Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो रिटायर झाल्यावर अचानक मोठं
तो रिटायर झाल्यावर अचानक मोठं झाल्याची जाणीव झाली >> +१००
बायकोला वाढदिवसाला साधा गजरा
बायकोला वाढदिवसाला साधा गजरा आणायलाही विसरणारा मी, 50वा वाढदिवस साजरा करायला सचिन कोकणात माझ्या गावी,. अगदीं माझ्या होमपीचवर, गेला , म्हणून या वयातही कॉलर ताठ करून मिरवतोय ! डोळ्यांना त्रास होतो म्हणून टिव्ही बघायचं बंद केलेले वयाच्या नव्वदितले माझे वडील, फक्त सचिन बॅटिंगला आला ( व वॉर्न बोलिंगला ) की खुर्ची सरसावून टिव्हीसमोर बसून ' सुंदर ', ' शाब्बास ', ' कमाल आहे! ' , अशी दाद गुणगुणत !! सचिनचं मनावरचं गारूड " न भूतो, न भविष्यति " असंच आहे !!!
मासे पण त्येचावर जीव ओवाळून टाकूक तयार ! सचिन मुंबैक गेलो परत, तर सगळे धांवले मुंबैक !!! आज कर शाकाहारीच कायतरी !!!
मस्त भाऊ !! आपण नशिबवान
मस्त भाऊ !! आपण नशिबवान म्हणून आपल्याला त्याचा अवतार ह्याची डोळा ह्याची देही बघायला मिळाला.
WTC फायनल पाच दिवसात चालू
WTC फायनल पाच दिवसात चालू होतेय. काय प्रेडिक्शन आहेत इथल्या मंडळींचे ?
*काय प्रेडिक्शन आहेत इथल्या
*काय प्रेडिक्शन आहेत इथल्या मंडळींचे ?* - हल्ली फायनल म्हटली की हवामान प्रेडिक्शन काय आहेत हे प्रथम पहावं लागतं. !
इंग्लंड आयर्लंड टेस्ट मधे
इंग्लंड आयर्लंड टेस्ट मधे बाझबॉल अप्रोच परत आलाय. 25 ओव्हर मधे 152 मारलेत. ब्रॉड नी परत एकदा 5 काढले. आयर्लंड 172 मधे गळपटले
क्राऊली नी 11 चौकार मारून 56 करताना वाईट्ट फोडला.
काय प्रेडिक्शन आहेत इथल्या
काय प्रेडिक्शन आहेत इथल्या मंडळींच
>>
गेल्या खेपेस आपण जड्डू अन् आश्विन दोघांना खेळवलं होतं. तसं नको आता. यावेळी बुमारा पण नाहीये
शर्मा, गिल, पुजारा, कोहली, रहाणे, भरत, जडेजा / आश्विन, शार्दुल, यादव / उनाडकट, शमी, सिराज अशी टीम असूदे
आश्विन वा जडेजा पैकी अन् यादव वा उनाडकट हा फैसला प्रॅक्टिस सेशन मधल्या फॉर्म वर करावा
*काय प्रेडिक्शन आहेत इथल्या
*काय प्रेडिक्शन आहेत इथल्या मंडळींचे ?* - हल्ली फायनल म्हटली की हवामान प्रेडिक्शन काय आहे हे प्रथम पहावं लागतं. !
नविन, तरुण भारतीय खेळाडूच ही फायनल मुख्यत्वे गाजवतील, रोहितही पूर्वीच्या फॉर्मची झलक तरी दाखवेल असा अंदाज व तशी इच्छा व प्रार्थना !
काय प्रेडिक्शन आहेत इथल्या
काय प्रेडिक्शन आहेत इथल्या मंडळींच
___
Australia favourite
60-40
सर , तुमच्या भरंंशावर मी
सर , तुमच्या भरंंशावर मी खेळतोय.
१. आपण टी २० मोड मधून बाहेर
१. आपण टी २० मोड मधून बाहेर पडलेलो असू का ?
२. ऑसीज मिडल ऑर्डर बरेच दिवस इंग्लंड मधे आहे.
३. गेल्या इंग्लंड दौर्यामधे चांगला खेळलेले पंत नि राहुल (नि बुमरा) नाही आहेत.
४. गिल, भरत नि किशन ह्यांना इंङ्लंड मधे खेळण्याचा फारसा अनुभव नाही आहे.
५. इंग्लंड चे हवामान ९९% वेळा आपल्यावर गदा आणणारे असते.
६. द्रवीड च्या कोचिंग स्टाफ खाली आपण भारताबाहेर चौथ्या इनिंग मधे ३०० डीफेंड करायला सातत्याने कमी पडलो आहेत.
धरा बोटे, करा आकडेमोड ! आपण जिंकलो तर आपण ह्यावेळी खरच डीसर्विंग असू.
प्रामाणीकपणे एव्हढी मोठी स्पर्धा एका सामन्यानंतर संपणे मला अयोग्य वाटते. तीन सामन्यांची सिरीज हवी.
सहमत या मुद्द्यांशी. ६०-४०
सहमत या मुद्द्यांशी. ६०-४० सुद्धा भारत माझा देश आहे म्हणून अन्यथा ७५-२५ लिहीले असते.
२०-२० मधून टेस्टला जायचे आहे.
भारतामधून ईंग्लंडला जायचे आहे.
फलंदाजीत शर्मा टचमध्ये नाही.
गिलला ईंग्लिश कंडीशनचा अनुभव नाही. तिथे चमकला नाही.
रहाणे बेभरवश्याचा आहे.
गेमचेंजर पंत नाही.
विकेटमागे साहाही नाही.
पुजारा-कोहलीवर मदार आहे. ती पुरेलसे वाटत नाही. जोडीला किमान चुम्मा फॅक्टर हवाच होता. ऑस्ट्रेलियाके गुरूर को ललकारना होगा. पंतच्या अनुपस्थितीत कोहलीलाच हे काम करावे लागणार.
गोलंदाजीत बुमराहची अनुपस्थिती आणि थकलेले शमी, सिराज. ऑस्ट्रेलियाच कोलॅप्स झाला तर ठिक. पण ईनिंग मोठी चालल्यास हे थकणार. आणि मोठी ईनिंग खेळायची क्षमता असलेले फलंदाज ऑस्ट्रेलियात ठासून भरले आहेत. कोलॅप्स एकदा होईल. दोनदा नाही.
"आपण टी २० मोड मधून बाहेर
"आपण टी २० मोड मधून बाहेर पडलेलो असू का ?" - हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. एक पुजारा सोडला तर कुणीही इतक्यात लाँग फॉर्मॅट खेळलेलं नाहीये. किशन प्लेयिंग-११ मधे असेल असं मला तरी वाटत नाही (पाँटिंग काहीही म्हणो - एकदा ह्याच लॉजिकने त्याने एसीबीला मॅक्सवेल ला टेस्ट मध्ये खेळवण्याचा सल्ला देऊन बघावा).
इंग्लंडच्या वातावरणात
इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा सराव नाहीं, हा मुद्दा खरा आहे. पण टी 20 मोड मधून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावर मात्र असाही एक विचाप्रवाह असू शकतो - टी 20ची सततची फटकेबाजी जरी प्रेक्षकांसाठी खूप आनंददायी असली तरी फलंदाजासाठी ती तशी असेलच असं नाहीं. कदाचित, आयपीएल मधील तशा खेळाच्या अपेक्षेला (व परिणामी येत असलेल्या टेनशनला ) )कंटाळलेले फलंदाज, शांतपणे खेळून
खेळ एंजॉय करायच्या मोड मध्ये असू शकतात ! विचार वेगळा असला तरी त्यात तथ्य असावं कारण टेस्टमध्ये कामगिरी करून दाखवणं, याचं गारूड तर प्रत्येक फलंदाजाच्या मनावर असेलच असेल ! ( ऑसी दौर्यापूर्वी पंत कसोटीतही इतका प्रभावी ठरेल असं मला तरी खात्रीपूर्वक वाटत नव्हतं )
तीन सामन्यांची सिरीज हवी
तीन सामन्यांची सिरीज हवी
>>
नक्कीच
आज पाँटिंगचं भाकीत आलंय wtc त
आज पाँटिंगचं भाकीत आलंय wtc त भारताचे कोणते खेळाडू महत्त्वाचे ठरतील इ. इ. आपल्या संघाबद्दल व खेळाडूंबदल असेच कॉमेंट्स इतर देशांचे खेळाडू ( पाकी तर अधिकच ! ) सतत करताना दिसतात. आपले खेळाडू, तज्ञ वगैरे देखील इतर देशातील खेळाडू, संघ निवड ई.वर असे कोमेंन्टस करत असतात का ? कधी फारसं वाचनात नाहीं आलं , म्हणून कुतुहल ! इथे निदान wtc औसिज आपले प्रतिस्पर्धी आहेत म्हणून पाँटिंग बोलतोय आसं नाहीं तर तो नेहमीच भारतीय क्रिकेटविषयी असे अधिकारवाणीने लिहीत असतो.
तीन सामन्यांची सिरीज हवी हे
तीन सामन्यांची सिरीज हवी हे काही पटलंं नाही.
म्हणजे समजा पहिल्या दोन सामन्यात बरोबरी झाली की विजेते पदाचा निकाल शेवटच्या एकाच सामन्यावर. एकूण एकच.
मग एखाद्या संघाने दोनचा लीड
मग एखाद्या संघाने दोनचा लीड घेईपर्यंत खेळवत राहावे
ऑसी दौर्यापूर्वी पंत कसोटीतही
ऑसी दौर्यापूर्वी पंत कसोटीतही...
>>>>
त्याआधीही त्याचे इंग्लंड ऑस्ट्रेलियात शतके होती
भारतात बॅक टू बॅक 90 प्लस स्कोर होते
माझा पंतचा फॅन क्लब धागा त्या फेमस ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच होता..
आपली टीम जिंकेस्तो्.
आपली टीम जिंकेस्तो्.
ऑस्ट्रेलिया साठी हेझलवूड WTC
ऑस्ट्रेलिया साठी हेझलवूड WTC अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर.
स्विंग गोलंदाज मायकल निसर ला स्क्वाड मध्ये त्हेझलवूड ची रिप्लेसमेन्ट म्हणून आता घेण्यात आले आहे.
माझा गट फील असा आहे कि आपण
माझा गट फील असा आहे कि आपण तीन अष्टपैलू खेळाडू (जडेजा, अश्विन आणि शार्दूल) अकरा मध्ये घेऊन उतरनार.
शमी आणि सिराज हे दोघेच फ्रंटलाईन पेस बॉलर खेळतील, उमेश आणि उनाडकत बेंच वर बसतील.
किशन त्याच्या बॅटिंग च्या भरवश्यावर विकेटकिपर म्हणून खेळेल, भरत बेंच वर बसेल.
अक अनुमोदन ! मलाही असेच
अक अनुमोदन ! मलाही असेच वाटते आहे.
आपले खेळाडू, तज्ञ वगैरे देखील इतर देशातील खेळाडू, संघ निवड ई.वर असे कोमेंन्टस करत असतात का ? >> मी नाही वाचलेले फारसे पण त्यात एक मुद्दा असाही आहे कि इतर देशातले खेळाडू आपल्या दौर्यासाठी कॉमेंट्री करायला, किंवा सिंडीकेट साईन अप वगैरे असतात. आपले असे किती असतात ह्याची कल्पना नाही. गावस्कर, शास्त्री , गंगू वगळता बाकीचे कोणी इतर संघांच्या दौर्याबद्दल ऐकण्यात आलेले नाहीत नि हेही अगदी अपवाद म्हणून.
एकूण एकच. >>एक सामना खेळून
एकूण एकच. >>एक सामना खेळून जिंकणे हरणे हे नाणेफेकीच्या निकालासारखे आहे. ज्याचा दिवस चांगला तो जिंकला. मर्यादित षटकांमधे ते पटते पण टेस्ट सारख्या लाँग क्लासिकल फॉर्मट मधे दोन्ही संघांना एकमेकांची बलस्थाने, पिचेस, हवामान वगैरे चा फायदा-गैरफायदा घेता यावा ह्यातून बेस्ट ऑफ थ्री मला योग्य वाटते. पाहूणा संघा बरेचदा सुरूवातीला जेव्हढा चाचपडतो तेव्हढा नंतर चाचपडताना कमी वेळा दिसतो - विशेषतः क्वालिटी प्लेयर्स.
मला वाटतं अश्विन, जडेजा
मला वाटतं अश्विन, जडेजा खेळतील. शामी, सिराज आणि उनाडकट (स्विंग बॉलर) असा बॉलिंग लाईनअप असेल. विकेटकीपर म्हणून भारतच खेळेल.
शर्मा, गिल, पुजारा, कोहली, रहाणे, भारत, जडेजा, अश्विन, शामी, उनाडकट, सिराज अशी टीम खेळेल असं वाटतंय.
क्रिकबझ इंस्टा अपडेट मधे
क्रिकबझ इंस्टा अपडेट मधे वाचलं की जर हवामान क्लिअर अन् सनी असेल तर भारत 2 स्पिनर अन् 3 पेसर खेळवेल (शार्दुल बाहेर)
पण जर पावसाची शक्यता / ढगाळ हवामान असेल तर जडेजा ऐवजी शार्दुल खेळेल.
उमेश अन् जयदेव पैकी कोण अन् भरत अन् किशन पैकी कोण खेळतं हे बघायचं
माझं मत भरत अन् जयदेव च्या बाजूनी
उमेश अन् जयदेव >> दोघेही
उमेश अन् जयदेव >> दोघेही लॉटरीच आहेत. एकाला अनुभव आहे पण कंसिस्टंसी नाही नि दुसर्याला सरफेसची मदत लागते नि अननोन फॅक्टर आहे. कोणालाही घेतले तरी प्रश्न असणारच आहेत.
आश्विन आईवजी शार्दुल आत.
आश्विन आईवजी शार्दुल आत.
त्यांचा गेल्या वर्षी सर्वात जास्त धावा करणारा उस्मान ख्वाजा शून्यावर बाद. झेल भरत गोलंदाज सिराज.
आने दो अभी.
नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी
नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी. मला तरी थोडं खटकली. सीम गोलंदाजी साठी अनुकूल परिस्थिती वगैरे. कित्येक कप्तान ह्या जुगारात फसले आहेत. का आपण कसोटी सामना खेळत आहोत त्याचा विसर पडला?
श्रीकर भारत चेंडू बरोबर पकडत
श्रीकर भारत चेंडू बरोबर पकडत नाहीये.
Pages