Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अक्षर पटेल चा विजय असो.
अक्षर पटेल चा विजय असो. षट्कार मारून विजयश्रीला खेचून आणले! २ चेंडू नि दोन गडी राखून भारत विजयी.
मॅच हातात असताना आवेश खान
मॅच हातात असताना आवेश खान ग्लोरी शॉट शोधण्यात गेला.
सध्या प्रत्येकाचा फोकस आपण कसे हिरो बनू यावर असतो असे वाटते. कारण ११ च्या संघात यापैकी कोणीच फिक्स नाहीये.
“मॅच हातात असताना आवेश खान
“मॅच हातात असताना आवेश खान ग्लोरी शॉट शोधण्यात गेला.” - असं नाही वाटलं. डोक्याच्या वर उसळलेल्या बाऊन्सरला, ७ बॉल्समधे ८ रन्स हवे असताना कुणीही बॅट्समन हूकच करेल. बाऊंड्रीवर कॅच जाणं हे त्या प्रयत्नांत घडू शकतं. तिथे दुसरा शॉट संभवतच नव्हता.
डोक्याच्या वर उसळलेल्या
डोक्याच्या वर उसळलेल्या बाऊन्सरला, ७ बॉल्समधे ८ रन्स हवे असताना कुणीही बॅट्समन हूकच करेल.
>>>
तुम्ही फक्त तो बॉल बघितला असावा. त्याचे आधीचेही सगळेच बॉल बघा.
मी लाईव्ह बघत होतो. १५ बॉल १६ वगैरेचा आरामात जिंकायचा सामना होता. पण त्याचे दर चेंडूला तेच प्रयत्न चालू होते. स्विंग ॲंड मिस. यात एक फोर आला आणि कित्येक बॉल ज्यांचा बॅटला अतापता नाही असे गेले. बॉल कुठलाही असो, आधीच ठरवून बॅट फिरवत होता. अनावश्यक एक्स्ट्रा रिस्क. ज्याची काही गरजच नव्हती. कारण समोर अक्षर ३१ बॉल ५५ वगैरे खेळत होता. पण याला विजयात आपले चमकदार योगदान हवे होते. आणि हे या संघात दर सामन्याला जाणवतेय. स्पर्धाच अशी झाली आहे म्हणा.
त्या दिवशी पंत पांड्याच्या भागीदारीतही जेव्हा आपले अर्धशतक होताच पंत त्याच्या मूळ शैलीनुसार खुलून मारू लागला तेव्हा एवढावेळ सहज ११० च्या स्ट्राईकरेटने खेळणारा पांड्याही अचानक प्रत्येक बॉलला मारू लागला. हि एक आपल्यातीलच स्पर्धा होती. दोन तीन फोर लागोपाठ मारून अजून एक मारण्यात बाद झाला. ५५ धावा हव्या होता साडेचारच्या आसपास धावगतीने.
म्हणून ईथे धोनीचे वेगळेपण दिसून येते. तो असता तर पंत आता सुटलाय. त्यात तो बादही होऊ शकतो हे ओळखून त्यालाच मारू दिले असते. त्यालाच हिरो बनू दिले असते. तो बाद झाला तर मग सुत्रे आपल्या हातात घेत सामना पुढे नेला असता. पण स्वत: त्याच्याशी मारण्याची स्पर्धा करून बाद झाला नसता कारण त्यापाठोपाठ पंतही बाद झाला असता तर ५० रन्सचा सामना फसला असता.
हार्दिक पांड्या आता जी मॅच्युरीटी दाखवतोय त्यात त्याने एक घर पुढे जावे. संघाचे हित कश्यात आहे हे ओळखून त्यानुसार खेळावे. यात कदाचित तुम्ही एका रात्रीत हिरो बनणार नाही. पण हे सातत्याने जमवू लागला तर धोनी जरूर बनाल.
काही गोष्टी असतात ज्या स्कोअरकार्डवर दिसत नाहीत. वा हायलाईटसमध्येही कळत नाहीत.
“ काही गोष्टी असतात ज्या
“ काही गोष्टी असतात ज्या स्कोअरकार्डवर दिसत नाहीत. वा हायलाईटसमध्येही कळत नाहीत.” - तुझी गृहितकं झाली का सुरू? पूर्ण मॅच पाहिली मी. आवेश खानची डेब्यू मॅच होती आज. दहाव्या नंबरचा प्लेयर आहे तो. उगाच त्याची धोनीसारख्या ३५० वनडेज खेळलेल्या प्लेयरशी, मिडल ऑर्डर बॅट्समनशी, तुलना करण्यात काही अर्थ नाही. आणि अगदी हवंच असेल तर धोनी त्याच्या पहिल्या वनडेमधे स्कोअर करायच्या anxiety मधे एक सुसायडल रन काढताना शुन्यावर रन-आऊट झाला होता. त्याची मॅच्युरिटी अनुभवातून आली होती. निदान आवेश खान ला त्याच्याकडे मॅच्युरिटी, गेम सिच्युएशन रीड करण्याची क्षमता आहे का नाही हे सिद्ध करण्याची संधी तरी मिळू दे.
आवेश खानची तुलना धोनीशी नाही
आवेश खानची तुलना धोनीशी नाही केली ओ
पोस्ट फुकट गेली माझी
धोनी पुढे पांड्याच्या पोस्टला आला होता.
आणि आवेश खानसमोर नॉनस्ट्राईकरला धोनी असता खेळायला तर त्याच्या पहिल्या अंदाधुंद फायरींगलाच धोनीने जाऊन खडसावले असते आणि हिरो बनण्यासाठी नाही तर संघासाठी खेळायला लावले असते.
आणि हो मी आवेश खानच्या
आणि हो मी आवेश खानच्या मॅच्युरीटीवर भाष्य करत नव्हतो तर मेंटेलिटीवर करत होतो. त्याच्या हिरो बनायच्या चक्करमध्ये आपण हरायची भिती होती.
आता तुम्हाला त्याची पुर्ण इनिंग बघून तो असे काही करतच नव्हता असे वाटत असेल तर ईटस ओके. जे मला दिसले ते मी सांगितले. तुम्हाला नाही दिसले ईटस ओके.
शॉर्ट बॉल आला. हूक पुल मारला. तिथे फिल्डर होता. कॅच गेला. क्रिकेट ईतकेच नसते. माईंड गेम बराच असतो अश्या डिसमिसल मागे. विंडीजने त्याला ट्रॅप करून घेतले हे खात्रीने सांगू शकत नाही. पण त्याच्या आधीच्या शॉटमागील धडपड त्यांना शंभर टक्के कळाली असणारच.
बाकी माईंड गेमचा विषय निघाला म्हणून धोनी आठवला. तो त्यातला जगात बाप माणूस आहे _/\_
<<<आवेश खानची तुलना धोनीशी
<<<आवेश खानची तुलना धोनीशी नाही केली ओ>>>
बर्याच लोकांना लिहिण्याची एव्हढी घाइ होते, की नीट वाचल्याशिवायच काहीतरी प्रत्युत्तर द्यायचेच असे ठरवून येतात इथे.
ते राहू दे.
भाउ नमस्करांकडून एका व्यंगचित्राची अपेक्षा आहे.
(No subject)
*भाउ नमस्करांकडून एका व्यंगचित्राची अपेक्षा आहे.* - अपेक्षा आहे म्हणून प्रयत्न केलाय-
अपेक्षा आहे म्हणून प्रयत्न
अपेक्षा आहे म्हणून प्रयत्न केलाय
>>
भाऊ,
लई भारी
नेहीप्रमाणेच...
आवेश खान वरून धोनी काय
आवेश खान वरून धोनी काय पांड्या काय पंत काय ? आवेशखान त्याला झेपत होते तेच करत होता . दहाव्या क्रमांकाचे बॉलर्स ज्यांना बॅटींग येत नाही पण अशा वेळी खेळावे लागते ते असेच खेळतात. अक्षर ने त्याला तेच सांगितले असावे हे उघड होते. कारण अक्षर शेवटची ओव्हर खेळणार हे नक्की होते त्यामूळे आवेश खानच्या विकेट ला अर्थ नव्हता. ह्याउलट तो सिक्स गेला असता तर प्रेशर विंडीज वर गेले असते. आधीच्या ओव्हर मधे त्याच्या बॅट फिरवण्यामधे लागलेला फोर मुळे पडलेला फरक लक्षात घे. *मी पूर्ण मॅच पाहिली आहे*
अक्षर पटेल मात्र भारीच खेळला
अक्षर पटेल मात्र भारीच खेळला काल. पेकिंग ऑर्डर मधे जाडेजाच्या पुढे सरकला वन डे साठी असे वाटले.
आधीच्या ओव्हर मधे त्याच्या
आधीच्या ओव्हर मधे त्याच्या बॅट फिरवण्यामधे लागलेला फोर मुळे पडलेला फरक लक्षात घे
>>>
आवेश खानने बॅट फिरवून १२ बॉल १० मारले. त्यात दोन फोर. आणि दहा डॉट बॉल गेले. बॅट फिरवत असूनही. ते नशीब आपले कि तो आधीच बाद झाला नाही.
बाकी काय झाले ते बघून नंतर कोणीही एक्स्पर्ट कॉमेंट देऊ शकते. पण ते घडताना काय चूक आणि काय बरोबर हे समजणे गरजेचे. कुठे किती रिस्क उचलायची हे तेव्हा कळायला हवे. कारण अंदाधुंद फटकेबाजी करताना तुमचे विकेट जायचे चान्स वाढणार हे बेसिक लॉजिक आहे.
आवेश खानचा एक फोर काय तीन सिक्स बसले असते तर लोकं आता त्याचे ईथे गुणगान करत असते हे मला माहीत आहे.
पण १७ बॉल १८ चा सामना होता. तो एक ओवर राखून जिंकलो असतो तर काही बोनस गुण मिळणार नसतो हे प्रत्येकालाच समजायला हवे
बरं तो शार्दुल ठाकूरही आधी
बरं तो शार्दुल ठाकूरही आधी असाच अनावश्यक शॉट मारून बाद झालेला जो त्या सिच्युएशनला गरजेचा नव्हता. त्यामुळे मागाहून आवेश खाननेही तेच करणे क्लेशकारक होते. त्यामुळे पर्सनली मला ते दोघे बाद होत विनिंग सिक्स अक्षरच्याच बॅटमधून आला याचा आनंदच झाला
मूळात आवेश खान हा पट्टीचा
मूळात आवेश खान हा पट्टीचा फलंदाज आहे हा महान समज तुझ्या सारख्या एक्स्पर्ट ला कसा झाला हे आधी समजाव. त्याचा पहिला वन डे सामना होता ह्याची एक्स्पर्ट ला कल्पना होती का ? बुमरा, शमी, उमेश, सिराज - आवेश खान सारखा पट्टाअ फिरवून खेळणार्या खेळाडूंची यादी मोठी आहे. ह्यात त्यांना क्रिकेट सेन्स कमी असणे हे नसून ह्याउलट "स्वतःच्या फलंदाजीच्या उणिवांची जाणीव नि नुसते मैदानावर थांबलो तर विकेट जाण्याचे चान्सेस अधिक आहेत तेंव्हा दहा बॉल मधे शून्य धावा पेक्षा २ बॉल मधे एखाद चुकार फोर" हा जास्त प्रीफर्ड अॅप्रोअच असू शकतो हे बेसिक लॉजिक आहे.
ईंग्लण्डच्या सामन्यात पांड्या
ईंग्लण्डच्या सामन्यात पांड्या मारत असताना पंतने आधी आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घातली. तसेच पांड्या गेल्यावरही पंतने सुरू झाला आहे तोच मारधाडीचा गिअर कायम राहू देणे योग्य समजले असताना जडेजाने कुठलीही हुशारी न दाखवणे हि मॅच्युरीटी झाली. धोनीपर्यंतही जायला नको. जडेजाला बघा आता. त्याच्याकडून शिकावे.
पंत, पांड्या, धोनी, जाडेजा नि
"पंत, पांड्या, धोनी, जाडेजा" नि आवेश खान हे एकाच कुवतीचे फलंदाज आहेत हे बेसिक ज्ञान मला नव्हते. खुद्द आवेश खान ला तरी आहे का हे माहित नाही.
नुसते मैदानावर थांबलो तर
नुसते मैदानावर थांबलो तर विकेट जाण्याचे चान्सेस अधिक आहेत तेंव्हा दहा बॉल मधे शून्य धावा पेक्षा २ बॉल मधे एखाद चुकार फोर" हा जास्त प्रीफर्ड अॅप्रोअच असू शकतो हे बेसिक लॉजिक आहे.
>>>
अपेक्षित पोस्ट होती.
आवेश खान ईतका अडमतडम फलंदाज नाहीये.
आणि विंडीज गोलंदाही ईतकी भेदक नव्हती.
असो
आई ग्ग..
आई ग्ग..

आवेश खानची फलंदाजीची तुलना मी धोनी पंत पांड्याशी करतोय हे कुठे जाणवले तुम्हाला
बर्र शार्दुलला कुठल्या पंक्तीत घेतले मी आता. तुम्हीच सांगा मला
कालपासून धोनी, पांड्या, पंत
कालपासून धोनी, पांड्या, पंत ज्या मेंटेलिटीमधे खेळतात तसे आवेश खान खेळला नाही हे घोर पातक झाले हे आपल्या डू आयडी वरून येणारे पोस्ट्स आहेत का ? जी व्यक्ती फलंदाज नाही तीने फलंदाजासारखे खेळावेच हे गमतीशीर आहे
"आवेश खान ईतका अडमतडम फलंदाज नाहीये." >> संपूर्ण कारकीर्द नवव्या नि दहाव्या क्रमांकावर खेळणार्या महान फलंदाज आवेश खानची बॅटींग कारकिर्द https://www.espncricinfo.com/player/avesh-khan-694211/bowling-batting-stats
ठाकूर च्या विकेट बद्दल मी एकही चुकार शब्द लिहिलेला नाही ह्या क्षुल्लक गोष्टीकडे तुझे लक्ष वेधू इच्छितो
पंत हा एक अविश्वसनीय टॅलेंट
पंत हा एक अविश्वसनीय टॅलेंट असलेला फलंदाज आहे. तरी त्याच्या मॅच्युरीटीवरून एकेकाळी त्याने बरीच टिका झेलली आहे. ती मॅच्युरीटी एखाद्या ११ नंबरच्या फलंदाजातही असू शकते हे मुळात समजून घ्यायला हवे. मॅच्युरीटी म्हणजे फलंदाजीतले टॅलेंट वा स्किल नाही तर गेम सिच्युएशन रीड करून आपली क्षमता काय आहे हे ध्यानात घेऊन खेळणे.
पण ते सोडा, तुम्हाला मुद्दाच नाही कळाला आहे.
नवीन खेळाडू मॅच्युरीटीत कमी पडला याबद्दल माझी काहीच तक्रार नसती.
पण कालचे शार्दुल वा आवेशचे खेळणे हे लॅक ऑफ मॅच्युरीटीपेक्षाही त्यांनी हिरो बनायचा प्रयत्न केला हे खटकले. मॅच्युरीटी खेळतील तसे वाढेलच. पण मला हि मेंटेलिटी घातक वाटतेय जी सध्या संघात जागा मिळवायच्या स्पर्धेने रुजतेय.
आता शार्दूल ठाकूर नि आवेश
आता शार्दूल ठाकूर नि आवेश एकत्र टाकून नसलेल्या मुद्द्याला पुष्टी देण्याचा प्रयत्न का ? मूळात फिक्स्ड आयपील सारखे "त्यांनी हिरोगिरी करायचा प्रयत्न केला" हे गृहितक. एका विशिष्ट रन रेट च्या पुढे एकमेव बॅट्समन म्हणता येईल अशा अक्षर पटेल ने रिस्क घेणे योग्य कि पेनल्टीमेट ओव्हर मधे आवेश खान ने घेणे योग्य ह्याबद्दल थोडा विचार करून बघ.
पेनल्टीमेट ओव्हर म्हणजे ४९ वी
पेनल्टीमेट ओव्हर म्हणजे ४९ वी ना?
आवेश खान ४८ व्या ओवरला ३ ओवर १९ असतानाही हेच करत होता.
तो आल्यापासून हेच करत होता. बॉलचा अंदाज न घेता करत होता म्हणून सातत्याने बॅट फिरवूनही ईतके डॉट बॉल आलेले.
असो
आता शार्दूल ठाकूर नि आवेश
आता शार्दूल ठाकूर नि आवेश एकत्र टाकून नसलेल्या मुद्द्याला पुष्टी देण्याचा प्रयत्न का ?
>>>>
हेच मी बोलतोय.
मुद्दाच कळला नाहीये
मूळात फिक्स्ड आयपील सारखे
मूळात फिक्स्ड आयपील सारखे
>>>
आयपीएल का आठवली ईथे?
आयपीएलबाबत माझी मते काय आहेत त्याचा ईथे काय संबंध?
आयपीएलबाबत माझी मते काय आहेत
आयपीएलबाबत माझी मते काय आहेत त्याचा ईथे काय संबंध? >> साधी गोष्ट आहे . वर स्पष्ट लिहिलेले आहे. तुला नक्कीच कळले असेल.
मुद्दाच कळला नाहीये >> मुद्दा ? फिक्स्ड आयपील सारखे "त्यांनी हिरोगिरी करायचा प्रयत्न केला" हे कसलाही आगा पिछा नसलेले गृहितक ह्यापलीकडे काहीही नाही.
तिसर्या एकदिवशीय सामन्याचे
तिसर्या एकदिवशीय सामन्याचे गणित कळले नाही.
भारताने ३६ षटकात २२५ धावा केल्या. मग वेस्ट इंडीजला ३५ षटकात २५७ धावा का?
पावसामूळे षटके वाया गेली कि
पावसामूळे षटके वाया गेली कि किती षटके वाया गेली नि किती विकेट्स बाकी होत्या ह्याप्रमाणॅ डकवर्थ लूईस प्रमाणे हे टारगेट ठरवलेले असते.
बिचारा गिल, आज पण शतक हुकले. अय्यर ला स्पिन खेळताना बघणे हा एक मस्त अनुभव असतो. सेहवाग नंतर स्पिनर म्हणजे फक्त हाणण्यासाठीच असतात अशा स्टाईल मधे खेळणारा फलंदाज. (ह्यात अतिशोयक्ती आहे पण भावना समजून घ्या) त्याची हि हुसेन ची चेस मॅच सुरू होती एकदम.
तिसर्या एकदिवशीय सामन्याचे
तिसर्या एकदिवशीय सामन्याचे गणित कळले नाही.
>>>
फॉर्म्युलांमागचे लॉजिक सांगतो.
जर सामन्याआधी पाऊस पडला आणि सामना सुरूच तीस ओवरचा झाला. तर फलंदाज वेगात धावा जमवतात. पण तेच सामना पन्नास ओवरचा म्हणून सुरू झाला, तर फलंदाज विकेट सांभाळून खेळतात. अश्यात जर एखाद्या संघाने २० ओवरमध्ये एक विकेट गमावून १०० धावा मारल्या आणि मध्येच पाऊस पडून सामना ३० ओवरचा झाला. तर उरलेल्या दहा ओवरमध्ये नऊ विकेट हातात असूनही ते बिचारे किती मारणार. जी सुरुवात पन्नास ओवरच्या सामन्यासाठी चांगली वाटत होती तीच ३० ओवरच्या सामन्यासाठी गचाळ ठरेल. त्यांच्यावर हा अन्याय होईल. तोच टाळायला त्या सिच्युएशननुसार त्यांचा प्रोजेक्टेड स्कोअर काढतात आणि ते ॲड करून शेवटी फायनल टारगेट वाढते.
हे उलटेही होऊ शकते. म्हणजे एखाद्या संघाने २५ ओवरमध्येच ८ विकेट गमावल्या आणि मग पाऊस पडून सामना ३० ओवरचा झाला तर टारगेट कमी होऊ शकते. कारण तसेही ते पन्नास ओवर खेळणारच नव्हते.
प्रत्यक्ष सामन्यात शेपूट वळवळते म्हणा. पण तुम्ही किती ओवर्स आणि विकेट नामक रिसोर्स वापरले आणि किती शिल्लक आहेत हेच आपण फॉर्म्युलात बांधू शकतो.
अय्यर ला स्पिन खेळताना बघणे
अय्यर ला स्पिन खेळताना बघणे हा एक मस्त अनुभव असतो
>> Can't agree more
ही सिरीज अय्यर साठी चांगली ठरली
कालच्या सामन्यात चहलला सामनावीर मिळायला हवा होता. गिल च्या धावा महत्त्वाच्या होत्याच, पण रन रेट रोखून विकेट्स घेतल्यानी विजय मिळाला
Pages