परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. हे समाजसेवक होते.
लोकहो,
हे गृहस्थ ओळखता येत नसतील, तर मर्ढेकरांच्या लेखनाकडे लक्ष द्या.. Happy

.

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    चिनुक्स, ते डॉ. प्रकाश आमटे आहेत का? (एक खडा टाकलाय..)

    नाही. आमट्यांपैकी कोणी नाहीत. पुलंनी यांच्यावर, यांच्या कामाबद्दल लेख लिहिला आहे.

    चिन्मय, मधल्या व्यक्तीचा समाजकार्याबरोबरच शिक्षण क्षेत्राशी संबंध होता का?

    नाही. मला जो शब्द हवा आहे, त्याच क्षेत्राशी संबंध होता. हा शब्द मर्ढेकरांच्या आयुष्यात महत्वाचा होता, आणि गेली अनेक वर्षं शेखर कपुरच्याही.

    पुनर्वसन?
    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    तो लेख 'गुण गाईन आवडी'मध्ये आहे का रे?

    स्वाती, आर्फी,
    नाय Happy

    चित्राची हिंट घेतली तर त्यात 'कृष्णमूर्ती' आहे. Happy

    आणि गेली अनेक वर्षं शेखर कपुरच्याही.
    >> हे वाचून मला सुचित्रा कृष्णमूर्ती आठवलं. Happy

    --------------
    नंदिनी
    --------------

    स्पिरीचुआलिटी? मधली व्यक्ती कोणी spiritual leader आहे का?

    नाही. समाजसेवा.

    'पाणी' हा तुला हवा असलेला शब्द आहे का?

    मर्ढेकरांचं पुस्तक आणि शेखरकपूरची डॉक्युमेंटरी त्याच नावाने. (मधल्या व्यक्तीचा त्याच्याशी असलेला संबंध?? विचार करावा लागेल)

    येस्स.. पाणी.. Happy

    मर्ढेकरांची पहिली कादंबरी - पाणी
    श्री. विलासराव साळुंखे - जलव्यवस्थापन, पाणी पंचायत
    शेखर कपुर - आगामी चित्रपट (अनेक वर्षं तयार होत असलेला) -पानी
    कृष्ण व गोपी - वृंदावन - वृंदावनच्या विधवा - Water.

    chinoox आणि बाकी कोडे टाकणारे, ते फोटो वरती चिकटवता येतील? म्हणजे जे कोडे सुटलेले नाही ते लगेच वर दिसेल. मागे जावे लागणार नाही.

    सिनेमा आहे होय. मला वाटलं डॉक्युमेंटरी!

    हे जरा जास्तच अवघड होतं बरका! Sad
    मी शोधून शोधून दमले! Happy

    www.bhagyashree.co.cc

    पुलंनी विलासराव साळुंख्यांवर लेख लिहिलाय?
    कुठल्या पुस्तकात आहे? (म्हणजे दुसर्‍या शब्दांत - मला कसा आठवत नाही! :P)

    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    पुलंच्या शेवटच्या काळात किंवा ते गेल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात हा लेख आहे. बहुतेक अघळपघळ.

    ह्म्म.. शोधते आता घरी गेल्यावर.

    (बाकी शेवटचा क्लू हा क्लू नसून वाईट दिशाभूल होती हाँ! :P)

    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    चिन्मय, अघळपघळमधे नक्कीच नाही.

    मग पुस्तकाचं नाव उद्या सांगतो. पण लेख आहे हे नक्की. तो लेख वाचूनच मला साळुंख्यांबद्दल कळलं होतं.

    लेख नक्की आहे, मी वाचलाय... 'एक शून्य मी' पुस्तकात बहुतेक..

    www.bhagyashree.co.cc

    अरे मस्त आहे बाफ.
    हे माझं पण एक कोडं.

    1.jpg2.jpg4.jpg3.jpg

    वरील सर्व चित्रांतून एका प्रसिद्ध व्यक्तीचे नाव अपेक्षित आहे.

    ..

    आता दिसतंय ना व्यवस्थित ?

    हो. आता दिसतं आहे. Happy

    दुसरे चित्र कसले आहे? फारच लहान आहे
    बरे .. हे विनोदी सिनेमा/नट ह्या संबंधित आहे का? - दादा कोंडके?

    Pages