चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभास बाहुबलीत भयंकर आवडला होता.
त्यानंतर त्याचे बरेच सिनेमे पाहिले हिंदी डब्ड. बराच यंग असतानाचे. ते पण आवडले.
म्हणुन साहो बघणार होते. रिव्युज बघुन रद्द केलं.
आता राधेश्याम पण नाही बघणार.
तसंही आता प्रभासची जादु उतरलीये डोक्यातुन.

धन्यवाद

बधाई दो मध्ये राजकुमार रावचे अ‍ॅक्टिंग फार आवडले नाही त्याउलट तो गुरु नामक नट आहे, त्याचे उजवे वाटले. सिनेमा चांगला वाटला.

बधाई दो विषय चांगला मांडला आहे मात्र फार लांबवला आहे.. एडिटिंग पाहिजे... त्या जिजाचे एकही जोक हसवत नाहीत... फॅमिली शी कनेक्ट होत नाही पब्लिक जसा बधाई हो मध्ये होत होते... भूमी एकदम ऍव्हरेज परफॉर्मन्स.... राजकुमार राव सस्ता आयुष्मान वाटतो पूर्ण चित्रपट भर... हंटर वाला गुलशन ने मस्त काम केले आहे आणि त्याच्या एंट्री नंतर चित्रपट चांगला पळतो ...
शेवटच्या गाण्यात राजकुमार आय मास्क घालून नाचायला लागतो तिथेच चित्रपट संपवायला पाहिजे होता.. ते गाणे छान आहे आणि ते मस्त एंडिंग झाले असते ...

बधाई दो चांगला वाटला.

पावनखिंडही पाहिला. त्यात 'तानाजी'पेक्षा कमी अ आणि अ सीन्स आहेत. त्यामुळे ठीक आहे, नाहीतर सभात्यागच करणार होतो. सगळ्या ऐतिहासिक चित्रपटात शत्रू एवढे बावळट का दाखवतात? शत्रूकडे अजिबात शौर्य, सामर्थ्य, बुद्धिमत्ता नसताना त्यावर मात करणारे शिवाजी, मावळे किंवा भारतीय सैन्याचे जवान हे अगदीच सहज जिंकू शकतील, मग त्यात नवल ते काय - असं वाटतं ते चित्रपट बघताना.

खिंडीत आल्यावर कमी सैन्यानिशी लढताना काय युक्ती लढवता येईल (त्यांनी त्यावेळी काय केले असेल) हे पाहणे रोचक ठरले असते. मला वाटलं की ते बाजी, बांदल यांपैकी कुणीतरी काहीतरी पटकन योजना आखेल. पण पाहतो ते काय - योजना काहीच नाही, नुसतंच स्फुरण! युक्ती काय लढवली तर एकटे बाजी समोर उभे राहिलेले दिसतात (ज्यांचं चेवपूर्ण भाषण ऐकत बसण्याऐवजी शत्रूने त्यांना लांबून बाण मारून केव्हाच जखमी केलं असतं) आणि बाकीचे लोक पाण्यात श्वास रोखून लपून बसलेत (खिंडीतून वाहणार्‍या पाण्याची खोली ती काय असणार! त्याच्याही खाली. स्वदेस पिक्चरमध्ये एक मीटर उंचीच्या टाकीत आख्खा शाहरुख आत बुडी मारून पाईपमध्ये अडकलेला कचरा काढतो - ते गणित बरं असं म्हणायची पाळी आहे.). शिवाय पाण्यात श्वास रोखून बसणे (शत्रू येऊन आणि बाजींचं भाषण / दटावणी वगैरे संपेपर्यंत) - काय मूर्खपणा आहे! शत्रू उशीरा आला तर मावळा उगीच गुदमरून मरेल. आधीच संख्या कमी, त्यात ही असली रिस्क! त्यातही शत्रू हरतो म्हणजे तो किती बावळट असेल!!
(हे चित्रपट पाहतानाचे विचार आहेत. खर्‍या इतिहासात दोन्ही बाजू नक्कीच बावळट नव्हत्या आणि काहीतरी अचाट दर्जाची ती लढाई झाली असणार ह्यात शंका नाही. पण आपल्याला अचाट म्हणजे नुसतं शौर्य, एक माणूस दहा-वीस जणांना लोळवतो - इतकंच काय ते वाटतं. त्या जोडीला चातुर्य असल्यामुळेच ह्या लढाया जिंकल्या गेल्या. त्याचा मागमूसही चित्रपटात नसल्याने तो अगदीच बाळबोध वाटतो.)

काही शाळा मुलांना हा चित्रपट बघायला घेऊन जात आहेत असं ऐकलं. चित्रपटात अनेक हिंसक दृष्य आहेत. ती अंगावर येऊ शकतात. निदान १२च्या खालील मुलांना शाळेकडून हा दाखवला जाऊ नये असं वाटतं.

चित्रपटात अनेक हिंसक दृष्य आहेत. ती अंगावर येऊ शकतात. निदान १२च्या खालील मुलांना शाळेकडून हा दाखवला जाऊ नये असं वाटतं.>>+१

पावनखिंड किंवा तिचे फोटो (मी फोटोच पाहिलेत) पाहिले की कळतं , शत्रूला अडवायला तीच जागा का निवडली ते. एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल इतकी अरुंद खिंड आहे. तिथे एकास एक लढाईला पर्याय नाही.
शत्रूकडे धनुष्यबाण नसावेत.
८-९ वर्षांपूर्वी नववी इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात विठ्ठ्ल रामजी शिंदेंचा पन्हाळादर्शन हा पाठ होता. तेव्हा ते फोटो शोधले होते.
आता नेमकी ती खिंड दाखवणारा फोटो शोधता आला नाही. एकतर चित्रपटाचे फोटो नाहीतर ट्रेकर्सचे.

मी करीन ती पूर्व या नाटकाचा एका हौशी प्रयोग लहानपणी दीनानाथला पहिल्या रांगेत बसून पाहता आला होता. त्यातला शेवटचा लढाईचा प्रवेश तेवढा लक्षात आहे

मिसळपाव वरचं डॉ सुहास म्हात्रेंचं मत पटलं.

दुसरी शक्यता ही की पर्यटन, ट्रेकिंग वाढल्याने बदल केले गेले असावेत. कारण मी ८-९ वर्षांपूर्वी शोधलं तेव्हा बाजीप्रभूंच्या पुतळ्याचा फोटो दिसला नव्हता.

ह.पा. एकदम पटलं!

पावनखिंड म्हणून आपण आज जी जागा ओळखतो ती खरीच आहे की दुसऱ्या जागी ती लढाई झाली होती यावर कौस्तुभ कस्तुरे यांचा एक चांगला लेख वाचला अलीकडे.

अररारा पाण्यात मावळे लपून बसतात असं दाखवलं आहे, कर्म Happy
असली काहीतरी माती करण्यापेक्षा बाहुबली सारखे काल्पनिक सिनेमे का नाही बनवत, त्यात काय काहीही दाखवलं तरी चालतं
उगाच ऐतिहासिक घटना घेऊन त्यात अतर्क्य प्रसंग दाखवण्यावर कायमची बंदी घालण्यात यावी Happy

भरत धनुष्य बाण नव्हते पण ठासणीच्या बंदुका होत्या की

मी एक ट्रेलर मधला सिन पहिला त्यात बाजीप्रभू चल असे म्हणतात ते अफाट कॉमेडी आहे
बहुदा सर्गढी मधला अक्षय कुमार चल झुठा म्हणतो तो प्रसंग आवडला असावा निर्मात्याला मग काय घुसडा आपल्या सिनेमात पण

ट्रेलर मध्ये कोणीतरी मावळा इंग्रजांना भोसकतो तेही अफाट आहे

अररारा पाण्यात मावळे लपून बसतात असं दाखवलं आहे >> सॉरी! स्पॉयलर अ‍ॅलर्ट द्यायला विसरलो. चित्रपट स्पॉईल करणारा स्पॉयलर आहे हा.

मी एक ट्रेलर मधला सिन पहिला त्यात बाजीप्रभू चल असे म्हणतात ते अफाट कॉमेडी आहे
>>>>
आमच्याकडे मला हाच सीन दाखवून पिक्चरला चल, मनोरंजक आहे म्हणून आग्रह करत होते Happy
अर्थात ट्रेलरला तो सीन टाकणार्‍यांचा हेतूही तोच असणार म्हणा...

वरची मिसळपाववरची लिंक पुर्ण वाचावीशी वाटली. म्हणजे ईतिहास जाणून घेण्यात रस आहे. पण फिल्मी पद्धतीने दाखवलेला बघण्यात रस नाही. तानाजीने जीभ पोळलीय, पुन्हा मन धजावत नाही.

पावनखिंड म्हणून आपण आज जी जागा ओळखतो ती खरीच आहे की दुसऱ्या जागी ती लढाई झाली होती यावर कौस्तुभ कस्तुरे यांचा एक चांगला लेख वाचला अलीकडे >>>
हा लेख कुठे वाचलात, सांगाल का ?

ती लढाई पावनखिंडीत नाही तर विशाळगडाच्या पायथ्याशी झाली होती असे सांगणारा का?
त्यातले काही पटले काही नाही
म्हणजे जागा दुसरी असू शकते हे पटण्याजोगे आहे पण बाजीप्रभू हे महाराजांच्या सोबत नव्हतेच, ते विशालगडाहून निघाले आणि लढाईत मारले गेले इत्यादी नाही पटलं

हा लेख कुठे वाचलात, सांगाल का ?

नवीन Submitted by चिन्मय_1 on 15 March, 2022 - 14:29
> मला पीडीएफ मिळाली होती. मी फेसबुकवर नाही, पण इतिहासाच्या पाऊलखुणा नावाच्या फेसबुक ग्रुपवर ती पीडीएफ त्यांनी दिली होती असं कळलं.

आशुचँप, त्यांनी वेगवेगळ्या शक्यता मांडल्या आहेत. विशाळगडावरून परत खाली येऊन लढाई केली हे पटण्यासारखे नाही असंच त्यांनी पण लिहिलं आहे.

अमेरीकेतल्या थिएटरातले बायकांचे वॉशरूम दाखवलेय त्यात, ते सुद्धा पाणी वगैरे फ्लश करून... धन्य आहे ती विडिओ बनवणारी Happy

Lol

Lol आवरा

Lol अचाट व्हिडीओ आहे. मी म्यूटवर पाहिला. झुंड बद्द्ल काही आहे का त्यात? रेल्वे फॅन्स चे व्हिडीओ ब्लॉग्स असतात तसा आहे हा. अगदी स्टेशनपासून सुरूवात करून मग गाडीतील डब्यांची माहिती वगैरे देतात. तो पॅटर्न आहे.

अमेरिकेत दुसर्‍या आठवड्यात शोज सुरू आहेत.

Pages