क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ विलियमसन चे अजून एक शतक” - द्विशतक!! काय अफलातून प्लेयर आहे!! आधी सचिन, लारा, मार्क वॉ पाहिले, नंतर सचिन, पाँटिंग, कॅलिस पाहिले (सचिन होताच). आणि आता विल्यमसन, स्मिथ, रूट आणि कोहली. lucky us!

रंगा सोहोनीची त्यांच्या वयाच्या पन्नाशीतील तुफान फलंदाजी व गोलंदाजी पाहिली, शैलीदार फलंदाज सोबर्स,वाडेकर, पतौडी, सुनिल,विश्वनाथ, अझर.....Luckier me !!!!! Wink

“ Luckier me ” - क्या बात हैं भाऊ!

ह्यापैकी गावसकर च्या कारकिर्दीची शेवटची काही वर्षं आणि अझहरुद्दीन चं बरचसं करियर पाहिलंय. पण बाकीचांविषयी ऐकीव, वाचीव माहिती जास्त आहे. तरी यू-ट्यूबमुळे थोडे व्हिडीओज बघता येतात पण त्यात लाईव्ह बघण्याची मजा नाही.

मी मागच्या जन्मात ब्रॅडमन, ट्रंपर, हार्वे ह्यांना पाहिलय. Wink

भाऊंच्या लिस्ट मधल्या विश्वनाथला बघायला आवडले असते. टायगर ची ऑस्ट्रेलियामधली इनिंग्स वाचल्यापासून ते नि त्याचीकप्तानी बघायला आवडली असती. सोबर्स ची बॉलिंग बघायला मजा आली असती. सोबर्स नि रिचर्ड आज खेळत असते तर आयपील मधे दोघे सगळ्यात अधिक बोलींवर गेले असते. ब्रॅडमन देव आहे त्यामूळे त्याच्यावर बोली लावण्याचा अधिकार आपला नसावा Happy

शाकिब अल हसन वन डे क्रिकेट मध्ये 7000+ धावा आणि 300+ बळी घेणारा तिसरा खेळाडू बनला आहे.

या पूर्वी हि कामगिरी फक्त सनथ जयसूर्या आणि शाहिद आफ्रिदी यांनी केली आहे.

कमालीची गोष्ट म्हणजे शाकिब ची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतली सरासरी जयसूर्या आणि आफ्रिदी यांच्या तुलनेत अव्वल आहे.

स्टार्क बँड वाजवतो आहे आपला
रोहित, गिल, सूर्या, राहुल ला काढलं

अबॉट नी हार्दिकला उडवलं
१० ओव्हर मधे ५१/५

आता कोहली अन् जड्डू वर अवलंबून सगळं...

*बहुतेक २०-२० आहे असे आपल्या फलंदाजांना वाटले होते.*. खरंच शक्य आहे, अचानक बदललेल्या फॉरमॅटशी जुळवून घेणं कठीण जातही असेल !
*सूर्याला ४ थ्या नंबरवर का खेळवितात?* - लवकर येवून तोच बाद झाला तर लगेचच संघाचाच सूर्यास्त होवू नये म्हणून !! Wink

“ सूर्याला ४ थ्या नंबरवर का खेळवितात?” - तो अय्यर चा बॅकप म्हणून खेळतो. पण संजूला मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून ग्रूम केल्यावर ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर आता ह्या प्रयोगाचं प्रयोजन कळत नाही. २०१९ च्या वर्ल्डकपच्या वेळी अंबाटी रायडूच्या बाबतीतसुद्धा असाच प्रकार झाला होता.

पण संजूला मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून ग्रूम केल्यावर ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर आता ह्या प्रयोगाचं प्रयोजन कळत नाही
>>
सूर्या ज्या प्रकारे टी२० खेळतो, तोच इम्पॅक्ट त्यानी इतर फॉरमॅट मधे दाखवणं टीम मॅनेजमेंट ला एक्स्पेक्टेड आहे असं दिसतंय, पण त्याचा वन डे अथवा टेस्ट परफॉर्मन्स टी२० इतका इंपॅक्टफुल नाही हे कळतं पण वळत नाहीये. अन् सध्याची स्टाईल बघता, जो पर्यंत गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत संधी देत रहाणार, अन् अधे मधे कधी प्लेअर क्लिक झाला, तर तो कसा क्लासी प्लेअर होता म्हणून त्याच्यावर विश्वास टाकला वगैरे कॉमेंट्स मारणार...

काल शामीच्या पहिल्या ओव्हर मधे फक्त 2 रन निघाल्या होत्या हे लक्षात घेतलं तर पुढच्या 10 ओव्हर मधे ऑसीज नी 119 मारल्या...
हग्या मार म्हणतात तो हाच...

सूर्या ज्या प्रकारे टी२० खेळतो, तोच इम्पॅक्ट त्यानी इतर फॉरमॅट मधे दाखवणं टीम मॅनेजमेंट ला एक्स्पेक्टेड आहे असं दिसतंय >>>

हाच माझा आपल्या टीम मॅनेजमेंट (आत्ताच्या आणि पूर्वीच्या) बद्दल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला प्लेयर ना मारून-मुटकून ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट बनवायची सवय आहे.

शर्मा आणि द्रविड यांच्या एका खेळाडूला अनंत संधी देणे आणि नवोदित खेळाडूंना सतत डावलत राहणे यामुळे संघाची पिछेहाट होत आहे. देशांतर्गत स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून सुद्धा अनेक खेळाडूंना संधी मिळत नाही आहे.

सतत डावलत राहणे यामुळे संघाची पिछेहाट होत आहे. देशांतर्गत स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून सुद्धा अनेक खेळाडूंना संधी मिळत नाही आहे.>>
दादाच्या काळापासून आहे हे... (अमोल मुजुमदार आठवा)

आधी ही असेल, पण तेंव्हाच डोमेस्टिक फॉलो केलं नाहीये

मारून-मुटकून ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट बनवायची सवय आहे.
>>
प्लेअर चे इगो अन् ऑल फॉरमॅट प्लेअर चं नसतं ग्लॅमर अंगाशी येणार आपल्या

दादाच्या काळापासून आहे हे... (अमोल मुजुमदार आठवा) >>>

मुजुमदार ला संधी न दिल्या बाबत दादाला दोष देणे हार्श ठरेल. तो पूर्ण भरात असताना अझर आणि मग सचिन कर्णधार होते.

तसही तेव्हा आपली मिडल ऑर्डर पूर्णपणे पॅक होती. त्या काळात लक्ष्मण ला हि संघात जागा बनवण्यासाठी ओपनर म्हणून खेळावे लागत होते.

दादाला शिव्या द्यायचा असल्याच तर देवांग गांधी आणि दासगुप्ता सारख्या अति ऍव्हरेज खेळाडूंना खेळवण्यासाठी देऊ शकतॊ.

अमोल मुजुमदार गांगुलीचा पीअर होता ना.. म्हणजे गांगुली कॅप्टन व्हायच्या आधीच मुजुमदारची बरीच कारकीर्द ओसरली होती. अमोल मुजुमदारबद्दल बरीच तज्ज्ञ मंडळी पण हळहळतात. त्याचे डोमेस्टिक नंबर भारी होते फक्त चुकीच्या काळात होते आणि बाकी चौघात हा पाचवा मागे राहिला. अशीही थिअरी ऐकली आहे की unknowingly he went on a wrong side of one of the selectors who was very influential.

नंतरच्या काळात सिद्धेश लाड ची पण अशीच केस आहे. फॉर्ममध्ये असताना संधी मिळाली नाही. गावस्कर म्हणाला होता की लाडचा मुजुमदार करू नका म्हणून.

त्याचे डोमेस्टिक नंबर भारी होते फक्त चुकीच्या काळात होते आणि बाकी चौघात हा पाचवा मागे राहिला. अशीही थिअरी ऐकली आहे की unknowingly he went on a wrong side of one of the selectors who was very influential. >>>

हो, पण तेव्हा अमोल खोऱ्याने रणजीत धावा काढून संघ बाहेर राहणाऱ्या मिडल ऑर्डर फलंदाजा मध्ये एकटा नव्हता.

आताच नॅशनल सिलेक्टर शरथ, मध्य प्रदेश चा बुंदेला असे इतरही होते. अर्थात अमोल मुंबईकर असल्याने तो आपल्या सेंटीमेंट्स जवळचा आहे.

अमोल च्या तोंडून एका इंटरव्यूत ऐकले आहे कि त्याला भारत A संघात किंवा टुरिंग टीम च्या समोर वॉर्म अप मॅच मध्ये धावा करत नाही हे कारण सांगून बाहेर बसवले होते.

अशीही थिअरी ऐकली आहे की unknowingly he went on a wrong side of one of the selectors who was very influential. >> मीही हे दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी ऐकले/वाचले आहे. त्यामूळे दादा ला दोष देणे मला पण जमत नाही असे वाटले. फॅब फोर पैकी (सेहवाग ला आधीच ओपनर बनवला होता) कोणाला बाहेर बसवून अमोल ला आणले असते ?

सूर्याचे डोमेस्टिक वन डे नंबर पन काही खास नाहियेत त्यामूळे त्याला हि संधी मिळाते आहे ह्याहे एकमेव कारण टी २० ईफेक्ट पेक्षा अधिक काय असणार ? पण तसही संजू किंवा हूडा वगळता अजून कोणाला ट्राय करणार होते ?

स्टार्क ने दोन मॅचेस मधे जे केलय ते ओव्हला ला झाले नाही म्हणाजे मिळवले. गिल दोन्ही मॅच्स मधे सारख्याच प्रकारे बाद झालाय. तिसर्‍या मधे बदल करतो का हे बघू - त्यावरून किती लंबा घोडा हे ठरेल.

दादाला शिव्या द्यायचा असल्याच तर
>> मी २००३ वर्ल्डकप मधे लक्ष्मण ऐवजी दिनेश मोंगिया ला टीम मधे घेण्याबद्दल देईन...

मुजुमदार योग्य वयात टीम मधे आला असता तर अझर च्या टीम मधे आला असता किंवा सचिन च्या (९६ च्या सुमारास)
टायटन कप ला आपण खोऱ्यानी प्रयोग केले होते (सोमासुंदर, पंकज धरमाणी, वूर्केरी रमण, विक्रम राठोड, मांजरेकर, सिद्धू, रॉबिन सिंग हे सगळे संगीत खुर्चीत होते). त्यात मुजुमदार कसाही खपला असता. दादा ला पहिल्यांदा ओपन करायलाही याच सिरीज मधे पाठवलं होतं.
इथेही जर मुजुमदार आला नसेल तर ते इन्फ्लोंशियल सिलेक्टर च्या खाप्पा मर्जी मुळे असेल असं मानायला भरापूर वाव आहे.

टायटन कप ला आपण खोऱ्यानी प्रयोग केले होते. त्यात मुजुमदार कसाही खपला असता. दादा ला पहिल्यांदा ओपन करायलाही याच सिरीज मधे पाठवलं होतं. >>>

ह्या बाबतीत ब्लेम सर्वस्वी सिलेक्टर वर आहे. अमोल व्हाईट बॉल प्लेअर नाही असा शिक्का मारलेला होता.

तीच स्टोरी 10-12 वर्षा नंतर बद्रीनाथ सोबत रिपीट केली. तो तिशी पार पास्ट हिज प्राईम गेल्यावर IPL मध्ये खेळताना बघून मग त्यांना व्हाईट बॉल हि खेळू शकतो हा साक्षत्कार झाला.

Caught Out: Crime. Corruption. Cricket sheds light on the match-fixing scandal that shocked cricketing fans in the 1990s and early 2000s.
जे लोक क्रिकेटच्या मागे वेडे होतात त्यांचे डोळे उघडण्यासाठी.

https://www.rediff.com/movies/review/caught-out-crime-corruption-cricket...

पुढच्या WTC सायकल ची (2023-25) फिक्सचर जाहीर झाली आहेत.

भारत येत्या 2 वर्षात 19 कसोटी सामने खेळणार आहे.
विंडीज (2 सामने - बाहेर ), द आफ्रिका (2 सामने - बाहेर), इंग्लंड (5 सामने - घरी), बांगलादेश (2 सामने - घरी), न्यूझीलंड (3 सामने - घरी) आणि ऑस्ट्रेलिया (5 सामने - बाहेर)

द आफ्रिकेला फायनल ला पोचण्यासाठी माझ्या मते सगळ्यात फेव्हररेबल ड्रॉ आहे - भारत, पाकिस्तान, श्रीलंका (घरी) आणि बांगलादेश, विंडीज, न्यूझीलंड (बाहेर)

न्यूझीलंड ला फायनल ला पोचण्यासाठी माझ्या मते सगळ्यात कठीण ड्रॉ आहे - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द आफ्रिका (घरी) आणि भारत, श्रीलंका आणि बांगलादेश (बाहेर).

2023 वर्ल्ड कप साठी चे 12 व्हेन्यू नक्की केल्याची बातमी आहे.

मॅच मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद, लखनौ, इंदौर, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि अहमदाबाद ला होतील.

फायनल अहमदाबाद ला होणार.

आपल्या साठी ऑस्ट्रेलिया (5 सामने - बाहेर) आणी द आफ्रिका (2 सामने - बाहेर) हे बोंब असणार आहे.

सर्फराज खान किप्निंग च्या पाठी लागला आहे जेणेकरुन दिली कॅपिटल साठी तो किपर असेल असे वाचले. भारतीय संघात येण्याचा हा नवा मार्ग आहे म्हणे. क्पिंग शिकण्यामागे अ‍ॅटीम्ग ची बोंब लागू नये म्हणाजे मिळवली.

IPL च्या दृष्टीने बघायचा झालं तर याला 100% कारणीभूत दिल्ली चं स्क्वाड सिलेक्शन आहे.

त्यांच्या स्क्वाड मध्ये आता केवळ 1 जेन्युईन विकेटकिपर आहे, फील सॉल्ट.

त्याला खेळवायचं म्हणजे तुम्ही एक ओव्हरसीज प्लेयर चा स्पॉट पूर्णवेळ अडवून ठेवणार.

म्हणून आता सर्फराज आणि मनीष पांडे ला विकेट किपींग शिकायला लावत आहेत.

“ म्हणून आता सर्फराज आणि मनीष पांडे ला विकेट किपींग शिकायला लावत आहेत.” - म्हणजे अजून एखाद-दोन सीझन्स नंतर ऑनलाईन क्रिकेट तज्ञांच्या सर्फराझ/पांडे ला विकेटकीपर म्हणून टेस्ट्स/वनडे मधे खेळवण्याविषयीच्या ‘स्ट्रॅटेजीज’ विषयी पोस्ट्स वाचायची तयारी ठेवावी लागणार आहे.

Pages