परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके आता मी खरंच उत्तर देतो Happy
दुसरे चित्र पथेर पांचालीमधील दृष्य. नेव्ही कटचे पाकीट सत्यजित रे यांनी डिझाईन केले होते.

पण टण्या, मला आज अजून एक संबंध सुचला -
त्या जहाजावर (शिप) वर ४२ आहे - Hitchhikers' guide to galaxy : A trilogy in five parts. हे पुस्तक ५ भागात असले तरी त्याला trilogy म्हणतात. पाथेर पांचाली हीसुद्धा तीन चित्रपटांची मालिका.

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    .

    सही.. Happy

    खालील चित्रातील तीन व्यक्तींमध्ये एक समान संबंध आहे. तो ओळखा.
    दुसर्‍या चित्रातील व्यक्ती ओळखल्यास तो संबंध लगेच कळेल.

    pz.jpg

    अरे स्लार्ट्या, पण मग त्या ट्रिलॉजीत ctrl+x कट चे काय करणार? Happy

    टण्या, हिंट म्हणजे help document आहे... म्हणजेच गाईड Happy

      ***
      A falling leaf
      looks at the tree...
      perhaps, minus me

      संबंध म्हणजे साम्य आहे अशा अर्थी का??
      -----------------------------------------------------------
      विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
      -----------------------------------------------------------

      या तिघाही व्यक्तींना जोडणारा एक शब्द आहे. या तिघांच्याही कार्यक्षेत्राशी संबंधित.

      टण्या पॉपीचा उपयोग पण नेव्ही कट मधुनच होतो ना? एक भा. प्र. Proud

      टण्या पॉपीचा उपयोग पण नेव्ही कट मधुनच होतो ना? एक भा. प्र.
      >>>>
      नेव्ही कट वगैरे जरा कुचकामीच.. जेव्हडी लांब तेव्हडी चांगली पॉपीसाठी.. Wink

      पहिला तर कही ओळखुच येत नाहिये. दुसरा पण. पण बघितल्यासारखा वाटतोय. तिसरा शेखर कपूर यांचा. एव्हढेच कळतेय. अजुन काही हिंट मिळेल?
      -----------------------------------------------------------
      विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
      -----------------------------------------------------------

      अर्रे, दुसरा ओळखीचा आहे. जऽऽरा हिंट दे Happy

        ***
        A falling leaf
        looks at the tree...
        perhaps, minus me

        मिस्टर इंडियाचा काही संबंध आहे का?

        पहिल्या चित्रावर स्वाक्षरीही आहे वाटते.

        मायबोलीवर व्यवस्थित संचार असेल, तर पहिला फोटो कोणाचा, हे कळेल. Happy
        दुसर्‍या फोटोतील व्यक्ती आता हयात नाही. त्यांच्यावर टण्याच्या आवडत्या लेखकाने एक लेख लिहिला आहे.
        या तिघांना एकत्रित जोडणारा जो शब्द आहे, त्याचा चित्रपटाशी संबंध आहे. शेखर कपुर असल्याने तसा संबंध असणारच. पण मि. इंडियाचा अजिबात काही संबंध नाही.

        Passion हा शब्द असु शकतो का ? Wink
        हे तिघेही आपले काम खुप passionately करत असतील. Proud
        -----------------------------------------------------------
        विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
        -----------------------------------------------------------

        Happy नाही. म्हणजे मला अपेक्षित असलेलं हे उत्तर नाही.
        दुसरा फोटो कोणाचा, हे ओळखल्यास उत्तर सापडण्याची शक्यता जास्त.

        पहिला फोटो मर्ढेकरांचा आहे.

        बरोब्बर. पहिले मर्ढेकर.

        ओह! Happy

        टण्याचे आवडते लेखक मला ठाऊक असलेले म्हणजे जीए.

        नाही.. 'आवडते'.. म्हणजे पुलं..

        त्यांच्यावर टण्याच्या आवडत्या लेखकाने एक लेख लिहिला आहे
        >>>>
        त्यांनी कुणावर लिहायचे सोडले आहे? Proud दुसरा फोटो बाबांचा आहे की काय तरुणपणातला?

        समान शब्द डायरेक्टर असावा. शेखर कपूर फिल्म डायरेक्टर, मर्ढेकर रेडिओ स्टेशन डायरेक्टर.

        मधले कोण नाही ओळखत.

        <समान शब्द डायरेक्टर असावा. शेखर कपूर फिल्म डायरेक्टर, मर्ढेकर रेडिओ स्टेशन डायरेक्टर.>

        नाही. मधल्या फोटोशी हा संबंध जुळत नाही.

        <कविता>

        या शब्दाचाही मर्ढेकर वगळता इतर दोघांशी संबंध नाही.

        आयला,आता मधले बाबाजी शोधण अवघडच म्हणायच.
        ~~~~~~~~~~~~~~~~~~
        अच्छा था मन का अवसन्न रहना
        भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
        पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
        कि बहुत दिन हो गये घरको छोडे|

        आचवल आहेत का ते मधले ?

        हायला, म्हणजे नाथा कामत ज्यांच्यावरून घेतले तेच की काय हे ?

          ***
          A falling leaf
          looks at the tree...
          perhaps, minus me

          नाही. आचवल नाहीत. फोटोतील व्यक्तीचं कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यात होतं.

          मधले कोणी आघाडीचे समाजसेवक आहेत का? चेहेरा खुप ओळखीचा वाटतोय पण नाव मात्र अजिबात आठवत नाही ..

          Pages