Submitted by अश्विनीमामी on 20 December, 2021 - 05:37
सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.
ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.
अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.
आपणास काय वाट्ते.?
https://indianexpress.com/article/explained/raising-legal-age-for-marria...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्लॅक कॅट, रखमाबाई राऊत पोस्ट
ब्लॅक कॅट, रखमाबाई राऊत पोस्ट छान
रखमाबाईची पोस्ट आज निरुपयोगी
रखमाबाईची पोस्ट आज निरुपयोगी आहे असे माझे मत आहे
कारण थंड पाणी आंघोळीला घेउ नका , 20 ऐवजी 40 डिग्रीचे घ्या असे आंदोलन पहिले झाले ते यशस्वी होईल,
त्याच्यापुढे त्याचा आदर्श घेऊन आता 40 चे 60 डिग्री करा असे कुणी बोलले तर तो वेडेपणा होईल
मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी
मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी करा. लग्न करायचं, लिव्हइन करायचं, पळून जायचं का आणि काय करायचं हे प्रत्येकाला आपलं आपलं ठरवू द्या. सज्ञान १८ ला होतात तेव्हा वाहन चालक परवाना मिळतो, मतदान करता येते, नोकरी करता येते, गुन्हा केला तर पूर्ण शिक्षा तुरुंगात जाऊन भोगावी लागते इ. सगळं होतं तर लग्न का करता येऊ नये? पूर्वी मागासलेपणा मुळे १८-२१ कायदा होता असं मला वाटतं. आता ७५ वर्षे जाऊन ही मागासलेपण कमी होणार नसेल तर मग करा सगळ्यांनाच २१ वय. तसं ही शिक्षण, नोकर्यांच्या जागा न वाढल्याने रॅट रेस मध्ये टिकाव धरायला आपली जात मागास कशी बनेल याची चढाओढ भारतात चालतेच. मुलींना शिक्षण, संरक्षण देणं ७५ वर्षांत जमलं नाही तर मग आता लग्नाचं वय २१ करा. लोकसभेला कायदे करण्याचे काम आहे, तेव्हा कायदे हे केलेच पाहिजेत. माध्यमांनी चर्चा केली पाहिजे.
सज्ञान १८ ला होतात तेव्हा
सज्ञान १८ ला होतात तेव्हा वाहन चालक परवाना मिळतो, मतदान करता येते, नोकरी करता येते, गुन्हा केला तर पूर्ण शिक्षा तुरुंगात जाऊन भोगावी लागते इ. सगळं होतं तर लग्न का करता येऊ नये? >>
स्त्री पुरुष समानताच साधायची असेल तर मुलाचे लग्नाचे वय २१ वरून १८ का करु नये? मुले-मुली दोघांनाही वरील गोष्टी १८ झाल्यावर लागू आहेत ना?
स्त्री पुरुष समानताच साधायची
स्त्री पुरुष समानताच साधायची असेल तर मुलाचे लग्नाचे वय २१ वरून १८ का करु नये?
>>>>>
काही भेद निसर्गानेही स्त्री-पुरुषात केले आहेत. स्त्री-पुरुष समानता करणार्यांना हे बरेचदा समजत नाहीत वा समजून घ्यायचे नसतात.
काय आहेत हे भेद? या संदर्भात
काय आहेत हे भेद? या संदर्भात?
इव्हेंच्युली दोघांचे वय १८ च
इव्हेंच्युली दोघांचे वय १८ च करावे.
स्त्री लवकर वयात येते, पुरुष
स्त्री लवकर वयात येते, पुरुष उशिरा येतात
काय आहेत हे भेद? या संदर्भात?
काय आहेत हे भेद? या संदर्भात?
>>
स्त्री लवकर वयात येते, पुरुष उशिरा येतात
>>
हो, माझ्या माहितीनुसार तरी हेच. माझी माहिती चुकीचीही असू शकते. प्लीज जाणकार कन्फ्रर्म
म्हणुन मुद्दाम या संदर्भात
म्हणुन मुद्दाम या संदर्भात म्हटलं.
१८ वर्षांपर्यंत मुलांची प्युबर्टी पूर्ण होत नाही?
१८ वर्षांपर्यंत मुलांची
१८ वर्षांपर्यंत मुलांची प्युबर्टी पूर्ण होत नाही?
>>>
काय वय असते मुलांचे आणि मुलींचे वयात येण्याचे?
जर खरेच मुली दोन तीन वर्षे आधी वयात येत असतील तर त्यानंतर दोघांनाही सेम मार्जिन ठेवून लग्नाच्या वयातही तोच फरक असावा.
१८ च काय काही काही जण चाळिशी
१८ च काय काही काही जण चाळिशी ओलांडल्यावर पण
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स,
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कनडा इथे १८ वर्षे मुले-मुली दोघांसाठी आहे. म्हणजे तेथील मुली आपल्या मुलींच्या बरोबरीने वयात येतात. आणि आपली मुले तिकडच्या मुलांच्या मानाने उशिरा वयात येतात असे असावे.
काय वय असते मुलांचे आणि
काय वय असते मुलांचे आणि मुलींचे वयात येण्याचे?
प्रश्न हा आहे. यात मग जगभरात कायद्यानुसार काय वय आहे ते नंतर बघूया.
वयात येण्याचे वय माहीत नाही
वयात येण्याचे वय माहीत नाही तर मग ती निसर्गतःच भेद कॉमेंट नक्की कसल्या संदर्भात होती?
वयात येण्याचे वय गुगळून सापडेल.
काय वय असते मुलांचे आणि
काय वय असते मुलांचे आणि मुलींचे वयात येण्याचे? >>> +१
पब्लिक ओपिनियन
https://www.youtube.com/watch?v=EU8u82WML4I
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल -
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल - लग्नाचे वय नसेल तर लिव इन मधे रहा
https://www.youtube.com/watch?v=G1ptr2NZbvA
लॉ कमिशनच्या शिफारशी
https://www.youtube.com/watch?v=YLUmaynk1Ys
ओळखीत तीन मुली आहेत ज्या
ओळखीत तीन मुली आहेत ज्या बालकल्याण समितीमार्फत एका संस्थेत वाढत होत्या.
ही संस्था १८ व्या वर्षी निराधार मुलांना बाहेर काढत नाही तर वोकेशनल आणि मुल कपेबल असेल तर पदव्यूत्तर शिक्षणसुद्धा देते. या संस्थेचा प्रयत्न प्रत्येक मुलाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा असतो.
दोन मुली असे व्होकेशनल कोर्सेस करत होत्या. तिसरी बारावीला होती व स्टेट लेवलला खेळाडू होती.
मुली १८ वर्षांच्या झाल्यावर तिन्ही मुलींच्या नातेवाईकांनी मुलींना संस्थेतून काढून लग्न लावून दिली. १८ वर्षापर्यंत या नातेवाईकांचा त्यांत्या जडण घडणीत शून्य हातभार होता.
एक मुलगी गृहिणी आहे. दुसर्या दोघी नावापुरत्या असे कोर्सेस करत आहेत ज्याला काही मार्केट व्हॅल्यू नाही.
हातात असलेली पायावर उभे राहण्याची संधी त्यांच्याकडून हिसकावून घेतली गेली याची अजून हळहळ वाटते. स्वतःच्या क्षमता पूर्णपणे एक्स्प्लोअर करून या मुली गृहिणी झाल्या असत्या तर माझा आक्षेप नव्हता.
ज्या मुली घरात राहत नव्हत्या त्यांच्यावर एवढे प्रेशर तर ज्या घरात असतात त्यांच्यावर किती प्रेशर असेल लग्नाचे?
वरील चर्चेत काही गोष्टी पटल्या नाहीत.
लग्न करून शिक्षण पूर्ण करणे हे काही अवघड नाही.
>> ज्या मुलींना आत्ता लग्न करायचे की नाही हे विचारत नाहीत तिथे पुढे शिकायचे आहे की नाही हे विचारतील?
वय वाढत जाते तसे फर्टिलिटी इश्युज वाढत जातात.
>>> खरे आहे. आणि भारतिय समाजात अजूनही अपत्यप्राप्ती हा वैवाहिक जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो.
पण जे अजून जन्मले नाही त्याचा विचार महत्वाचा की जित्या जागत्या माणसाच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा महत्वाच्या?
आत्ता १८ व्या वर्षाच्या आत विवाह होत नाहीत का?
>>> होतात. पण ज्यांना ते मनापासून मान्य नाही त्यांना लिगल रिकोर्स उपलब्ध नाही का? बातम्या येतात ना पेपरमधे की बालविवाह रोखला. ज्यांना ते मान्य असतील/ आक्षेप नसेल त्या मुली हा मार्ग चोखाळत नसाव्यात.
माझे समर्थन आहे विवाहाचे कायदेशीर वय वाढवायला.
वयात येण्याचे वय माहीत नाही
वयात येण्याचे वय माहीत नाही तर मग ती निसर्गतःच भेद कॉमेंट नक्की कसल्या संदर्भात होती?
>>.>
वर म्हटलेय ना की माझ्या माहितीनुसार मुली आधी वयात येतात.
फक्त कन्फर्म वय माहीत नाही. अजूनही ईथे कोणी कन्फर्म करत नाहीये ही माहिती खरी की खोटी.
धर्मगुरूंच्या मते उचित वय
धर्मगुरूंच्या मते उचित वय
सदगुरू
https://www.youtube.com/watch?v=9E9xI0n6jHE
झकीर नाईक
https://www.youtube.com/watch?v=VsB72Wa_KZI
वय वाढत जाते तसे फर्टिलिटी
वय वाढत जाते तसे फर्टिलिटी इश्युज वाढत जातात
>>>
हे ईश्यू वाढायचे वय ३०+ असावे. लग्नाचे १८ चे वय २१ झाले तरी दोन अपत्यांना जन्म द्यायला पुरेसे आहे.
भारतीय मुलग्यांपेक्षा भारतीय
भारतीय मुलग्यांपेक्षा भारतीय मुली लवकर मोठ्या होतात हे खरे आहे. ह्यावर सरासरी वयोमान वगैरे माहिती नेट वर आहे.
मला मराठीत विकीवर हे सापडले.
मला मराठीत विकीवर हे सापडले.
पौगंडावस्था (Puberty[१]) हा लैंगिक संक्रमणाचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या वर्षी होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली [मासिक पाळी] येणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.
√√√√√
मुलामुलीच्या लग्नाच्या वयात किमान एक वर्षाचा फरक तरी हवाच. तरच ती समानता.
१८ वर्षी दोघांची वाढ पूर्ण
वृंदा करत यांचा चांगला लेख.
वृंदा करत यांचा चांगला लेख.
https://www.ndtv.com/opinion/centres-hypocrisy-in-raising-marrying-age-f...
१८ वर्षी दोघांची वाढ पूर्ण
१८ वर्षी दोघांची वाढ पूर्ण होते म्हणजे लगेच बोहोल्यावर चढयचं नाहिये.
>>>>
एक्झॅक्टली. तुम्ही मुलींना वयात आल्यावर एक वर्षे स्वातंत्र्य देत आहात. किंवा कोणी मुलगी वयात यायला उशीर झाला तरी तिला एका वर्षाची मार्जिन देत आहात. पण मुलांना मात्र कडक नियम. हे चुकीचे आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास मुलांच्या टीमची फलंदाजी चालू असताना वाईडची लाईन एक फूट बाहेर सरकवत आहात आणि मुलींच्या फलंदाजीवेळी एक फूट आत घेत आहात तर कसे चालेल? मुलांसाठी मार्जिन ऑफ एरर कमी करत आहात..
मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय
मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठराच असावे.
तसेही बर्याच मुलींची लग्ने वयाच्या १५-१६ मधेही होत आहेत.ही गावाकडील गोष्ट नाही तर शहरातील आहे.
जे लोक शिक्षणाचे महत्व जाणतात, त्यांच्यासाठी कशाला कायदा ?
Submitted by देवकी on 20 December
अअनेक वेळा मुली १८ ला प्रेमविवाह करायचा हट्ट धरतात. धर्मांतराची घाई करतात. अशावेळी आईवडिलांनी कितीही सांगितलं की २१ पर्यंत थांब, निदान पदवी घे तरी मुली ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. Grooming केलेलं असू शकतं. अशावेळी या कायद्यामुळे फायदा होईल. मधल्या ३ वर्षात एकतर मुलीचा विचार बदलेल. किंवा जर केलंच लग्न तरी निदान पदवी हातात आलेली असेल.
आणि हो, पाश्चात्य देश करतात
आणि हो, पाश्चात्य देश करतात ते सारे काही बरोबर नसते वा आपल्याला जसेच्या तसे लागू नसते.
तिथली लग्नसंस्था आणि आपली लग्नसंस्था, व्हर्जिनिटी गमावायचे वय, अपत्यसंख्या वगैरे सर्वच बाबतीत जमीन अस्मानाचा फरक आहे. तिथे मुलामुलींचे लग्नाचे वय काय आहे यावरून आपले ठरवण्याचा प्रश्नच नाही.
मला तरी वाटते मुलामुलींचे
मला तरी वाटते मुलामुलींचे दोघांचे लग्नाचे वय २१ च हवे. कारण शाळा कॉलेजातील प्रेम बहुतेक केसेसमध्ये आकर्षणातून लांबचा विचार न करता आले असते. त्या प्रेमालाच अंतिम समजून लग्न केले की पस्तावणेच हातात पडते. नुसते शारीरीकदृष्ट्या वयात आले म्हणून लग्न केले तर ईतर जनावरांमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक काय?
मला आता स्वत:लाच आठवूअन् हसायला येते की मी शाळा कॉलेजात असताना कोणाकोणाच्या प्रेमात पडलेलो आणि हिच आपले आयुष्य असे समजलेलो. नशीब शिक्षण पुर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नव्हते अन्यथा कुठेतरी अडकलोच असतो जिथे आम्ही दोघेही एकमेकांना लायक नव्हतो.
Submitted by vijaykulkarni on
Submitted by vijaykulkarni on 21 Decemb
करात यांचा सगळा लेख वाचला नाही पण त्यांनी पुरुषांचं वय १८ करायची सूचना केली आहे ती पटली. एकतर २१ किंवा १८ हे वय ठरवलं तर त्यात लिंगभेद नको. नाहीतर पुरुषांना मतदान २१ ला, ड्रायव्हर लायसन्स २१ ला ,केजीला प्रवेश मुलीला चौथ्या वर्षी, मुलाला सातव्या वर्षी असं सगळीकडे +३ करा!
Pages