चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मात्र अर्धा तास तरी दम धरला होता , शेवटी बंद करून आय पी एल बघत होतो ..
स्टोरी लैच स्लो , संवाद कमी असल्यामुळे विद्या आणि शेफाली दोघीत शब्दवाचून कळले सारे अभिनयाची स्पर्धा लागलेली .
त्या दोघींना दर्शकांना फक्त चेहऱ्यावरील अभिनयाद्वारे काय सांगायचे आहे हे समजून घेता घेता माझ्या डोक्याचा पार भुगा झालेला .
हॉल मध्ये एकत्र बसलेल्या हितचिंतक कुटुंबिय सदस्यांनी वैतागून सिनेमातून लक्ष काढून केंव्हाच आपापल्या मोबाईलकडे मोर्चा वळवलेला होता आणि मी अजून किती वेळ लढू शकतो याकडे कानडोळ्यांनी बघत होते . शेवटी ते जिंकले !!!!
ओळखीच्या लोकांचा " लेकीन आपकी लडकी इतनी रात बाहर क्यो गयी थी ? " येणारा वारंवार प्रश्न आणि त्यावर शेफाली चे उत्तर न देता ऑस्कर अवॉर्ड विनिंग ऍक्टिगं द्वारे समोरच्याला गप्प करणे !
हे दृश्य माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरले आणि मी आय पी एल कडे वळलो .
Happy

सुरूवातीला एका जज्जशी घेतलेले वाकडे. मग तिच्या घरातली परिस्थिती, ती सांभाळणारी मेड.
तिच्याच मुलीचा होणारा अपघात . प्रेडीक्टेबल आहे पुढचे.
पण सध्या कोणत्याच चित्रपटात लक्ष लागत नाही. नॉशिया आल्यासारखे झाले आहे. सिनेमा हॉलला जाऊन पाहिला तरच.
दर महिना एव्हढे पैसे घालवायला आपण काय पैशाचे झाड नाही लावलेले.

दसवी बद्दल मै ला+१.
फारच बोर आहे. अभिषेक काम चांगलच करतो, पण स्टोरी इतकी बकवास लिहिली आहे की कंटाळा येतो.

आणखी एक अनोखा सिनेमा- मिडसोमर (२०१९)

गुड टाईम भलताच आवडला, आणि कुठंतरी वाचलं कि गुड टाईमचे वितरक- A24चे वितरक नेहमी व्यवसायासाठी अतिशय उत्तम सिनेमेच निवडतात. सिनेमे नेहमीच हटके असतात, आणि बऱ्याचदा खूप मोठी स्टार कास्ट किंवा सुपरीचीत नावे जोडले नसलेले सिनेमे असतात. (Indie films- इंडिपेंडन्ट सिनेमाचे लघुरूप)

त्यांच्या सिनेमांची यादी पाहता, फक्त काहीच सिनेमे मी पाहिले होते- गुड टाईम, हेरेडिटरी, द रूम, द विच, द लाईटहाऊस. ह्यातले कोणतेही सिनेमे भंकस वाटले नव्हते- सगळे नाविन्यपूर्णच होते. हेरेडिटरी, गुड टाइम्स तर खूपच आवडलेले. द विच, द लाईटहाऊस आणि हेरेडीटरी तिन्ही भयपट आहेत. भयपट पाहायला आवडतात, आणि चांगल्या भयपटांचा कायम दुष्काळ जाणवत असतो, म्हणून भयपट म्हणून दर्शवलेला मिडसोमर बघितला.

कथेचा सेटप असा आहे- डॅनी नावाची तरुणी नुकत्याच एका धक्क्यातून गेली असते- तिची बहीण, आई आणि वडील एकदमच काही कारणाने निर्वतले असतात. त्यामुळे ती उध्वस्त झाली असते. तिचा बॉयफ्रेंड, ख्रिश्चन- हा द्विधा मनस्थितीत असतो. डॅनीची बहीण बायपोलर असते. त्यामुळे डॅनीला पूर्वीही तिची सतत काळजी वाटत असते आणि ती ख्रिश्चनचा आधार घेत असते. ख्रिश्चनच्या मित्रांना हे चुकीचे वाटत असते, आणि डॅनीने ख्रिश्चनवर असे ओझे टाकू नये असे वाटत असते. (ते दोघे तीन वर्षांपासून एकत्र असतात, तरीही !) आणि डॅनीला सुद्धा हे जाणवत असते आणि अपराधीपणाची टोचणी लागत असते. कुटुंबाच्या मृत्यूनंतर तिला कोणीतरी आधार देण्याची गरज वाटतच असते, पण ख्रिश्चनकडें आधार घेण्यास अपराधीपणा वाटत असतो.

ख्रिश्चनचा मित्र जॉश स्वीडनमध्ये त्याचा थिसिस पूर्ण करायला जाणार असतो. त्यांचा पेले नावाचा स्वीडिश मित्र असतो- त्याच्या हार्गा नावाच्या गावी जाऊन त्याची पॅगन (नॉर्स देवतांची आराधना करणारी) कम्युनिटी पाहून त्यावर थिसिसचा एक भाग लिहायचा असा त्याचा प्लॅन असतो- सोबत ख्रिश्चन आणि मार्क नावाचा आणखी एक मित्र सुद्धा जाणार असतात. हि खूप दिवसांपासून प्लॅन केलेली ट्रिप असते तरी ख्रि. ने डॅनीला काहीच कल्पना दिली नसते. आणि मग अपराधी वाटून तो तिला यायचे आमंत्रण देतो (मित्रांना न विचारताच!)- आणि डॅनी स्वीकारते.

यापुढील संपूर्ण सिनेमा स्वीडन मध्ये- हार्गा या कम्युनिटपाशी होतो. हि खूप जुनी कम्युनिटी असते. आणि ९० वर्षांतून एकदा होणारा, देवांना धान्य आणि मांस देण्यासाठी आभार मानायचा कार्यक्रम त्यावर्षी होणार असतो. त्यानंतर हार्गा बद्दल काही डिस्टर्बिंग गोष्टी हळूहळू अमेरिकन गटाच्या समोर येतात. हा भाग हॉरर म्हणून गणला जाऊ शकतो- पण माझ्यादृष्टीने ह्या सिनेमातला सायकॉलॉजिकल थ्रिलर भाग अतिशय कसबीचा आहे. एक शोकमग्न मुलगी आणि तिचा performative बॉयफ्रेंड यांच्या नात्यामधले awkward tension अगदी सुरेख पकडले आहे.

सिनेमा दिसायला आणि ऐकायला अतीव सुंदर आहे. स्वीडनचे निसर्गसौन्दर्य अतिशय मस्त पकडले आहे. सोबतीचे संगीत सुद्धा सिनेमाच्या एक एक टप्प्याला अनुकूल आहे.

हा सिनेमा नेहमीचा भयपट नाही, काहींना भयपट वाटणार सुद्धा नाही. पण मला नक्कीच भयपट वाटला. जम्प स्केअर एखाद्या दुसऱ्या वेळेसच वापरले आहेत.

८/१०
(हेरेडीटरी च्या दिगदर्शकाचाच सिनेमा आहे.)
(अमेझॉन प्राईम वर पाहू शकता.)

दसवी पहायला सुरूवात केली. कसाबसा २० मि. पाहीला. मग बंद केला.

झी५ वर नाळ पाहिला. फार आवडला. सगळ्यांचा अभिनय उत्तम. छोट्या चैत्याने खूप रडविले.

भुताचा हनिमून अप्रतिम सिनेमा, भरत जाधवची जबरदस्त (कि भयाण) ऐक्टींग.. नक्की बघा.. अजिबात प्रेडिक्टेबल पण नाही. Proud
(मी आधी लिहिलय बहुतेक इकडं या सिनेमा बद्दल)

मामच्या गावाला जाऊ या.... अर्धा बघितला....उरलेला नाही बघणार.. इतके कसे पकवू शकतात हे सिनेमे?

दसवी बद्दल मैत्रयीला १००% अनुमोदन. ह्याच सगळ्या गोष्टी जाणवल्या होत्या बघताना.

दसवी बघताना पुन्हा आपण झिम्मासारखे लॉजिकचे भिंग घेऊन बसलो तर अवघड आहे.
पॉवर कर्रप्टस, त्यात जीवाभावाची नातीही पलटतात, विद्या विनयेन शोभते, तसेच विद्येसोबत विनयही येतो वा यायला हवा, शिक्षणाचा हेतू माणसाला सुशिक्षित बनवणे नाही तर सुसंस्कृत बनवने हा सुद्धा आहे, चांगला नागरीक बनवणे हा सुद्धा आहे, जर ईतिहासातून आपण काही शिकलो नाही तर आपणच ईतिहास बनतो, वगैरे कैक गोष्टी चित्रपट बघताना समोर येतात आणि पटतात.
मुळात हा पुर्ण चित्रपट आणि त्याचा शेवट हे प्रत्यक्ष आयुष्यात कधी होऊ शकत नाही. आणि हे माझ्या ट्रेलर बघतानाच लक्षात आलेले. जसे मुन्नाभाई आपण बघितला त्याच नजरेने हा चित्रपट बघायला हवा असे वाटते.
अर्थात मुन्नाभाई फारच मनोरंजक चित्रपट होता. त्यामुळे आपण लगेच त्याला विनोदी चित्रपट सदरात टाकतो आणि लॉजिक शोधायचे बंद करतो. या चित्रपटात खळखळून न हसवता हलकेफुलके चिमटे काढले जातात त्यामुळे आपण लॉजिक शोधू लागतो जे खरे तर टाळायला हवे..

<<<आज फँटास्टिक बिस्ट्स ३ बघणार.

Submitted by कॉमी on 10 April, 2022 - 05:00>>

मी आज पाहिला. Worth watching if you like that type of movies..
Spoiler alerts- सुरुवातीलाच एक सीन पाहून चटका लागला, तो चित्रपट संपेपर्यंत गेलाच नाही...
कथेची गरज म्हणून असेल पण खूपशी दृश्ये अंधारात / कमी उजेडात चित्रीत केलीत. एखादे प्रकारातले दृश्य पडद्यावर आले की बरे वाटत होते..

Beast मस्त मुवि आहे

पण तरीही पंतप्रधानाची निवड करायला कुठलातरी कोल्हाकुत्रा वापरणे , जरा पटायला जड गेले.

ओरिलीयस उर्फ क्रीडेन्स आणि अलबस डंबलडोर हे तर करण अर्जुनवरून ढापले की काय असे वाटून गेले .

दंगलीच्या आरोपातून सुटणे , मग तो इलेक्षनला उभा रहाणे, त्याने ' आपके बुरे दिन खतम हुये ' असे भाषण ठोकणे , मगलू आणि जादूगार यांच्या लव्हजिहादला विरोध करणे, क्विलीन प्राण्याला ईव्हीएम हॅक केल्यागत हॅक करणे. ......

गंमत गंमत

ह्यावेळी ग्रीनडेलवाल्ड कुणी वेगळा आहे का ? जॉन ढेप नाही ना ?

दसवी मी 3 दिवस थोडा थोडा बघत संपवला. त्याची सही रेषा आणि टिंब कळलं नाही, इंग्रजी पण येत असतं त्याला. काही काही हरियाणी भाषा समजायला अवघड वाटली. निम्रत कौर मस्तच.
कॉमी, मला गूड टाइम्स nelflix वर नाही सापडला.

मीही दोन हत्प्यात बघितला. पटकथा व लोकांचे रोल्स व त्यानुसार वागणे गंडलेले आहे. पण मधे मधे संवाद हसवतात. निम्रत कौरचे काम जबरी आहे पण तिच्यातील बदल अचानक वाटतो. अभिषेकचे काम चांगले आहे. यामी दिसते छान पण तिचा रोल नीट लिहीलेला नाही त्यामुळे जमला नाही.

सहज अधूनमधून बघायला ठीक आहे. चांगली घट्ट पटकथा असती तर आणखी छान झाला असता.

कौन प्रवीण तांबेही थोडा बघितला. मुंबई क्रिकेटचे व एकूणच गल्ली क्रिकेटचे वातावरण जबरी आहे. ते एका मुलाला ओणवे उभे करून त्याच्या पाठीवर बोटांनी आकडे धरून टीम निवडणे - हे कित्येक वर्षांनी पाहिले. मला हे आम्हीही नक्की कसे करत होतो हे आठवायला काही मिनीटे लागली.

बिस्ट्स डोके बाहेर ठेऊन बघायचा सिनेमा आहे. मार्व्हल सारखा. म्हणजे जादू तर आहे पण इंटर्नल कनसिस्टन्सी पण शून्य आहे.

पण मनोरंजक आहे. ब्लॅककॅट ह्यांनी लिहिलंय तशी धमाल आहे सगळी.

चला धागा पुन्हा विषयावर आणूया.
आज काही चित्रपट बघणे झाले नाही. ईथली चर्चा वाचून मगाशी जलसा बघायचा विचार करत होतो. पण दुर्दैवाने बायकोने तो बघितला असल्याने तिला तो पुन्हा बघायचा नव्हता. आणि ती जे काही ईंग्लिश लावते ते मला झेपत नाही.
असो, जलसा तिला आवडला म्हणाली. पण लगेच दुसऱ्यांदा बघावा असाही नसावा अन्यथा तयार झाली असती बघायला.

मी परवा ड्युन परत पाहिला. प्राइम वर आहे. थिएटर मध्ये बघितला आहे. व साउम्ड ट्रॅक अप्रतिम आहे. काही काही शॉट्स परत परत बघायचे होते.
काही समजून घ्यायचे होते. ह्याची कथा फार मोठी आहे दहा पंधरा सिक्वील प्रिक्वील नक्की बनतील. बाल हिरो टिमोथी शलामे एकदम क्युट पपी आहे. सध्या चा वर्ल्ड वाइड हार्ट थ्रॉब!! हा आपला ग्रह सोडताना एकदा पाण्यात हात घालतो. सूर्यास्त बघतो माती हातात घेतो. परत कधी हे सर्व करायला मिळेल. हा छोटासाच शॉट् सुरेख आहे.

साडुर कर आर्मी चा शॉट भयानक आहे. मागे अनेक सैनिक बलिदान केलेले आहेत व त्यांचे रक्त वेदिवरून वाहात वाहात खाली येते, पावसाच्या पाण्यात मिसळ ते. व त्याचा तिलक उभ्या सैनिकांना लावतात. ओळखीचे वाटते.

दुसरा प्लॅनेट भयानक वाळवंट जिथे पुढील कथानक घडते. सर्व सायन्स फिक्षन मध्ये ३० - ४० प्रतिश त शॉट्स हे स्पेसक्राफ्ट इक्डून तिक्डे जाते. लँडिन्ग टेक ऑफ व दार हलू हलू उघडून आतून रहस्य मय व्यक्ती बाहेर येतात लगेच कधी कधी स्फोट होतो. असेच असतात.

हिरो व फॅमिली नव्या ग्रहावर येतात त्यांचे आगमन स्वागत जबरी आहे. आईचे कपडे व दागिने जबरद्सत केलेले आहेत. अगदी राणी शोभते.
ह्या मानाने येणा री सून अगदीच लक्तरे घालून नाकात नळी घालून वावरते.
ह्यातील स्पेसक्राफ्ट मोठी भली मोठी आहेत. व पक्ष्यासारखे हेलिकॉप्टर अगदी सुपर. चालवायला हवे असेच आहे.

एक वाक्य फार छान आहे लाइफ इज नॉट अ प्रॉब्लेम टु सॉल्व्ह बट अ रिअ‍ॅलिटी टू एक्स्पिरीअन्स.

ह्यातील व्हिलन हा व्लादिमीर नावाचा हावरट पेट्रोल डांबरात जगणारा असा आहे. व तो हाउस अ‍ॅट्रेडिस वर हल्ला करतो हे युक्रेन वरील हल्ल्याचे प्री सुचक वाटते मला. हा जरा नारा यण धारपांच्या कथेतील विचित्र व्यक्तिमत्वासार खा पण दिसतो. व जगतो पण.

साउंद ट्रॅक हा स्पॉटि फाय वर उपलब्ध आहे. आज शेजारी कंप्लेंट करे परेन्त ऐकायचा प्लान आहे.

किती अंडररेटेड अ‍ॅक्टर आहे तो हे पुन्हा जाणवते>>> अभिषेक ब. आणि अंडररेटेड??? Rofl
अर्थ माहित आहे का या शब्दा चा?
अंडररेटेड आहेत नवाजुद्दीन, मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी ई. मला सान्या मलहोत्रा पण वाटते.. हे प्रतिभावान कलाकार ज्यांना कुत्रं ही ओळखत नव्हतं ते आपल्या अभिनय क्षमते वर पुढे आलेत,चमकलेत. ह्यांना म्हणतात अंडररेटेड!
स्टार किड्स कुठले अंडररेटेड..

नवाजुद्दीन, पंकज आणि मनोज त्रिपाठी अंडररेटेड बिलकूल नाहीयेत. ते चांगले हायली रेटेड आहेत, सर्वांना त्यांचा अभिनय आवडतो.

फंटास्टिक बिस्ट मध्ये तो कुठला कोल्हासदृश प्राणी घेऊन योग्य उमेदवार ठरवत असतात

अक्षय कुमारच्या एका सिनेमात कबुतरे खांद्यावर बसली की त्याच्याशी लगीन लावत असतात

Pages