चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोच्या झाला रे >>>>>> हा हिन्दी ' ऑल द बेस्टचा' रिमेक आहे. हिन्दी आवडला होता.
>>> पती सगळे उचापती... >>>>>> ओहो हे तर विसरलेच मी धन्स चप्र्स

स्पेशल मेन्शन बाकी शिबा चढ्ढाचा! छोटे रोल करते पण अगदी लक्षात राहते. ह्यात सुद्धा तिचे हावभाव आणि डायलॉग डिलिवरी बघायला फार मजा आली. एकदम रोल मध्ये रिलॅक्स फिट असते ती नेहमी. दम लगा के हैश्शा मध्ये बुआ (कहीं थुक वूक मत देना लडकीवालो के सामने ... Lol ), बधाई हो मध्ये हिरविणची सोफिस्टिकेटेड आई. >>>>>>> बधाई दो मध्ये हिरोची मन्द आई झालीये.

शिबा चढ्ढा >> +१. बधाई दो मधलं काम तिच्या इतर कामांपेक्शा फारच वेगळं आहे, पण छान केलंन तिनं.

शर्माजी नमकीन मला ऋषी कपूरसाठी बघायचा होता. त्याचा वावर खुपच मस्त होता. परेश काही इतका आवडला नाही. चालसे होता. अभिनयाच्या बाबतीत नाही तर एकंदर त्याचा प्रेसेन्स कमी होता "पंजाबी पात्र" आणि एक खवय्या म्हणून रीलेट नाही झाला.

टाईमपास आहे. जेवताना बघितला.

लोच्या झाला रे: इतका पकाउ. तो सिद्धार्थ जाधव तसाही डोक्यात जाणारा आहे.

मला कोबाल्ट ब्ल्यू आवडला. प्रत्येक फ्रेम एवढी सुंदर आहे. कथेतील घर, तळं, नील भूपालमचं घर, केरळ अप्रतिम. त्यातील कविता Never make plans with your lover आवडली.

मराठीत कुणीच असा ऑल इन वन हिरो नाहिच का ज्याचा अभिनय, लुक्स,डान्स आवडेल??
Submitted by mrunali.samad on 6 April, 2022 - 10:11
>>>>>

ईथे बरीच नावे सापडतील. चेक करा Happy

कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ??
https://www.maayboli.com/node/52048

मराठीत कुणीच असा ऑल इन वन हिरो नाहिच का ज्याचा अभिनय, लुक्स,डान्स आवडेल??>>
अन्कुश चौधरी, प्रसाद ओक यांची अभिनय, लुक्स आवडतात. वैभव तत्ववादी लूक्स आवडतात. ललित प्रभाकर लूक्स आणि काही ठराविक रोल्स मधे अभिनय आवडला होता.
डान्स मधे नविन पैकी कुणी आठवत नाही.

मराठीत कुणीच असा ऑल इन वन हिरो नाहिच का ज्याचा अभिनय, लुक्स,डान्स आवडेल??>> एक काय शंभर असते, जर माबोवर वेळ घालवत बसले नसते तर ... (माझं सोडा आता, लाडकं गेली स्मशानात {माझ्या शत्रूंची} )

शांमा Lol
तसं नाही मला विचारयचं होतं ते असं, जसं साऊथ मधे हिरोचे निस्सीम फैन्स असतात...ज्याच्या सिनेमात हिरोईन असली नसली तरी फरक पडत नाही..फक्त हिरोच्या हिरोइजम वर सिनेमे हाऊसफुल्ल चालतात तसं..
जसे तेलुगू, तमिळ मधे असतात तसे..
ती वरची रिक्षा पाहिली..त्यातली कित्येक नावं माहीत नाहीत.

तसं नाही मला विचारयचं होतं ते असं, जसं साऊथ मधे हिरोचे हार्ड कोअर फैन असतात...ज्याच्या सिनेमात हिरोईन असली नसली तरी फरक पडत नाही..फक्त हिरोच्या हिरोइजम वर सिनेमे हाऊसफुल्ल चालतात तसं.. >>> कुठल्या तोंडाने माफी मागू आता ? मला काय माहिती योग्य वेळी मराठी पिक्चर मधे नाही गेलो त्यामुळे इतक्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील ते. Happy

आत्ताही वेळ गेलेली नाही. तुम्ही सगळे मिळून सरांना साकडे घालू शकता. फॅन्सच्या संख्येचं टेन्शनच घेऊ नका.

Rofl

मराठीत श्वास सारखे सिनेमे बनतात. ते हिरोइझम वर नाही तर कंटेट वर चालतात. अशा खूप चित्रपटांची यादी आहे ज्याच्यावर व्यावसायिक लोक सिनेमे बनवणारच नाहीत.
कट्यार काळजात घुसली च्या वेळी मित्रमंडळी म्हणत होती "अरे, काय लावलंय तू पण, कुणाला समजणार ते नाट्यसंगीत ?" पण मी पाहिला आणि पाहिल्याचं समाधान आहे. काशिनाथ घाणेकर पण चांगला होता.
मध्यंतरी इतके चांगले सिनेमे बनायचे पण ते सगळे एकाच वेळी रिलीज होत असल्याने बघणे झाले नाही.

काल कोबाल्ट ब्लू लावला. अर्धा बघितला तरी पॉईंट काय आहे ते समजलं नाही. रटाळ चालू आहे
>>मी तर पुस्तक वाचलेलं. मराठी कादंबरी मधली दुःख (
ख वर टिंब Wink नाही दिलं तर मराठी माणूस खवळतो. कीबोर्ड ल वर टिंब देऊ शकतो, पण दu:खाला co-operate करत नाही. पण आपलं दुःख कोणीच समजून घेत नाही...)

रटाळ वाटतंय ना टिंब पुराण? तसच काहीसं कोबाल्ट ब्लू वाचताना झालं. Lol

कोबाल्ट ब्लु च्या फ्रेम्स फार मस्त आहेत... पण प्रतीक बब्बर च नक्की काय चाललेलं असतं तेच कळलं नाही मला...
आणि त्या मराठी लोकांच्या जेवणात मी 2 ते 3 दा मोदक पाहिले... असें सारखे मोदक कोण बनवते???

राधेश्याम तर बघता येत नाही इतका बकवास आहे. आम्ही तर इंटरवल व्हायच्या 1 तास आधी च असले कंटाळलो होतो की बस !

काल RRR बघितला... अ आणि अ असला तरी आवडला... म्हणजे राधेश्याम सारखा रटाळ नाहीय......

https://youtu.be/0E1kVRRi6lk
दक्षिणेतील अजून एका सुपरस्टार विजय जोसेफ चा बिस्ट सिनेमा येतोय !
ट्रेलर वरून तरी हा पण बॉक्सऑफिस वर हिट होणार असे दिसतेय .
यातील अतेरेकी मुस्लिमसारखे दिसतात म्हणून कुवेत ने रिलीज होण्यावर बंदी घातली , असेच वाद इतर ठिकाणीही वाढत गेले तर मात्र डब्बा गुल होईल .

काल पूर्ण केला कोबाल्ट ब्लू.
स्टोरी ठीक आहे. पण स्क्रीन प्ले फार बाळबोध आहे. प्रेक्षकांंना शहाणे करुन सोडावे प्रकार बराच आहे. उगा प्रतिकं (बब्बर वाली नाही) वापरुन ती समजावुन सांगत बसले आहेत. ते कासव कासवच नाही तर.... अरे हो! बाबा समजलं आम्हाला. तो अ‍ॅक्टर ही फार बोर आहे.
तो प्रोफेसरही व्हाईट वॉश दिल्याने खटकला.
अनुजा आवडली. ती एकदम दीपिका सारखी दिसते/ बोलते.

टीपः सचिन कुंडलकरांवर सेक्शुअल हरासमेंटचे आरोप झाल्याने त्यांना या प्रोजेक्ट पासून दूर करण्यात आले आहे. त्यांचं नाव ही दिग्दर्शकात नाही.
https://www.mid-day.com/entertainment/bollywood-news/article/netflix-tak...

प्रतिकं वापरुन ती समजावुन सांगत बसले आहेत. ते कासव कासवच नाही तर.... अरे हो! बाबा समजलं आम्हाला. >> +१ Happy

तो अ‍ॅक्टर ही फार बोर आहे. >>
तो अ‍ॅॅक्टर बाकी दिसायला, बोलायला डिट्टो कुंडलकरांसारखाच वाटला..! Happy
म्हणजे बोअर अशा अर्थाने नाही, कारण कुंडलकरांचा 'गुलाबजाम' आवडला होता मला..!!

त्या बिस्ट स्टोरीसारखा एक मुवि आताच येऊन गेला विद्युत जामवाल की टायगर श्राफ आहे , मॉलऐवजी हॉस्पिटल आहे

RRR पाहिला एकदाचा... अचाट आणि अतर्क्य टाईप चा आहे खूपच.. पण आवडला तरीही.. acting कमाल आहे दोघांची.. आणि स्टोरी ही मस्तच.. भव्य दिव्य..

दसवी बद्दल "चायसे ज्यादा किटली गरम "ही शन्का अगदि खरी ठरली , मुव्ही ट्रेलरइतका नक्किच खास नाही पण वाईटही नाहिये, गुड वन टाइम वॉच मुव्ही, थोडा मुन्नाभाई वळणावर आहे.

>>>>>Never make plans with your lover आवडली.
होय मलाही आवडली.

दसवी एक नंबर
हळूहळू रंगत जातो ते अखेरपर्यंत .. फील गूड मूवी आणि संदेशही छान
तिघांची अ‍ॅक्टींग मस्त, यामी गौतमीला बघून नेहमीसारख्याच मनाला गुदगुल्या होतात, पण अभिषेकचे कॅरेक्टर.. एकदम चुम्मा.. किती अंडररेटेड अ‍ॅक्टर आहे तो हे पुन्हा जाणवते.. जरूर बघा.

फक्त कोणी बघितले असेल तर मला हे सांगा, तो अभिषेक बच्चन वरतून कसा लिहितो? वेगळीच पध्दत आहे..

दसवी पाह्ण्याचा प्रयत्न केला. फडतूस. मठ्ठ मूव्ही. हा विषय घेऊन खरं तर बरा कॉमेडी मूव्ही बनू शकला असता. पण डायरेक्टर ने झोपेत काम केले असावे.
अभिषेक चे पात्र आठवी पास असते, त्याला इन्ग्रजी व्यवस्थित वाचता येते, इतिहास इन्ग्रजीत शिकतो ( यात उगीच ऐतिहासिक स्टोर्‍या दाखवून लांबण लावले आहे, ते सायमन गो बॅक, दांडी यात्रा, इ. कथांमधे टाइम ट्रॅवल सारखा अभिषेक जातो आणि लालाजी, आझाद वगैरेंशी बोलतो वगैरे!) पण मग हिन्दी मधे मात्र या माणसाला अक्षर ओळख पण नसते? आपले नाव पण लिहिता येत नाही? न म्हणजे नळासारखा आकार, ह म्हणजे हत्तीची सोंड इ. आणि गणितात प्रोबेबिलिटी म्हणजे काय हे एकाच वेळी शिकतो Uhoh जेल मधे कुणीही युनिफॉर्म मधे नसतात. कुणी धोतर, कुणी लुंगी काहीही. अन जेलर म्हणून सुंदर नाजूक मुलगी ( यामी गौतम ) का? गंडलेले कास्टिंग आहे. तिचे अ‍ॅक्टिंग तर माहितच आहे, चेहर्‍यावरची माशी हलत नाही असं. फक्त अभिषेक ची बायको हे कॅरेक्टर आणि ती अ‍ॅक्ट्रेस चांगली वाटली.

Pages