Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कुल्फी या मासिकाचे नाव तर
कुल्फी या मासिकाचे नाव तर ऐकले असशिलच. हळू हळू दर्जा वाढवायचा आणि हळूच काहीतरी सकस इंट्रोड्यूस करायचे
>>> 'पासवर्ड' अनियतकालिकाचं नाव ऐकलं आहेस का?
मी गेली ८-१० वर्षं त्याच्या एडिटिंग टीममध्ये काम करतेय. पैकी गेली ४-५ वर्षं आमचा अंक निमशहरी भागांमध्ये, आश्रमशाळांमध्ये जातो, जिथे मुलांना अवांतर वाचनासाठी काहीच उपलब्ध नसतं. त्या मुलांसाठी आम्हाला कंटेंटची धाटणी जरा बदलावी लागली. पण त्यातही मजा आहे.
चांगली चर्चा चालू आहे.
चांगली चर्चा चालू आहे.
सध्या जुन्या हिंदी आणि रशियन साहित्यिकांच्या कथा वाचणे सुरू आहे. त्या काळात गेल्यासारखे वाटते. वाचनालयाला यादी दिली आहे, पण ते रशियन लेखक कुणी वाचत नाही म्हणाले. अंगावर पडतील पुस्तके असं मत आहे त्याचं.
मराठी भरपूर वाचले. आता ते आवडणार नाही. ऐतिहासिक कादंबरी या प्रकाराचा वीट आला आहे. राधेयचा अपवाद.
साध्या सोप्या भाषेत एखादी आली तर वाचायला हरकत नाही. सध्या मराठीत लिहीणार्या कोणत्याही लेखकाच्या लिखाणाचे आकर्षण उरलेले नाही. सुबोध भावेने पुढे मागे आत्मचरित्र लिहीले तर मात्र पहिली कॉपी घेऊन वाचेन.
वाचनालयात अनुवादीत पुस्तके भरपूर आली आहेत. ती जर मूळ भाषेतून वाचली तर भाषा तरी सुधारेल.
रशियाची राज्यपद्धती तीन वेळा
रशियाची राज्यपद्धती तीन वेळा बदलली. झार >> कम्यनिझम >> पुतिन. पुस्तकांचे विषयही बदलतील ना.
----------------
पासवर्ड कुठे मिळतं?
-----------
सुनील तांबे यांच्या लेखनाचा विषय काय असतो?
-------------
कुल्फीबद्दल फेबुवर वाचले आहे.
कुल्फीबद्दल फेबुवर वाचले आहे. ल-प्रि - पासवर्ड बद्दल माहीत नव्हते. चांगला उपक्रम आहे! काय विषय निवडता तुम्ही सहसा?
सुबोध भावेने पुढे मागे आत्मचरित्र लिहीले तर मात्र पहिली कॉपी घेऊन वाचेन >>
लोक डिमाण्ड करत आहेत एक मिड-करीयर आत्मचरित्र लिहूनच टाक असे सांगायला हवे त्याला 
दुसरे म्हणजे आत्ता लिहीले तर त्यावरच्या पिक्चरमधे त्याच रोल तोच करू शकेल. नाहीतर नंतर सुबोध भावेच्या बायोपिकमधे त्याचा रोल कोण करणार असा प्रश्न उपस्थित होईल. चिंगारी कोई भडके गाण्यासारखे लॉजिक.
आत्ता लिहीले तर त्यावरच्या
आत्ता लिहीले तर त्यावरच्या पिक्चरमधे त्याच रोल तोच करू शकेल. नाहीतर नंतर सुबोध भावेच्या बायोपिकमधे त्याचा रोल कोण करणार असा प्रश्न उपस्थित होईल >>>
झालं.
चिंगारी कोई भडके थोड्या वेळाने समजलं, नंतर मात्र
एसआरडी >> माझ्या पोस्टबद्दल आहे का ? काही समजलं नाही.
सुबोध भावेने पुढे मागे
सुबोध भावेने पुढे मागे आत्मचरित्र लिहीले तर मात्र पहिली कॉपी घेऊन वाचेन>>>>
सुबोध भावे , घेई छंद
https://www.goodreads.com/book/show/39099673
थँक्स छन्दिफन्दि. तिथले
थँक्स छन्दिफन्दि. तिथले प्रतिसाद पण वाचले.
वाचावंसं वाटू लागलंय. फक्त ऐकलं होतं कि सुभा आत्मचरित्राचा विचार करतोय. पण कधी आलं समजलंच नाही.
>>> चिंगारी कोई भडके
>>> चिंगारी कोई भडके गाण्यासारखे लॉजिक.

कोई भी बायोपिक बनाए
कोई भी बायोपिक बनाए

तो सुभाही वो रोल निभाए
सुभा जो बायोपिक बनाए
उसे कौन निभाए?!!
>> एसआरडी >> माझ्या
>> एसआरडी >> माझ्या पोस्टबद्दल आहे का ? होय. आपण जे रशियातील डोस्टोवस्की वगैरे लेखक वाचतो तो काळ वेगळा होता. बदललेल्या राज्यपद्धतींत जनतेचे प्रश्न आणि समाजही बदलला असेल. नवीन लेखक मी अजून वाचले नाहीत.
______________________________________
कुल्फी आणि सायकल यांबद्दल बहुतेक ऐसीवर वाचले आहे. ( सई केसकर?)
__________
पुस्तक परिचय -
संशोधक निसर्गयात्री - लेखक मिलिंद आमडेकर , ठाणे.हे पुस्तक आताच वाचले. (२०१६)पाने शंभर.
यामध्ये - फर्ले मोवेट, ब्रायन मॉरिसन, एडवर्ड ब्लिथ, सम्युअल टिकेल, स्टॅनले आणि बेलिंडा ब्रिस्बेन, मेरिन नॉर्थ, बिल लिशमन, ॲलन ह्यूम, टि. सी. जेर्डॉन, सर जोसेफ हुकर आणि इतर पक्षी प्राणी अभ्यासकांची माहिती दिली आहे.
या नामवंत निसर्ग निरीक्षकांची ओळख एकाच ठिकाणी देणारे पुस्तक मला फारच आवडले. ( पक्षी निरीक्षण धाग्यावरही ही खरड टाकली आहे.)
ISBN 978-93-80875-65-1
मिलींद आमडेकर आणि त्यांची
मिलींद आमडेकर आणि त्यांची बायको अंजली आमडेकर फार पुर्वी म टा त छान ललितलेखन करायचे. तेव्हा ते अंबरनाथला रहायचे.
मैत्रेयी परफेक्ट
मैत्रेयी
परफेक्ट
मैत्रेयी भारीच, हाहाहा.
मैत्रेयी भारीच, हाहाहा. मगाशी पोस्ट नजरेतून सटकलेली.
फा, मैत्रेयी भारीये!
फा, मैत्रेयी
भारीये!
चांगला उपक्रम आहे! काय विषय निवडता तुम्ही सहसा? >>>
कुमारवयीन मुलांसाठी अंक असतो. वयोगट साधारण ६वी ते १०वी.
हे मुलांना सांगायला हवं, वाचायला द्यायला हवं, असं जे जे आम्हाला वाटतं, ते गोळा करतो.
गोष्टी, गाणी, फोटोफीचर्स, जगभरातल्या 'डिड यू नो?' टाइप छोट्या छोट्या बाबी, क्रिडाक्षेत्रातले किस्से, कलाविषयक काही ना काही, वेगवेगळ्या प्रकारची शब्दकोडी, विज्ञान, गणितगंमती, भूगोलगोष्टी, जोक्स.
तो मजकूर गरजेनुसार सोप्या भाषेत पुन्हा लिहून काढतो. त्यात उपदेशपर भाषा कटाक्षाने टाळतो. मुलांनी आपणहून सहज वाचतावाचता बोध घ्यावा असा उद्देश.
मायबोलीवरच्या अनेकांनी आजवर पासवर्डमध्ये लिहिलं आहे. (लेटेस्ट एंट्री - केशवकूल.)
त्या मुलांना रिलेट होईल, मजा येईल असं कंटेंट. कंटेंटमध्ये शहरी बाबी शक्यतो कमी असतील असं बघतो. कारण टारगेट वाचक मुलांना शहरांचं काही एक्सपोजरच नाहीये. (पण ते पूर्ण टाळतही नाही. ) हा फिल्टर लावताना लक्षात येतं की शहरांमध्ये आपण किती गोष्टी गृहित धरतो.
तसंच या मुलांसाठी छोटे मजकूर जास्त जमवावे लागतात. उदा. ५-६ पानी अद्भुतरम्य किंवा डिटेक्टिव्ह कथा कितीही भारी असली तरी ती बाजूला ठेवावी लागते, (किंवा छोटी करावी लागते) त्या मुलांचा ६ पानं वाचण्याच्या पेशन्स नसतो, कारण पुन्हा तेच- वाचन म्हणून लहानपणापासून काही मिळालेलंच नसतं.
आमचे प्रतिनिधी वेळोवेळी आश्रमशाळांमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांकडून फीडबॅक घेतात. त्यानुसार आम्ही कंटेंटची निवड सुधारून घेतो.
ललिता - प्रीती छान आहे उपक्रम
ललिता - प्रीती छान आहे उपक्रम!
चिंगारी
चिंगारी
चिंगारी लॉजिक <<< फा
चिंगारी लॉजिक <<< फा

आजच्या लोकसत्ता-लोकरंग मध्ये
आजच्या लोकसत्ता-लोकरंग मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी शिफारस केलेली पुस्तकांची यादी चांगलीय :
https://www.loksatta.com/lokrang/diwali-reading-season-begins-with-lokra...
संप्रति१ , मीही ती यादी
संप्रति१ , मीही ती यादी सकाळी वाचली होती.
बांदेकरांच्या यादीतलं माणूस असण्याच्या आठवणी - देवी प्रसाद मिश्र - हे नावच इंटरेस्टिंग वाटलं. हे वाचलंय का तुम्ही?
आणि बांदेकरांचं उजव्या सोंडेच्या बाहुल्या?
बांदेकरांच्या यादीतलं माणूस
बांदेकरांच्या यादीतलं माणूस असण्याच्या आठवणी - देवी प्रसाद मिश्र - हे नावच इंटरेस्टिंग वाटलं. हे वाचलंय का तुम्ही?>>
जबरदस्त पुस्तक आहे ते. 'मनुष्य होने के संस्मरण' म्हणून मूळ हिंदी पुस्तक आहे. ते गेल्या वर्षी पुस्तक महोत्सवातून घेतलं होतं. ते छोटं होतं. या मराठी अनुवादामध्ये मिश्र यांच्या आणखीही बऱ्याच कथांचे अनुवाद ॲड केले आहेत. गणेश विसपुतेंनी केलेत अनुवाद, एकेक शब्द तासून तासून वापरतात ते अनुवाद करताना.!
त्या यादीतलं जी के ऐनापुरेंचं 'अयोध्या' आणि मुरलीधर सुतार यांचं 'नैमिषारण्यात अर्ध्या रात्री' (यादीत नाव चुकलंय !) ही पण बघा. भारीयेत.
बांदेकरांची उजव्या सोंडेच्या बाहुल्या नाही वाचलं अजून तरी,
'चाळेगत' वाचलीय. समकालीन कोकण आहे त्यात.
लोकसत्ता यादीबद्दल आज दिवसभर
लोकसत्ता यादीबद्दल आज दिवसभर अनेकांशी चर्चा केली.
संप्रति, तुम्ही सांगितलेल्या 'अबुजमाडचे अनुनाद' आणि 'द लायब्ररी' या पुस्तकांचा उल्लेख आहे त्यात.
गणेश मतकरीचे दोन कथासंग्रह अनेकांच्या यादीत आहेत - तडा आणि फ्री फॉल. मी नुकतेच दोन्ही वाचले. फ्री फॉल जास्त आवडलं.
त्या याद्यांमध्ये आमची (समकालीन प्रकाशनाची) तीन पुस्तकं आहेत.
वॉकिंग ऑन द एज (प्रसाद निक्ते)
वर्दीतल्या माणसांच्या नोंदी (सदानंद दाते)
आम्ही स्वयंपूर्णा (मेधा पुरव-सामंत) (हे अगदी ताजं पुस्तक आहे.)
या तीनही पुस्तकांच्या संहिता संपादनात मी सहभागी होते. त्यामुळे छान वाटलं.
यादी देणाऱ्यांनी पुस्तकाचे
यादी देणाऱ्यांनी पुस्तकाचे प्रकाशन वर्ष , पुस्तकाचा साहित्य प्रकार आणि दोन ओळींत ओळख दिली तर बरं होईल.
पुस्तकांच्या नावावरून काही बोध होत नाही.
उदाहरणार्थ १. रिकामे अवकाश ... (२०२४), विज्ञान कथा, एक कुटुंब आपल्या मुलाच्या शोधात अवकाशात जातं. त्यांना तो भेटतो का आणि कसा.
२. खटाटोप. २०२३, राजकीय टीका लेख संग्रह. काळ २०१९-२०२४.
३. हरवलेले मोती. २०२०, ललित लेख आणि निबंध. कवी आणि लेखकांची ओळख.
४. चतुर. २०१८. बाल वाङमय . वय ७-१०.
५. बोगदा. फ्रेंच अनुवादीत कथा. १८९०-२०१० काळातील समाजावर आधारित.
इत्यादी. मला सुचलं ते दिलं.
पुस्तकं शोधताना उस्तवार वाचेल. आत्मचरित्र , चरित्र, ऐतिहासिक कादंबरी,विज्ञान कथा, विनोदी, माहितीपर, पाठ्यपुस्तक, कळावे. नाहीतर कोणी वाचेल, परिक्षण लिहील तेव्हा कळेल.
यादीतून काही नवी नावे कळली.
यादीतून काही नवी नावे कळली.
अयोध्या ही कादंबरी कशी आहे? एक्चुअली मला कधी ऐनापुरे आवडले नाहीत तरीही त्यांचे वाचतो अधून मधून.
आता मी या धाग्यावरून रजा घेतो. माझ्याकडून काही विशेष मोलाची भर घातली जाणार नाही.
काहीही लिहिण्याआधी एकदा पीवर वाचक स्टेटला जाण्याचा प्रयत्न करीन. जमले तरच काहीतरी लिहीन. नाहीतर उगाच वाळला बांबू.
अयोध्या ही कादंबरी कशी आहे? >
अयोध्या ही कादंबरी कशी आहे? >> पुलित्झर मिळावं
ऐनापुरेंची 'रिबोट' कादंबरी
ऐनापुरेंची 'रिबोट' कादंबरी वाचली आहे. गिरणी कामगारांच्या संपाचे परिणाम दाखवणारी. अंगावर येते. (आवडली असंही म्हणवत नाही.)
एक जनरल प्रश्न - येथे येणारी
एक जनरल प्रश्न - येथे येणारी नवीन व दर्जेदार मराठी पुस्तके किंडल अनलिमिटेड वर उपलब्ध असतात का ? माझं भारतात जाणं होत नाही, पुस्तक विकत घेणं होत नाही. स्टोरी टेल वर ऑडिओ बुक आहेत पण मला वाचायला आवडतं, नाही तर चित्त लागत नाही. नवीन किंडल न घेता आहे त्या टॅबलेटवरच सबस्क्रिप्शन घेईन.
येथे येणारी नवीन व दर्जेदार
येथे येणारी नवीन व दर्जेदार मराठी पुस्तके किंडल अनलिमिटेड वर उपलब्ध असतात का ?>> नाही. मराठी पुस्तकांसाठी किंडल अनलिमिटेड काही कामाचं नाही. (हिंदी पुस्तकांसाठी मात्र किंडल अनलिमिटेड परफेक्ट आहे. नव्या जुन्या जवळपास सगळ्या हिंदी पुस्तकांच्या किंडल आवृत्त्या निघालेल्या दिसतात.)
मराठीत विक्रम त्र्यंबक भागवतांच्या कादंबऱ्या आहेत किंडलवर, चांगल्या आहेत: माया, झोका, कादंबरी, पुठ्ठा, श्वास, धांडोळा, जंजाळ, स्वप्नवृत्त.
शिवाय श्रीनिवास जोशींचं 'टॉलस्टॉयचं कन्फेशन' पण आहे तिथे, बघा. एकच नंबर आहे. !
अनुवादित मध्ये, विश्वास पाटील यांचं 'झुंडीचे मानसशास्त्र', सॉमरसेट मॉमचं 'मून ॲंड सिक्स पेन्स', पुरूषोत्तम अग्रवालांचं 'नाकोहस', मिखाईल नाईमीचं 'द बुक ऑफ मीरदाद', ॲलेक्झांडर द्युमासचं 'कॅमिली' वगैरे आहेत किंडलवर. अजूनही आहेत. पण ती बऱ्यापैकी परिचित आहेत.
धन्यवाद संप्रति.
धन्यवाद संप्रति.
मला हीच शंका आली होती, माझी तडफड खरेतर मराठी आणि नवीन पुस्तकांसाठीच होती. सगळीकडे जुनी पन्नास वर्षांपूर्वीची पुस्तके उपलब्ध दिसतात. नवीन आणि दर्जेदार मात्र छापिल स्वरूपातच असतात. हिंदीच्या रेकोसाठीही धन्यवाद. नोंद करून घेतली आहे. टॉलस्टॉयचे कन्फेशन- इंटरेस्टिंग वाटले.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलात
प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलात मॅजेस्टिकचं पुस्तक प्रदर्शन भरलं आहे. माणूस असण्याच्या आठवणी दिसलं, ते घेतलं.
पंकज भोसलेंची कादंबरी आली आहे - फ्रेन्च मेनिअॅक.
पुस्तकातच दिलेली ओळख - याला काल्पनिक म्हणा किंवा गेल्या चार दशकांतील मुंबईच्या उपनगरांतील सांस्कृतिक जडणघडणीचा इतिहास म्हणा.
धन्यवाद संप्रति आणि भरत
धन्यवाद संप्रति आणि भरत
Pages