परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधल्या फोटोतले गृहस्थ हा फोटो काढला तेव्हा चान्दणी चौकात उभे होते, त्याआधी ते पहिल्या फोटोत जो डोंगर दिसतो तो ज्या चौकातून दिसायचा तिथे रहायचे. नंतर ते चीनमध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी एक पुस्तक लिहिले त्याचे नाव 'चान्दणी चौक टू चायना', तिसरा फोटो हे त्या पुस्तकाचे कव्हर आहे. त्यावर मधल्या फोटोतल्या गृहस्थांचाच फोटो आहे, टोपी आणि वेष यामुळे वेगळे दिसतात. (अधिक माहिती- या पुस्तकावर आता सिनेमाही निघाला आहे.)

मला मधला फोटो झक्कींसारखा वाटतोय ..

क्लिओ, झालं? :d
ती चीनची भिंत नाही आणि त्या माणसाचं नावही चिन्मय नाही.

सशल, ते झक्कीही नाहीत. :p त्या माणसाचं नाव सांगितले तर ओळखता येईल. पण त्याआधी पहिल्या आणि तिसर्‍या चित्रातला संबंध तरी ओळखणे एवढे कठीण नाही.

--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया

पहिला फोटो मला मनमाड स्टेशन सोडल्या सोडल्या दिसणार्‍या डोंगरासारखा दिसतोय. त्याला आम्ही थम्स अप डोंगर म्हणायचो. अक्षय कुमार थम्स अपची जाहिरात करतो. अक्षय कुमार 'चांदणी चौक टू चायना' ह्या चित्रपटात देखील होता.
मधल्या गृहस्थांबद्दल माहिती नाही. पण ओल्ड मंक ह्या डार्क रम बरोबर थम्स-अपच चांगले लागते आणि कोक-पेप्सी वगैरे फारच भिकार लागते ही माहिती मला आहे. त्याचा काही उपयोग होउ शकतो का इथे? Proud

टण्या बरोबर. Happy

त्या माणसाचे नाव रमेश चौधरी - पार्ले बंधूंपैकी एक. ज्यांनी थम्सअप या पेयाला आपले फ्लॅगशीप ड्रींक (याला मराठीत काय म्हणता येईल?) म्हणून घोषित केले.

'थम्सअप' हा या तीन चित्रातला समान धागा.

--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया

मुंबई पुणे मार्गात ते Duke's Nose नामक काहितरी दिसतं तेही असंच दिसतं का? ह्या Thumbs-up सारखं?

बापरे, टण्या..
तीर डायरेक्ट निशानेपे!
एवढं नसतं बुवा आलं आपल्याला!

जीडी, पुढची चित्रमालिका येऊद्या! Happy

हे घ्या पुढचं - Happy

Quiz2.jpg

गजानन काही क्लू लागत नाही. बाकी कोणी हे बघितले का? एखादेवेळेस पान एकदम मागे गेल्यामुळे कोणाला दिसले नसेल.

जीडी आयडीया सही है! टण्या ग्रेट!
_______________________________
"शापादपि शरादपि"

अमोल, शुक्रवारी टाकलेले म्हणजे बरेच मागे गेले असणार. Happy

बाकी कोणी बघितले का हे? उत्तर सांगू का? Happy

जीडी, पहिले फारच मस्त होते. टण्या एकदम भारी उत्तर..
दुसरे काहीच क्लू लागत नाहीये..
जीडी जरा क्लू देणार का?
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

क्लू : मारुती Happy

मिंटो फ्रेशचा जपानशी काही संबंध आहे का?

नाही. Happy

टाटा आणी मारुती हे जॉईंट व्हेंचर ने मिंट ओ फ्रेश च प्रॉड्क्शन करणार का?
Happy

मारूती (सुझुकी) वरून टाटा, टेल्को, अगदी डेमलर बेंझ पर्यंत जाउन आलो, पण अजून काही लिन्क लागत नाही. त्यात मिंटो फ्रेश बद्दल माहिती नाही फारशी.

कदाचित मिंट फ्रेश च्या जाहिरातीमध्ये टाटा आणि मारुती ह्या गाड्या दाखवल्या असतील.
नाहीतर मिंट ओ फ्रेश डान्स का चान्स मधे मारुती मिळणार असेल, पुर्वी टाटा मिळत असावी.

मिंटो फ्रेशच्या कँपेनमधल्या राखी सावंतचा काही संबंध नाही ना?

टाटा सुमो - पहिलवान
सुझुकीची मारुती - पहिलवान
मिन्टो फ्रेश - पहिलवानाशी काय सम्बंध आहे बर.!, काही तरी असला पाहीजे.
आमच्या पहिलवानी डोक्यात नाही शिरत.:) (जरा मिन्ती घ्यायला पाहीजे. दिमागकी बत्ती जलवायला)

उत्तर - पहिले चित्र टाटा मोटर्स, दुसरे चित्र सुझुकी. टाटाने इन्डिका बनवली तेव्हा त्या प्रकल्पाचे नाव 'मिन्ट' ठेवले. 'मारुती इन ट्रबल'!

बापरे! हे लक्षातच आलं नसतं. धन्यवाद जीडी Happy

आता पुढची चित्रं..

सहीच गजानन.. Happy अजून येऊं दे!

सहीच जीडी Happy
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

गजा हे अंमळ अवघडच होते हं. Happy सही आहे.

अरे, सही आहे!! लक्षात् आलंच नव्हतं.
--------------
नंदिनी
--------------

सही आहे गजानन. मी इंडिका च्या वेळेस त्या प्रोजेक्ट च्या SAP implementation साठी काम करत होतो, पण ते कोडनेम लक्षात नाही. आता उगाचच अंधुक आठवल्यासारखे वाटते Happy

सही ...अवघडच होते हे ओळखणे.
ह्या प्रोजेक्ट्चे नाव माहीत नव्हते म्हणुन उगाच 'मिंट ओ फ्रेश' ह्या ब्रँडशी बादरायण संबंध लावत होतो. Happy

1.jpg

या ३ चित्रांमधला संबंध ओळखा.. अगदी सोपे आहे.

देख के लख लख परदेसी गर्ल, एव्हरीबडी लाईक माय देसी गर्ल. Proud

Pages