चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक ब. आणि अंडररेटेड??? Rofl
अर्थ माहित आहे का या शब्दा चा?
अंडररेटेड आहेत नवाजुद्दीन, मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी ई.

स्टार किड्स कुठले अंडररेटेड..

>>>>>

माझे ईंग्लिश कच्चे आहे कबूल. तरी काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

तुम्ही जे अभिनेते अंडररेटेड म्हणून उल्लेख केलेत ते त्यांच्या ऊच्च कोटीच्या अभिनयासाठीच ओळखले जातात. तर मग अंडररेटेड कसे झाले?

याऊलट अभिषेकला तुम्ही स्टारकिड म्हणून ओळखता म्हणूनच म्हटले की त्याचा अभिनय अंडररेटेड आहे.

ते नंतर ओळखले जायला लागले
नवाजुद्दीन अक्षरशः एक मिनिटं सिन मध्ये असायचा
सर्फरोश मधला आठवा
उलट मक्ख चेहऱ्यावर माशी पण न बसणाऱ्या अभिषेक ला हिरो म्हणून किती सिनेमे मिळाले ते मोजा आणि याला जर अंडररेटेड म्हणत असतील तर कृपया लवकरात लवकर एक चांगली डिक्शनरी विकत घ्या सर

सच में गोली चला दो, बस लगनी नही चाहिये,,, या सीन मधे आहे नवाजुद्दीन. मी अचानक ओळखले होते त्याला बघता बघता. आधीही तो सीन पाहीला होता पण तेव्हा लक्षात आलं नव्हतं.

आधीही तो सीन पाहीला होता पण तेव्हा लक्षात आलं नव्हतं.>>>
आधी तो माहितीच नव्हता,एक्स्ट्रा असावा असं वाटलेलं
नंतर मग तो अजून काही सिनेमात आला आणि आठवलं अरे हा तोच आहे

मला नवाज आवडला सगळ्यात जास्त तो ब्लॅक फ्रायडे मध्ये
पोलीस उलटतपासणी मध्ये त्याने जो काही अभिनय केलाय त्याला तोड नाही

मक्ख चेहऱ्यावर माशी पण न बसणारा अभिषेक >>>>> म्हणूनच अंडररेटेड म्हटले.. असो Happy

चेहऱ्यावर माशी न बसने म्हणजे कौतुक आहे.. याचा अर्थ एक्सप्रेशस देत असावा..
चेहऱ्यावर माशी न उडणे म्हणजेच नो एक्सप्रेशन्स- उदाहरणार्थ मुक्ता किंवा ललित प्रभाकर...

च्रप्स Lol

Proud

चेहऱ्यावर माशी न बसने म्हणजे कौतुक आहे>>>
तुम्हीही सर जातील त्या दुकानात मराठी चे पुस्तक घ्या विकत
दुकानदार काही सवलत देतोय का बघा
Happy

नवाझुद्दीन स्टृगलच्या काळात एक मिनिटाच्या सीनमध्ये असायचा म्हणून अंडररेटेड... वाह >> शब्दांचा खेळच करायचा तर जरा बरा तरी करीत जा रे. किती बोर मारशील?

नवाझ इतका दीर्घकाळ स्ट्रगल केलेलं दुसरं उदाहरण नसेल.

Annotation 2022-04-11 134729.jpg

आता खूपवेळ तो कुढत, चरफडत राहील. मग काहीतरी 'भन्नाट' सुचलं समजून 'भास्करा'सारखा तळपत येईल Wink

नवाजुद्दीन सीक्रेट गेम्स मधे एक मिनिटपेक्षा जास्त वेळ आहे. मग तो अंडररेटेड कसा काय ? उलट फिल्म अ‍ॅकेडेमी मधे शिकून पण कामं मिळाली नाहीत.
शाहरूख सरांना तर कुणीच ओळखत नव्हतं इंडस्ट्रीत. ते टीव्हीतून पुढे आले. बॉलीवूड मधे आल्या आल्या हिटची लाईन लावली. त्यांना सक्सेस मिळालं म्हणून नवाजुद्दीन ग्रेट कसा काय ? सक्सेस नाही मिळाला हे कौतुक ?
शारूक सर इंडस्ट्रीचे अनभिज्ञ सम्राट का आहेत हे ज्या दिवशी लोकांना कळेल त्या दिवशी ते जीवनात यशस्वी होतील.

शारूक सर इंडस्ट्रीचे अनभिज्ञ सम्राट का आहेत हे ज्या दिवशी लोकांना कळेल त्या दिवशी ते जेवणात यशस्वी होतील.>>>जेवणात??smiley36_0.gif बिचारा शाखा , त्याचा लोक नित्यनियमाने इतका कचरा करत असतिल यापासुन तो नक्किच अनभिज्ञ असेल.

अमिताभ ने मै प्रेम कि दिवाणी मध्ये ऋत्विक आणि बेबो पेक्षा चांगली ऍक्टिंग केली आहे... कसम कि कसम

अमिताभ ने मै प्रेम कि दिवाणी मध्ये ऋत्विक आणि बेबो पेक्षा चांगली ऍक्टिंग केली आहे... कसम कि कसम>>> हो त्या दोघानी मिळून शाखाने त्याच्या एकुण एक चित्रपटात केलेली ओव्हरअ‍ॅक्टिन्ग या एकाच चित्रपटात केली होती त्यामुळे "दगडापेक्षा वीट मौ "या न्यायाने ज्यु बच्चन बराच बरा होता.

अभिषेक चांगला कलाकार आहे पण त्याला गायडन्स चुकीचा मिळाला असे वाटते... अरे बॉडी बनाने से , डान्स करने से कुछ नही होता.. अच्छी ऍक्टिंग होनी चाहिये.. हमें देखिये.. बिना बॉडी बनाये टिके है अभि तक... हैं ...असे सिनियर बच्चन त्याला म्हटले असतील असे उगाचच वाटत राहते..
हृतिक, शाहिद, सलमान,आमिर वगैरे बॉडी बनवत होते तेंव्हा हा अभिनय पक्का करत असावा...
इतकी मस्त हायीट आहे... योग्य वयात बॉडी बनवली असती आज कुठे असता... लोक स्टार किड्स ला हेट करत नसत असा तो जमाना होता.. नेपोटीझम वगैरे कोणाला माहित होते तेंव्हा...

मै प्रेम की दिवानी हूं मधे आमच्याकडे मिलिंद गुणाजी आणि मिठून चक्रवर्ती होता . त्यातले मै कृष्णन अय्यर एम ये नारियलपानीवाला हे गाणं गाजलं होतं. अमिताभ बच्चन तर गोलमाल मधे होता. शाहरूख खान म्हणत असाल तर येस्स, उपकार मधला लंगड्याचा रोल आवडला. तुमच्याकडच्या रीळ मधे कोण होता ?

ऋन्मेष तू खरंच पालथ्या घड्या वर पाणी आहेस.. काहिहि इंटरेस्ट नाही तुला काही सांगण्यात Happy
तू चालु दे तुझं तुणतुणं!
अ. बच्चन चे रेफ्युजी, द्रोण, ई. चित्रपट (संपूर्ण) बघ आणि वर उल्लेखलेले काही महान लोकांचे मिनिट दोन मिनिटांचे सिन्स पण बघ काही फरक पडतोय का ते..नाही पडला तरी उत्तम च!

Pages