क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलग दोन सामने विल्यमसन ने खिशात घातले. ही इज बॅक अ‍ॅफ्टर लाँग स्लंप. लंका हॅज पुश्ड बियोंंड देअर वेट फॉर लास्ट फ्यू सिरीज.

WTC point system अपूर्ण आहे. ड्रॉ ला अजिबात मह्त्व नाही. किवीज - लंका सामना अनिर्णित राहिला असता तरी त्याची व्हॅल्यू बघता भारत - ऑसी तिसर्‍या सामन्यापेक्षा कमी कशी असू शकते ? समजा चौथा सामना पाचव्या दिवशी ऑसीज नी ब्रेक झालेल्या पिचवर दोनशे चा लीड वजा करताना ८-९ विकेट्स घालव्न अनिर्णित ठेवला असता तर त्याची किम्मत शून्य बरोबर ठरली असती का ?

एकदिवसीयमध्येही एक धावांनी विजय मिळवा किंवा ३०० धावांनी मिळवा. तितकेच गुण मिळतात.
रनरेट सुधारतो. पण तो समान गुण झाले तरच कामात येतो.

पर्सनली मला वाटते की अनिर्णित सामन्यात गुणांची समसमान वाटणी न करता होम टीमला कमी आणि पाहुण्यांना जास्त गुण द्यावेत. ४०-६० च्या रेशिओने. दुसऱ्याच्या घरात जाऊन सामना अनिर्णित राखणे हा छोटासा विजयच असतो. तसेच त्यामुळे होम टीम पाटा खेळपट्ट्या देखील बनवणार नाही. सामन्यांचा निकाल लागेल हे बघेन. पण पावसाचा फटका बसत शंभरेक ओवर फुकट जात असतील तर मात्र समसमान गुण वाटावेत.

सलग दोन सामने विल्यमसन ने खिशात घातले. >>>

हो पण डॅरील मिचेल हि तुफान फॉर्मात आहे. कदाचित मोठं रेप्युटेशन नसल्याने त्याची कामगिरी नजर अंदाज होत्ये.

गेल्या 10 कसोटी सामन्यात 6 अर्ध शतके आणि 4 शतके मारली आहेत.

*जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज*

विराट कोहली – 1803 (52 डाव)
रोहित शर्मा – 1794 (36 डाव)
चेतेश्वर पुजारा – 1728 (60 डाव)

बरीच वर्ष मला तीव्रतेने असं वाटतं की दोन देशांतील कसोटी मालिकांचा निकाल केवळ कसोटी जिंकण /हरणं व ड्रॉ यावरून न ठरवता, गुणतक्ता बनवून त्यानुसार प्रत्येक कसोटीला मिळालेल्या गुणांची बेरीज करून ठरवावा. या गुणतक्त्यात रनरेट, पीचचा दर्जा, टॉस जिंकल्याचा निर्णायक फायदा, ई.ना वाजवी महत्व असावं. थोडक्यात, दोन्ही संघाना मालिकेतील शेवटच्या कसोटी पर्यंत जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणं आवश्यक ठरेल. हाच गुणतक्ता कसोटी विश्वचषकाचे अंतिम दोन संघ निवडीसाठीही वापरावा.

भाऊ , श्रिनिवास न ने असा प्रयत्न केला होता काहि वर्षांपूर्वी. त्यात कोण कोणाबरोबर कुठे खेळते आहे नि दोन्ही संघांची तौलनिक ताकद काय आहे त्यावरून गुण बहाल केले होते. एकदम मस्त प्रयत्न होता तो. पिच त्यात थेट वापरलेले नव्हते पण समजा भारत ऑस्ट्रेलिआ मधे गेला नि तिथे जिंकला तर भारताचा आफ्रिकेमधल्या विजयापेक्षा कमी गुण मिळतील (कारण पास्ट हिस्टरी). त्याच बरोबर एखादा देश भारतात येऊन जिंकला तर त्याला त्याच देशाने आफ्रिके मधे जिंकण्यापेक्षा अधिक गुण मिळणार कारण भारताचा होम रेकॉर्ड अधिक चांगला आहे वगैरे. लिंक मिळाली तर देईन नंतर.

मला वाटते, प्रचंड मोठ्ठ्या प्रमाणावर पैसे देऊन वाट्टेल ती क्रिकेट मॅच बघणार्‍या भारतीय प्रेक्षकांना कुठल्याहि पद्धतीचा काहीहि फरक पडत नाही. पैसे जास्त भारतातच मिळतात. मग कशाला खटाटोप? उगीच आपले दाखवायला काहीतरी केले की झाले.

न्युझीलंड वि. श्रीलंका - शेवटच्या चेंडूवर न्युझीलंड विजयी ! आले देवाजीच्या मना. .... भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत !! Wink

*एकदम मस्त प्रयत्न होता तो * असामीजी, खूप कठीण आहे सर्वमान्य गुणतक्ता बनवणं . पण कसोटी क्रिकेट चालू ठेवायचं असेल तर त्या दिशेने तात्काळ प्रयत्न होणं अत्यावश्यक असावं.

दोन्ही संघांची तौलनिक ताकद नुसार गुण बहाल करणे हा बलाढ्य संघावर अन्याय आहे.
त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना जास्त गुण मिळणार आणि ते जिंकले तर त्यांना मात्र कमी. त्याच प्रतिस्पर्ध्यांना तिसऱ्या एखाद्या संघाने हरवले तर त्यालाही तुलनेत जास्त गुण मिळणार पण बलाढ्य संघाला कमी.
आयसीसी रॅंकिंगसाठी हे ठिक आहे. टूर्नामेंटला लागू नाही.

आणि पास्ट रेकॉर्ड हे देखील अंशत: ईनलॉजिकल आहे. यात त्या त्या देशतील खेळपट्ट्या प्रतिस्पर्ध्यांसाठी तितक्याच घातक असतील हे गृहीत धरलेय हे एकवेळ ठिक. पण गेले दोन दौरे म्हणजे सहा आठ वर्षाच्या कालावधीत दोन्ही संघाचे प्लेअर बदलले गेले असतील आणि त्याने पक्षीय बलाबल बदलले असेल त्याचे काय..

बव्हंशी खरंय. म्हणूनच, गुणतक्ता फार क्लिष्ट न करतां न्याय्य बनवणं खरं कठीण काम आहे, पण अशक्य नाही.

टेस्ट चॅम्पयनशिपमध्ये मोजल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये दोन देशातल्या होम आणि अवे अशा दोन्ही दौर्यांचा समावेश असायला हवा. काही देशांचा फक्त अवे अन् काहींचा फक्त होम टूर्स असं कडबोळं नको.

थोडं डीटेल प्लॅन करायला लागेल, पण ते फेअर असेल.
पीच बद्दलही कुणाला उगाच होम ॲडवांटेज मिळणार नाही, अवे टूर ला हिशोब चुकता होईल.

आत्ता ही देशांच्या रँक प्रमाणे त्यांच्यातली मालिका किती सामन्यांची असेल हे ठरतं (२ सामने ते ५ सामने), त्यानुसार प्लॅन मधे सगळ्या देशांचे साधारण समान सामने खेळले जातील असं बघता येईल.

फायनल ही 3 सामन्यांची अन् नॉन टेस्ट नेशन मधे ठेवता येईल (आबू धाबी / कॅनडा / नैरोबी वगैरे, दुबई पाक चं होम ग्राउंड असल्याने बाद)

बांग्लादेशने ट्वेंटी-२० मध्ये ईंग्लंडला व्हाईटवॉश दिला..
हे ईंग्लंडवाले टेस्टमध्ये बाझबॉल खेळतात आणि ट्वेंटी-२० मध्ये काय गोट्या खेळतात का Proud

प्लॅन मधे सगळ्या देशांचे साधारण समान सामने खेळले जातील असं बघता येईल. >> सुरूवातीला हा प्रयत्न होता पण कोव्हिड मुळे समीकरण बदलले. पण आता परत तसे करायला हरकत नसावी. तसेच प्रत्येक टीमला जवळजवळ समान सामने (होम नि अवे) खेळायला लावले पाहिजेत.

फायनल ही 3 सामन्यांची अन् नॉन टेस्ट नेशन मधे ठेवता येईल >> +१ किंवा एक एक सामना होम पिच वर नि एक अशा देशामधे - बेस्ट ऑफ थ्री.

किंवा एक एक सामना होम पिच वर नि एक अशा देशामधे - बेस्ट ऑफ थ्री
>>
हे आलं होतं मनात, पण ट्रॅव्हल अन् बाकी लॉजिस्टिक्स बघता अवघड पडेल...

वर्ल्ड कप फायनल मधे भरत च्या जागी राहुल ला कीपर म्हणून घ्यायचा सल्ला गावस्कर ने दिला आहे. ऑसीज च्या विरुद्ध पांड्या कसा कप्तानी करतो ते बघून त्याला वर्ल्ड कपला कप्तान म्हणून नेण्याबद्दल पण बोलला आहे.

*.....घ्यायचा सल्ला गावस्कर ने दिला आहे. * गावसका बद्दल क्रिकेटर म्हणून व समालोचक/ तज्ञ म्हणून आत्यंतिक आदर व प्रेम असूनही, हल्ली बरेच वेळा सनसनाटी विधाने करण्याकडे त्याचा कल झुकतो आहे असं वाटतं. ( त्याचा जुना व कट्टर चाहता असल्याने, मीं याबाबत चूक ठरवलं गेलेलं मलाच आवडेल ! )

हल्ली बरेच वेळा सनसनाटी विधाने करण्याकडे त्याचा कल झुकतो आहे असं वाटतं. >> Happy हो पूर्वीचा स्पष्टवक्ता गावस्कर लपाछपी खेळत असतो. वरची वाक्ये बोलणारा कुठला होता देव जाणे Happy

ट्याच्या डोक्यावर कधी लीली किंवा कुणा जलदगति गोलंदाजाचा चेंडू लागला होता का? शक्य आहे आता त्याचा परिणाम हळू हळू बाहेर येऊ लागला आहे.

राहूलच्या वनडे मधल्या स्थानाविषयी मागे इथेच चर्चा झाली होती. आजच्यासारख्या अनेक इनिंग्ज तो ह्याआधी सुद्धा खेळलाय (वनडे मधे). मस्त खेळला!! टी-२०/टेस्ट मधे जरी तो टोटली आऊट ऑफ फॉर्म असला, तरी वनडे मधे महत्वाचा प्लेयर आहे.

अय्यरच्या अनुपस्थितीत संजूला खेळवावं असं मला वाटतं. सूर्यकुमारला टी-२० ची जादू वन-डे मधे अजून तरी दाखवता आलेली नाहीये.

राहूलच्या वनडे मधल्या स्थानाविषयी मागे इथेच चर्चा झाली होती. आजच्यासारख्या अनेक इनिंग्ज तो ह्याआधी सुद्धा खेळलाय (वनडे मधे). >> Happy

सूर्यकुमारला टी-२० ची जादू वन-डे मधे अजून तरी दाखवता आलेली नाहीये. >> एक शतक वगळता ! वर्ल्ड कप देशात आहे बघता हूडा पण त्याच्या पार्ट टाईम बॉलिंग नि स्लॉग ओव्हर्स मधे लागणार्‍या स्लॉगच्या बळावर कँडीडेट ठरू शकतो. ठाकूर बरोबर मावी ला तयार करायला हवा हँडी बॅट्समन नि बॉलर म्हणून बॅकप म्हणून. तो इंजर्ड झाला तर कोणिच नाही तसा.

राहुल चौथ्यापाचव्या नंबरवर चेस करताना फार टेस्ट झाला नव्हता.
या नंबर वर खेळताना त्याचा पहिली फलंदाजी असतानाचा एवरेज १४ ईनिंग नंतर ६० आहे तर तेच चेस करतानाच्या दहा-अकरा ईनिंगमध्ये ३१ वर घसरत होता.

आज चांगला खेळला तो. फॉर्मशी झुंजत असताना आणि प्रचंड ट्रोल होत असताना खेळला हे विशेष. सामनावीर जडेजा ऐवजी त्याला द्यायला हरकत नव्हती. किपिंगही छान केलेली वाटते. हायलाईट्समध्ये दाखवत होते.

२०-२० मध्ये तो कोहलीपेक्षाही वरचढ क्लासिकल फटके खेळतो असे मी नेहमी म्हणत आलोय. पण त्याचा प्रॉब्लेम मोठ्या सामन्यात दडपणाखाली पसरायचा आहे. ते त्याने झेलायला शिकले पाहिजे. कोहली तिथेच नेमके उलटे करून जातो हे त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दाखवले.

चौथ्या पाचव्या क्रमांकावर वन डे मधे येणार्‍या खेळाडूचा फक्त एव्हरेज बघणे माझ्या मते धाडसी आहे. बहुतांशी वेळा वन डे मधे तिथेयेणारा खेळाडू सेट खेळाडू बाद झाल्यानंतर १०-२० ओव्हर्स बाकी असताना येतो. त्यावेळी त्याच्याकडून आहे तो रन रेट ठेवणॅ किंवा त्यापेक्षा अधिक जाणे हि अपेक्षा असते. स्लॉग ओव्हर्स मधे स्लॉग करताना शीर तळहातावर ठेवून खेळावे लागते. चेस करताना तर हे आकडे अधिकच जिकिरीचे होतात. नुसत्या आकड्यांऐवजी त्याने खेळलेल्या इनिंग्स लक्षात घेतल्या नि विशेषतः त्यांचा कोंटेक्स्ट की त्याची व्यॅल्यू लक्षात येते.

४-७ मधे खेळताना राहुल चा रेकॉर्ड असा दिसतो
https://stats.espncricinfo.com/ci/engine/player/422108.html?batting_posi...

४-७ क्रमांकावर : 26 मॅचेस - 953 धावा
१-३ क्रमांकावर : 26 मॅचेस - 992 धावा
१-७ क्रमांकावर : 52 मॅचेस - रन्स 1945
५ - ११ क्रमांकावर : 18 मॅचेस - रन्स 744
४ : 8 मॅचेस - रन्स 209
५ : 17 मॅचेस - रन्स 733 (इथे बहुतेक वेळा नॉट आउट राहिला आहे त्यामूळे सरासरी पन्नास पेक्षा अधिक आहे)
चेस करताना ४-७ क्रमांकावर 12 मॅचेस - रन्स 297

चेस करताना तर हे आकडे अधिकच जिकिरीचे होतात.
>>>
ह्नमम.. चेस करताना जिंकलेल्या सामन्यात १०० ची सरासरी असलेल्या धोनीचा बेँचमार्क आहे आपल्याकडे म्हणून दुसऱ्याकडूनही फार अपेक्षा करणे हार्श होत असेल.
राहुलबाबत तो तिथे अश्या सिच्युएशनमध्ये फार टेस्ट झाला नाही ईतकेच म्हटलेले. असो..

विलियमसन चे अजून एक शतक. टेनिस एल्बो च्या प्रॉब्लेम मधून पूर्ण रिकव्हरी झाल्याचं दिसतंय.

Pages