'डीप वॉटर' बघितला. प्राईमच्या डिस्क्रिप्शन वरुन सायको-थ्रिलर होता. तो एरॉटिक थ्रिलर निघाला. ते ही ठीकच पण शेवटी पॉईंट काय होता कशाला इतकं लंबाण लावलं काही झेपलंच नाही. दोन दिवसांत बघुन संपवला झालं.
बेन अफ्लेक आणि अॅना डी अर्मास आहे.
आर आर आर च्या तिकीटी काढल्यात. टू डी मधेच बघणार होतो. पण भाऊ बघून आला त्याचा आग्रहाने थ्रीडी बघणार आहे.
सामरीच्या वेळचं थ्रीडी आवडायचं. आत्ताच्या तंत्रज्ञानात छोटी छोटी माणसं दिसतात.
Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 10:40
ते आर आर आर वाले टू-डी मधेच इतके अंगावर येतात की ३-डी मधे काय होईल! ट्रेलर पाहिला आहे फक्त. वाघाच्या दुप्पट डरकाळी, अॅथलेटिक अॅक्शन मधे पळणारा आदिवासी हीरो. रजनीकांत "चालबाज" मधे जशी लाथ मारून सायकल फ्लिप करतो तशी इथे ५०० सीसीची वाटणारी मोटरसायकल फ्लिप केलेली पाहिली.
फा,
लॉजिक घरी ठेवता येत असेल तर आर आर आर बघता येईल. नाहीतर बरेच दिवसात ज्याचे पोस्टमार्टेम करावे असे मूव्हीज पण नाहीत आलेले. भव्यता, भव्यता आणि मनोरंजन. त्याला देशप्रेमाचा आणि जय श्रीरामचा तडका. आजच्या काळातलं पब्लीक पण ७० च्या काळातल्या पब्लीकप्रमाणे शिट्ट्या मारताना बघून नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.
राम आणि भीम एकत्र आणून वाल्मीकी आणि व्यास यांना सलीम जावेद बनवून टाकण्याचे एक मोठे काम राजामौली यांच्या नावे अजरामर झाले आहे. ज्यु एनटीआर आवडत नव्हता. त्याचा सिनेमा पाहू शकेन एव्हढा विश्वास आला.
Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 17:14
म्हणजे साधारण सकाळी उठल्यापासून सुरू करायचे ते झोपेपर्यंत. झोप आली की मुव्ही पॉझ करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बघायला सुरुवात. >>>>>>> ऑ? मग बाकीची दिनचर्या कधी उरकायची?
आणि मग त्याची परिणीती राक्षसी आकाराचे साप, मगरी, सुसरी, मासे, शार्क >>>>> मला आवडतात असले चित्रपट. गॉडझिला चित्रपटातली त्याची एण्ट्री भारी होती.
'डीप वॉटर' बघितला. >>>>>>> नाव वाचून वाटल शार्कवर असेल.
अभिनयक्षेत्रात चमकण्यासाठी बेटी ही तरुण मुलगी हॉलिवूड मध्ये आपल्या काकूच्या घरी आली असते. काकू सध्या घरीं नसतेच- काकू सुद्धा अभिनेत्रीच असते. घरामध्ये बेटी येते तेव्हा घरी आधीच एक तरुण मुलगी असते. ती तिच्या काकूपासून लपून घरी घुसली असते. प्रेक्षकांना आधी दाखवण्यात आले असते की ती मुलगी एका अपघातात सापडली असते, आणि त्याआधी तिला मारण्याचा प्रयत्नसुद्धा झाला असतो. पण आत्ता त्या मुलीला काहीही आठवत नसते, स्वतःचे नाव सुद्धा आठवत नसते. ती पोस्टरवरचे नाव बघून स्वतःचे नाव रिटा आहे असं बेटीला सांगते. मग बेटी आणि रिटा रिटाच्या ओळखीचा तपास करतात- असे सुरुवातीचे कथानक आहे.
दोघी प्रमुख अभिनेत्या खूप सुंदर आहेत- आणि त्यांनी त्यांचे काम पण मस्त केलंय. खासकरून नाओमी वॉट्स ने साकारलेले बेटीचे पात्र. बेटी इतकी सद्गुणी आणि दयाळू का आहे ह्याची उकल शेवटी छान केली आहे.
वरकरणी सरधोपट वाटणारी गोष्ट असली तरी शेवट अत्यंत उलथापालथ करणारा आहे. शेवटामुळे सिनेमा सर्वसाधारण क्राईम ड्रामा न राहता वेगळ्याच सिनेप्रकारात जातो.
हा सिनेमा पूर्ण समजण्यासाठी आणि सगळ्या बाजू नीट समजण्यासाठी शेवट माहीत असल्यावर सिनेमा परत एकदा पाहावा लागेल. तोपर्यंत काही प्रसंग असंबंधीत वाटू शकतात.
मी इतक्यात प्राईमवर बघितलेले अप्रतिम मराठी सिनेमे.
-आरोन- सस्पेन्स, खिळवून ठेवणारा सिनेमा
-वेडिंगचा शिनेमा- इमोशनल, डोळ्यात पाणी आणणारा सिनेमा.
-पिंपळ-अजिबात बोअर झाला नाही
-मी शिवाजी पार्क- क्राईम,इन्वेस्टिगेशन, काय प्लानिंग आणि अभिनय एकेकाचा.
-अजून एक राहिला, 'ध्यानीमनी'- सस्पेन्स थ्रीलर, अश्विनी भावे,महेश. मांजरेकर खतरनाक अभिनय.
Submitted by mrunali.samad on 31 March, 2022 - 12:19
संवैधानिक इशारा द्यायला हवा
संवैधानिक इशारा द्यायला हवा होता.

अय्यो, लैच लोड घेतला भावाने
अय्यो, लैच लोड घेतला भावाने
काहीच्या काही बातमी.
काहीच्या काही बातमी.
बातमी लिहीणारा/री चा कट्टर
बातमी लिहीणारा/री चा कट्टर हिंदुत्ववादी असण्यावर फारच आक्षेप दिसतोय, अगदी जोर दिलाय त्यावरच
'डीप वॉटर' बघितला.
'डीप वॉटर' बघितला. प्राईमच्या डिस्क्रिप्शन वरुन सायको-थ्रिलर होता. तो एरॉटिक थ्रिलर निघाला. ते ही ठीकच पण शेवटी पॉईंट काय होता कशाला इतकं लंबाण लावलं काही झेपलंच नाही. दोन दिवसांत बघुन संपवला झालं.
बेन अफ्लेक आणि अॅना डी अर्मास आहे.
आर आर आर च्या तिकीटी
आर आर आर च्या तिकीटी काढल्यात. टू डी मधेच बघणार होतो. पण भाऊ बघून आला त्याचा आग्रहाने थ्रीडी बघणार आहे.
सामरीच्या वेळचं थ्रीडी आवडायचं. आत्ताच्या तंत्रज्ञानात छोटी छोटी माणसं दिसतात.
मलाही ते थ्रीडीत पहावे वाटू
मलाही ते थ्रीडीत पहावे वाटू लागले आहे
अॅना डी अर्मास आहे. >> अ
अॅना डी अर्मास आहे. >> अॅना डी फर्मास आहे
बेन चा सगळा चार्म हरवलाय सध्या. बॅटमन कर्स लागलाय त्याला.
व्हय. बेन अफ्लेक चेहेर्यावर
व्हय. बेन अफ्लेक चेहेर्यावर एकच भाव ठेवून पूर्ण चित्रपट वावरतो. लुक्सवर किती काळ जाईल तितका जाईल!
अॅना-डी दिसते पण भारी आणि काम पण चांगलं केलंय.
Anna cutie pie aahe. Ben
Anna cutie pie aahe. Ben recovering alcoholic. I loved his chin dimple though. In movie Armageddon
चित्रपट-एकादशी खत्तर्र्नाक
चित्रपट-एकादशी खत्तर्र्नाक आहे! >>> ह.पा
शुक्राणू - हे पिक्चरचे नाव आहे? सिरीयसली?
ते आर आर आर वाले टू-डी मधेच इतके अंगावर येतात की ३-डी मधे काय होईल! ट्रेलर पाहिला आहे फक्त. वाघाच्या दुप्पट डरकाळी, अॅथलेटिक अॅक्शन मधे पळणारा आदिवासी हीरो. रजनीकांत "चालबाज" मधे जशी लाथ मारून सायकल फ्लिप करतो तशी इथे ५०० सीसीची वाटणारी मोटरसायकल फ्लिप केलेली पाहिली.
फारेण्ड यान्चा जुना धागा
फारेण्ड यान्चा जुना धागा वाचून औरन्गजेब बघितला..एकदम मस्त मूव्ही आहे..शेवटपर्यन्त खिळवून ठेवले या पिक्चरने..
फा,
फा,
लॉजिक घरी ठेवता येत असेल तर आर आर आर बघता येईल. नाहीतर बरेच दिवसात ज्याचे पोस्टमार्टेम करावे असे मूव्हीज पण नाहीत आलेले. भव्यता, भव्यता आणि मनोरंजन. त्याला देशप्रेमाचा आणि जय श्रीरामचा तडका. आजच्या काळातलं पब्लीक पण ७० च्या काळातल्या पब्लीकप्रमाणे शिट्ट्या मारताना बघून नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.
राम आणि भीम एकत्र आणून वाल्मीकी आणि व्यास यांना सलीम जावेद बनवून टाकण्याचे एक मोठे काम राजामौली यांच्या नावे अजरामर झाले आहे. ज्यु एनटीआर आवडत नव्हता. त्याचा सिनेमा पाहू शकेन एव्हढा विश्वास आला.
म्हणजे साधारण सकाळी
म्हणजे साधारण सकाळी उठल्यापासून सुरू करायचे ते झोपेपर्यंत. झोप आली की मुव्ही पॉझ करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बघायला सुरुवात. >>>>>>> ऑ? मग बाकीची दिनचर्या कधी उरकायची?
आणि मग त्याची परिणीती राक्षसी आकाराचे साप, मगरी, सुसरी, मासे, शार्क >>>>> मला आवडतात असले चित्रपट. गॉडझिला चित्रपटातली त्याची एण्ट्री भारी होती.
'डीप वॉटर' बघितला. >>>>>>> नाव वाचून वाटल शार्कवर असेल.
आरआरआर वर कोणी धागा काढा रे.
लॉजिक घरी ठेवता येत असेल तर
लॉजिक घरी ठेवता येत असेल तर आर आर आर बघता येईल. >>>
हो रिव्यूज वाचून तसेच वाटले. पण पब्लिकला आवडलेला दिसतोय.
औरंगजेब एकदम हिडन जेम आहे. मस्त पिक्चर आहे.
औरंगजेब अर्जुन कपूर हेच मी
औरंगजेब अर्जुन कपूर
हेच मी लिहिले असते लोक पेटले असते..
च्रप्स - अर्जुन कपूरची तारीफ
च्रप्स - अर्जुन कपूरची तारीफ केल्यामुळे का? पण तुम्ही त्याला डायरेक्ट दिलीप कुमारच्या लाइनीत बसवला असता
लोल... नाही हो... चांगली
लोल... नाही हो... चांगली ऍक्टिंग फक्त... लोकांना वाटले असते मुद्दाम लिहितोय मी...
च्रप्स, खरं सांगा. लोक
च्रप्स, खरं सांगा. लोक पेटलेले आवडतात की नाही तुम्हाला?
चान्गला आहे औरन्गजेब, अर्जुन
चान्गला आहे औरन्गजेब, अर्जुन कपुरही बरा होता त्यात तेव्हा बराच बारिक झाला होता पण मुळ डुलत चालायची सवय कायम आहे,
रिशी कपुर वॉज द बेस्ट.
औरंगजेब पहिल्या वेळी बघितला
औरंगजेब पहिल्या वेळी बघितला तेव्हा आवडला होता. नंतर परत कधीतरी लागला होता तेव्हा एवढा आवडला नाही, परत बघावासा नाही वाटला.
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)
अभिनयक्षेत्रात चमकण्यासाठी बेटी ही तरुण मुलगी हॉलिवूड मध्ये आपल्या काकूच्या घरी आली असते. काकू सध्या घरीं नसतेच- काकू सुद्धा अभिनेत्रीच असते. घरामध्ये बेटी येते तेव्हा घरी आधीच एक तरुण मुलगी असते. ती तिच्या काकूपासून लपून घरी घुसली असते. प्रेक्षकांना आधी दाखवण्यात आले असते की ती मुलगी एका अपघातात सापडली असते, आणि त्याआधी तिला मारण्याचा प्रयत्नसुद्धा झाला असतो. पण आत्ता त्या मुलीला काहीही आठवत नसते, स्वतःचे नाव सुद्धा आठवत नसते. ती पोस्टरवरचे नाव बघून स्वतःचे नाव रिटा आहे असं बेटीला सांगते. मग बेटी आणि रिटा रिटाच्या ओळखीचा तपास करतात- असे सुरुवातीचे कथानक आहे.
दोघी प्रमुख अभिनेत्या खूप सुंदर आहेत- आणि त्यांनी त्यांचे काम पण मस्त केलंय. खासकरून नाओमी वॉट्स ने साकारलेले बेटीचे पात्र. बेटी इतकी सद्गुणी आणि दयाळू का आहे ह्याची उकल शेवटी छान केली आहे.
वरकरणी सरधोपट वाटणारी गोष्ट असली तरी शेवट अत्यंत उलथापालथ करणारा आहे. शेवटामुळे सिनेमा सर्वसाधारण क्राईम ड्रामा न राहता वेगळ्याच सिनेप्रकारात जातो.
हा सिनेमा पूर्ण समजण्यासाठी आणि सगळ्या बाजू नीट समजण्यासाठी शेवट माहीत असल्यावर सिनेमा परत एकदा पाहावा लागेल. तोपर्यंत काही प्रसंग असंबंधीत वाटू शकतात.
व्हीलनच्या घरी आगी लावणे , हा
व्हीलनच्या घरी आगी लावणे , हा राजामौलीचा आवडता छंद आहे ( लंका दहन ?)
मगधीरा - हेलिकॉप्टर व पेट्रोल पंप जळतो
मख्खी - तिजोरी जळते , शेवटी सगळेच जळते
बाहुबली - राजवाडा जळतो , एकदा गाडीचे चाक जळते
आर आर आर - ह्यातही राजवाडा जळतो
पिक्चर अजून बघितला नाही, युट्युबवर RRR fire scene सर्च केले
कॉमी तुम्हला मलहॉलंड दर्यीव
कॉमी तुम्हला मलहॉलंड दर्यीव आवडला तर donnie डोरको नक्की बघा...
डॉनी डार्को बघितलाय कि.
डॉनी डार्को बघितलाय कि. चांगला आहे.
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)
>>>> मी पण पाहीलाय हा सिनेमा... समजायला खरचं अवघड आहे.
मग explained in hindi सर्च केलं
तरीपण त्या दोघींना दिसलेलं शव कुणाचं होत ते कळल नाही
मी इतक्यात प्राईमवर बघितलेले
मी इतक्यात प्राईमवर बघितलेले अप्रतिम मराठी सिनेमे.
-आरोन- सस्पेन्स, खिळवून ठेवणारा सिनेमा
-वेडिंगचा शिनेमा- इमोशनल, डोळ्यात पाणी आणणारा सिनेमा.
-पिंपळ-अजिबात बोअर झाला नाही
-मी शिवाजी पार्क- क्राईम,इन्वेस्टिगेशन, काय प्लानिंग आणि अभिनय एकेकाचा.
-अजून एक राहिला, 'ध्यानीमनी'- सस्पेन्स थ्रीलर, अश्विनी भावे,महेश. मांजरेकर खतरनाक अभिनय.
धन्यवाद मृणाली.. लिस्ट मध्ये
धन्यवाद मृणाली.. लिस्ट मध्ये ऍड करतो
आबा, इथे दिलेले आहे तेच मला
आबा, इथे दिलेले आहे तेच मला पण वाटले
https://www.thisisbarry.com/film/mulholland-drive-explained-simply-with-...
Prime: ऋषी कपूर यांचा शर्माजी
Prime: ऋषी कपूर यांचा शर्माजी नमकीन हा चित्रपट सुद्धा खूप छान आहे. बर्याच दिवसांनी जुनी दिल्लीचे दर्शन झाले.
Pages