चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धूम २ मधल्या ऋत्विक ऐश्वर्याच्या किसिंग सीन मुळं अभिषेकला पब्लीकने सिरीयसली घेणं बंद केलं. त्यांचं लग्नं ठरलं होतं. धूम सिरीज मधे उदय चोप्रा आणि अभिषेक ला येड्यात निघण्याचंच काम होतं.

कोणाचे लग्न ठरलं होतं ? अभिषेक कि हृतिक कि ऐश्वर्या कि उदय? का बिपाशा बद्धल बोलताय चित्तांग ?

अभिषेक अंडररेटेड अभिनेता आहे म्हणताच लोकं आता त्याच्या अभिनयाची तुलनाही नवाझुद्दीन आणि पंकज त्रिपाठी यांच्याशी करू लागलेत हे मोठे गंमतीशीर आहे Happy

कोण म्हणालं अभिषेक अंडरग्राऊंड आहे ? का ? काय केलं त्याने ? चांगला आहे तो. अभिनयात थोडा कमी पडतो.

अभिषेक ची तुलना फक्त रिथिक शी व्हायला हवी... एकाच वर्षी डेब्यू... रेफ्यजी आणि कहो ना... मी दोन्ही थेटरात पाहिले .. एक ऋत्विक साठी आणि एक करीना साठी... अभिषेक , नवाज , पंकज त्रिपाठी बघण्यासाठी कोणी थेटरात जात नाही...

ऋन्मेष सरांनी शाखरूख खान अभिषेक बच्चनसमोर कच्चा पेरू आहे हा जो निष्कर्ष काढला आहे त्याला अनुमोदन.
च्रप्स सरांनी जॉन अब्राहमचं लग्न कुणाशी झालं हे सांगितलं नाही. पुढचा धागा काढून ठेवा.

दसवी ४ दिवसांपासुन पहाते आहे. संपेचना. अजुनही बराच बाकी. अभिषेक बच्चन काही सीन्समधे (बोलत नाही तेव्हा) डोळ्यांचे व चेहर्‍याचे हावभाव जरा बरे करतो पण आवाजात काहीच वजन नाही त्यामुळे बोलतो तेव्हा निष्प्रभ ठरतो. चालतो पण जोर नसल्यासारखा. नाच येत नाही. बॉडी नसावी त्याच्याकडे. त्यापेक्षा दोन्ही बायांनी त्यांचे संवाद जोरदार फेकलेत. यामी नेहमीच सुंदर दिसते. पण पुढच्या १० दिवसात पाहुन झाला नाही तर पहिला पाहिलेला भाग विसरणार.

चपस्र
थंड घ्या. भडकू नका.
धागा भरकटवण्याचा आणि बोर मारायचा तुमचा लोड कमी करत होतो. मदत करतोय. चिल.

सहमत,
प्रेक्षकांनी इतकं स्ट्रगल केलेलं दुसरं उदाहरण नसेल

चपस्र सर म्हणाले की अमिताभ बच्चन कडून चुकीच्या टिप्स मिळाल्या. पण अमिताभ बच्चन तर बिल्डर आहेत ना? अभिनयाच्या टीपा बारामतीकर काकांकडून साहेबांकडून घ्यायला पाहिजेत. आत्मक्लेष मधे अभिषेक सरांनी काकांच्या टीपा घेऊन अविस्मरणीय अभिनय केला होता.
बॉडी बघायची तर अरविंद केजरीवाल सरांची. रामलीला मधे त्यांनी acting तोडली होती.

राजमा चावल पाहिला. हलकाफुलका आहे. एक्दा बघण्यासारखा जेवताना वगैरे.

एक लडकि को देखा बघायला घेतला आणि सोनमचा अभिनय पाहून बंद केला.

मला कुठला तरी मुव्ही बघायचा आहे, प्लिज सजेस्ट करा
खूप मराधाड, लॉजिक ला सोडून हवेत उडणे वगैरे, ओढून ताणून चे विनोद आणि भावनात्मक प्रसंग, सुपर हिरो, हॉरर, रक्तपात
हे शक्यतो नसावं

कुठल्याही भाषेतील चालेल पण एका बैठकीत बघून व्हायला हवा

आशुचँप, तुम्ही अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है बघा. त्यात वरील सर्व गुण (त्यांचा अभाव) सामावले आहेत. Happy

कुठल्याही भाषेतील चालेल पण एका बैठकीत बघून व्हायला हवा>> द बबल नेटफ्लिक्स वर आहे. जाम हहपुवा विनोदी.

आशुचँप सिरीयसली का? Happy
Dirty Rotten Scoundrels पाहिला नसेल तर (शक्यता कमी वाटते). स्ट्रेसबस्टर.

धन्यवाद,

बबल आणि डर्टी रॉटन बद्दल...आजच शोधतो आणि बघतो
अल्बर्ट पिंटो कुठे मिळू शकेल बघायला

अल्बर्ट पिंटो युट्यूबवर आहे. फार भारी भारी लोक आहेत त्यात. नसीर, शबाना, स्मिता पाटील, ओम पुरी, उत्पल दत्त. फक्त हा सिनेमा बघितल्यावर तुम्ही म्हणाल की त्यापेक्षा मारधाड रक्तपात असलेले सिनेमे बघावेत. म्हणून सुचवला Lol

अल्बर्ट पिंटो वाल्या मिर्झा चे अरविंद देसाई की अजीब दास्तान आणि सलीम लंगडे पे मत रो हो दोन इतर सिनेमे आहेत. सलीम बघताना झोपलो होतो.

कुठल्याही भाषेतील चालेल पण एका बैठकीत बघून व्हायला हवा
>> Notting hill, my best friend's wedding, shawshank redemption, as good as it gets, inception, dahavi f, देवराई, निशाणी डावा अंगठा, अंदाज अपना अपना, जुना गोलमाल आणि त्या जोनर चे सगळे..
All time favorite

तुम्हाला कुठला जोनर आणि किती नवा/जुना हवाय सांगा ना

नानबा - shawshank redemption
एकदा बघितला पुन्हा बघण्याचे धाडस नाही
म्हणजे अप्रतिम सिनेमा आहे पण असा काही त्रास होतो ना ते बघताना, स्पेशली अँडी चा साक्षीदार मारतात तेव्हा

बाकी या यादीतले बरेचसे झालेत बघून

हरचंद - Happy
मला तसाच जाने भी दो यारो वाटला
म्हणजे शेवटचा महाभारत सिन वगळता बाकी सिनेमा फारच ओढून ताणून बसवलाय आणि एकसे एक कलाकार असताना

सर - मी शरूख चा एकच सिनेमा बघू शकतो तो म्हणजे चक दे
कारण त्यात तो शरूखगिरी करत नाही, नॉर्मल आहे
अन्य सिनेमे निव्वळ असह्य, एका बैठकीत सोडा पाच मिनीटेही बघवत नाहीत सो शरूख सोडून तुम्हाला अन्य कोणी अभिनेता माहिती असल्यास सांगा

शांत माणूस - अशी झोप मला कोर्ट बघताना लागलेली, खूप कौतुक ऐकून बघायला घेतला, बराच वेळ काहीच होत नाही आणि जाग आल्यावर कळतं सिनेमा संपला Happy

देवराई, कासव, विहीर, अस्तू या कॅटेगरी मधले सिनेमे पण झेपत नाहीत
म्हणजे असतील ते नक्कीच चांगले, त्या बद्दल दुमत नाही पण मला सोसवत नाहीत, मी फॉरवर्ड करून करून शेवट करतो त्याचा आणि बघला म्हणून टिक करतो Happy

काल मराठी तले प्राईम वरचे १ वे तिकिट बघायला घेतला..रद्दड बोर आहे, १० मिन. बंद.
मग तुला नाहीच कळणार सुबोध भावे, सो.कु. ज्यु. बघुन सुरू केला तो ही महा बोर १५ मिन. बंद! Sad
मल्याळम बघायचा विचार आहे आता.

Pages