इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महंमद, कुराण ह्यावर टीका केल्यास मृत्यूदंड अशी कायदेशीर तरतूद पाकिस्तान, सौदी आणि अनेक देशात आहे. भारतात असे कुठले कायदे आहेत का? वर्तमान सरकार तसे कायदे करण्याच्या प्रयत्नात आहे का? >> तुमचे सोशल नेटवर्क वाचन कितपत आहे माहीत नाही पण भारतात असल्या प्रकारचे कायदे व्हावेत असले भिकेचे डोहाळे लोकशाही व अभिव्यक्तीस्वातंत्र्य यथेच्छ उपभोगणार्‍यांना लागत आहेत. सोशल नेटवर्क वर अनेकदा दिसले आहे. अगदी मृत्यूदंड पर्यंत पोहोचलेले नाही. पण असा अपमान करणार्‍यांना शिक्षा व्हायला हवी म्हणणारे आहेत. त्याहीपुढे जाउन कोणी यांना मारहाण, तोडफोड केली तर "त्यांना असलीच अद्दल घडली पाहिजे" असे म्हणणारे असंख्य आहेत. परवाच 'आश्रम' च्या सेटवर हे झाले. गेल्या वर्षी अंधेरी मधे एका रेस्टॉ मधे तोडफोड झाली. इथे सरकार भाजपचे असो वा नसो, हे उद्योग करणारे लोक आपल्या बेस मधले असले तर कोणालाही या प्रकाराला आवर घालण्यात इंटरेस्ट नसतो.

आणि जातीव्यवस्थेचे अवशेष म्हणण्याइतके ट्रिव्हियलाइझेशन करू नका हो. एखाद्या उत्खननात ५०० वर्षांपूर्वीची वस्तू सापडते. त्यावरून सध्या कोठे बाकी नामोनिशाण नसलेल्या जुन्या व्यवस्थेची ओळख होते. तेथे अवशेष शब्द ठीक आहे. इथे अजून दर आठवड्याला बातम्या येत आहेत. काल गुजरात मधे रामाच्या देवळात गेले म्हणून काही दलितांना जबर मारहाण झाली. मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दलित लोकांना गाव सोडून जावे लागले.

भारतात काही राज्ये गोवंशहत्येबद्दल अधिकाधिक कठोर कायदे करत आहेत..
ताजी हवा लव्ह जिहाद आणि धर्मांतराबद्दलच्या कायद्यांची आहे.
मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणी रस्त्याने एकत्र जाताना दिसले तरी तरुणाला आत टाकतात.

सध्या दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा चाललंय.
किराणा दुकानात - ये क्या मुसलमान का दे रहे हो? दूसरा दो हे मी स्वतः: ऐकलंय. मुंबईत.
नमकीनच्या पाकिटांवर फारसी सदृश भाषेतही माहिती असते. बहुतेक आखाती देशांत निर्यातीसाठी. आणि वेगवेगळं packaging करत नसतील.

इंदूरमध्ये एका मुस्लिम बांगडी विक्रेत्याला हिंदू सदृश नाव सांगून ओळख लपवली म्हणून रहिवाशांनीच मारहाण केली. त्याची बातमी झाल्यानंतर त्यांच्यावरच मुलीचा विनयभंग केल्याची केस घातली. मारहाण करताना त्याबद्लल काहीच बोलत नाहीएत. तो माणूस तीन महिने तुरुंगात आहे. मॉब लिंचिंगमध्ये मेला असता तर सुटला असता.
गुरगाव मध्ये गेले चार शुक्रवार एका पब्लिक पार्कात ( रस्त्यावर नव्हे) नमाज पढला जात असताना काही लोक , यांत बायकाही आहेत.तिथे जाऊन जोरजोरात आरत्या आणि भजने म्हणतात.
पार्कात नमाजाला पोलीस परवानगी आहे.
गुजरात आणंद - एका मुस्लिम ओन्ड रेस्टॉरंट समोर जमाव भारत में रहना है तो जय श्री राम कहना होगा अशा घोषणा देतोय असा व्हिडियो आहे. बायका पाणी ओतून शुद्धीकरण करताहेत.
या तिन्ही घटनांतला जमाव मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन आहे. बजरंग दल टाइप नाही.
आताच अमित शहांचं उत्तर प्रदेशातलं भाषण ऐकलं.
नॅशनल हायवे दर शुक्रवारी बंद ठेवले जातात असं सांगताहेत. हे तुष्टीकरण चुकीचं आहे असं म्हणताहेत.
( कावड यात्रेच्या वेळी त्या त्या भागातले नॅशनल हायवे चार चार दिवस बंद ठेवले जातात. ज्या भागात, राज्यांत आधी कावड यात्रा नव्हती तिथेही निघू लागल्यात.)
प‌ बंगालमध्ये राम कधी फार पुजला जात नसे. तिथे रामाच्या नावे मिरवणुका निघू लागल्यात.

तिथले तालिबान क्रूड आहेत. आम्ही जरा sophisticated आहोत.

थोड्या हिंदू वाटतील इतपत बदलत आहेत. मग एक टिकली फोटोशॉप करुन का लावेनात!
>>> आजकल कोण मंगलसूत्र आणि टिकली लावतो ? जूनी पिढी सोडली तर...

तुम्हाला निव्वळ अशाच बातम्या वाचायला मिळतात जिथे जातीवर आधारित काही वाईट घडते आणि हेच सार्वत्रिक आहे असे आपणास वाटते. ठीक आहे.
आपण आसपासच्या देवळात गेलात तर किती ठिकाणी तुम्हाला जात विचारली जाते?
पंढरपूर, जेजूरी, अष्टविनायक, सिद्धीविनायक, चतु:शृंगी असल्या प्रसिद्ध देवळात आपणास जात विचारून प्रवेश देतात का? उलट आजही मक्का, मदिना ह्या शहरात बिगर मुस्लिमांना पाऊलही ठेवू दिले जात नाही. पूर्ण शहरात. मशीदीत वगैरे नाही. आणि ह्यात कुणाला भेदभाव वगैरे वाटत नाही. कुठलीही माध्यमे ह्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत.
म्हणजे हिंदूंनी तसे केले तर पंढरपूर गावात बिगर हिंदूंना पाऊलही ठेवू देणार नाही असा कायदा करणे.

तुमच्या लेखी किती टक्के हिंदू दलितांवर अत्याचार करत असतील?
शेकडा किती मुस्लिम व्यावसायिकांना धंदा करण्यापासून रोखून मारहाण केली जात असेल?
माझ्या मते एकंदरीत लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण नगण्य आहे पण ह्याला प्रसिद्धी प्रमाणाबाहेर दिली जात आहे .
आपल्यकडे काही आकडेवारी असेल तर द्या.

कश्मीर खोर्यातुन हिंदुंना इथुन जा अश्या धमक्या (पुन्हा) मिळाताहेत. एकाही फुरोगाम्याने त्याबद्दल निषेध नोंदवलेला ऐकला वा वाचला नाही. एरवी अतिरेक्यांना धर्म नसतो हे विधान हिरिरिने मांडणारे भगवा दहशतवाद असा शब्द प्रयोग एका नालायक मंत्र्याने मुद्दामुन वापरला तर मीठाची गुळणी धरुन गप्प होते.

>>
थोड्या हिंदू वाटतील इतपत बदलत आहेत. मग एक टिकली फोटोशॉप करुन का लावेनात!
>>> आजकल कोण मंगलसूत्र आणि टिकली लावतो ? जूनी पिढी सोडली तर...
>>
हो. मान्य. पण सणासुदीला तरी अशा परंपरांची आवर्जून आठवण ठेवणारे लोक आहेत. अशा प्रसंगी पारंपारिक वेषभूषा करणारे अनेक स्त्रीपुरुष दिसतात. केवळ सणासुदीला पाळल्या जातात म्हणून त्या परंपरा तुच्छ मानाव्यात असा आपला विचार आहे काय?

कश्मीर खोर्यातुन हिंदुंना इथुन जा अश्या धमक्या (पुन्हा) मिळाताहेत. >> घ्या! ते अमितशेठ म्हणतात की काश्मिरात सगळं आल्बेल आहे. ते खोटं बोलतात की तुम्ही खरं बोल्ता ??

माझी आई आताच राजस्थान फिरून आली. तिथले गाईड आणि ड्रायव्हर टुरिझम साठी आले ल्या लोकांना सुध्दा
त्या जागेची माहिती सांगायचे सोडून, मुस्लिम कसे वाईट टेप ऐकवत होते. शेवटी ग्रुप मधल्या एका काकांनी वैतागून अरे बाबा हमको उसमे इंटरेस्ट नही , म्हंटल्यावर ओशाळुन गप्प बसला. महाराष्ट्रात स्थिती बरी आहे, पण उत्तर भारतात जबरदस्त पोलरायझेशन झालय.

>> घ्या! ते अमितशेठ म्हणतात की काश्मिरात सगळं आल्बेल आहे. ते खोटं बोलतात की तुम्ही खरं बोल्ता
ख्या ख्या. त्या अमितभै ना चुनावी जुमला म्हणण्याची वैट खोड आहे हो.

तुमचा बेंचमार्क इस्लामिक राष्ट्रं आहेत यातच काय ते आलं.

या सगळ्या प्रकारांची सोशल नेटवर्किंग साइट्सवरून समर्थन करणाऱ्यांचं प्रमाण पहा.

या गोष्टींचं प्रमाण वेगाने वाढतंय हे ढळढळीत दिसतंय.

वर अमित शहाणचं उदाहरण दिलं. गेल्या वर्षी तेजस्वी सूर्याने बंगलोरमधल्या कोव्हिड हेल्प सेंटरमधल्या मुस्लिम एम्प्लॉयीजची यादी वाचत तमाशा करत ते बेड अडवायच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. इथे मदरसा चालवता का असा प्रश्न विचारला.
चौकशीअंती त्या तमाशाच्या वेळी सूरयासोबत असलेल्या दोन भाजप आमदारांशी संबंधित हिंदू व्यक्तीचं दोषी आढळल्या.

गेल्या मार्चमध्ये कोव्हिड महामारीच्या सुरुवातीला दिल्लीतील तबलिगी जमात वरून कांगावा केला गेला. देशभरातून तबलिगींना अटक केली गेली. आतापर्यंत आलेल्या निकालांत विविध कोर्टांनी त्यांना निर्दोष मुक्त केलंय.
इथे मायबोलीवरच त्याबद्दल किती कालवा केला गेला होता.

{केवळ सणासुदीला पाळल्या जातात म्हणून त्या परंपरा तुच्छ मानाव्यात असा आपला विचार आहे काय?}
Strawman argument.
सणासुदीला सुद्धा कोणी कुंकू टिकली शिवाय कसं राहू शकतं असं तुम्ही विचारताय. त्या जाहिराती ज्यांच्यासाठी आहेत तो त्यांचा ग्राहक राहत असेल. मार्केट रिसर्च करतच असतील त्या कंपन्या.

तुम्हाला निव्वळ अशाच बातम्या वाचायला मिळतात जिथे जातीवर आधारित काही वाईट घडते आणि हेच सार्वत्रिक आहे असे आपणास वाटते. ठीक आहे. >> आँ? मी कधी म्हंटलो की सार्वत्रिक आहे, तमाम हिंदू जातीयवादी आहेत? तुम्ही एकदम "अवशेष" वगैरे ट्रिवियलायझेशन करू नका हा पॉइण्ट आहे. अजूनही होत आहे ही वस्तुस्थिती आहे. ते किती टक्के वगैरे अवांतर आहे. इथे काही हिंदू धर्माचा सोशल अ‍ॅनेलिसीस करायला बसलेलो नाही.

तेव्हाच्या संघराज्य सरकारच्या गृहसचिवानेही भगवा दहशतवाद आहे , हे नाकारता येणार नाही असं म्हटलं होतं. आज तो माणूस मोदी सरकारमध्ये मंत्री आहे.
ख्या ख्या

सोनाली रानडे म्हणून एक अमेरिकन ट्विटर युजर आहे. सोशल पोलिटिकल अनॅलिस्ट. तिच्या मते आता हे हिंदू मुस्लिम प्रकरण अमित शाह आणि मोदींच्याही हाताबाहेर गेले आहे. अर्थात हे तिचे मत आहे. शंभर टक्के बरोबर नसेल. पण
ह्या किरकोळ बातम्या आहेत, आपल्या कडे असे काही नाही च अशा भ्रमात कुणी राहू नये.

> माझ्या मते एकंदरीत लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण नगण्य आहे पण ह्याला प्रसिद्धी प्रमाणाबाहेर दिली जात आहे .

पुन्हा तेच! दिल्लीत लाखो मुली प्रवास करतात एखाद्याच निर्भयावर बलात्कार होतो मग इतका का बाऊ, असे म्हणण्यासारखे आहे हे. शिवाय या घटना तुटक तुटक नाहीत, त्यांना जोडणारा समन धागा व एको सिस्टीम आहे व त्याला केंद्रसरकारचे अभय आहे.

मिशी वाले थांबा. मोदी पंतप्रधान झाले की इथे परिंदा भी पर नहीं मार सकेगा. असं होणार होतं.
आता तर जोडीला अमित शहा गृहमंत्री आहेत.
नोटाबंदीने दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय.
३७० रद्द केल्याने काश्मीर मुख्य धारेत सामील झालाय.
मग असं काही होणं कसं शक्य आहे? कळवा असतील बघा‌

१९९० मध्ये दिल्लीत व्ही पी सिंग सरकार, श्रीनगरमध्ये जगमोहन हा भाजपायी राज्यपाल असताना झालैल्या पलायनाला कॉंग्रेस जबाबदार
आणि आताही तुम्ही पुरोगाम्यांनाच दोष देताय. बजरंग दल, वि हिं पण, अभाविप यांना पाठवा की तिकडे.

एकदा एक सावकाराने एका माणसाचा खून केला. प्रकरण कोर्टात आलं. त्याला खून करताना प्रत्यक्ष बघणारा एक आणि एकच साक्षीदार होता. त्याने साक्ष दिली. सावकार म्हणाला "ह्याः! मी तर ५० असे साक्षीदार आणेन ज्यांनी मला खून करताना पाहिलेले नाही. मग त्यांच्या साक्षीनुसार मी निर्दोष आहे." तरीही गुन्हा सिद्ध होऊन त्यालाच शिक्षा झाली. कारण अशा नकारार्थी साक्षीचा काही अर्थच नाही. तद्वत ५० ठिकाणी दलितांवर वा मुस्लिमांवर अत्याचार झाले नाहीत ह्या म्हणण्याला काही अर्थच नाही. जिथे अत्याचार होत आहेत, तीच १ केसच महत्त्वाची आहे. ज्या ५० ठिकाणी काही झालेलंच नाही त्याची दखल घ्या हे म्हणणे म्हणजे सरळ ढोंगी कावेबाजपणा तरी आहे किंवा मूर्खपणा तरी.

शेंडेनक्षत्र, तुम्हाला जितकं तुरळक प्रमाणात वाटतंय तितकं ते नाहीये. माझ्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर दररोज काही तरी हिंदू खतरे में या अर्थाचा मेसेज येतो. परवा कुठल्यातरी वेगळ्याच चर्चेत तो माणूस मुसलमान आहे म्हणजे तो असाच असणार या अर्थी एक वाक्य खुद्द माझ्या आईने उच्चारल्यावर मी थक्क झाले. तिच्याशी वाद घालायला गेले तर तिने मला रोजच्या येणाऱ्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स चा हवाला देऊन खात्रीने हे असच असणार हे सांगितलं. असं स्लो पॉझनिंग हे प्रत्येक धर्मात सुरू आहे. माझी खात्री आहे की या अशा प्रकारचे हिंदूंची भीती घालणारे मेसेज मुस्लिम लोकांच्या फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले जात असणार. विद्वेषाचा इतका दारूगोळा भरणं चालू आहे की पुढे जाऊन एक ठिणगी पडायचा अवकाश सारे पेटेल Sad
मुसलमानांचा तालिबान आणि हिंदूंचा तालिबान वरकरणी वेगळा दिसेलच पण अंतरंग एकच असेल.
सर्वात वाईट गोष्ट ही आहे की ही वेळ असल्या वादाची नाही. दहा वर्षांनी जेव्हा दुष्काळ आणि पूर अतितीव्र होतील तेव्हा तुमचा धर्म कितीही मेजॉरीटी मध्ये असला तरी काही फरक पडणार नाहीये. You will lose everything.

ज्या ५० ठिकाणी काही झालेलंच नाही त्याची दखल घ्या हे म्हणणे म्हणजे सरळ ढोंगी कावेबाजपणा तरी आहे किंवा मूर्खपणा तरी.
<<
सरकार जोवर असे म्हणत नाही की वाईट, गैर घटना घडवून आणणार्‍यांना शिक्षाच होता कामा नये तोवर चिंता करू नये. कायदा आपले काम करेल आणि संबंधितांना शिक्षा देईल. पण अट्टाहासाने केवळ वाईटच घटना घडत आहेत आणि आपण ५०-६० वर्षापूर्वी खूप पुढे गेलो होतो ते गेल्या ५-१० वर्षात पार मागे गेलो आहे हे दावेही मूर्ख किंवा ढोंगी आहेत. उत्तरेत जातीपातीचे राजकारण कायम होत आले आहे. आणि तरी निदान शहरात परिस्थिती सुधारत आहे हे अट्टाहासने आणि पूर्वग्रहापोटी नाकारत असाल तर आनंद आहे.

पुन्हा तेच! दिल्लीत लाखो मुली प्रवास करतात एखाद्याच निर्भयावर बलात्कार होतो मग इतका का बाऊ, असे म्हणण्यासारखे आहे हे. शिवाय या घटना तुटक तुटक नाहीत, त्यांना जोडणारा समन धागा व एको सिस्टीम आहे व त्याला केंद्रसरकारचे अभय आहे.
<<
केंद्रसरकारचे अभय वगैरे बिनबुडाचे आणि पूर्वग्रहदूषित दावे आहेत.
एखाद्या दलितावर अत्याचार झाले म्हणून तमाम केंद्रसरकार, भाजप, संघ आणि आपले नावडते लोक सगळे जातीय आहेत आणि ते तमाम दलितांचे शिरकाण करत आहेत असा निष्कर्ष काढू नये. उत्तर प्रदेश , बिहार वगैरे राज्यांच्या मागास भागात पूर्वीही जातीवरून अत्याचार होतच आले आहेत. अगदी कॉंग्रेसच्या सुवर्णयुगातही. पण त्याकाळी तमाम माध्यमे इतकी बोकाळली नव्हती त्यामुळे इतकी प्रचंड प्रसिद्धी मिळत नव्हती (चांगली वा वाईट).

सणासुदीला टिकली आणि इतरवेळी नसेल तरी चालेल हे असले भम्पक लॉजिक मी पण एका ग्रुपवर वाचले आहे.. सती केशवपन ह्याचे समर्थन कधी सुरू होणार? पुढल्या दिवाळीत? एक नाशिकच्या उपासनी म्हणून तालिबानी मॅन चा ऑडिओ इर्शाद कार्यक्रमा निमित्त व्हायरल झालाय त्यात हा कार्यक्रम त्याच नावे झाला तर पुण्यात येऊन राडा करेन असे म्हणत आहे. जे लोक ह्या असल्या प्रवृत्ती चे आत्ता मजेत समर्थन करत आहेत त्यांना ह्याच्या दूरगामी परिणामांची खरेच कल्पना येत नाहीये का????

Lol. सरकार शिक्षा होणार नाही असं कशाला म्हणेल? शिक्षा होणार नाही याची काळजी घेतलेली पुरेशी आहे की.
मॉब लिंचिंगचे व्हिडियो असताना मारणारे निर्दोष सुटलेले आहेत. जामीनावर बाहेर सुटले की संघराज्य मंत्री त्यांचं सारं घालून स्वागत करतो. मॉब लिंचिंगचा आरोपी मेला तर त्याच्यि बॉडीवर भाजप आमदार तिरंगा पांघरतो.

उ प्र सरकारने मुजफ्फरनगर दंगा तील विशिष्ट आरोपींवर चे खटले मागे घेतले.
पण याकडे दुर्लक्ष करूया. सरकार शिक्षा करणार नाही असं कुठे म्हणतंय?

{केवळ सणासुदीला पाळल्या जातात म्हणून त्या परंपरा तुच्छ मानाव्यात असा आपला विचार आहे काय?}
Strawman argument.
सणासुदीला सुद्धा कोणी कुंकू टिकली शिवाय कसं राहू शकतं असं तुम्ही विचारताय. त्या जाहिराती ज्यांच्यासाठी आहेत तो त्यांचा ग्राहक राहत असेल. मार्केट रिसर्च करतच असतील त्या कंपन्या.
<<
ह्यात straw man काय आहे?
काय दिव्य मार्केट रिसर्च करुन जाहिराती बनवल्या जात आहेत ते ह्या भकास आणि सुतकी जाहिराती पाहून कळतेच आहे.
ज्या गिर्‍हाईकांना आपल्या परंपरा काही प्रमाणात तरी दिसाव्यात आणि त्या दिसत नसतील तर आ म्ही त्यांच्याकडून खरेदी करणार नाही असे म्हणायचे असेल तर तसे करण्याचा पुरेपुर अधिकार त्यांना आहे. आणि असला दबाव आल्यामुळे जर त्या त्या कंपन्या जाहिरातीत बदल करत असतील तर तो बदल माझ्या मते स्वागतार्ह आहे. ह्यात कुठेही तालिबानी प्रकार नाही. ग्राहक आणि दुकानदार ह्यांच्यातला व्यवहार आहे.
पुरोगाम्यांना दिवाळीत सुतकी, मुस्लिम दिसणार्‍या जाहिरातीच हव्य असतील तर त्यांनी तशा जाहिराती करणार्‍या लोकांच्या दुकानातून भरपूर खरेदी करावी आणि ह्या प्रतिगाम्यांचा कावा हाणून पाडावा.

जिज्ञासा +1111 पूर्ण पोस्टला. काय अराजक माजू शकेल आणि केवढी मोठी किंमत मोजावी लागेल ह्याची कल्पना अजून आलेली नाही लोकांना. ओळखीत एका कायप्पा ग्रुपवर आम्ही तर बुवा ह्या बाईचे फॅन आहोत असे वाचले आणि एकदम सुन्न व्हायला झालं. आणि मग तेच परत पुरोगामी बॅशिंग.

तटस्थपणाबद्दल-
हे तटस्थ लोक सरकारने शेजारच्या घरातून माणसं उचलून नेली तरी बेसनलाडू खात निवांत बसतील अशी हेटाळणी पुरोगामी करतात. I disagree.
उचलून नेलेला माणूस कुरेशी, खान, कुलकर्णी, कांबळे , करमुसे, गोस्वामी यापैकी कोण आहे, कोणत्या पक्षाचा समर्थक आहे, उचलणारं सरकार कोणत्या बाजूचं आहे- यावरून प्रतिक्रिया द्यायची की नाही हे ठरवणं, दिल्यास ती काय असावी ठरवणे(या लोकांना हीच भाषा कळते म्हणत टाळ्या वाजवणे/ एका ओळीचा टोकन निषेध/प्रकरण शेवटपर्यंत लावून धरणे) - असं आज चालू आहे. त्याऐवजी सर्वांच्या दडपशाहीचा विरोध करणं हे तटस्थ लोकांकडून अपेक्षित आहे. असे पुरेसे लोक असतील तर दोन्ही बाजूंना जरब बसेल.
गेल्या 7-8 वर्षात विरोधी पक्षांनी अनेकवेळा बंदचं आवाहन केलं होतं. लोकांचा रिस्पॉन्स नसतो म्हणून ते फेल गेले. यावेळी मात्र पद्धतशीर भीती, दहशत निर्माण करून महाराष्ट्र बंद सक्तीने राबवला गेला. पुरोगामी मंडळी यात अगदी आनंदात होती. कुठे काय निषेध दिसला नाही.
त्यामुळे 'ते वाईट आहेत म्हणून आमच्या बाजूला या आणि गपगुमान ऑर्डर्स पाळा' हे गाणं बंद करा.लोकांना दोन्ही बाजूंना विरोध करण्याची स्पेस असायला हवी.
बुरखा हा कल्चरल आयडेंटिटीचा भाग आणि टिकली हे शोषणाचं प्रतीक अशी दुहेरी भूमिका घेणं वैद्यबाईना पूरकच आहे.
याबाबतीत केजरीवाल आवडतो. तो स्वतः हिंदु धर्म पाळतो. पण त्यात कट्टरता, मुस्लिमद्वेष नसतो. तो दोन्ही धर्माच्या लोकांना आवडतो. केंद्रात मोदी आणि दिल्लीत केजरीवाल अशी निवड लोक करतात तेव्हा ते कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेले बैल नाहीत हेच सिद्ध होतं.

सणासुदीला टिकली आणि इतरवेळी नसेल तरी चालेल हे असले भम्पक लॉजिक मी पण एका ग्रुपवर वाचले आहे.. सती केशवपन ह्याचे समर्थन कधी सुरू होणार? पुढल्या दिवाळीत? एक नाशिकच्या उपासनी म्हणून तालिबानी मॅन चा ऑडिओ इर्शाद कार्यक्रमा निमित्त व्हायरल झालाय त्यात हा कार्यक्रम त्याच नावे झाला तर पुण्यात येऊन राडा करेन असे म्हणत आहे. जे लोक ह्या असल्या प्रवृत्ती चे आत्ता मजेत समर्थन करत आहेत त्यांना ह्याच्या दूरगामी परिणामांची खरेच कल्पना येत नाहीये का????
<<
ह्यात भंपक काय आहे? आम्ही निदान सणाला तरी आमच्या परंपरा लक्षात ठेवतो हे सगळीकडेच होते. ज्यू लोक सणासुदीला त्यांची वेषभूषा करतात. नेहमी सुटाबुटात वावरणारा लग्नाला धोतर वगैरे नेसतो हे होत असते. अनेक मुसलमान ईद वगैरे असते तेव्हा त्यांची ती खास टोपी घालतात . निव्वंळ हिदु करतात म्हणून भंपक असे तर्कशास्त्र असेल तर मग काय उत्तर नाही!
ह्यावरून थेट सती आणि केशवपन? वा. पुरोगाम्यांना च ह्या प्रथा सुरु व्हाव्यात असे वाटते आहे असे दिसते आहे.

शेफाली बाईंचे विधवा स्त्री आणि कुन्कू ह्यावर असे विचार आहेत
पण आज एका स्वतःला पुढारलेल्या विचारांच्या वगैरे म्हणवून घेणाऱ्या बाईचे विचार वाचून मी चक्रावूनच गेले, हा हॅशटॅग चालवून मी विधवा स्त्रियांवर अन्याय करतेय असं त्यांचं अभिनव तर्कशास्त्र होतं.
विधवा बाईला कुंकू लावण्याचा अधिकार नसतो ही जुनाट, बुरसटलेली प्रथा जर तुम्हाला डिफेन्ड करावीशी वाटते तर कसल्या तुम्ही पुरोगामी आणि कसल्या तुम्ही स्त्रीवादी? माझी आई आणि सासूबाई दोघीही माझे बाबा आणि सासरे पुढे गेले असले तरी व्यवस्थित कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात, सर्व धार्मिक कार्यक्रमांत पूर्वीच्याच अधिकाराने भाग घेतात, दिवाळीला वाढदिवसाला आमचं औक्षण करतात, घरी आलेल्या बाईची ओटीही भरतात आणि त्यात कुणालाही काहीही वावगं वाटत नाही, त्यांनाही आणि आम्हालाही. माझ्या घरी काम करणाऱ्या मावशींची मी दर नवरात्रात ओटी भरते. गेल्या वर्षी त्यांचा नवरा गेला. मी त्यांना विचारलं, ‘ओटी भरली तर चालेल का’ तर त्या आनंदाने हो म्हणाल्या. पाचवी शिकलेली बाईही अन्याय्य रूढी तोडू पहात होती आणि ह्या इतक्या शिकलेल्या बायका ’विधवेला कुंकू लावायचा अधिकार नाही’ हा मूर्ख विचार डिफेन्ड करतात, तोही स्त्रीवादाच्या नावाखाली. ह्याला काय म्हणू मी. असल्या बेगडी पुरोगामी स्त्रीवादापेक्षा माझं हिंदुत्व कितीतरी प्रागतिक विचारांचं आहे.
बस हेच सांगायचं होतं!
शेफाली वैद्य

Pages