Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या सात्विक सोल ने टिकली का
त्या सात्विक सोल ने टिकली का लावली नसेल?
पुरोगाम्यांना शेफाली वैद्य
पुरोगाम्यांना शेफाली वैद्य च्या विचारांकडे दुर्लक्ष करुन कुण्या सात्विक सोल च्या ट्वीट उचलून धराव्याशा वाटतात हे फार बोलके आहे.
शेंडे, तुम्हाला ‘ब्लॅक लाइव्ज
शेंडे, तुम्हाला ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ प्रकरणात फोडल्या गेलेल्या दुकानांचा कळवळा आला होता, तेव्हा अमेरिकेतल्या न फोडल्या गेलेल्या दुकानांची कित्येक पटींनी मोठी असलेली संख्या आठवून दिलासा कसा नाही वाटला?
गृपमधल्या पेन्शनर काकांना
गृपमधल्या पेन्शनर काकांना मुसलमानांना त्रास झाल्या वर गुदगुल्या होत असतील तर ठीक च आहे. खरी मजा कॉर्पोरेटस ची येणार आहे. ह्या लोकांनी भाजपाला फंडिंग स्वत चे हितसंबंध जपण्यासाठी दिले. तसे पॉलिसी चेंजेस दिसतात पण. त्यांना असे वाटत होते की निवडणूक संपली की हे धार्मिक द्वेषाचे भूत लगेच कपाटात बंद करून ठेवता येते.
पण ते जेव्हा हाताबाहेर जाईल तेव्हा सर्वात आधी यांची सप्लाय चेन गोत्यात येणार आहे.
दुसरे असे की वाय ओ वाय ग्रोथ ही काही सुख वस्तू मध्यम वर्गीय देत नाही तर आर्थिक दृष्ट्या मागासलेला एक लेयर अपलिफ्ट होतो तेव्हा ती टारगेट ऍचिव्ह होतात. आज त्यांनाच चिरडायचे पध्दतशीर प्रयत्न सुरू आहेत.
फारएन्ड, भरत, लंपन व इतर
फारएन्ड, भरत, लंपन व इतर पुरोगामी
+११११
>>>पुरोगाम्यांना शेफाली वैद्य
>>>पुरोगाम्यांना शेफाली वैद्य च्या विचारांकडे दुर्लक्ष करुन कुण्या सात्विक सोल च्या ट्वीट उचलून धराव्याशा वाटतात हे फार बोलके आहे.
शेफाली वैद्याचेच विचार पाहू. जशने रिवाज म्हणजे "परंपरेचा सोहळा" ह्यात काय प्रॉब्लेम आहे वैद्य बाईला ? हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे काय का उगाच स्नोफ्लेक अस्मिता दुखावल्या आहेत ?
(शेंडे, तुम्ही कॅन्सल कल्चर बद्दल नाही बोलत ना कधी ? उगाच विचारतो.)
नाझीकाळात जे समर्थक होते
नाझीकाळात जे समर्थक होते त्यांनी हिटलर मेल्यावर "आमचं समर्थन नव्हतंच, आमच्यावर समर्थन द्येयची जबरदस्ती होती" असा युटर्न मारला. आजच्या काळात सर्वकाही जालावर अनंतकाळ रहाणार आहे पण सरकार मात्र कधीनाकधी बदलणारच. तेव्हा हे भगतगण युटर्न मारू शकणार नाहीत. कोणी या द्वेषपुर्ण, अतिरेकी विचारांना उघड समर्थन दिले, कोण महत्वाच्या वेळी व्हाॅट्बाउट्री करत होते, कोण विरोधकांनाच विखारी म्हणून हिणवत होते हे सर्व इथेच रहाणार आहे.
हे वैद्यबिद्य भडकाऊ लोक सरळ बाडबिस्तरा उचलून परदेशी पळून जातील. शेंडेबिंडे तर परदेशीच आहेत तसेही. इथल्या लोकांनी भडकाऊ लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे हेच उत्तम. काळ बदलला अन दुसर्यांवर जी लाचारीची परिस्थिती आणेयला मजा येतेय ती तुमच्यावरही येऊच शकते. मूळात कोणालातरी त्रास व्हावा, त्याला लाचार करावे, त्याची रोजीरोटी हिसकवावी, बायकांना हळूहळू बंदिस्त करण्याकडे वाटचाल करावी अशा इच्छा असणे हेच बिघडलेल्या मेंदुचं आणि चुकीच्या संस्काराचं लक्षण आहे. सर्वे भवन्तु सुखीनः हे कोण्या धर्मात सांगितलंय? मुस्लिम?
सतत "ते" अमकं करतात म्हणून आम्हीपण करणार हे काय विचित्र लाॅजिक घेऊन फिरतात कळेना. हे म्हणजे फर्स्टक्लास येणार्या मुलाने सदैव नापास होणार्याची काॅपी करण्यासारखं आहे.
फर्स्ट क्लास येत होता, आता डिस्टिंक्शनची तयारी करायची तर याना नापास व्हायचे डोहाळे लागलेत.
सतत "ते" अमकं करतात म्हणून
सतत "ते" अमकं करतात म्हणून आम्हीपण करणार हे काय विचित्र लाॅजिक घेऊन फिरतात कळेना.
शिवात "ते" जे काही चांगले करतात त्याचे अनुकरण नाही करणार !
मोहम्मद शमी ट्रोल प्रकरण आले
मोहम्मद शमी ट्रोल प्रकरण आले / येऊन गेले का या धाग्यावर?
भारत पाक सामना हरताच मोहम्मद शमी देशद्रोही म्हणून ट्रोल झाला ट्विटरवर..
चक दे मध्ये जेव्हा शाहरूख खान उर्फ कबीर सिंगला जेव्हा गद्दार म्हटले गेले तेव्हा वाटले छे असे कधी होते का..
मोहम्मद अझरुद्दीन जो फिक्सिंगमध्ये अडकला त्याबद्दल सुद्धा कधी तो मुसलमान असल्याचे विचार मनाला शिवले नाही..
शमी बाबत तर मुसलमान आहे हे ध्यानातही नव्हते. हे ट्रोल प्रकरण समोर आले तेव्हा जाणवले की त्याचे पहिले नाव मोहम्मद आहे ..
मेरा देश बदल रहा है ... परकीयांशी लढा रे, स्वकियांशी नको
तुमची पोस्ट कोणाला विखारी
तुमची पोस्ट कोणाला विखारी वाटली आणि तसं म्हटलं तर तो गुन्हा आहे का? त्यासाठी आंतरजालावर सगळं राहातं आणि सरकार कधीतरी बदलणार आहे अशी भाषा कशाला! आणि वर दुसऱ्यांना नाझी म्हणायचं!
मायबोलीवर एक पंटर जातीयवादी लिखाण करत असतो. रोज तीच पोस्ट कॉपी पेस्ट करत असावा. त्याला मध्येच दोन्ही बाजूचे लोक 'अशं नाई हं लिहायचं बाळा' असं प्रेमाने समजवतात. बाळ्या काय ऐकत नसतो. ते बाळ्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. Guess what- ते दुसऱ्या बाजूच्या सगळ्यांनाही तसंच लागू होतं!
शेंडे नक्षत्र सारख्या लोकांचं
शेंडे नक्षत्र सारख्या लोकांचं एक भारी असतं अमेरिकेत राहून secularism चा फायदा घ्यायचा आणि भारत कसा सेक्युलर नको हे रेटत राहायचे.
शेंडे, तुम्हाला ‘ब्लॅक लाइव्ज
शेंडे, तुम्हाला ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ प्रकरणात फोडल्या गेलेल्या दुकानांचा कळवळा आला होता, तेव्हा अमेरिकेतल्या न फोडल्या गेलेल्या दुकानांची कित्येक पटींनी मोठी असलेली संख्या आठवून दिलासा कसा नाही वाटला?
<<
विषयाला फाटे फोडून काहीच्या काही मुद्दे मांडू नका. बी एल एम ह्या दहशतवादी वर्णद्वेष्ट्या संघटनेने भयानक संहार केला तो स्टेट स्पॉन्सर्ड होता. सत्ताधारी डेमो लोकांनी त्याच्याकडे पूर्ण काणाडोळा केला. कुणालाही शिक्षा केली नाही काही खून वगैरे अपवाद वगळले तर. हा एक मोठा फरक आहे. बी एल एम ह्या संघटनेने अत्यंत विखारी वर्णद्वेष्टे, पोलीस द्वेष्टे विचार मांडत आपला विध्वंस घडवून आणला. मोठ्या कंपन्यांकडून खंडण्या घेऊन त्यावर व्यक्तिगत मालकीचे मोथे इमले उभारले. ती एक डेमो मंडळींचा वरदहस्त असलेली राजकीय संघटना आहे. या विषयावर ह्या बीबीवर मी बोलणार नाही. वेगळा धागा उघडा हवा तर.
आणि हो, खुद्द गैर प्रकाराला चांगले म्हणत नाहीच आहे. फक्त जर उत्तर प्रदेशातील कुण्या सवर्ण हिंदूने दलितावर अत्याचार केले तर दागिन्यांच्या दुकानावर बहिष्कार टाकणार्या शेफालीबाई आणि तमाम हिंदू लोकांना त्याला जबाब्दार धरणे गैर आहे. कारण समस्त हिंदू समाजाकडे ह्याला जबाबदार ठरवायचे असेल तर त्याकरता लाखो दलित आपले जीवन अत्याचार सहन न करता जगत आहे हेही विचारात घेतले पाहिजे.
शेंडे नक्षत्र सारख्या लोकांचं
शेंडे नक्षत्र सारख्या लोकांचं एक भारी असतं अमेरिकेत राहून secularism चा फायदा घ्यायचा आणि भारत कसा सेक्युलर नको हे रेटत राहायचे.
<<
मुद्दे संपले की वैयक्तिक हल्ले सुरु. अहो, भारत हा सेक्युलर आहे कारण त्यात हिंदू बहुसंख्य आहेत. कायम हिंदूना हीणकस लेखून , त्यांच्या परंपरा तुच्छ मानून आपल्या पुरोगामीत्वाच्या तुतार्या फुंकणे अनेक वर्षे चालू होते. त्याला मी कायम विरोधच केला आहे.
सेक्युलर म्हणजे हिंदूंचा पदोपदी अपमान आणि अल्पसंख्यांचे लांगूलचालन अशी जी व्याख्या आपण केली आहे त्याला विरोध आहे. खरोखर शुद्ध सेक्युलर तत्त्वज्ञान असते तर माझी काही तक्रार नव्हती.
शेंडे नक्षत्र सारख्या लोकांचं
प्रकाटा
हे वैद्यबिद्य भडकाऊ लोक सरळ
हे वैद्यबिद्य भडकाऊ लोक सरळ बाडबिस्तरा उचलून परदेशी पळून जातील. शेंडेबिंडे तर परदेशीच आहेत तसेही. इथल्या लोकांनी भडकाऊ लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे हेच उत्तम. काळ बदलला अन दुसर्यांवर जी लाचारीची परिस्थिती आणेयला मजा येतेय ती तुमच्यावरही येऊच शकते. मूळात कोणालातरी त्रास व्हावा, त्याला लाचार करावे, त्याची रोजीरोटी हिसकवावी, बायकांना हळूहळू बंदिस्त करण्याकडे वाटचाल करावी अशा इच्छा असणे हेच बिघडलेल्या मेंदुचं आणि चुकीच्या संस्काराचं लक्षण आहे. सर्वे भवन्तु सुखीनः हे कोण्या धर्मात सांगितलंय? मुस्लिम?
<<
घटनांचा, लोकांच्या विचारामागील अर्थ न समजून घेता विरोधी विचारांना एका डांबराच्या काळ्याकुट्ट रंगाने रंगवायचा प्रयत्न. भडकाऊ काय आहे? मला जाहिरात आवडली नाही मी उत्पादन विकत घेणार नाही. हिंदूंना इतकेही स्वातंत्र्य द्यायचे नाही? तर मग हीच खरी फासिस्ट वृत्ती आहे. तुम्हाला दिवाळीला कळकट चेहर्याच्या, दुर्मुखलेल्या शोकमग्न चेहर्यांच्या बायका दाखवणार्या जाहिराती आवडत असतील तर तुम्ही अशा लोकांकडून दागिने, कपडे, आणि अन्य वस्तू घ्यायला स्वतंत्र आहात. इतरांना आवाहन करून त्या उद्योगाचा घसघशीत फायदा करून द्यायला ही मोकळ्या आहात.
जर हिंदू धर्माचा रितीरिवाजांचा इतका तिटकारा असेल तर त्या उद्योगांनी फक्त अल्पसंख्य लोकांच्या सणाला जाहिराती द्याव्यात. त्यांना त्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पण हिंदू सणाच्या निमित्ताने मिळणारा फाय्दा तर हवा आहे पण जाहिरातीत सणांची कुठली प्रतिके दिसु द्यायची नाहीत हा दुटप्पीपणा आहे. ह्यात त्यांच्या स्वातंत्र्यावर घालाबिला काही नाही.
उगाच वडाची साल पिंपळाला लावून हिटलर स्टालिन वगैरे नावे फेकून आपल्या मुद्द्यांना वजन आणण्याचा एक अश्लाघ्य प्रयत्न चालू आहे.
बायकांना बंदिस्त करणे वगैरे दावे तर हास्यास्पद आहेत. निदान दिवाळीच्या जाहिरातीत दाखवली जाणारी मॉडेल दिवाळीकरता प्रसंगानुरुप नटली आहे असे वाटले पाहिजे अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे बायकांना बंदिस्त करणे असे ज्यांना वाटते त्यांना साष्टांग प्रणाम!
पुन्हा एकदा स्ट्रॉमॅन
पुन्हा एकदा स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट, समस्त हिंदू समाजाला कोणीही दोषी ठरवत नाहीये करण इथे प्रतिसाद देणारे बहुतेक सगळेच स्वतः हिंदू आहेत.
सेक्युलर म्हणजे हिंदूंचा पदोपदी अपमान आणि अल्पसंख्यांचे लांगूलचालन अशी जी व्याख्या आपण केली
अशी व्याख्या कोणीही केलेली नाही. उगाच कांगावा करून पुरोगामी आणि सेक्युलर या गुणांना वाईट बनवायचा प्रयत्न करू नका
सतत "ते" अमकं करतात म्हणून
सतत "ते" अमकं करतात म्हणून आम्हीपण करणार हे काय विचित्र लाॅजिक घेऊन फिरतात कळेना
अगदी अगदी...
सुनिती तुमचे प्रतिसाद खूप आवडले.
भरत, फारएन्ड, कॉमी आणि इतर सगळ्याच पुरोगाम्यांना पूर्ण पाठिंबा
शेंडे नक्षत्र, कॅन्सल कल्चर
शेंडे नक्षत्र, कॅन्सल कल्चर वर तुमची काय मते आहेत? का अमेरिकेसाठी वेगळी आणि भारतासाठी वेगळी आहेत ही मते ?
सुनिती प्रतिसाद खूप आवडले.
सुनिती प्रतिसाद खूप आवडले.
हिंदू धर्माच्या लोकांना कट्टर करणाऱ्यांना ताबडतोब शाब्दिक फटकारे देऊन जागा दाखवण्याची गरज आहे. अजिबात हयगय नाही.
>>>खरोखर शुद्ध सेक्युलर
>>>खरोखर शुद्ध सेक्युलर तत्त्वज्ञान असते तर माझी काही तक्रार नव्हती.
व्हेग बोलणे बाजूला टाकून सांगा, काय अशुद्ध सेक्युलरिझम आहे आत्ता सांगा बघू ? In real terms, आज सो कॉल्ड "शुद्ध" सेक्युलरिझम आणायला काय काँक्रीट गोष्टी होणे तुम्हाला पाहिजे आहे ?
शेफाली बाईंनी जे केले ते
शेफाली बाईंनी जे केले ते कायद्याच्या कक्षेत बसणारे आहे. त्यांना त्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला ते आवडत नसले तरी. पुढल्या वर्षी जर शेफालीताईंनी अशी मोहिम काढली की अशा जाहिराती करणार्या दुकानावर दगड फेका तर ते कायद्यात बसत नाही. त्याकरता शिक्षा व्हायलाच हवी. आणि तेव्हा ते थांबवायला जे काही करायचे ते करण्याचा नागरिकांना आणि शासन व्यवस्थेला आहे.
पण आज उचललेले अहिंसक पाऊल म्हणजे उद्याची दगडफेक आहे अशी आगाऊ समजूत करून ऊर बडवणे, आकांत करणे आततायीपणाचे आहे. कायदा हा आज अमुक केले म्हणुन उद्या ते करेल असे मानून शिक्षा देत नाही. पुरोगाम्यांनी तशी देऊ नये.
आता कॅन्स्ल कल्चर. बर्कले ह्या मुक्त विचारांच्या मानल्या गेलेल्या विद्यापीठाने एका प्रतिगामी समजल्या जाणार्या व्यक्त्याला आमंत्रित केले होते. कॅन्स्ल कल्चर लोकांनी त्या विद्यापीठात कायदा हातात घेऊन जाळपोळ, दगडफेक, विध्वंस केले. लोकांना अमानुष मारहाण केली. विद्यापीठाच्या पोलिसांना अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करा अशा सूचना होत्या आणि त्यांनी तसे केले. मी ह्याला कॅन्सल कल्चर समजतो आणि ते चूक आहे.
उलट मला हा भाषण करणारा मान्य नाही मी हे भाषण ऐकणार नाही. इतरांना जाहीर आवाहन करीन की तुम्हीही जाऊ नका. (पण कुणाचे भाषण करण्याचे, ऐकण्याचे, कार्यक्रम आयोजित करण्यचे स्वातंत्र्य मला मान्य आहे). असे कॅन्स्ल कल्चर असेल तर मी त्याला कणभरही विरोध करणार नाही.
अल्पसंख्यांचे लांगूलचालन आणि बहुसंख्याना झोडपणे, लाथाडणे ही सेक्युलरिज्म ची व्याख्या भारतात काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट लोकांनी अनेक दशके वापरलेली आहे. भरपूर उदाहरणे आहेत.
लॉल भाषण द्यायला न देणे हे
लॉल भाषण द्यायला न देणे हे कॅन्सल कल्चर ? आपल्याला न पटणारे प्रॉडक्त, व्यक्ती ह्यांना कुणी फायनान्शियल स्पोर्ट करू नये असे सांगणे, पोलिटीकली इन्करेक्ट गोष्टींसाठी एखाद्याला आयुष्यातून उठवणे हे कॅन्सल कल्चर चे भीषण रूप आहे. शेफाली वैद्य निरनिराळ्या कंपन्यांना कॅन्सल करण्याच्या प्रयत्नातच गुंतल्या असतात.
मुनावर फारुकी ला स्टॅन्ड अप करू दिले जात नाही. पोलीस मारहाण झालेल्या फारुकीलाच उलटे अटक करतात.
किंचित काहीतरी नावडती गोष्ट झाली की शेफाली टाईप लोक थयथयाट सुरु करतात.
भारतात कॅन्सल कल्चर राईट कडून होते आहे आणि हे खरेच आहे. मान वळवायची असल्यास वळवा.
>>अल्पसंख्यांचे लांगूलचालन
>>अल्पसंख्यांचे लांगूलचालन आणि बहुसंख्याना झोडपणे, लाथाडणे ही सेक्युलरिज्म ची व्याख्या भारतात काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट लोकांनी अनेक दशके वापरलेली आहे. भरपूर उदाहरणे आहेत.
काय करायचे शुद्ध सेक्युलरिझम साठी ? साधा प्रश्न आहे.
शेंडे नक्षत्रांच्या
शेंडे नक्षत्रांच्या म्हणण्याचा सारांश -
दलित , मुस्लिमांवर हल्ले , त्यांचे मॉब लिंचिंग या क्षुल्लक तुरळक घटना आहेत. मीडिया त्यांनाच उगाच प्रसिद्धी देते.
तालिबान राजवटी आणि इस्लामी देशांच्या तुलनेत हे काहीच नाही.
खरा ज्वलंत प्रश्न जाहिरातींची हिंदूंची प्रतीके न वापरल्याने शेफाली वैद्य आणि त्यांच्या लाखो फॉलोअर्सच्या दुखावलेल्या भावना हा आहे.
शिवाय आम्ही शेफालींच्या याबाबतीत ल्या साळसूद पोस्टला चिकटून राहू. बाकीच्या खोट्या आणि द्वेषमूलक पोस्टींकडे दुर्लक्ष करू. खासदार सूर्याच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू.
रस्त्यांवर लोकांची जात धर्म पडताळणत फिरणाऱ्या टोळक्यांकडेही दुर्लक्ष करू.
पहिली काही पाने चांगली आणि
पहिली काही पाने चांगली आणि विषयाला धरुन चर्चा चालली..... नंतर नेहमीचे पक्ष कार्यकर्ते वादात उतरल्यावर हा धागा विषयाला सोडून आपापले पक्षीय अजेंडे रेटत नेहमीच्या टिपिकल राजकीय धागे ज्या वळणावर येऊन पोचतात तिथे येऊन पोहचला आहे!
दलित , मुस्लिमांवर हल्ले ,
दलित , मुस्लिमांवर हल्ले , त्यांचे मॉब लिंचिंग या क्षुल्लक तुरळक घटना आहेत. मीडिया त्यांनाच उगाच प्रसिद्धी देते.
तालिबान राजवटी आणि इस्लामी देशांच्या तुलनेत हे काहीच नाही.
<<
काहीच्या काही निष्कर्ष. तलिबान आणि इस्लामी देशात दलित मुस्लिमांवर हल्ले होतात? मला माहित नव्हते!
स्टेट स्पॉन्सर्ड अट्रोसिटीज आणि काही व्यक्तींनी केलेले अत्याचार ह्यात मोठा फरक असतो. आणि तो मुख्य फरक आहे तालिबान आणि अन्य इस्लामी देशात. दलित आणि मुस्लिमांवर केलेले अत्याचार कायदेशीर ठरावेत म्हणून मोदींनी कायदा बदलल्याचे ऐकले नाही. तसा विचारही मांडल्याचे ऐकले नाही. आपणास ऐकिवात असल्यास कळवा.
उत्त्तर प्रदेशात , बिहारमधे भारतात अन्य ठिकाणी शेकडो वर्षे दलितांवरअत्याचार होत आहेत. मोदी आल्यानंतर त्यात लक्षणीय वाढ झाली आहे हा दावा मला चुकीचा वाटतो. अनेकदा डाव्या विचारांची माध्यमे मोदींच्या काळातील अत्याचार घटना जास्त ठळक मांडून त्याला स्टेट स्पॉन्सर्शिप असल्याचा आभास निर्माण करत आहेत. राजकारणातील बडे लोक, श्रीमंत लोक अशा प्रकारच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालत आले आहेत. साम दाम भेद दंड सगळे वापरुन. अगदी काँग्रेसच्य राज्यातही हे चालायचेच, भाजप राज्यात ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे असे मला वाटत नाही.
कुठेही हिंदूने काही वाईट केले की तेजस्वी सूर्यापासून शेफालीपर्यंत सर्वा हिंदू धर्म मानणार्यांना धारेवर धरण्याचे तर्कट अजब आहे. हाच न्याय कुठल्या मुसलमानाने काही वाईट केले तर तमाम मुस्लिमांना धारेवर धरता का आपण भरतराव?
मला अमुक एक जाहिरात आवडत नाही ह्या ह्या कारणाकरता. अशा जाहिराती करणार्या उद्योगांकडून मी काही घेणार नाही तुम्हीही घेऊ नका इतके स्वातंत्र्य एका स्वतंत्र नागरिकाला (अगदी हीन हिंदू असला तरी) देण्याचा उदारपणा आपल्याकडे नसावा हे खेदकारक आहे.
शेंडेनक्षत्र, you are
शेंडेनक्षत्र, you are downplaying Shefali Vaidya's statement to a large extent. कुंकू न लावलेल्या किंवा लावू न शकणाऱ्या बायका यांना मोठ्या भेदभावाचा सामना करायला लागला असा इतिहास आहे. हा सामाजिक बदल ज्यांनी घडवून आणला त्यांना समाजसुधारक म्हणतात म्हणजे हा बदल चांगला, समता आणणारा आहे.
अशात हे असे स्टेटमेंट म्हणजे सर्व समाजसुधारक मंडळींच्या कार्यावर बोळा फिरवणे आहे. एका सो कॉल्ड आधुनिक भारतीय स्त्रीने हे विधान करणे अधिक क्लेशदायक आहे. जर एखाद्या कपड्याच्या ब्रँडने ही प्रतीकं वापरली नाहीत तर तो ही एक मेसेजच असेल. राहता राहिला हिंदू धर्म - तर तो जानवी, शेंड्या, कुंकू, मंगळसूत्र या सारख्या प्रतीकांच्या अस्तित्वावर अवलंबून नाही. हिंदू धर्माला इतक्या क्षुल्लक प्रतीकांच्या मायेत बद्ध करणे म्हणजे त्याचे शून्य आकलन असल्याचा पुरावा आहे!
परवा माझ्या युट्यूब फीडमध्ये सती प्रथा और राजा राममोहन रॉय का झूठ असा व्हिडिओ रेकमेंडेशन म्हणून आला होता. हे पण ऐकायची वेळ येईल असे वाटले नव्हते! वरचा व्हिडिओ मी पाहिला नाही.
अर्रे काय दिवाळीच्या दिवसांत
अर्रे काय दिवाळीच्या दिवसांत भांडणं उकरून काढतायेत... मला शेफालीबाई कोण माहित नव्हतं, इतक्यातच कळलं... मला तर आजकाल fb, ट्विटर, watsapp सगळं बंदच व्हावं असं वाटायला लागलंय..
मर्कटलीला तरी थांबतील.
मी जेव्हा M S करत होते, तेव्हा artificial intelligence वापरुन ट्वीट categorize कारायचे, असा काहीसा माझा प्रोजेक्ट होता. तेव्हा ते कित्ती भारी वाटायचं! आता कळतंय की मी तर nuclear बॉम्ब हाताळत होते.
{कुठेही हिंदूने काही वाईट
{कुठेही हिंदूने काही वाईट केले की तेजस्वी सूर्यापासून शेफालीपर्यंत सर्वा हिंदू धर्म मानणार्यांना धारेवर धरण्याचे तर्कट अजब आहे}
तसं करायची गरज नाही. हे दोघे स्वतः:च त्यांच्या वागण्याबोलण्यातून त्यासाठी कारण मिळवून देतात.
सूर्याने काय केलं ते काल रात्री लिहिल़ आहे.
शेफाली च्या hate mongering चं उदाहरणही या धाग्यावर दिलं आहे.
दलित अत्याचाराबाबत आधी आणि
दलित अत्याचाराबाबत आधी आणि आता काय फरक पडला ते लिहितो. आधी अशा घटना घडल्या की सगळे निदान तोंडदेखलातरी निषेध करत. शासन यंत्रणा तेव्हाही न्याय देण्यात कमीच पडत होती. यात राजकारणी आणि तेव्हाचे सत्ताधारीही आले.
आता सुरुवात ही फेक न्यूज आहे म्हणून होते. मग दलित म्हणून उल्लेख का? मग पीडित व्यक्ती वरचं दोष ढकलायचा प्रयत्न.
हाथरसचं उदाहरण ताजं आहे. ते सगळं प्रकरण वाचून पहा.
Pages