Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जसा ज्याचा देव तसा त्याचा सूर
जसा ज्याचा देव तसा त्याचा सूर.
कोहली फॅॅन ---शर्मा मुळे सामना गेला.
शर्मा फॅॅन--- कोहली मुळे सामना गेला
शर्मा + कोहली फॅॅन ---पुजारा इज रीस्पोन्सिबल.
आयपीएल हेटर्स --- T20 मोड
आयपीएल लवर्स --- अहो पण पुजारा कुठे आयपीएल खेळत होता.
एक्सपर्ट म्हणजे मी -- टॉस जिंकून बॉलिंग? टॉस जिंकला पण कप गेला.
ह्यापेक्षा शास्त्री काय वाईट होता.
असा मतामतांचा गलबला.
शेवटी मला कमिन्स म्हणाला ते पटल, "कोई एक राहूल शर्मा या विराट यादव हाथमे ग्लोव्ह्ज पहनके बॅॅट लेके और गलेमे गिटार लटकाके इस मजबूत आस्ट्रेलीआकी नीव हिला नही सकता!"
केशवकूल, ऑस्ट्रेलियाच्या
केशवकूल, ऑस्ट्रेलियाच्या ताकदीविषयी दुमत नाही. हारण्याचं दु:खसुद्धा आहे. पण स्ट्रॅटेजिक ब्लंडर्स, प्रॉसेस ब्रेकडाऊनविषयी मात्र अपरंपार निराशा आहे. right process may not always yield the right results, but wrong process is recipe for disaster.
शर्मा नी बॅटिंग बद्दल बोललं
शर्मा नी बॅटिंग बद्दल बोललं असलं तरी द्रविड म्हणाला की ४६९ वालं पिच नव्हतं...
पण स्ट्रॅटेजिक ब्लंडर्स,
पण स्ट्रॅटेजिक ब्लंडर्स, प्रॉसेस ब्रेकडाऊनविषयी मात्र अपरंपार निराशा आहे. right process may not always yield the right results, but wrong process is recipe for disaster. >> +१ द्रविड असल्यामूळॅ हे जास्त खटकते आहे. शास्त्री, कोहली हे इंस्टीक्टीव्ह होते त्यामूळे अशा चुका समजू शकत होतो पण द्रविड सारख्या अभ्यासू मनुष्याकडून पुरेपूर निराशा झाली. हा ट्रेंड फायनल सुरू व्हायच्या आधीपासून सुरू आहे.
पुढच्या राउंड मधे आपण असू ह्याबद्दल मला शंका वाटते - इंङ्लंड रीसर्जंट आहे, ऑसी स्टेबल आहेत. पाकिस्तान एक चांगली टीम डेव्हलप झाली आहे. किवीज रिबिल्ड पूर्ण झालेला आहे. ह्याउलट आपण रिबिल्ड मोड मधे जाणार आहोत नि प्रामाणिकपणे टेस्ट मोड मधे खेळणारे खेळाडू फारसे दिसत नाही आहेत. आता सगळेच बाझबॉल च्या पाठी लागले तर गोष्ट वेगळी.
पुढच्या राउंड मधे आपण असू
पुढच्या राउंड मधे आपण असू ह्याबद्दल मला शंका वाटते - >>>
येत्या 2 वर्षातल्या कसोटी मालिकांचं शेड्युल बघता माझ्या मते द आफ्रिका फायनल ला पोचायला फेवरीट आहेत.
द आफ्रिकेला तुलनेत कठीण टूर नाहीयेत (बांगलादेश चा अपवाद वगळता) आणि ते अशा टीम ना होस्ट करणार आहेत ज्यांचा द आफ्रिकेतला हिस्टोरिकल रेकॉर्ड वाईट आहेत (भारत, पाक, श्रीलंका).
अर्थात 2021-23 च्या सायकल मध्ये पाक लाहि सगळ्यात फेव्हरेबल ड्रॉ होता पण त्यांनी बरोबर रायता घातला.
इतके दिवस आयपीएल अन् टेस्ट
इतके दिवस आयपीएल अन् टेस्ट फायनल मधे जितका पण वेळ मिळेल तो ठीक आहे म्हणणारा शर्मा आता अशा इव्हेंट च्या आधी २५-३० दिवसांचा गॅप पाहिजे म्हणतोय...
कठीण आहे...
भारत कॉट आयपीएल बोल्ड
भारत कॉट आयपीएल बोल्ड ऑस्ट्रेलिया
द्वारकानाथ संझगिरी
भारतीय संघ कॉट आयपीएल बोल्ड ऑस्ट्रेलिया, असं या पराभवाचं वर्णन करता येईल.
जे आयपीएलमध्ये कमावलं ते डब्ल्यूटीसीमध्ये गमावलं. एका ठिकाणी कोटी-कोटी कमावले, दुसऱया ठिकाणी इज्जत गमावली.
रवी शास्त्री म्हणाला,"
बीसीसीआयने आता ठरवायलं हवं, आयपीएल महत्त्वाचं की आंतरराष्ट्रीय क्रिकेट ?"
हे अगदी खरंय. सद्य परिस्थितीत मंडळा विरूध्द कुणी समालोचकाने क्षीण का होईना आवाज उठवला हे कमी नाही. कसोटी क्रिकेटचं महाकाव्य हवंय की आयपीएलची चटकदार चारोळी ? हेही आपण ठरवून टाकावं. मग आम्हाला हरल्याच दुःख होणार नाही. आयपीएलचे फायदे अनेक आहेत, पण त्यामुळे कसोटीच महत्व कमी होणं चुकीचं आहे. इंग्लंडला थेट जाऊन कुणी अत्यंत महत्त्वाचा कसोटी सामना एकही सराव सामना न खेळता कसा खेळू शकतो ? पण तो सराव सामना खेळण्यासाठी आपल्याकडे वेळ तरी कुठे होता ?
आयपीएलनंतर थेट तिथेच जावं लागलं. थोडक्यात आयपीएलला महत्त्व दिलं गेलं. कारण आयपीएलच्या तारखा अॅडजेस्ट करण्याचा अजिबात प्रयत्न झाला नाही. त्याचा परिणाम भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजीवर प्रखरपणे दिसला. एकेकाळी इंग्लंडच्या दौऱयावर छोटय़ा कसोटी मालिकांसाठीसुद्धा पाच-पाच काऊंटी सामने आधी खेळले जात. कारण इंग्लिश खेळपट्टय़ा आणि हवामानाशी एकरूप होण्याची अत्यंत गरज असते.
आणि भारतीय उपखंडातून जाणाऱया संघांना तर असतेच असते.
संघ निवड असो किंवा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेणं असो, दोन्ही बाबतीत भारतीय संघाने अक्षम्य चुका केल्या. सुदैवाने भारतीय संघ इंग्लंडला जाताना इथलं तापमान घेऊन तिथे गेला होता. त्यामुळे मस्त ऊन होतं. तरीही खेळपट्टीचा असणारा हिरवा रंग आणि आकाशात जमलेले काळे ढग याला घाबरून भारतीय संघाने टॉस जिंकूनही क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाँटिंगने फार चांगलं विधान केलं. तो म्हणाला, " भारतीय संघाने फक्त पहिल्या डा वाचा विचार केला. संपूर्ण मॅचचा नाही."
थोडंसं धैर्य दाखवत फलंदाजी घेऊन पहिल्या दिवशी पहिले दोन तास नीट खेळून काढले असते तर हिंदुस्थानी संघाला पहिल्या डावात चांगल्या धावा उभारता आल्या असत्या. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला" पहिले आप "म्हटल्यावर त्यांनी लंचनंतर धावा लुटायला सुरुवात केली. शमी आणि सिराजने पहिला स्पेल चांगला टाकूनही उमेश यादवला खेळपट्टीशी जुळवून घेता आलं नाही. त्यामुळे शमी आणि सिराजने टाकलेल्या दबावातून बाहेर येत हेड आणि स्मिथने खणखणीत शतके ठोकली. खेळपट्टीच्या हिरव्या रंगाला भुलून भारतीय संघाने चार वेगवान गोलंदाज खेळवले आणि अश्विनला ड्रेसिंग रूम मध्ये बसवलं. त्यावेळी स्मिथ आणि काही ऑस्ट्रेलियन फलंदाजानी सोडलेला सुस्कारा म्हणे ऑस्ट्रेलियात ऐकायला आला.
दुसऱया दिवशी हिंदुस्थानी गोलंदाजांनी एका मर्यादेपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखले, पण तरीही तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ 450 धावांचा पल्ला गाठून पुढे निघून गेला होता. दुसऱया डावात उमेश यादवने चांगली गोलंदाजी टाकली, पण तोपर्यंत मॅचचा रिमोट कंट्रोल ऑस्ट्रेलियाच्या हातात गेला होता. अजिंक्य रहाणे सोडला तर भारताच्याच्या पहिल्या पाच फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. आयपीएलचा हंगाम संपला असला तरी त्याची धुंदी, त्याची नशा उतरली नव्हती. ती नशा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी उतरवली.
रोहित शर्मा अलीकडे क्रिकेटच्या खेळामध्ये 40 च्या पुढेही आकडे असतात हे विसरून गेलाय. चाळिशी आली की त्याचा फ्यूज कधी उडेल हे सांगता येत नाही. शुभमन गिल हा अत्यंत गुणवान फलंदाज आहे, याबाबत शंका नाही. पण आयपीएल आणि कसोटी सामना यात किती फरक आहे याची जाणीव त्याला तिथे खेळताना नक्की झाली असेल. तीन मिनिटांचा गाणं गुणगुणणं वेगळं आणि तीन तासांची मैफल रंगवणं वेगळं. त्याला आपला ऑफ स्टम्प कुठे होता, याचा अंदाजच आला नाही. त्याने घरात शिरणाऱया चेंडूला अगदी हात पसरवून आत येण्याचं आमंत्रण दिलं. पण गिल तरी नवखा आहे. पुजारा शंभर कसोटी खेळलाय, वर इंग्लिश क्रिकेटमध्ये खोऱयाने धावा ओढतोय. तरी त्याला आपल्या ऑफस्टम्पचा पत्ता ठाऊक नसावा. काय म्हणावं, कळतच नाही.
कोहलीला चांगला चेंडू पडला. गुडलेंग्थ स्पॉटच्या अलीकडून तो झपकन उसळला. विराट कोहली क्रीझच्या पुढे उभा राहतो. त्यामुळे स्विंग गोलंदाजी खेळताना काही फायदे जरूर होतात. पण असा उसळलेला चेंडू तुम्हाला उघडा पाडू शकतो. तोच कोहली बॅकफूटवर असता तर कदाचित तो व्यवस्थित बचाव करू शकला असता.
अजिंक्य रहाणेने मात्र इंग्लिश खेळपट्टय़ांवर खेळण्याच सर्वोत्तम तंत्र दाखवलं. तो अजिबात क्रीझच्या पुढे उभा राहिला नाही. प्रत्येक चेंडू उशिरात उशिरा खेळला आणि विशेषतः बचाव करताना चेंडू त्याच्या नजरेखाली असायचा. एमसीसी कोचिंग मॅन्युअलला त्याच्या बचावाचे काही फोटो आपल्या पुस्तकात घ्यायला नक्की आवडतील. रवींद्र जडेजाने खाली येऊन आक्रमणाचे गट्स दाखवले. शार्दुल ठाकूरने काही चेंडू अंगावर घेत रहाणेबरोबर शतकी भागीदारी केली. पण तरीही मॅचच्या संदर्भात १७३ धावांची आपण ऑस्ट्रेलियाला बहाल केलेली आघाडी खूप मोठी होती.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात भारताने चांगली गोलंदाजी केली. विशेषतः जडेजा गोलंदाजी टाकत असताना त्याला अश्विनची साथ हवी होती. असं वारंवार वाटलं. ऑस्ट्रेलियन फलंदाजीला भारतीय गोलंदाजांनी भरधाव सुटू दिलं नाही. पण शेवटच्या डावात 444 धावा करून कसोटी जिकणं, हे कुठल्याही संघाला सोपं नसतं.
इतिहासात त्याचे दाखले फार कमी आहेत. तरी भारतीय फलंदाजांनी सुरुवात चांगली केली. गिलची विकेट दुर्दैवी होती. पण सेट झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ चेतेश्वर पुजाराने जे फटके खेळले, ते अनाकलनीय होते. कोहली आणि रहाणेने चौथ्या दिवशी सौम्य झालेल्या खेळपट्टीवर चांगली भागीदारी केली आणि पाचव्या दिवशी सामना जिंकण्याचा आशेला, राख झालेल्या निखाऱयाला फुंकर मारून निखारे फुलवावेत तसे फुलवले.
शेवटच्या दिवशीचे आव्हानही सोपं नव्हतं. पण लढत होईल, असे चौथ्या दिवसाच्या खेळावरून वाटत होतं. कोहलीने कव्हर ड्राइव्हसाठी चुकीचा चेंडू निवडला आणि स्मिथने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपला. त्याचं ते झेल घेणं पाहून स्मिथने जिम्नॅस्टिकसुद्धा गाजवलं असतं असं वाटलं. एरव्ही टिच्चून लढणारा जडेजा,' यस सर 'अशी हजेरी बोलांडच्या एका चांगल्या चेंडूला लावून निघून गेला. रहाणे एका बाजूला आत्मविश्वासाने उभा होता. पण स्टार्क चा बॅकफूट ड्राइव्हसाठी निवडलेला चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उसळला आणि जिंकण्याच्या आशेचे सारे निखारे थंडगार झाले. स्विमिंग पूलमध्ये सराव करून इंग्लिश खाडी पोहून जाता येत नाही, हा धडा भारतीय संघाला मिळाला. राहुल द्रविड हा महान फलंदाज असेल पण प्रशिक्षक म्हणून तो अजून स्फूर्तिदायक वाटत नाही. फलंदाज मूलभूत चुका करत असतील तर विक्रम राठोडची फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून भूमिका नेमकी काय ह्याचा उलगडा होत नाही.
पुन्हा भारतात सामने होतील. आपण जिंकू सर्व विसरलं जाईल.
अतिशय कॅज्युअल ॲप्रोच
अतिशय कॅज्युअल ॲप्रोच याच्यापेक्षा जास्त या पराभवाची कारणमीमांसा कराविशी वाटत नाही!!
ऋन्मेऽऽष!
ऋन्मेऽऽष!
सार, तुम्ही मायबोली सोडा नोकरी सोडा आणि क्रिकेटला वाहून घ्या. मुंबई इंडीअंंस चे मेंटार व्हा.
मुकेश कधी विजिट येत असेल ना ? त्याच्याशी बोला. त्याच्या नशिबात असेल...
आपल्या टीम मधे भरपूर
आपल्या टीम मधे भरपूर सेलिब्रिटी आहेत, त्यांना कोच सोडा, बीसीसीआय पण फार काही सांगू शकतं नाही.
राहणे चा फॉर्म गेला, तो डोमेस्टिक खेळला
पुजारा चा फॉर्म गेला, तो काउंटी खेळला
पण कोहलीचा फॉर्म गेल्यावरही तो फक्त इंटरनॅशनल च खेळत होता. रोहित तर शेवटचा डोमेस्टिक कधी खेळला होता हे त्यालाही आठवत नसेल
तीच गोष्ट बुमरा ची
असा attitude ठेवला तर वर्ल्डकप चं ही अवघड आहे...
वेस्ट इंडिजच्या टेस्ट टूर
वेस्ट इंडिजच्या टेस्ट टूर नंतर बोर्ड अन् रोहित टेस्ट कॅप्टनशिप बद्दल चर्चा करणार आहेत असं वाचलं.
सद्य परिस्थितीत मला तरी कुणीही योग्य खेळाडू दिसत नाहीये.
पंत खूप चांगला ऑप्शन ठरला असता, पण तो सध्या रिकव्हारी मोड मधे आहे.
राहुल मलातरी कॅप्टन म्हणून योग्य वाटत नाही.
बमारा अन् अय्यर च्या फिटनेस चं काही नक्की नसतं.
गिल अजून परिपक्व नाही वाटत.
जडेजा, आश्विन, रहाणे किती टेस्ट खेळतील काही नक्की नाही.
टेंपररी सिलेक्षन (पंत फिट होऊन परते पर्यंत) असेल तर पुजारा ला जवाबदारी देता येईल.
किंवा बेस्ट बेट, कोहली ला परत टेस्ट कॅप्टन करता येईल.
(आजच गांगुली म्हणाला आहे की bcci wasn't ready when Kohli left test captaincy)
"कोहली ला परत टेस्ट कॅप्टन
"कोहली ला परत टेस्ट कॅप्टन करता येईल." - सपनें मत दिखाइयें मोहनबाबू
अँकी मीही ती बातमी वाचली,
अँकी मीही ती बातमी वाचली, त्यात मह्त्वाचा मुद्दा हा होता कि रोहित टेस्ट कॅप्टन्सीबद्दल मूळातच फारसा उत्साही नव्हता. तसे असेल तर त्याला बळच तयार करून चूक केली. अश्विन तेंव्हा योग्य पर्याय होऊ शकला असता. अय्यर फिट झाला तर तो अतिशय योग्य उमेदवार वाटतो. सध्या कोणीच लायक उमेदवार वाटत नाही हे मात्र खरय.
अॅशेस सुरू होणार आहेत - काय
अॅशेस सुरू होणार आहेत - काय होईल असे वाटते ? पिचेस बर्यापैकी पाटा असणार आहेत म्हणे. तसे असेल तर बाझबॉल ला सूट होतील - हे इंटरेस्टींग असेल. ऑसी बॉलिंग अशी प्रेशर खाली आली कि काय होते ते आपण चौथ्या पाचव्या टेस्ट मधे बघितले आहे. अँडरसन ला पिच ने काही फरक पडत नाही त्यामूळे मजा येणार आहे एकंदर.
असामी
असामी
होय असामी. मी पण आतुरतेने वाट पहात आहे.
आपला फुल सपोर्ट ऑस्ट्रेलिया
आपला फुल सपोर्ट ऑस्ट्रेलिया ला आहे. इंग्लिश मीडिया आणि फॅनबेस डोक्यात जातो.
“इंग्लिश मीडिया आणि फॅनबेस
“इंग्लिश मीडिया आणि फॅनबेस डोक्यात जातो.” - दगडापेक्षा वीट मऊ?
पहिल्या सेशनमधे इंग्लंड च्या ३ विकेट्स गेल्या आहेत. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढत चुरशीची होईल असं वाटतंय.
दणक्यात बाझबॉल सुरू आहे. ऑसीज
दणक्यात बाझबॉल सुरू आहे. ऑसीज जर लिड घेऊन गेले तर मजा येईल दुसर्या डावात इंग्लंड काय करते ते बघायला.
३९३ वर डिक्लेअर!! इंटरेस्टिंग
३९३ वर डिक्लेअर!! इंटरेस्टिंग!! उद्याचा दिवस बघायला मजा येईल.
इंग्लंड खरच धमाल आहे
इंग्लंड खरच धमाल आहे
राहुल आणी रोहित सध्या टीमची
राहुल आणी रोहित सध्या टीमची पनवती आहेत. दोघांना नारळ दिला तरच काहीतरी फरक पडेल नाहीतर येरे माझ्या मागल्या.
रूट चे reverse scoop शॉट्स
रूट चे reverse scoop शॉट्स धमाल होते! Hope tnis will be a good one and England wins
.
नवीन धागा काढला
नवीन धागा काढला
क्रिकेट - ८
https://www.maayboli.com/node/83589
इंडियन टीम ‘peaking at the
.
Pages