Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Hi hospital madhun. Ghari
Hi hospital madhun. Ghari aali. Atta you tube baghta baghta leki sathi fresh orange. Juice banavla . Hatala exercise. Hospital madhe injection gheun vaitag aala. Zepto var orange masta aahet.
हाय अमा. छान हेलदी खाऊन लवकर
हाय अमा. छान हेलदी खाऊन लवकर पूर्ण फीट व्हा.
अनिंद्य, आमच्या भागात पारसी
अनिंद्य, आमच्या भागात पारसी डेरी फार्मची शाखा सुरू झाली आहे. त्यांच्याकडे राजस्थानी घेवर मिळतोय म्हटल्यावर मागवलाच. तुम्ही इथे दिलेल्या फोटोतल्यासारखाच होता. जाळीदार, वरून किंचित क्रिस्प तर खाली मॉइस्ट. अगदी कडेला केरळी अप्पमसारखा पातळ. खाल्ल्यावर सूदिंग फीलिंग आलं.
पण मी लहानपणा पासून खात आलेल्या मालवणी घीवराचीच चव डोकात बसली आहे. तो याच्यापेक्षा कडक , किंचित आंबट. मालवण हे माझं आजोळ आणि माझी मावशी (तिचं सासरही मालवण) प्रत्येक वेळी घेऊन यायची त्यामुळे त्याच्यासाठी मनात विशेष जागा आहे. मी गेल्यावर्षी
मालवणला गेलो ते कळतेपणी पहिल्यांदाचआणि तिथे एका ग्रामदैवताची जत्रा (इथे धयकालो म्हणतात) होती. स्टॉल्स लागले होते. त्यात घीवर बघून न घेणं शक्यच नव्हतं. त्या मावशीची मुलगीही सोबत होती हा आणखी एक शुभयोग.
मालवणी खाजा इथे मिळतो. गावाहून येणारे घेऊनही येतात, त्यामुळे त्याचं एवढं अप्रूप नाही.
जाळीदार मेसूरपाक, मालवणी , राजस्थानी आणि सिंधी घेवर एकाच कुळातले वाटतात. त्यांच्या रेसिपीज कुतूहल शमवण्यासाठी पाहेन.
@ पारसी डेरी
@ पारसी डेरी
ओरिजनल पारसी डेअरीचे खूप छान अनुभव - आठवणी आहेत. मुंबईहून सिल्वासा प्रवासात त्यांचे फार्म आहे, ते आउटलेट झकास होते/आहे पारसी भोणू साठी. आता किती पडझड झाली माहित नाही, last visit was 5 years back ! त्यांचे milk froth फार आवडते.
@ घेवर
आनंदी आठवणी आणि प्रेमीजनांची साथ ज़ायक़ा वाढवतेच. दुसरेही जरूर ट्राय करा सर्व.
मरीन लाइन्सला पारसी डेरीचं
मरीन लाइन्सला पारसी डेरीचं दुकान आहे. एकदा माझ्या कलीगसोबत ऑफिस अवर्समध्ये तिथे सुतरफेणी घ्यायला गेलो होतो आणि ती मिळाली नाही, तेव्हा तिने वाद घातला होता. पारसी डेरीचं तूप सगळ्यांत महाग असतं. त्याचा टिनाचा एक डबा होता घरात.
मी आता घेवरसोबत खरवस आणि वेलची श्रीखंड मागवले. दोन्ही छान होते. या श्रीखंडात चिकटपणा नव्हता, ड्रॉपिंग कन्सिस्टन्सीपेक्षा जऽऽऽरा घट्ट. मला आवडतं तसं.
बोरिवलीत पण पारसी डेअरीची
बोरिवलीत पण पारसी डेअरीची शाखा उघडली आहे. तिथे गेले की बजेटच्या बाहेरच खर्च होतो.
पारसी डेअरीची लिंक आहे का?
पारसी डेअरीची लिंक आहे का?
मी बोरिवलीतच आहे.
मी बोरिवलीतच आहे.
https://www.parsidairyfarm.com/
गुगलून पाहिले.खरवस पाहून जीव
गुगलून पाहिले.खरवस पाहून जीव वेडावला.होम डिलिव्हरी होईल की नाही माहीत नाही.दादर किंवा मरीन लाईन्सला गेले पाहिजे.फक्त 1020 रू.किलो खरवस म्हटल्यावर दबकले.कारण तेवढा घरी पुरणार नाही.
पारसी डेअरीचे तूप बिगबस्केटवर मिळते.
पारसी डेअरी प्रिमियम चार्ज
पारसी डेअरी प्रिमियम चार्ज घेतातच आधीपासून.
साक्षी यांच्या रेसिपीत ( पाककृती स्पर्धा-१ - उपासाची गोड कचोरी - साक्षी) थोडे फेरफार करून:
खोबरं नक्को, तिखट पदार्थात गोड नको असे नखरे असल्याने कॉर्नच्या केल्या. उपास करत नाही सो पनीर, मक्याचे दाणे, रोस्टेड बदाम, तीळ, चिली फ्लेक्स असे सारण. डीप फ्राय केल्या
मला २ मिळाल्या - पैकी एक “हसरी परी”
चांगला फोटो घेता आला, रविवारी
चांगला फोटो घेता आला, रविवारी अजून एक बॅच केली चॉकोलेट ची, same टीम.. ह्यावेळी अर्ध्या दिवसात सगळे खाऊन संपवले मुलांनी.
हार्ट वाले चॉकलेट ! ❤️
हार्ट वाले चॉकलेट ! ❤️
Enjoy !
हार्ट वाले चॉकलेट ! ❤️
.
किल्ली,
किल्ली,
दिवसेंदिवस एकदम प्रो होतायेत चॉकलेट्स
दिवाळीला ऑर्डर घ्या
धन्यवाद.
धन्यवाद.
मोठ्या प्रमाणात करून बघायचे आहे. सध्या छोटी वाटी वापरतेय मोजायला.
एक मोल्ड भरून होतात फक्त.
कितीही करा ते संपेपर्यंत मुलांना चैन पडत नाही. त्यामुळे कमीच बरे.
.
दिवाळीला ऑर्डर घ्या +७८६
दिवाळीला ऑर्डर घ्या +७८६
ऑर्डर नसेल घ्यायची तर पणती चकली लाडू करंज्या शंकरपाळी कंदील अश्या आकारात बनवून बघ दिवाळीला..
अनिंध,किल्ली एकदम भारी!
अनिंध,किल्ली एकदम भारी!
हसरी परी
हसरी परी
होय, आमच्याकडे चकल्या
होय, आमच्या घरी चकल्या तळतांना फुटल्या- विस्कटल्या तर “चकली हसली” म्हणतात. म्हणून वरची फुटकी कचोरी हसरी परी
होय होय चकल्या हसतात
होय होय चकल्या हसतात
चकली हसली” म्हणतात>> सेम
चकली हसली” म्हणतात>> सेम

माझा १ मावसभाऊ आहे त्याला तर चामट (कुरकुरीत नसलेली "च") चकली आवडते.
हसरी परी समजलंच नव्हतं.
हसरी परी समजलंच नव्हतं.
अनारसे हसतात हे आठवलं
.
हसरी परी तों पा सू अगदी
.
धन्यवाद मंडळी.
हसरी चकली हे मी सुद्धा नवीनच
हसरी चकली हे मी सुद्धा नवीनच ऐकले आहे.
पण आमच्याकडे चकली बोल चकली म्हटले की तुझी बायको टाकली म्हटले जायचे हे आठवतेय.
बायको टाकली>>>> अर्रे बाबा
बायको टाकली>>>> अर्रे बाबा टकली आहे रे तो शब्द
ते बनवाबनवी मधे- नवर्याने टाकलीये हिला आठवले & दात ओठ खाणारा लक्ष्या
सॉरी ऑटो करेक्ट टायपो झाला
सॉरी ऑटो करेक्ट टायपो झाला
(No subject)
दसरा हसरा करण्यासाठी आज
दसरा हसरा करण्यासाठी आज रसमलाई
अनिंद्य, रस मलाईचे गोळे
अनिंद्य, रस मलाईचे गोळे काँकेव्ह वाटत आहेत...!
फोटोचा दोष (खाण्याची घाई )
फोटोचा दोष + खाण्याची घाई
मस्त पदार्थ
मस्त पदार्थ
अनिन्द्य जुम्मान चा किस्सा आला नाही काल शुक्रवार होता
Pages