स्त्रियांच्या लग्नाचे वय १८ असावे की २१? कायदा येण्या पुर्वी चर्चा

Submitted by अश्विनीमामी on 20 December, 2021 - 05:37

सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.

ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.

अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.

आपणास काय वाट्ते.?

https://indianexpress.com/article/explained/raising-legal-age-for-marria...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळ बा बा बा म्हणायला लागले कि लगेच बॉटनी, झुलॉजी उरकून टाकावे. पहिली ते पदवी. पाय टाकायला लागले कि जॉगरफी शिकवा.
भात, चपाती खायला लागले कि फिजिक्स केमिस्ट्री फिनिश. तिस-या वर्षी त्याचं मास्टर्स व्हायला पाहीजे. चौथ्या वर्षी लग्न आणि पाचव्या वर्षी नोकरी.
प्रॉब्लेम्स सॉल्व्ह्ड.

वीस ,एकवीस वर्षी मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहण्यास सक्षम व्हायला हवी .
त्या साठी उपाय योजना,कायदे,नियम,सुविधा सरकार नी निर्माण करायला हवेत.
फक्त लग्नाचे वय कायद्याने २१ करून स्त्री सक्षम होणार नाही.
हेच तर सांगायचे आहे.

अमेरिकेत राहणारे इथे आहेत त्यांच्या कडे दहावी ,बारावी स्लॅब आहे का?
जगात सर्व च देशात भारत सारखी १०+२+५ हा स्लॅब आहे का
डिग्री साठी.

त्या साठी उपाय योजना,कायदे,नियम,सुविधा सरकार नी निर्माण करायला हवेत.
>>>सरकारने सुविधा पुरवायला हव्यात, प्रबोधन करायला हवे हे ही मान्यच. पण जबाबदारी फक्त सरकारचीच आहे का? आपण जन्माला घातलेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी आपण काही प्रयत्न नको करायला? लग्न करून दिलं की झालं का?

जगात सर्व च देशात भारत सारखी १०+२+५ हा स्लॅब आहे का
>>>

मागे कुठेतरी वाचलेले की आपली शिक्षणव्यवस्था ईंग्रजांनी त्यांच्यासाठी चाकरमानी तयार व्हावेत अशी बनवली होती आणि आपण त्यातच अडकलो आहोत.

करोडपती होणे हेच शिक्षणाचे ध्येय नसते.
समाजात उत्तम नागरिक तयार व्हावेत. सत्य, प्रामाणिकपणा, दया, क्षमा, शांति इ. चांगले गुण सर्वांच्या अंगी यावेत. कलह, हिंसा कमी व्हावेत.
समाजात सर्वांनाच हे शिक्षण मिळावे. गुणांचा ज्ञानाचा आदर व्हावा असे शिक्षण सर्वांना मिळावे.
म्हणजे समाजाची उन्नति होईल.

<<<<मागे कुठेतरी वाचलेले की आपली शिक्षणव्यवस्था ईंग्रजांनी................................. अडकलो आहोत.>>>>
२ फेब. १८३५ या दिवशी मेकॉले या इंग्रज ग्रुहस्थाने लिहीले त्याचा सारांश इतके दिवस मी नेहेमी वाचत आलो आहे.:

"I do not believe we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage and therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own. They will lose their self esteem,, their native culture culture and become what we want them, a truly dominated nation."

तसे झाले. दोष मेकॉले ला द्यायचा की आपल्या पूर्वजांना, मेकॉलेने असे ख्रेच लिहीले होते का हे वादाचे विषय होतील व आहेत. पण मला खात्री आहे की हे असे झाले, नवीन शाळा सुरु झाल्या नि आपण गुलाम झालो. आणि बर्‍याच बाबतीत अजूनहि आहोत.

मेकॉलेच्या नावावर जे फिरतंय ते फेक आहे . १८३५ पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा बहुतेक भाग ताब्यात घेतला होता. फक्त शीखांचं राज्य तोवर शाबूत होतं. मेकॉले मिनिट्स इथे वाचता येतील
http://home.iitk.ac.in/~hcverma/Article/Macaulay-Minutes.pdf

आपली आत्ताची शिक्षण पद्धती फार ग्रेट आहे असं नाही पण त्या सदोष शिक्षण पद्धतीच्या आधारे का होईना स्रियांचे सबलीकरण होऊ शकते हे लक्षात आल्यावर तिच्यातले दोष एकदम प्रकर्षाने जाणवत आहेत याची गंमत वाटतेय!

आपली पूर्वीची शिक्षणपद्धती जगात नावाजलेली होती.
पूर्वी इथेच वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. आधुनिक वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे विज्ञान शिकवले गेले. अणूचा शोध रूद्रा फर्डे नावाच्या एका शेतकर्‍याने लावला. नीलम भोर नावाच्या एका तरूणीने अणूचे मॉडेल बनवले. करे दांपत्याने रेडीओ अ‍ॅक्टीव्ह मटेरिअल्स शोधून काढले.
नूतन नावाच्या एका ब्राह्मण विदुषीने गुरूत्वाकर्षणाचा शोध लावला आणि भौतिकशास्त्रातले तीन नियम सांगितले. आई आणि सून यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. वेडीसून या टोपणनावाने तळपदे नावाच्या एका पंडीताच्या सुनेने वीजेच्या दिव्याचा शोध लावला.
भयंकर क्रांती झाली होती इथे.

<दोष मेकॉले ला द्यायचा की आपल्या पूर्वजांना, मेकॉलेने असे ख्रेच लिहीले होते का हे वादाचे विषय होतील व आहेत. पण मला खात्री आहे की हे असे झाले, नवीन शाळा सुरु झाल्या नि आपण गुलाम झालो. आणि बर्‍याच बाबतीत अजूनहि आहोत. > हे वाचलं नव्हतं.

म्हणजे खोटं आहे हे माहीत असूनही तेच खरं आहे असं धरून चालायचं, तेच दामटून सांगत राहायचं हा आजार जुना आहे आणि अमेरिकास्थित भारतीयांतही आहे तर.

नवीन शाळा सुरू झाल्या आणि भारतातल्या ज्या एका मोठ्या वर्गाला शिक्षण -ज्ञान यांच्यापासून वंचित ठेवलं होतं, त्यांच्यासाठी शिक्षणाची , प्रगतीची दारं खुली झाली, त्यांना स्वत्वाची जाणीव झाली, त्यामुळे प्रिव्हिलेज्ड वर्गाला नुसता आपला प्रिव्हिलेज सुटत चालल्याचं पाहून गुलाम झाल्याचं वाटत असेल तर ते समजू शकतो. त्यांचा प्रयत्न तेव्हाही नव्या शिक्षणाची गंगा सगळ्यांपर्यंत पोहोचू नये असाच होता.

दहा वर्ष नंतर दहावी
२ वर्ष नंतर बारावी.
डॉक्टर किंवा बाकी पदवी घेण्या साठी .
सहा वर्ष च पकडा एकद जादा च पकडा.
त्या नंतर डॉक्टर सोडून बाकी लोकांचे अजून कोर्स दोन वर्ष पकडा .
त्या नंतर नोकरी लागायला किंवा व्यवसाय चालू करायला दोन वर्ष.
किती झाले टोटल २८ वय होते तो पर्यंत .
तो पर्यंत त्या मुलाचा आर्थिक भार उचलावा लागणार.
त्या साठी त्याघे आई वडील नोकरीत असावेत.
त्यांनी जर ३२ vya वर्षी मुल जन्माला घातले असेल तर
३२ प्लस २७
त्यांचे वय ५९ वर्ष असेल.
शारीरिक ,आर्थिक बाबतीत पूर्णतः कमजोर.
हा माझा पॉइंट आहे.
शिक्षणात २७ वर्ष जात असतील तर काही तरी चुकतंय असे वाटत नाही का.
आणि तेच सर्कल पुढे चालू राहतं असेल
तर अजून पुढे गंभीर समस्या येतील असे मला सुचवायचे आहे.>> कुच्छ भी. ह्याला सपोर्टिन्ग व्हॅलिडेटिन्ग विदा आहे का?

लवकर लग्न झाले की त्याची पूर्ण जीवनावर परिं णाम होतात.
वन्स यु फिगर आउट यु केन लिव्ह अ ग्रेट लाइफ. पण जबरदस्ती नसावी. ह्याची गरज मला पदो पदी भासली आहे.

पीजी पुण्यात पूर्ण करुन लग्न झाले असते तर चांगल्या नोकर्‍या मिळाल्या असत्या सुरुवाती पासूनच. साखरपुडा लवकर झाल्याने १२ वरचा फोकस गेला. व मेडिकल ची अ‍ॅडमिशन हुकली. थोड्या पर्सेंटने. प्रत्येक ठिकाणी मी हुषार आहे. मला समजते सिन्सिअर आहे हे समजाउन द्यायला फार मेहनत घ्यावी लागली जी पीजी डिग्री हातात असती तर नसती लागली. बॉसेस तुम्हाला वेगळे ट्रीट करतात. मा नहानी सहन करावी लागते. ह्याचे आता वाइट वाटत नाही पण यु डु थिं क अबाउट द मिस्ड चान्से स.

एका मुलीच्या बाबतीत इतर सर्व निर्णय घेतात पन परिणाम तिलाच सहन करून मार्ग काढावा लागतो. म्हणून मी मुलीं च्या बाजूने आहे.

सुप्रभात अमा, तुम्ही खरच चतुरस्त्र आहात. मानले तुम्हाला.

पण ते आई कुठे काय करतेची पिसे मात्र काढत रहा.

चांगला मनुष्य बनण्यासाठी शिक्षण घेतलं असे सांगणारे खूप कमी भेटतात. शिक्षणाचा उपयोग नोकरीसाठी असतो असे मानणारे ९९% च्या वर भेटतात. माझे आसामात चहाचे मळे असते, वाडवडलांचे उद्योग व्यवसाय असते तर आत्मिक समाधाना साठी शिक्षण घेत बसलो असतो. एकदा कोकणात एक चाळीशीतली गृहीणी भेटली होती. नोकरी वगैरे करत नाही. पण कोरियन शिकत होती. तिची सासू चायनीज शिकत होती. हात पाय हलतात तोपर्यंत शिकायचं म्हणाल्या दोघी. मनापासून पाया पडलो.

हे वरचे मेकॉले चे अवतरण त्याच्या ब्रिटिश पार्लमेंट मध्ये केलेल्या भाषणातील आहे असा प्रचार केला गेलाय आणि जातोय. मूळ उताऱ्यात तशी टीप आहे. शिवाय पिवळट पडलेल्या कागदावर तथाकथित मिनिट्स मधला उतारा छापलेला फोटो होता तो. बाजूला मेकॉलेचे चित्रही होते. पण हे फॉरवर्ड फेक आहे. कारण ब्रिटिश पार्लमेंट च्या मिनिटस् मध्ये त्या काळात (१८३५ साली)असे कुठलेही चित्र छापले जात नव्हते. शिवाय २ - २ १८३५ ह्या दिवशी मेकॉले हिंदुस्थानात होता! किंबहुना त्या वर्षाचा बहुतांश काळ तो भारतात होता.
ह्या प्रोपगंड्याचा उगम भारतीय जनता पार्टीच्या वीस पंचवीस वर्षांपूर्वीच्या एका निवडणूक वचननाम्यात आहे.
याविषयीचे एक पुस्तक माझ्यापाशी आहे, त्यात अनेक पुरावे आहेत.
पुस्तकाचे नाव पटकन आठवत नाहीय. पण डोक्यात आणि कपाटात शोधाशोध केली तर नक्की सापडेल.

तीन दिवसीय चिंतन शिबीर पार पडले की डोक्यात घुसलेले बाहेर काढायला दरवर्षी एक नवीन पिढी समाज माध्यमात मेकॉलेचा उद्धार करत सुटते. आधीची भरीला असतेच. मेकॉलेला वर किंवा नवीन जन्मात इतक्या उचक्या लागत असतील की डॉक्टर चक्रावून गेले असतील.

अमा
तुमचे उदाहरण अपवाद म्हणून ग्राह्य धरता येईल पण तुमचे उदाहरण हे सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही.
समाजात मी सांगितलेली स्थिती च जास्त आहे.
अगदी आपल्या बाजूची उदाहरणे जरी बघितली तरी लक्षात येईल
नोकरी मधून निवृत्त झाल्या नंतर करण्यास काहीच योग्य काम नसल्या मुळे एकटे पडणे आणि त्या मधून नैराश्य येणे.
ही शहरी नोकरदार वर्गाची समस्या आहे.
आणि शिकत असताना दुसरी कोणतीच जबाबदारी नसणे आणि त्या मुळे शिक्षण व्यतिरिक्त कोणत्याच स्किल नसणे, कला नसणे .ही तरुणांची समस्या आहे.
आणि कौटुंबिक जाणीव पण नसणे ही वृत्ती तरुणान मध्ये विकसित होत आहे.

अमा, रिस्पेक्ट!

नवीन शाळा सुरू झाल्या आणि भारतातल्या ज्या एका मोठ्या वर्गाला शिक्षण -ज्ञान यांच्यापासून वंचित ठेवलं होतं >>> भरत, त्या नवीन शाळांमधून शिकवले जाणारे ज्ञान पूर्वी मुळात होतेच कोठे? विज्ञान, तंत्रज्ञान, गणित वगैरे कोणताच वर्ग शिकत नसे. जे काही शिक्षण होते ते सगळे पारंपारिकच होते की.

इतरत्र नवीन माहिती / ज्ञान उदयास येत होती आणि ती विरोध सोसूनही अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होत होती.
आपल्याकडे मात्र ज्ञान पारंपरिक राहिले होते.

धन्यवाद. वैयक्तिक पार्ट काढून टाकला आहे. पन मुद्दा आहे.

हो पण मध्यमवर्गीय सुशिक्षित आर्थिक सुस्थितीत ल्या हुषार मुलींची जर परवड ओढाताण होते तर अशि क्शित, धर्म रुढी परं परांचा, लोक काय म्हणतील ह्याचा धसका घेतलेल्या आई वडिलांच्या मुलींची परिस्थिती ह्या हुनही वाइट आहे. २०२१ मध्ये सुद्धा.

काही जमातींमध्ये अजूनही लग्न झाल्यावर मुलगी व्हर्जिन होती ह्याचा पुरावा जात पं चायतीत दाखवावा ला गतो. ह्यात मुलींना किती जबरदस्ती लाजिर वाणे पणा वाटत असेल ते बघा. ह्या बद्दल काही तरुणांनी आंदोलन चालवले होते मध्यंतरी. जु हू बांद्रा सो बो , जिमखाना प्रभात रोड च्या मुली स्वतंत्र फील करत असतील पण इतरत्र परिस्थिती भयानक आहे ( मुलींसाठी) . इतर धर्मीय मुलींची अजुनच वाइट आहे. त्यांना ह्या कायद्याने मदत होईल. अशी अपेक्षा आहे.

जमीन अधिग्रहण आणि फार्म लॉज या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील दोन कायद्यांच्या बाबतीत जे झालं- कायदे करून मागे घेणं- ते पाहता सरकार या बाबतीत घाई करेल असं वाटत नाही. पण या निमित्ताने जी चर्चा घडली त्यातून तथाकथित (alleged) पुरोगाम्यांचे दडवलेले प्रतिगामी पत्ते दिसले. वय वाढलेल्या पुरुषाला कोवळी तरुणी उपलब्ध झालीच पाहिजे. म्हणून 18-21 हा फरक असलाच पाहिजे. स्त्रीचं अस्तित्व मुख्यत्वे मुलं जन्माला घालण्याचं मशीन हेच आहे. हे विचार अतिशय toxic आहेत.

काँग्रेसने अधिकृत भूमिका या कायद्याला विरोध करण्याची घेतली असली तरी पी चिदम्बरम यांनी व्यक्तिगत सपोर्ट केला आहे व घाई न करता एक वर्ष कायद्याचा लोकांपर्यंत प्रचार करून 2023 पासून लागू करावा असा सल्ला दिला आहे तो चांगला आहे.

बारावी पर्यंत शिकलेल्या मुलाला शिक्षणातून जीवनात त्याच्या कामाला येणारे काय ज्ञान मिळते.
१) लीहता वाचता येते.
२) एकाधी एक्स्ट्रा भाषा लिहता वाचता येते
३) शरीराची बेसिक रचना समजते,शरीराचे कार्य कसे चालते ह्यांचे थोडेफार ज्ञान
4) देशाचा भूगोल,देशाचं सरकार कसे चालते ह्यांचे ज्ञान.
५) भौतिक शास्त्र मधील बेसिक ज्ञान,गणिताच्या माध्यमातून आकडेवारी.
थोडे अकाउंट ची माहिती.आणि थोडे वातावरण,पर्यावरण,प्राणी,जीव सृष्टी ची माहिती.बस
व्यवहारात
ह्या मुलांना सरकारी कार्यालयात जावून स्वतः कोणतेच काम करता येत नाही
पुस्तकात जे आहे ते व्यवहारात नसते.
साधे जातीच्या दाखल्ासाठी ते अगदी जमिनीचे उतारे काढण्यासाठी त्यांना एजंट ची गरज लागते स्वतः त्यांना प्रोसेस समजत नाही
गणित मधून बेरीज वजाबाकी शिकलेली असते पण व्यवहारात त्यांना बँक वसूल करत असलेल्या व्याजाची पद्धत पण समजत नाही.
साधी साधी खरेदी करणे पण समजत नाही
ही काही उदाहरणे.
शिक्षण चे प्रत्यक्ष व्यवहारात ,रोज च्या कामात उपयोग होत नाही .
त्या साठी बदल तर आवश्यक आहे.
पुस्तकी ज्ञान बरोबर प्रॅक्टिकल ज्ञान देणे ह्या प्रकारची शिक्षण पद्धत असली पाहिजे.

हीरा, फारेण्ड,
पारंपारीक ज्ञानात राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, साहीत्य, भाषा इ. शिकवत होते. त्याचा फायदा होत नाही असे कसे म्हणता येईल ? जागरूक समाज घडण्यासाठी आवश्यक आहे ते. वैज्ञानिक क्रांती होत आहे हे जाणून घेऊन आपल्यात बदल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शेतात राबणार्‍या अडाणी कुणब्याला बाहेरचे बदल कसे कळतील ?

Pages