Submitted by अश्विनीमामी on 20 December, 2021 - 05:37
सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.
ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.
अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.
आपणास काय वाट्ते.?
https://indianexpress.com/article/explained/raising-legal-age-for-marria...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
WHITEHAT :अअनेक वेळा मुली १८
WHITEHAT :
अअनेक वेळा मुली १८ ला प्रेमविवाह करायचा हट्ट धरतात. धर्मांतराची घाई करतात. अशावेळी आईवडिलांनी कितीही सांगितलं की २१ पर्यंत थांब, निदान पदवी घे तरी मुली ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. >>>
हे आणि अशा कॉमेंट संदर्भात कोणीतरी जर १८ व्या वर्षी एवढ्या नादान असतील तर मतदान तरी कशा करत असतील, ते वयही २१ करा असे म्हटले आहे.
२१ वर्ष हा कायदा करत आहेत म्हणुन नाही.
पुढे तुम्ही म्हणता:
करात यांचा सगळा लेख वाचला नाही पण त्यांनी पुरुषांचं वय १८ करायची सूचना केली आहे ती पटली. एकतर २१ किंवा १८ हे वय ठरवलं तर त्यात लिंगभेद नको.
जर आधीची कॉमेंट बरोबर असेल तर मग मुलांचे वय १८ करून तो प्रश्न कसा सुटणार?
काहीतरी एक नक्की करा. मला मुलींचे दोघांचेही लग्नाचे वय सारखे करायचे आहे: दोघांचे १८ किंवा दोघांचे २१
की
१८ वर्षी मुली अजून नादान असतात, धर्मांतर वगैरे करू शकतात त्यामुळे लग्नाचे वय २१ करायचे?
कायद्यातील बदलाचा उद्देश
कायद्यातील बदलाचा उद्देश स्त्रियांची वर चर्चिलेली स्थिती सुधारणे हा नाही,असे कळले.
We're, in a democracy, 75 years late in providing equal rights to men and women to enter into matrimony. Through this amendment, for the first time, men and women will be able to make a decision on marriage at the age of 21, keeping in mind the right to equality," said Union Minister Smriti Irani.
मी माझे सगळे मुद्दे मागे घेतो.
तमाम भारतीय स्त्रियांना विवाहाबाबत मिळू घातलेल्या समानतेबद्दल त्यांचे अभिनंदन.
मानव,
मानव,
21-21 हा सरकारने घेतलेला निर्णय पुढे गेला(if it passes), तर त्याला पाठिंबा आहे. ते शक्य नसल्यास 18-18 करायला हवं. पण 18-21 बदलायला हवं ,निदान modify करायला हवं कारण ते समानतेच्या तत्वाला धरून नाही.
कायद्यातील बदलाचा उद्देश
कायद्यातील बदलाचा उद्देश स्त्रियांची वर चर्चिलेली स्थिती सुधारणे हा नाही,असे कळले.//
ऑ???स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कामात समानतेमुळे मदत, push मिळेल असं वाटत नाही?? Isn't equality the foundation and basic right?
आताच्या करिअर धारी
आताच्या करिअर धारी जोडलप्यांचा विचार केला तर.
लग्न ह्यांचे.
स्त्री ३० वर्ष आणि पुरुष ३२ वर्ष हे आहे
आधुनिक विचारांचे प्रचंड दडपण असल्या मुळे मुल दोन वर्ष नंतर.
तेव्हा जोडप्याचे वय
स्त्री ३२ आणि पुरुष.३४
वर्ष.
ह्यांची मुलगी जेव्हा २१ वर्षांची होईल तेव्हा.
आई ५३ वर्षांची आणि बाप ५५ वर्षाच्या असेल.
तेव्हा हे जोडपे मुलीचं लग्न करणार की त्यांचे म्हातारपण ठीक जावं म्हणून बंदोबस्त करणार.
सर्व च काही सरकारी नोकर नसतात किंवा आयटी मध्ये प्रचंड पगार घेत नसतात.
लग्न उशिरा होण्या मुळेवआणि
लग्न उशिरा होण्या मुळेवआणि उशिरा मुल होण्या मुळे काय दुष्परिणाम होतील ते आता दिसायला लागले आहेत
आई बाप म्हातारे आणि पोर नोकरी धंद्याला पण नाहीत.
खूप वाईट अवस्था आहे पहिल्या सुशिक्षित जोडप्यांची.
मुळात शिक्षणाचा आणि स्वतःच्या
मुळात शिक्षणाचा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा काडीचा संबंध नाही.
ती यूपी ,बिहार मधील मुल मुंबई कमी वयात येतात आणि कोणत्या तरी व्यवसायात स्वतःला स्थिर करतात.
गुजराती ,मारवाडी समाजात पण मुलांना थोडे कळते झाले की व्यवसायात टाकतात.
आपली मध्यम वर्गातील मुल आई वडिलांच्या पाठिंब्यावर इंजिनिअर,किंचा कोणती तरी डिग्री घेतात आणि वयाच्या तीसित पण बेकार च असतात.
आई वडिलांच्या वर च अवलंबून असतात
तो पर्यंत ते अडाणी यूपी,बिहारी,मारवाडी समाजातील मुल ,घर घेवून लग्न होवून एक दोन पोरांचे बाप पण झालेले असतात.
आणि आई वडील जबाबदारी मधून मुक्त पण झालेली असतात.
२१ वर्ष वयाच्या आत मुल झालेच पाहिजे .
आणि तीच पद्धत अतिशय योग्य आहे
हो
हो
पण ते आजच्या शिक्षण युगात अशक्य आहे
२१ वर्षे हे मूल जन्माला
२१ वर्षे हे मूल जन्माला घालण्याचे वय असू नये असे वाटते. कारण दर २१ वर्षांनी नवी पिढी जन्माला येईल आणि एका माणसापासून त्याच्या हयातीत (७५ वर्षे समजूया) एकंदर चार माणसे पृथ्वीवर नांदतील. ३० -३२व्या वर्षी मूल जन्माला आले तर तीनच माणसे असतील. लोकसंख्यावाढीचा दर तेव्हढाच कमी होईल. अर्थात लोकसंख्यावाढ कमी करण्याचे सरकारी, सामाजिक उद्दिष्ट असेल तर.
लोकसंख्या वाढ कमी करणे हा
लोकसंख्या वाढ कमी करणे हा हेतू असला तरी एक च मुल पुरे हा मार्ग आहे पण त्याचे पण दुष्परिणाम दिसू लागले आहेत.
मुलींनी ची संख्या कमी होत आहे.
उत्पादन शम तरुण लोकांची संख्या कमी होत आहे.
चीन लं ह्याचा धक्का बसला आहे.जपान लं बसत आहे.
शिक्षणाचं आणि व्यावहारिक जीवनात उपयोगी पडतील असे ज्ञान ह्याची सांगड घालण्यात अपयश आलेले आहे.
शिक्षण पूर्ण केले की व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम होईल ह्याच बिलकुल संबंध नाही .
शिक्षण पूर्ण होण्यासाठी लग्नाचे वय वाढवले .त्या मुळे मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.
त्या कशा?
हे काही समजत नाही.
मुल सुद्धा शिक्षण पूर्ण केले की स्वतःच्या पायावर उभे राहतील
ते कसे ?
हे पण समजणे अवघड आहे.
शिक्षणाचं स्तोम नव्हते पण शिक्षणाचे महत्व मात्र होते तेव्हा पंधरा वर्षाची मुल घरातील जो व्यवसाय आहे त्या मध्ये सहभाग घेत असत.
शेती असेल,दुकान असेल,बाकी काही उद्योग असेल त्या मध्ये त्यांचा सहभाग असायचा.
आता शिक्षणाचे इतके स्तोम माजवले गेले की अगदी २२ ते २५ वयापर्यंत मुलांचा कोणत्या उत्पादक कार्यात सहभाग नसतो.
अनुत्पादक पिढी तयार होत आहे
गंभीर पणे विचार करण्यासारखी स्थिती आहे.
या धाग्यावर माझी सर्वात पहिली
या धाग्यावर माझी सर्वात पहिली पोस्ट आहे तेच मुद्दे आता येऊ लागले आहेत.
गंमत अशी आहे की ईथे चर्चा
गंमत अशी आहे की ईथे चर्चा करणार्या आपल्या कोणालाही या कायद्याची थेट झळ बसणार नाहीये, वय १८ असो वा २१ काही फरक पडणार नाहीये. समाजाच्या ज्या स्तराला फरक पडणार त्यांचा कोणी प्रतिनिधी असा ईथे नाहीये.
१३२ पोस्टी झाल्यावर हे लक्षात
१३२ पोस्टी झाल्यावर हे लक्षात येत असेल तर मुलांच्या लग्नाचे वय २१च बरे. १८-१८ करू नका...

(No subject)
सी,
सी,
हे देखील मी कालच म्हटलेले की
हे देखील मी कालच म्हटलेले की मुले प्रगल्भ नाही होत लवकर मुलींच्या तुलनेत.. तेव्हा कोणाला पटत नव्हते.
पण आम्हाला फक्त एकूण एक गोष्टीत स्त्री पुरुष समानता हवीय. भले ती निसर्गाच्या विरोधात जाणारी का असेना..
जर मुलगा पुर्णपणे वयात आला नसेल वा तितकीच प्रगल्भता आली नसेल तर तो कसे हॅंडल करणार हे नाते?
एका ठराविक वयापर्यंत मी मुलींना प्रपोज करायला याचसाठी घाबरायचो की ती हो म्हणाली तर पुढे काय करायचे हे मला माहीत नव्हते... विचार करा तेव्हा लग्न लावले असते घरच्यांनी तर काय केले असते.
भाऊ, प्रगल्भ होणे ही प्रोसेस
भाऊ, प्रगल्भ होणे ही प्रोसेस फायनाईट आहे. लौकिक अर्थाने नसेल तरी कायदेशीरपणे आहे. एकदा १८ /२१ जो काय प्ल्याटू असेल तो आला की आला. आता वाढ संपली. जगाच्या अंतापर्यंत तीनची वजाबाकी करायचा सराव नकोय करायला.
शिक्षणामुळे मुलगा अथवा मुलगी
शिक्षणामुळे मुलगा अथवा मुलगी स्वतःच्या पायावर उभे रहात नाहीत असं मत असेल तर लग्नाचे वय १८ की २१ यावर चर्चा न करता, पोरांना शाळेत घालावे की नाही यावर चर्चा करायला हवी.
बाकी चालू दे.
जिज्ञासाच्या सर्व मुद्द्यांना + १
१३२ पोस्टी झाल्यावर हे लक्षात
१३२ पोस्टी झाल्यावर हे लक्षात येत असेल तर मुलांच्या लग्नाचे वय २१च बरे. १८-१८ करू नका... >>>
सी
जगाच्या अंतापर्यंत तीनची
जगाच्या अंतापर्यंत तीनची वजाबाकी करायचा सराव नकोय करायला. >>> छे छे, पुढे ही गॅप वाढत जाते म्हणे.
अमितव,
अमितव,
एक वर्षाच्या मुलाची धावण्याची शर्यत तीन वर्षाच्या मुलाशी लावली तर ते फारच अन्यायकारक होईल
पण तेच चौदा वर्षाच्या मुलाची शर्यत सोळा वर्षाच्या मुलाशी लावणे तितके अन्यायकारक होणार नाही.
भले दोन्ही शर्यतीत दोन्ही बालकांच्या जोडीत २-२ वर्षांचेच अंतर आहे.
वर मुद्दा तोच आहे.
जर वयात आल्यावर मुलींना दोन वर्षांची मार्जिन मिळत असेल तर मुलांनाही हवी.
त्यामुळे मुलेमुली दोघांचे वय २१ करायला हरकत नाही एकवेळ, पण दोघांचे १८ केले तर मुलांसाठी ते अन्यायकारक होईल. ती समानता नसेल.
इथली चर्चा वाचून तुम्ही वयात
इथली चर्चा वाचून तुम्ही वयात कधी आला? असा धागा निघेल की काय अशी शंका येते>>> हे विधान करून आपण नेहेमी जे लोक धागे काढत असतात त्याना एक सूचना दिली आहे. बघू या काय होते ते.
(No subject)
ज्या ज्या वेळेस गवर्नमेंट
ज्या ज्या वेळेस गवर्नमेंट लोकांच्या खाजगी (हो खाजगी, इंडिया इज ए डेमक्रॅटिक कंट्रि अॅड गवर्नमेंट हॅज नो बिझनेस इंटरफियरिंग इन पिपल्स प्रायवेट लाइफ) आयुष्या बाबत निर्णय घेते - याचा अर्थ एक समाज या अर्थाने आपण अजुन मागासलेले आहोत. खर्या लोकशाहित गवर्नमेंट लोकांवर खाजगी प्रकरणांत कुठल्याच प्रकारे सक्ती करु शकत नाहि. मच्युअर्ड (मुरलेल्या) लोकशाहिचा तो एक इंडिकेटर आहे.
शहरी भागात लिव-इन इज ए नॉर्म, पण ग्रामीण भागात बालविवाह (असुमिंग सच थिंग स्टिल हॅपन्स, आय्हॅव नो क्लु). टु एन्ड्स ऑफ द स्पेक्ट्रम. या परिस्थितीत कायद्यात बदल करण्याची आवश्यकता मला तरी वाटंत नाहि...
नवरा मुलगी जावू द्या आणि नवरा
नवरी मुलगी जावू द्या आणि नवरा मुलगा ही जावू द्या आपली लोकशाही अजून वयात का नाही आली त्याचा विचार करावा लागेल.
आपली लोकशाही कधी वयात येणार आणि कधी प्रगल्भ होणार ह्याचीच चिंता आहे.
राज ह्यांचे मत अगदी योग्य आहे कायदा करणे म्हणजे लोक अजून अडाणी आहेत असे समजणे.
प्रगल्भ लोकशाही मध्ये लोक च स्वतःच योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात .
कायद्याची गरज नसते.
लग्न कधी करावे हा निर्णय पण लोक घेण्यास सक्षम नसतील तर ते मतदान करण्यास तरी सक्षम आहेत का?
काही प्रतिक्रिया वारंवार भावी
काही प्रतिक्रिया वारंवार भावी मुलं आणि त्यांची सेटलमेंट याकडे जात आहेत. ज्या मुली आत्ता अस्तित्वात आहेत, त्यांचा विचार नको करायला? त्यांच्या जीवनात त्यांना चांगल्या संधी मिळेल असं बघावं की भविष्यातल्या मुलांचा विचार करुन, भावी आयांच्या संधी लिमिटेड करुन टाकाव्यात?
मुलं जन्माला घालणे एवढेच मुलीच्या अस्तित्वाचे सार आणि आधुनिक जगात लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का?
लग्न, मुलं हे आयुष्याचे भाग आहेत, महत्वाचे आहेत, पण फक्त याच गोष्टी आयुष्य नाहीत.
एका आंब्याच्या झाडाचं मनोगत -
एका आधुनिक माणसांच्या माणसाळलेल्या आंब्याच्या झाडाचं मनोगत - "जरी माझ्या आईने मला जन्माला घातलं असलं तरी मी हा निसर्गनियम धुडकाऊन लाऊ शकतोच की..! आम्ही काय फक्त आंबेच द्यायचे का..? जरा कधी हिरवी तर कधी पोपटी तर कधी लाल पानं लेऊन आनंद व्यक्त करु नये का..? जमीनीत मिळणार्या रसाने चांगलं बाळसं धरून सुर्यप्रकाशाने भरपूर अन्नद्रव्यं तयर करून चहु बाजुंनी प्रगती साधावी.... सुर्याच्या दिशेने वाढत जावे.. चांगलं मोहरून दआखवावं तर ते बघुन आनंद घ्या की.. कैर्या-आंबे कशाला हवेत..?? कैर्या लागल्या की लोकं दगडं मारणार, माकडं फांद्यांवर चढून त्या कैर्या ओरबडणार.. त्यातून काही कैर्या पिकून आंबे होतील मग त्या आंब्यांच्या कोया, साली... शी.... कशाला हवं हे सर्व..?? त्यापेक्षा नुसतं पालवी फुटून अन मोहरून आयुष्य जगता येतं हे कसं कळत नाही इतरांना..??"
तिसाव्या वर्षी लग्न करून ३५
तिसाव्या वर्षी लग्न करून ३५ व्य वर्षी मुलांना जन्म देणारे स्त्री आणि पुरुष आर्थिक बाबतीत मोठे यशस्वी होतात अगदी करोडपती च असतात(करिअर म्हणजे तुम्ही किती पैसे कमावत ह्यांचे गणित ) असा काही नियम आहे का?
अशी समाजात जास्त प्रमाणात उदाहरण आहेत का?
वीस वय असताना लग्न आणि २१ वय असताना मुल झालेले स्त्री पुरुष अत्यंत गरीब आहेत का?
अशी काही उदाहरणे आहेत का?
बिल गेट्स च्य मुलीने पण २४ vya वर्षी लग्न केले पस्तीस वय होण्याची वाट नाही बघितली.
लवकर लग्न,मुल,आणि प्रगती ह्याचा संबंध असेल तर .
जो लवकर लग्न करतो ,ज्यांना लवकर मुल होतात ती लोक तिसित लग्न आणि पस्तीस वयात मुल असणाऱ्या लोकांना पेक्षा जास्त सुखी आणि यशस्वी असतात
डिजे : तुम्ही माझा प्रतिसाद
@डिजे : तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाही. म्हणून पुन्हा लिहिते.
लग्न, मुलं हे आयुष्याचे भाग आहेत, महत्वाचे आहेत, पण फक्त याच गोष्टी आयुष्य नाहीत.
बाकी एखाद्या झाडाला कैर्या, आंबे द्यायचे नसतील तर तो सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. पण या धाग्यावर त्याची चर्चा नको.
@हेमंत : इथे कुणी ३५ व्या वर्षीच लग्न करावे असा कायदा करण्याला सपोर्ट दिल्याचे मी वाचले नाही. आणि तुमच्या या
(जो लवकर लग्न करतो ,ज्यांना लवकर मुल होतात ती लोक तिसित लग्न आणि पस्तीस वयात मुल असणाऱ्या लोकांना पेक्षा जास्त सुखी आणि यशस्वी असतात) विधानाला काही शास्त्रीय आधार, आकडेवारी असं मला वाटत नाही. असेल तर जरून शेअर करा.
२१ व्या वर्षी लग्न करून त्याच
२१ व्या वर्षी लग्न करून त्याच किंवा २२ व्या वर्षी मूल जन्माला घालायला बंदी आहे का? ज्यांना असे करायचे आहे त्यांनी करावे. ज्यांना उशीरा लग्न करायचंय, मूल उशिरा जन्माला घालायचंय/घालायचंच नाही त्यांना करू द्या त्यांच्या मर्जीप्रमाणे.
आता काय २० च्या आत लग्न केलेच पाहिजे, २१ च्या आत पहिले मूल २३ च्या दुसरे मूल जन्माला घातलेच पाहिजे कायदा करण्याची मागणी करणार का?
Pages