Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2014 - 11:30
स्वप्निल जोशीचा उल्लेख माझ्या लेखाच्या शिर्षकात मी सुपर्रस्टार असे करताच त्या धाग्यावर तीच चर्चा चालू झालीय. तिच्यावर काही आक्षेप नाही पण तिथे स्वप्निलचे अभिनंदन करणे अपेक्षित होते. तसेच हि चर्चाही काही गैर नाही म्हणून हिला रीतसर वेगळा धागा काढून देतोय.
इथे नुसते मत व्यक्त करू नका तर मत सुद्धा द्या.
मी खाली एकेका पोस्टमध्ये काही कलाकारांची नावे लिहितो जी त्या चर्चेत आली आहेत त्यांना वोट द्या आणि ठरवा काय ते एकदाचे!
वाटल्यास स्वत:च्या नावांचीही भर घाला, बघा आपल्या आवडीचा कलाकार इतरांना आवडतो का किंवा किती आवडतो. 
मी तेथीलच चर्चेवरून १२-१३ नावे काढलीत, ती फक्त कृपया एका क्रमात येऊद्या.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्निल जोशी
स्वप्निल जोशी
भरत जाधव
भरत जाधव
अंकुश चौधरी
अंकुश चौधरी
दादा कोंडके
दादा कोंडके
नाना पाटेकर
नाना पाटेकर
सिरियसली? निळू फुले, दादा
सिरियसली?
निळू फुले, दादा कोंडके आणि अरुण सरनाईक ह्यांच्यात स्पर्धा आहे.
येथे नीधप ह्यांचे मत अधोरेखीत करत आहे की अशोक सराफांना योग्य तो वाव नाही दिला गेला.
बाकी अभिनेत्री म्हणाल तर स्मिता पाटील वादातीत!
जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशी
अशोकमामा सराफ
अशोकमामा सराफ
लक्ष्मीकांत बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे
दिलीप प्रभावळकर
दिलीप प्रभावळकर
मकरंद अनासपुरे
मकरंद अनासपुरे
रितेश देशमुख
रितेश देशमुख
श्रेयस तळपदे
श्रेयस तळपदे
सचिन पिळगावकर
सचिन पिळगावकर
जितेन्द्र जोशी अरूण सरनाईक,
जितेन्द्र जोशी
अरूण सरनाईक, रमेश देव
रामदास आठवले! तहहयात
रामदास आठवले!
तहहयात सुपरस्टार!
सध्या नारायण राणे पण!
...... की अशोक सराफांना योग्य
...... की अशोक सराफांना योग्य तो वाव नाही दिला गेला.
>>>>>>>>>
सुपर्रस्टारला वाव दिला नाही हे कसेसेच वाटते.
बहुतेक सुपर्रस्टार हि संकल्पनाच समजून घेण्यात लोक फसत आहेत.
तो विविधढंगी बहुरंगी भुमिका आणि कसदार अभिनय करूनच बनला पाहिजे असे नसते किंबहुना याचा सुपर्रस्टार बनण्याशी काहीएक सबंध नसतो.
त्याला वाव मिळण्यासारखे, आणि त्याच्या टाईपचे चित्रपट तो बनवायला भाग पाडतो. निर्माते आणि दिग्दर्शक स्वताहून बनवतात.
प्रॅक्टीकली, टेक्निकली आणि लॉजिकली, काही प्रमाणात दादा कोंडके वगळल्यास मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार असा कोणी झालाच नाही. किंबहुना माझ्या माहितीत नाही, जुन्या काळचे चित्रपटांबद्दल मला फारसे ठाऊक नाही.
पण तरीही लोकप्रियतेच्या निकषावर आपल्या वैयक्तिक आवडीचा निकष जोडत आहे तयातून निवडायला हरकत नाही.
वाव किती छान विचार आहेत
वाव किती छान विचार आहेत
चंद्रकांत, सूर्यकांत, श्रीराम
चंद्रकांत, सूर्यकांत, श्रीराम लागू, रवींद्र महाजनी, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, महेश कोठारे...
अर्वाचीन(:P)पैकी संदीप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी राहिलेत.
ही आपली लिस्ट वाढवायला नावं.
अन्यथा मराठीत सुपरस्टार असं काही कधी होतं असं वाटत नाही.
मोहन आगाशे
मोहन आगाशे
सुपरस्टार म्हणजे सर्वाधिक
सुपरस्टार म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय या अर्थाने घेतले तर एकेकाळी अशोक सराफ व लक्ष्या होते.
लक्ष्या
लक्ष्या
बेशक दादा कोंडके. लागोपाठ
बेशक दादा कोंडके. लागोपाठ सिल्वर जुबिली सिनेमे दादांशिवाय कोणी दिले आहेत का आजतोवर?
बेशक दादा कोंडके >> +१
बेशक दादा कोंडके >> +१
अजिंक्य
अजिंक्य देव
http://marathimovieworld.com/marathi/interviews/ajinkya-deo-interview.php
सागर
सागर तळाशीकर
http://www.marathisrushti.com/profiles/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4...
बी.कॉम., एल.एल.बी. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या, गेली वीस वर्षं नाटक, सिनेमा आणि मालिकेत झळकणारा एक सोज्ज्वळ, सालस तरीही गंभीर असा चेहरा म्हणजे सागर तळाशीकर.
अवंतिका, गुंतता हृदय हे, असंभव, सोनियाचा उंबरठा या मराठी मालिका; बालगंधर्व, बाईमाणूस, गुलदस्ता आदी मराठी चित्रपट यांतून भूमिका साकारत सिने नाट्य क्षेत्रात सागरनी आपली एक वेगळी छाप उमटवली आहे.
पुरस्कार : या क्षेत्रात अनेक राज्य पुरस्कार, झी गौरव, नाट्यगौरव असे अनेक पुरस्कार सागरनी पटकाविले आहेत.
राजा गोसावी, बबन प्रभू, मधू
राजा गोसावी, बबन प्रभू, मधू आपटे यांना विसरू नका
दादा कोंडके बहुधा ग्रामीण
दादा कोंडके बहुधा ग्रामीण भागातच जास्त प्रसिद्ध होते, शहरी भागात नाही .. एक ठराविक वर्ग त्यांच्या चित्रपटाच्या वाट्याला जायचाही नाही.. अर्थात हि ऐकीव वाचीव माहीती आहे, कारण तेव्हा मी अंड्यात होतो.. असो, हे खरे असेल तर त्यानुसारच मी वर म्हणालो होतो की काही प्रमाणात दादांचा अपवाद वगळता...
फारेण्ड, अशोक सराफ आणि
फारेण्ड,
अशोक सराफ आणि लक्ष्याबाबत बरेपैकी सहमत, त्यांच्या खास करून विनोदी चित्रपटांची लाट होती.
माझ्या बालवयात मराठी म्हटले की तेच चित्रपट बघितले जायचे. किंबहुना अशोक सराफला गंभीर भुमिकेत बघितल्यावर माझ्या बालमनाला प्रश्न पडायचा हे मामा अशी भुमिका करत आहेत म्हणून..
आणि हो, याउपर ते महेश लक्ष्याचे पाच आकडी सुद्धा.. पण त्यांच्या दर्जाबद्दल एक वाद होईल, आणि त्यावरून लक्ष्याला सुपर्रस्टार ठरवायचे का हा दुसरा होईल.
<< याउपर ते महेश लक्ष्याचे
<< याउपर ते महेश लक्ष्याचे पाच आकडी सुद्धा.. >>
पाच अक्षरी
धुमधडाका
थरथराट
दे दणादण
धांगडधिंगा
खतरनाक
झपाटलेला
पछाडलेला
माझा छकुला
प्रशांत दामले, हा मराठी
प्रशांत दामले, हा मराठी रंगभूमीचा सुपर्रस्टार
श्रीराम लागू.
श्रीराम लागू.
यशवंत दत्त यांना कसे काय
यशवंत दत्त यांना कसे काय विसरताय ?
चेतनजी, ते मुद्दाम पाच आकडी
चेतनजी, ते मुद्दाम पाच आकडी लिहिले.. अक्षरीच्या जागी.. असो.. त्यात धडाकेबाज राहिला.. महेश कोठारे डॅमईटला अॅक्शन हिरो सुपर्रस्टार जंजीर फेम अमिताभ बनायचा किती चान्स दिला होता,.... त्याने स्वतः स्वतःलाच, पण .... घडता घडता राहिला.
महेश कोठारे = अमिताभ बच्चन
महेश कोठारे = अमिताभ बच्चन ?
श्रीराम गोजमगुंडेंचं पण नाव घ्या रेसमधे.
दादांचा सिनेमा बघून हिंदी
दादांचा सिनेमा बघून हिंदी वाले आपला सिनेमा रिलीज करायचे ... मला वाटते एवढा दरारा पुरेसा आहे superstar पद साठी ...
स्वाती चिटणीस - मराठी
स्वाती चिटणीस - मराठी रंगभूमी सुपर स्टार ...
चिरंजीव ऋन्मेष, रंगभूमीचा
चिरंजीव ऋन्मेष,
रंगभूमीचा विचार केलात तर सर्वप्रथम बालगंधर्व!
त्यांच्यानंतर
केशवराव दाते
चिंतामणराव कोल्हटकर (कायम खलनायक करूनही!)
डॉ. श्रीराम लागू
निळू फुले
प्रभाकर पणशीकर
डॉ. काशिनाथ घाणेकर
अशोक सराफ (ज्यांनी नाटकातले अशोक सराफ पाहीलेत त्यांनाच ते कळू शकेल)
नाना पाटेकर (एक पुरूष नाटक पुरेसं आहे त्याच्यासाठी!)
सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी
लक्ष्मीकांत बेर्डे (कायम टाईपकास्टच राहीला रंगभूमीवर)
आणि
मग प्रशांत दामले व इतर!
ज्यांनी नांदतीजागती पेशवाई पाहिली अथवा ऐकली त्यांना शनिवारवाड्याचं अप्रूप ते काय असणार?
सुपरस्टार म्हणजे काय, हे
सुपरस्टार म्हणजे काय, हे 'उद्या' लिहीन.
तूर्त, बाईंशी सहमत!
स्पार्टाकस, हे म्हणजे मी
स्पार्टाकस,
हे म्हणजे मी शाहरूख सुपर्रस्टार आहे म्हटल्यावर आधी संजीवकुमार, मग दिलीपकुमार ते अमिताभ वगैरे करत मग त्यानंतर कुठे शाहरूख खान असे बोलणे.
बाकी आपापली मते, आपापल्या अनुभवांवरून, प्रत्येकाला आपलीच आवड क्लास वाटणे स्वाभाविक आहे. दुसर्याची आवड खोडण्यापेक्षा आपली मांडणे केव्हाही चांगलेच
शाहरूख खानचा मराठी
शाहरूख खानचा मराठी चित्रपटसृष्टीशी काय संबंध?
दुसर्याची आवड खोडण्यापेक्षा
दुसर्याची आवड खोडण्यापेक्षा आपली मांडणे केव्हाही चांगलेच >>>
मी कुठे खोडली कोणाची आवड?
मला ज्या क्रमवारीने जे अभिनेते ग्रेट वाटतात तेवढेच लिहीले ना?
तुमची आवड तुमच्यापाशी, माझी माझ्यापाशी!
स्पार्टाकस | 26 December,
स्पार्टाकस | 26 December, 2014 - 12:50 नवीन
0
Vote up!
शाहरूख खानचा मराठी चित्रपटसृष्टीशी काय संबंध?
-->
शा खा चा उल्लेख केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही हो... मग धागा कोणताही असो ... जुना त्रास आहे ...
स्पार्टाकस, शाहरूख खानबरोबर
स्पार्टाकस,
शाहरूख खानबरोबर ईतरही हिंदी कलाकारांची नावे घेतली आणि ते उदाहरण म्हणूनच.
आवड खोडणे हे माझे प्रशांत दामलेचे वाक्य कोट करून पेशवाई शनिवारवाडा केलेत म्हणून तसे वाटले, तसे नसल्यास क्ष.! गै.स. न.
आधी ते सुपर्रस्टारचं
आधी ते सुपर्रस्टारचं सुपरस्टार करा जरा!
नको त्या जागी फाटल्यासारखा आवाज वाटतो तो!
मराठीतले पहिले सुपरस्टार होते
मराठीतले पहिले सुपरस्टार होते "राजा गोसावी"
अशोक सराफ - ११ नाना पाटेकर -
अशोक सराफ - ११
नाना पाटेकर - १०
दिलीप प्रभावळकर - ८
हेच जर हिंदीतला सुपर्रस्टार कोण असा धागा असता, एव्हाना ४०-५० अशी मते आली असती. मराठी माणसांच्या समूहावर मराठी अभिनेत्यांबद्दल कोणाला आस्था नाही असे नक्कीच म्हणू शकत नाही, पण याचाच अर्थ सुपर्रस्टार हि संकल्पना मराठी चित्रपट सृष्टीत रुजली नाही हेच खरे.
तुमचे जोशीबुवा किती?
तुमचे जोशीबुवा किती?
कुमार ऋन्मेष, मी तुमच्या
कुमार ऋन्मेष, मी तुमच्या स्वप्नील जोशीच्या धाग्यावर म्हणुनच असे लिहिले होते की<< मला वाटते नवीन धागा उघडला पाहिजे मराठी चित्रपटसृष्टीतील तुमचे आवडते कलाकार असा.>>>
पण तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुपर्रस्टार घडवण्याचा चंगच बांधलाय त्याला आम्ही काय करणार.

नरेश माने, हो, ती पोस्ट आपली
नरेश माने, हो, ती पोस्ट आपली वाचली होती. रात्री मग नाईलाजाने अवांतर चर्चा थोपवायला काढावा लागला धागा. मात्र यातून हे देखील दाखवायचे होते की मराठीत कोणालाही सुपर्रस्टार असे म्हणता येणार नाहीच, तर मग मी ट्विटरने लोकप्रियतेचा निकष लावत स्वप्निलचे अकाऊंट वेरीफाय केले तर त्याला त्या निमित्ताने मी सुपर्रस्टार म्हटल्यास हरकत काय. ज्या पदावर ईतर कोणाचाही हक्क नव्हताच तर कोणाच्या भावना दुखवायला नकोतच मुळात.
इथे पोस्ट अश्याच आशयाच्या आल्यात की सुपर्रस्टार म्हणायचे झालंच तर.. अमुकतमुक यांना म्हणावे लागेल. म्हणजे अधिकृत वा अनधिकृतरीत्या सुपरस्टार नाहीच!
Pages