चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो Happy

लक्ष्या, मक्या वगैरे लोकांचे सुरूवातीचे पिक्चर बघितलेत तर "बियर गाल" दिसत नाहीत. ते त्यांचे रोल्स व विनोद एकदम स्पॉण्टेनियस आहेत. नंतरचे तितके चांगले नाहीत.

मरिसा टोमे च्या कॅरेक्टर चा काहीतरी सिग्निफिकन्स आहे सिनेमात. शर्वरी जमेनिस ला उगाचच नुसतं मरिसा टोमे सारखं 'दाखवलंय'. >> सहमत. पण तरी मला कायद्याचं बोला आवडतो. माय कझिन विनी जास्त चांगला आहे यात वाद नाही. पण मराठी करताना त्यांनी चांगले बदल केलेत (एक शर्वरीचं पात्र वगळता)

डु.आयडीज, हे सर, सर कुणाला म्हणतायत ते, आणि या ट्रोलिंगमध्ये सामिल असलेले इतर,
ट्रोलिंगसाठी वेगळा धागा काढा, दुनियाभरचं ट्रोलिंग तिथे करा,

हा सिनेमाचा धागा आहे, सिनेमा कसा वाटला याबद्दलचे मेसेजेस वाचायला बाकीचे इथे येतात. पण ते मेसेजेस ट्रोलिंगच्या गर्दीत हरवून जातात...

+७८६
डु आयडी चर्चेला ॲडमिननेच एक स्वतंत्र ऑफिशिअल धागा काढून दिला तर बरे होईल. असे प्रतिसाद आले तर त्या चर्चेत सामील लोकांना तिथे पाठवता येईल. ज्यांना त्या चर्चेत भाग घ्यायचा असतील ते तिथे लिहीतील. वाचायची आवड आहे ते वाचतील. ईतर धागे साफ राहतील.

ड्युआयडीज च्या चर्चा टाळण्यासाठी सोपा मार्ग सुचवतो.
चित्रपट कसा वाटला च्या मागच्या धाग्यावर सुद्धा मी अवांतर चर्चेबाबत लिहिले होते. तो धागा त्यामुळे लगेच संपला. दहा टक्के पण पोस्टी चित्रपट कसा वाटला याबद्दल नव्हत्या. तिकडे तसे लिहिले त्याबरोबर एक्स मॅन या आयडीने मला शिवीगाळ केली जी खूप घाणेरड्या भाषेत होती. मी त्या प्रतिसादात कुणाचेच नाव नव्हते घेतलेले. पण तरीही च्रप्स, मार्मिक असे आयडी प्रत्येक ठिकाणी ट्रोल करू लागले.

चित्रपटविषयक नसलेल्या धाग्यावर सुद्धा प्रत्येक ठिकाणी शाहरूख खान आणणे सामान्य करून टाकले आहे. इथे जसे लोकांना चित्रपटविषयक चर्चा वाचायची असते त्याचप्रमाणे इतर विषयांवरची चर्चा चालू असताना लोकांना शाहरूख खान बद्दलचे प्रतिसाद नको असतात. अनेकांनी सभ्य भाषेत बरीच वर्षे सांगितले आहे. तिकडे सरांच्या फ्रेंडलिस्ट मधले आयडीज प्रोत्साहन देदेतात.
यामुळे नाईलाजाने सर सर असा उल्लेख करण्यात येतो. नेमक्या अशा वेळेस न विसरता आक्षेप घेणाऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. उलट सरांकडून अपेक्षा नाही. तुमच्या कडून आहे अशी मखलाशी केली जाते.

अवघड आहे राव खरंच.
पराग साक्षीदार नाहीत का?

या गोष्टी वेळच्या वेळी लक्ष देऊन टाळल्या तर कुणी कशाला सर सर करील? सरांना बोलल्यावर ट्रोल करणाऱ्या ड्युआयडीजचा बंदोबस्त केला तर कशाला कोण त्याबद्दल बोलेल?
की हे काही न करताच गळे काढून सगळे ठीक होईल?

मला कुठला तरी मुव्ही बघायचा आहे, प्लिज सजेस्ट करा
खूप मराधाड, लॉजिक ला सोडून हवेत उडणे वगैरे, ओढून ताणून चे विनोद आणि भावनात्मक प्रसंग, सुपर हिरो, हॉरर, रक्तपात
हे शक्यतो नसावं

वास्तुपुरुष (मराठी)
भावे सुकतंकर जोडीचा मला सर्वात जास्त आवडलेला चित्रपट.
सदाशिव अमरावपूरकर, रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी, उत्तरा बावकर सगळेच एक्सेएक धुरंदर अभिनेते. जरूर बघा.

अरे मी चुकून कटप्पा यांच्या धाग्यावर टाकला प्रतिसाद
आणि वाटलं अडमिंन यांनी अवांतर प्रतिसाद उडवले

नंतर बघतोय तर वेगळाच धागा

बबल नाही आवडला
ट्रेलर मधेच चांगलाच वाटला
थोडा विनोदी होता पण कथा फुलवता नाही आली
आणि मुलासोबत बघण्यासारखा तर अजिबात नाही

adventure of shriman narayana बघा. युत्युब वर उप्लब्ध आहे

‘बियरगालपूर्व मक्या‘ - Lol

अनासपुरेच्या सुरूवातीच्या काळात जमून गेलेल्या सिनेमांपैकी एक ‘कायद्याचं बोला‘ आहे.

मला सिनेमांबद्दल जास्त कळत नसतानाचा किस्सा-
आणि तो एक अगडबंब सिनेमा आणि दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा पण, नवीन नवीन नवर्याला हौशीने मराठी सिनेमे थिएटरात बघायला घेऊन गेले आणि अजून चिडवून घेतेय काय ते मराठी सिनेमे म्हणून. Lol

विषयांतर नाही केले तर नाही उडणार प्रतिसाद... मृणाली- मक्याचे चित्रपट थेटरात बघायचे नसतात...
बादवे पावनखिंड कोण कोण बघू शकले नाही... आहे का इथे पब्लिक...

पावनखिंडचे ट्रेलर पाहिल्यावर त्या सिनेमाच्या वाटेला गेलोच नाही.
नवीन अफजलखान वधावरच्या सिनेमाचा ट्रेलर सुद्धा तसाच वाटला.

त्या काळात मराठी सिनेमे विनोदी असायचे.
पराग्र , तुम्ही प्रतिसाद उडवला तो अवांतर उडवण्याबद्दल होता. विषयांतराबद्दल नाही. अवांतर उडवले तर नवीन धागा काढावा लागणार नाही हा प्रतिसाद उडवला. सरांचे आणि उपसरांचे दोन्ही धाग्यावरचे प्रतिसाद विषयांतर करत नाहीत अशी माझी हळू हळू खात्री होत चाललेली आहे. Happy

ज्या काळात मराठीत फक्त विनोदी सिनेमे निघायचे त्या काळात साऊथचे हिरो पण अगडबंब आकारचे असायचे. त्या काळातले अ‍ॅक्शन सीन्स तर जगभरात आजही बघतात. पन त्याच वेळी कमल हसन, मामुट्टी अशा काही मोजक्या लोकांचे सेन्सीबल सिनेमे पण यायचे.

बियरगालपूर्व Lol
कायद्याचं बोला मस्त आहे! 'बघ, हात दाखवून' पहिल्यांदा खूप आवडला होता, परत बघताना कंटाळा आला. 'दोघात तिसरा' पण आवडला होता.

वास्तुपुरुष ओटीटीवर सापडलाय का कुणाला?

मी पावनखिंड, फत्तेशीकस्त, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानिपत यातला एकही सिनेमा पूर्ण बघू शकलो नाहीये

बाजीराव मस्तानी हा लीलापुत्राचा आहे हे माहीत असूनही गेलो आणि मग पुत्रलीला पाहून आलो.
पद्यावती पण तसाच. पण अ‍ॅटलीस्ट तो ओटीटीवर तरी पाहिला. पळवत बघता आला. भिडतच नाहीत हे सिनेमे.

पावनखिंड, फत्तेशीकस्त, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानिपत यातला एकही सिनेमा पूर्ण बघू शकलो नाहीये
>> वैताग येणार हा अंदाज आल्याने वाट्यालाच गेले नाही..

Help म्हणून चित्रपट आहे. फार मस्त आहे.
वेगळं लिहायची इच्छा होती धागा काढून पण अजून जमले नाही. मोस्तली hotstar वर आहे.
फार फार भिडला.

दम लगा के हैशा मध्ये पण असंच होतं ना
पण मला तो मुव्ही आवडला
दोघांनीही फार सुंदर अभिनय केलाय
भूमी पेडणेकर ने तर काकणभर सरस, नवऱ्याला आपण आवडत नाही म्हणल्यावर वाईट वाटणे आणि प्रसंगी त्याला कानाखाली मरायलाही कमी न करणारी बायको काय ताकदीने रंगवली आहे आहे
वाह जियो

Pages