पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकं आता याला कंटाळली आहेत. हा चित्रपट पण याच्या मागच्या २-३ चित्रपटांसारखाच सुमार चालणार. जो पर्यंत काहीतरी नाविन्य आणत नाही तो पर्यंत ह्याची हिच अवस्था असणार. शाहरूखने आता कॅरॅक्टर रोल करायला सुरूवात करावी.

बॉलीवूडच्या खानमंडळींना हे लोक जर खानावळ म्हणत असतील तर मराठी चित्रपटातल्या तुपकट मंडळींना (स्व जोशी, सो कुलकर्णी, सु भावे) चिन्मावळ (चिन्मयच्या धरतीवर) म्हणूयात का?

शाहरूखने आता कॅरॅक्टर रोल करायला सुरूवात करावी.
>>>>
पुढे मागे तो ते करेनच. पण पहिल्या पानावर म्हाळसा यांनी टाकलेला फोटो पाहता तो सध्या तरी त्या विचारात दिसत नाहीये असे वाटते.

अमीर ने नुकतेच स्वतःच्या लाल सिंग चड्डा मुव्ही साठी काश्मिरी फाइल्स चे तोंड फाटेस्तो कौतुक केले !
बाकीच्यांनी नाके मुरडली तशी यानेपण करायला हवे , तरच याला तत्ववादी म्हणता आले असते .
>>>>>

चित्रपट हा व्यवसाय आहे. नुसते हिरो म्हणून आमीरच नाही तर कित्येकांचे पोट यावर असते. हे लोकं पहिले आपल्या पोटापाण्याचाच विचार करणार. उगाच त्यांनी तत्वे दाखवत फिरावे वा प्रत्येक सेन्सिटीव्ह ईश्यूवर भाष्य करावे हा हट्ट का ठेवला जातो.

असो, पठाण येईल तेव्हा मला असा कुठलाही लफडा नकोय.

असो, पठाण येईल तेव्हा मला असा कुठलाही लफडा नकोय.>>>>> Proud तोंड पानाने लाल रंगलेले, लुंगी वर धरलेली, झिपर्‍या आल्यात कपाळावर आणी हातात सुरी ( प्लॅस्टीकची ) असा ऋन्मेष डोळ्या समोर आला.

अरे काय आयडी आहे हा ! रात्री मार्मिक नावाने तीन साडेतीनपर्यंत प्रतिसाद देत होता, आत्ता पुन्हा ऋन्मेष नावाने हजर.
दुसर्‍या डोळ्याचा धागा लवकरच येईल वाटतंय. या वेळी त्यातून रक्त बिक्त येतानाचे फोटो असतील. आमेन !

या आयडीने शाहरूखचा फॅन यायच्या कितीतरी आधी त्याची अशी जाहीरात केली कि लोकांना तिडीक येऊन तो सुप्रफ्लॉप झाला.
तसेच झिरोच्या वेळीही केले होते. दुसर्‍यांदा झाल्याने लोकांनी झिरोला तुडव तुडव तुडवला. यावरून हा आयडी शाहरूखचे विकृत कौतुक करून त्याला संपवायला निघाला आहे असे वाटते.
रईस चा धागा किमान अमिताभच्या तुलनेसाठी होता. तिथेही अमिताभ बच्चनशी तुलना करून शाहरूख खानला शिव्या परस्पर शिव्या पडण्याची सोय केली होती. पण रईस चे ड फाटेस्तोवर तों कौतुक न केल्याने तो चालला.

श्रीयुत शाहरूख खान यांच्या पीआरच्या कानावर हा प्रकार घालायला हवा. कदाचित असे धागे न काढण्याचे काही घेत असावा हा. हा भयंकर विकृत आयडी आहे. रश्मी ताईंना फिल्मी या आयडीद्वारे एकदा वाटेल तसे बोलला आहे. दुसर्‍या आयडीने लगेच कौतुकही केले. मेंटलमधे हवा तर इथे धुमाकूळ घालतोय.

ओह. ओळखलं का ?
सस्मितजी रीयाजी असतील तर मी पण ऋन्मेष.
नसतील तर आपण दोघे एकच.

ओळखलंत का सर मला आयडी बदलून आलं कोणी?
मायबोलीवर चालते माझ्या आयडींचीच वाणी.

कधी टाकतो लिंक स्वतःची कधी करतो लाल,
शाहरुख जिथे तिथे आणि वाचणार्यांचे हाल..

चांगले चांगले लिहिण्यासाठी आयडी ठेवलाय राखून,
इतर अनेक अवतार आहेत पाहण्यासाठी वाकून.

धागे हायजॅक करणे असे हाच माझा धंदा,
राग अनावर झाल्यावर खरा आयडी परागंदा..

येतो मग मी रूप घेऊन इतर खोटे खोटे
ज्यांनी केली निंदा त्यांना शिव्यांचे मग सोटे.

धागे वर काढण्यासाठी ठेवलेत काही आयडी,
ज्यांच्या योगे प्रतिसादांची चढत राहते माडी..

विकृत थोडा आहे मी पण साळसूद माझे भाव,
मायबोलीच्या शहाण्यांनो ओळखा माझे नाव?

बाबौ, जबरदस्त सिक्सर हाणलाय या कवितेने.

ऋन्मेष, वरचे सारे स्क्रिप्टेड नसते रे. शाहरुख, सैफ किंवा सलमान हे अमीर इतके समजदार आणी मातीचे पाय असलेले नाहीत. स्टार किंवा अ‍ॅक्टर म्हणून पसंती द्यायची ना तर तुझ्या शाहरुख पेक्षा मी नवाजुद्दीन ला देईन. स्टार मटेरीयल नसतांना देखील इरफान आणी नवाज कुठल्या कुठे गेले.

अब रोने से का फाईदा जब चिडीया चुघ गई खेत.
बाजार उठला सरांचा. ये तो होना ही था.
आता कितीही आणि कोणतेही ड्युआयडी उतरवले तरी उपयोग नाही. Sad

एक वर्षानंतर जेंव्हा पठाण रिलीज होणार आहे त्या वेळी देशातील धार्मिक वाद चव्हाट्यावर नाही आले तर रुन्मेष सर साठी चांगले असेल .
चित्रपट हिट झाला चारपाचशे कोटी कमावले की रुन्मेष सर शांतचित्ताने झोपी जाऊ शकतात .
पण जर का त्यावेळी सुल्ली डिल , अतेरेकी हल्ल्याची एखादी घटना किंवा बुरखा विवाद या पैकी कोणताही विषय तापला तर पठाण बॅन च्या मोहिमा सुरू झाल्या की रुन्मेष सर कोमात !

Pages