चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलसा बघितला. संथ होता पण चांगला होता. Bechdel test पास करणारे हिंदी सिनेमे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. मुलगी रात्री उशीरा बाहेर पडली तरी सुरक्षित राहिली पाहिजे ह्या मताला ठाम असणारी रूक्साना (शेफाली) सारखी आई विरळाच. अन्यथा "मुलगी इतक्या अपरात्री बाहेर काय करत होती?" ह्या प्रश्नावर मान खाली घालणार्‍या आयाच जास्त असाव्यात. मुलगी बाहेर होती म्हणून हिट अँड रन क्षम्य होत नाही. त्यामुळे शेफालीचे त्या प्रश्नाला सारखे डोळे वटारणे खपवून घेतले Happy . तिचे व विद्याच्या मुलाचे सीन्स गोड आहेत. आई बाहेर असल्यावर मुलांचे भावनिक बंध कसे घडत जातात त्याचे गोड उदाहरण होते. रोहिणी हट्टंगडी वाया घालवली आहे. रिपोर्टर मुलीत स्पार्क आहे पण तिचे नाव माहिती नाही. शेवट अपेक्षेनुसार होता तरी आवडला कारण बॉलिवूडात "क्षमा" ही संकल्पना प्रभावीपणे हाताळली जात नाही. डोर, बदलापूर इ मोजके सिनेमे सोडले तर क्षमा, एंपथी इ भावना सेंट्रल थीम म्हणून अभावानेच आढळतात.

(जलसा सारखेच थोडे उपकथानक असलेला बॉम्बे बेगम्स आहे. अर्थात ती वेबसिरीज असल्याने हाताळणी पूर्णपणे वेगळी आहे.)

बॉलिवूडात "क्षमा" ही संकल्पना प्रभावीपणे हाताळली जात नाही >> सहमत.

ह्या क्षमा संकल्पनेवर 'द सेल्समन' नावाचा एक इराणी पिक्चर पाहण्यासारखा आहे. तसा तो खूप संथ आहे , त्यामुळे सर्वांना आवडेल असा नाही. मला तरी आवडला. ह्या पिक्चरला अनेक पारितोषिकं ( ऑस्कर, कान्स वगैरे वगैरे सकट) मिळालेली आहेत.

(वरील दोन्ही चित्रपटात क्षमा आहे - हा रहस्यभंग झाला. त्याबद्दल क्षमस्व)

त्यात क्षमा नाहीय... ती मुलाला नशिबावर सोडून देते जशी तिची मुलगी एकटी पडलेली असते... तो मुलगा वाचतो (किंवा नावाड्या कडून वाचवला जातो ) किंवा कदाचित वाचतही नाही.. मरतो.. डुबियस एंडिंग आहे... पुढचा सिन खरा आहे का इमॅजिनेशन प्रश्न आहे...

पण मग ती पुन्हा त्याला अजून कुठेतरी सोडू शकली असतीच की! मला वाटतं मुलाला तिथे सोडल्यावर तीच जरा विचार करते, खरा तो एकचि धर्म वगैरे... आणि मग पुन्हा येते त्याला घेऊन मागे.

पुढचा सिन खरा आहे का इमॅजिनेशन प्रश्न आहे... >> इतका पण इन्सेप्शन लेव्हलचा नाहीये हा पिक्चर!

काल लॅम्ब (२०२१) पाहिला. आईसलँडीक भाषेतला सिनेमा आहे.
एक जोडपं आईसलँडच्या निर्जन भागात आपली शेती आणि मेंढीपालन चालवत असते. एक दिवस एका मेंढीला एक विचित्र पिल्लू होते, आणि त्या पिल्लाला ते जोडपे आपल्या मुलासारखे सांभाळायला घेतात.

भयपट म्हणून दर्शवला असला तरी तसा नाहीये. आईसलँडचे चित्रीकरण सुरेख आहे. पण एकूण सिनेमाची कथा कमकुवत वाटली.
५/१०

आशुचँप दम लगा के बद्दल प्रत्येक शब्दाला मम.
तिला स्वतः बद्दल वजना बद्दल मुळीच न्युनगंड नसतो हे बघून तर इतकं मस्तं वाटतं की बस्स! Happy

दम लगा के हैशा आवडलेले लोक पण आहेत? आश्चर्य वाटले...>>> आम्हाला ही वाटते आश्चर्य तुमच्या आणि अजुन काहिंच्या अभिरूची बद्दल वाचून..

लक बाय चान्स मस्तं चित्रपट आहे..मला तर नाही वाटला प्रेडिक्टबल..
फरहान तसा वाईट अभिनेता नाही. किंबहुना बरेपैकी चांगलाच आहे. तरीही आपण काहीतरी ग्रेट अभिनेते आहोत असा एक आव त्याचा अभिनय बघताना जाणवतो तो रुचत नाही.>>> चक्क ऋ शी सहमत. दीड शहाणा वाटतो मला तो. माझा बाप माहिताय का कोण आहे? असे बोलेल, असं वाटतं Lol

बिग lebowski साठी एक बिग प्लस वन! Coen brothers che movies मस्तच असतात! त्यांचा raising Arizona पण cult movie आहे, Nicolas cage अणि Holly hunter. Prime ki Netflix वर आहे नक्कीच. त्यांचा अजून एक आवडता म्हणजे जॉर्ज Clooney चा o brother, where art thou

काल एक भूतपट पाहिला प्राईमवर. एका वेळी बरीच कामं करताना पाहण्यासाठी योग्य मूव्ही. बुडाला तरी चालतो.
त्यातला सुरूवातीचा बेस्ड ऑन अ फेक स्टोरी हा डिस्क्लेमरच सर्वात इंटिलेजंट होता.
मूळचा हिंदी होता कि डबडा हेच समजले नाही. मनीष शाह प्रेझेंटस हेच नाव ओळखीचे वाटले. इतकंच लिहीण्यासारखं आहे. नाव सांगत नाही.

ल.बा.चा. तुकड्या-तुकड्यात पाहिला आहे.
कोंकणा मला आवडते. लाइफ इन अ मेट्रो, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अय्यर, पेज थ्री, वेक अप सिद - हे तिचे सिनेमे आवडले होते.
तिचं दिग्दर्शन असलेला अ डेथ इन द गंज सुद्धा आवडला होता.

फेसबुकवर अनेकदा चांगले मुव्ही सजेशन मध्ये येतात
मी तो कुक अप द स्टॉर्म पाहिलेला
मस्त होता एकदम एक रस्त्यावरील कुक आणि एक फाईव्ह स्टार चा शेफ
अगदी टिपिकल बॉलिवूड मसाला, पण घेतलाय मस्त

अजून एक मस्त अभिनेता कलाकार म्हणजे दिब्येन्दू भट्टाचार्य
आताच अनदेखी सिरीज मधील त्याचा डीएसपी चा रोल पहिला
कमाल केलीय
ब्लॅक फ्रायडे मधला येडा याकूब आणि जमतारा मधला पोलीस
हेही भारी रोल होते त्याचे

Kgf 1 / 2 नक्की का बघावा कोणी सांगेल का ?
Kgf 1 मी टीव्ही वर बघून समजून घेण्याचा दोन चार वेळा प्रयत्न केला पण ती ब्राउन स्क्रिन ते यश ची स्लो मोशन मारामारी डोक्यात जायची !
मुलाच्या हट्टामुळे kgf 2 बघतोय , मध्यंतरी पर्यंतच माझी अवस्था आलिया भट्ट च्या मुझे घर जाना है सारखी झाली !
आग आया !! आया !!!
यश च्या राजमहाल मधील बायका नोकरांच्या काळ्या साड्या , पुन्हा सगळी ब्राउन स्क्रिन ,
काय ते म्युझिक चा दणदणाट , कधी हे सगळे संपेल असे झालेय !
अजून एक तास सहन करायचंय /\

को़ंकणा सेनचा पेज थ्री आणि त्यातली कोंकना सेन दोन्ही आवडलेले. तेव्हा अश्या टाईपचे चित्रपट फार बनायचे नाहीत. वेगळा म्हणूनही आवडलेला.
पण त्यानंतर मात्र ती दिसली की पिक्चर बघणे नकोसे वाटू लागले. दर चित्रपटात एक टिपिकल सॅड लूक घेउन ती वावरते. तिचे वय नेमके माहीत नाही पण अल्लड हिरोईन न वाटता खूप मॅचुअर वाटते.. मॅच्युअर लूक असण्यात काही गैर नाही. पण तो लूक तिला टाईपकास्ट करतो.

कोंकणाचा मध्यंतरी आलेला चार शॉर्ट स्टोरीचा बनवलेला पिक्चर फारफार आवडलेला.
कोंकणा फॅ़क्टरी मध्ये ब्लू कॉलर जॉब करत असते. समलैंगिक असते किंवा सेक्शुअ‍ॅलिटी एक्सप्लोर करत असते. त्यात अफाट काम केलं होतं तिने. नाव विसरलो आता.

कोकणा बद्दल सरांना अनुमोदन
त्यातल्या आत आवडली ती वेक अप सिद मध्ये
त्यातही ती त्याची मोठी बहीण वाटते, प्रेयसी नाही

सिद मध्ये त्यांच्यात आधी रूम पार्टनर आणि नंतर आई मुलासारखे नाते वाटले. प्रियकर प्रेयसी कधी वाटलेच नाहीत.
वसंतराव चांगला आहे पण खूप मोठा आहे. तीन तास आणि त्यात गाणी जास्त. वसंताची बायको म्हणून जी आहे ती वयाने त्याच्यापेक्षा बरीच लहान वाटते. सात महिने ते नेफाला असतात तो भाग मला कंटाळवाणा वाटला. सात महिने सात वर्षांसारखे दाखवलेत. मध्येच त्या बेगम त्यांना पुण्याच्या गाडीत बसवून देतात आणि ते परत नेफाला जातात ते काही कळले नाही. त्यांना जर नोकरी सोडायची नसेल तर ह्या कोण त्यांना पुण्याला पाठवणाऱ्या असे वाटले. सुरुवात चुकली आमची. त्यांची आई घराबाहेर का पडते ते काही कळले नाही. बहुतेक जाऊशी पटत नसते. मामा म्हणून आलोक आणि लाहोरचा (लाहोरच ना) भाग आवडला. पु लं आणि दीनानाथ पचनी पडले नाहीत. खूप मोठी व्यक्तिमत्व वयाने लहान कलाकारांनी सादर केल्यामुळे असेल.

The Sessions(2012) पाहिला. छान चित्रपट, उत्तम अभिनय. आवडला.

त्यातही ती त्याची मोठी बहीण वाटते, प्रेयसी नाही >>>>>>> मुळात त्यान्च नात कॉम्प्लिकेटेड दाखवलय सिनेमात. कधी आई- मुलगा, तर कधी प्रियकर- प्रेयसी, तर कधी मोठी बहीण. अशी नाती असतात प्रत्यक्षात. रणबीरपेक्षा मोठया वयाची नायिका मुद्दामहून घेतली असेल.

दर चित्रपटात एक टिपिकल सॅड लूक घेउन ती वावरते. तिचे वय नेमके माहीत नाही पण अल्लड हिरोईन न वाटता खूप मॅचुअर वाटते.. >>>>>>> लागा चुनरी मे दाग मध्ये ती राणी मुखर्जीची धाकटी बहिण झाली होती. बर्यापैकी अल्लड वाटत होती तिकडे. हा चित्रपट दोघी चा हिन्दी रिमेक आहे.

सूलू ओके.
जर असे असेल तर बघायला हवे तेवढ्यासाठी. तिची मनातली ती प्रतिमा जरा पुसली बदलली तर बरेच आहे.. अन्यथा कोंकणा म्हटली की डोळ्यासमोर तिचा दुखी चेहरा येतो आणि बॅकग्राऊंडला कितने अजीब रिश्ते है यहा पे गाणे वाजू लागते Happy

माझा आताचा प्रतिसाद उडाला का ? कि मी दुसरीकडे लिहीले आहे ?
उडवला असेल तर मला वेमांकडे विचारणा करावी लागेल.

शाहरूख खानने केलेल्या भूमिकांमुळे त्याची विकृत, हिंसक, प्रेमासाठी खून करणारा अशी इमेज नकारात्मक झालेली आहे हे वाक्य असलेली पोस्ट उडवण्याचे काय कारण आहे ? कोण उडवतंय हे ? हे चित्रपटाशी संबंधित नसेल तर मग इतर कलाकारांवर चर्चा हे विषयांतर नाही का ?
सातत्याने दोन लोकांच्या विषयांतराच्या पोस्टी तशाच ठेवून अशा पोस्टी उडवण्यामागचे काय कारण आहे ? आयडी उडवण्यासाठी केले जातेय का ? विनाकारण सुद्धा उडवू शकता. आधीचाही तसाच उडवला होता की.

Proud

भूमिका आणि प्रत्यक्ष जीवन यात काय संबंध ?

कितीतरी हिरो बाईलवेडे, व्यसनी , कर्जबुडवे , विकृत आहेत , उदा सलमान , राजकपूर , भुलभुलैयाचा हिरो कोण तो ?, दत्त

कितितरी व्हिलन सज्जन आहेत उदा नोळू फुले , अनुपम खेर, अरविंद त्रिवेदी

आणि आम्ही तर कोणत्या सिनेमातच नाही

मग आमची इमेज कशावर ठरणार ?

आणि मग पुढचा पंतप्रधान कोण ? विवेक ओबेरॉय ?

आणि त्या चिन्मय मांडलेकरला छत्रपती शिवाजी महाराज म्हणणार की बिट्टा कराटे ?

चित्रपट पाहताना त्या अभिनेत्याने तो कोण आहे हे विसरायला लावणे हा अनुभव असतो. काही जण त्यांची इमेज सोडत नाहीत.
अर्थात ही पोस्ट सुद्धा अवांतर आहे. पण हे अवांतर कॉमन झाले आहे. एखाद्या चित्रपटाबद्दल बोलताना त्यातल्या कलाकारांबद्दल चर्चा होणे वेगळं आणि मुद्दामून एखाद्या हिरोबद्दल सातत्याने बोलत राहणे वेगळे. इथे कोण बोलतंय यावर नियम ठरत आहेत.

Pages