि हो, त्याला “बॉम्बे सँडविच” असेच नाव आहे, त्याचे अजून “मुंबई सँडविच” झाले नाहीय. आंदोलनाला वाव आहे इथे मिलॉर्ड. Happy

बाकी पदार्थांची नावे अमुक का हे कोडे आहेच. व्हेज पटियाला आणि लाहोरी कबाब, सिंगापुर फ्राईड राईस भारतात सर्वत्र आहे.

राईट, कैलास पर्बत आणि AC त बसून खायचे असले तर चर्चगेटचे रेलिश. स्वच्छ, टापटीप. दक्षिण मुंबईत आणि पार्ले सांताक्रूज भागात मोठ्या कॉलेजेसला लागून असलेले, रोडसाइडवाले जास्त चविष्ट Happy ग्रिल खायचे तर बॉम्बे मसाला. Potatos, High Spice, butter and served super hot ! Big slurp !

रच्याकने तुमच्या सिंगापुरचा कैलास पर्बत वाला “सिंधी कोकी” मुंबईच्या आउटलेटपेक्षाही जास्त चांगली देतो. लिटिल इंडिया भागातला.

पुण्यात तुळशीबागेत ए वन सॅन्डविच वाला होता( अजुनही असेलच ), त्याच्याकडे कॉलेज डेज मधे खायचे मी..गॅस वर उलट पालट करायच साध सॅन्डविच मेकरमधल सॅन्डविच आणी केचप व भरपुर अमुल चिझ किसलेले नॉन ग्रिल असे दोन प्रकार होते...२००० साली ५-१० रुपयात पोटभरिला मस्त ऑप्शन होता...
बॉम्बे सॅन्डविच भारिच लागत...मुबैकर नातेवाइकानी खावु घातलय.

p_0.jpg

आज जरा बाहेर जेवण केले फ्रायडे स्पेशल. पिंक वाईन ट्राय केली (हाफ डे होता घाबरू नका Wink )
ती मुळीच चढत नाही.
स्पिनाच इन व्हाईट सॉस ऑन रोस्टेड साल्मन वगैरे.

वा वा, Friday special.

स्पिनाच इन व्हाईट सॉस + corn + चिली फ्लेक्स हे सँडविच स्टफिंग म्हणूनही झकास लागते. Grill करायचे.

पिंक वाईन ? रोझ वाईन माहिती आहे, दोन्ही एकच का ?

मस्तय. पण एवढेसेच भरीत का वाढलंस स्वतःला? Wink
पिंक वाईन ? रोझ वाईन माहिती आहे, दोन्ही एकच का ?>> कल्पना नाही, मला तर फक्त रेड & व्हाईट च माहित होत्या यापूर्वी.

Winefolly वर चेकवले. तुमची पिंक वाईन Rose wine च असावी. फ्रूटी- सायट्रस होती ना ?

पिंक सॉस पास्ता पण खूप लोकप्रिय आहे सध्या.

Bruschetta, home made - with olive oil and love ❤️

No cheese.

72ce3275-fffa-4c71-9a7e-c18fb39ce2a6.jpeg

सोबत जिभेवर taste striptease करणारी एखादी Sparkling wine असती तर …. असे मनात आले. पण जौद्या …

आधी गणपतीत, आता दिवाळीत या खाऊगल्लीत शुकशुकाटच आहे. बोअर होण्यासारखा विषय नाही खाण्याचा, मग काय कारण ?

फेस्टिवल माहौल बनाओ फ्रेंड लोग.

हा आजचा :
67effad9-09bf-44e2-a507-a9192ea2ed2c.jpeg

कश्याची तयारी ते समजलं असेलच Happy

Pages