चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्यात कुठला चांगला म्हणता येईल असा मराठी सिनेमाच पटकन आठवत नाही
लास्ट काही जबरदस्त आवडलेले ते म्हणजे वळू, त्याचा सिक्वेल म्हणता येईल असा देऊळ, एलिझाबेथ एकादशी आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी

Submitted by आशुचँप on 12 April, 2022 - 14:>>>>>> + १

https://youtu.be/SPG3L0s5dw0
हा ट्रेलर बघून ठरवू शकता.. चार पैरलल स्टोरीज सुरू असतात.शेवट पण अनपेक्षित.. छान सिनेमा. मला आवडलेला.
प्राईमवर आहे.

गिकु चा हायवे एक सेल्फी वेगळा प्रयोग म्हणून आवडून घेतला. पुणे ५2 आणि पोस्टकार्ड पिक्चर समजले नाहीत. बाकीचे त्याचे सगळे आवडले.

कट्यार आवडलेला.

पुणे ५६ >>>>> १५ मिनिटं पाहिला..बंद केला.. चांगलायका??बघावा का मग?

कट्यार मध्ये म्हागुरूंनी खूप फुटेज खल्लाय म्हणून नाही आवडला
गाणी कितीही वेळा ऐकावी अशी आहेत
आणि मुळ द्रुत लयीतल्या घेई छंद पेक्षा शंकर महादेवन चे संथ लयीतल्या ठाव घेतो

मृणाल - ट्रेलर बघितला पण त्याला सबटायटल्स नव्हत्या
साधारण लुडो स्वरूपाचा असावा असा वाटला

पुणे ५६ >> हा कधी आला? पुणे ५२ मात्र नक्की पूर्ण बघा. फक्त आम्हीच का म्हणून त्रास सोसायचा?

त्यातल्या त्या फोटो काढणाऱ्याचा फोटो काढतानाचा जो सीन आहे, त्याला मी हसून हसून लोळलो होतो.

आशुचॅम्प- मर्द को दर्द नही होता किंवा भावेश जोशी सुपरहिरो.. दोन्ही चांगले चित्रपट आहेत...

आशुचॅम्प, तुम्ही rescued by ruby बघा बरं. नेटफ्लिक्सवर आहे.
Turner & Hooch बघा. पूर्वी नेटफ्लिक्सवर होता. आता चेक करावे लागेल.
तुम्हांला आवडतील नक्की.

तुम्ही मल्याळम erida किंवा तेलुगू evaruबघा.
प्राईमवर. दोन्ही सस्पेन्स आणि खिळवून ठेवणारे आहेत.

तेलगू सिनेमाची नावे तेलगूमध्ये लिहिली आहेत प्राईमवर. कसा शोधायचा इवारू.

प्राईमवर सर्चमधे Evaru टाईप केल्यावर येतंय इंग्रजी नाव वर लिहून, सिनेमा फ्रंट फोटो वर तेलुगू असलं तरी.

Rescued by Ruby
मस्त चित्रपट आहे नेटफलिक्स वर
एका भुभुच्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे
लहान मुलांनाही खूप आवडेल असा आहे

Submitted by आशुचँप on 24 March, 2022 - 14:02

प्राची हे पहा
मी आधीच टाकलाय या ग्रुपवर हा मेसेज Happy

इथे काही पाने आधी "मराठीत चांगले व्यक्त्तीमत्त्व, अभिनय आणि नृत्य येणारा कोणता नायक आहे" अशी चर्चा झालेली दिसतेय. त्यात गष्मीर महाजनी ला लोकं विसरलीत की काय असे वाटले. अगदी उमदे व्यक्त्तीमत्त्व आणि मस्त नाच येणारा नायक आहे. त्याच्या नविन चित्रपटातले (विशू) मधले गाणे मस्त आहे.

आशुचँप, डर्टी रॉटन स्काऊंड्रल कुणीतरी सुचवलाच आहे. त्याच कॅटेगरीतला आणखीन एक म्हणजे माय कझिन विनी. धमाल मूव्ही आहे. हलका फुलका च बघायचा तर शर्माजी नमकीन ट्राय कर. फील गूड मूव्ही आहे.

हो शर्माजी नमकीन झाला बघून
बबल चा ट्रेलर पहिला, मस्त वाटतोय
तोच आता प्रयोरिटी वर बघणार आज रात्री

सर्वांना धन्यवाद

माय कझिन व्हीनी एक नंबर सिनेमा आहे. कायद्याचं बोला त्याचा रिमेक आहे म्हणे. (मी कायद्याचं नाही पाहिला.)

"कायद्याचं बोला त्याचा रिमेक आहे म्हणे." - कायद्याचं बोला हा माय कझिन विनी चं अंधानुकरण आहे. मरिसा टोमे च्या कॅरेक्टर चा काहीतरी सिग्निफिकन्स आहे सिनेमात. शर्वरी जमेनिस ला उगाचच नुसतं मरिसा टोमे सारखं 'दाखवलंय'.

मकरंद अनासपुरे Happy
साहेब मक्का बसला का तुम्हाला Happy

नि.डा.आ. मला पुस्तक जितके आवडले तितका पिक्चर नाही आवडला.

कायद्याचं बोला नक्कीच माय कझिन विनी वरून घेतला आहे. पण बर्‍यापैकी जमला आहे. त्याचे देशीकरण्/मराठीकरण जमले आहे - मरिसा टोमे वगळता Happy जसे व्हॉट वीमेन वॉण्ट चे देशीकरण "अगं बाई अरेच्चा" मधे जमले आहे, आणि तो शेवटचा टेररिस्ट वाला अनावश्यक भाग सोडला तर धमाल आहे.

माझ्या मराठी कलाकारांबद्दलच्या थिअरीप्रमाणे बीयरगालपूर्व मक्या धमाल आहे.

Pages