इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हजरो फोलोअर्स आहेत म्हणून त्या व्यक्तिला अभिव्यक्तीस्वातंत्र्यच नाही का? कुठल्या दुकानातून स्वतःच्या पैशाने काय घ्ययचे ह्याचे स्वातंत्र्य नाही? आणि ते कारण व्यक्तही कराय्चे नाही >> तुम्ही स्ट्रॉमॅन वर स्ट्रॉमॅन टाकत सुटला आहात. माझी पोस्ट नीट वाचा. त्यांना लिहायला कधी विरोध केला आहे?

इर्शाद नामक कार्यक्रम काय होता आणि कसा होता ह्याविषयी मला माहिती नाही. >>> इथे वरती ४-५ जणांनी ऑलरेडी लिहीले आहे. मी ही लिहीले आहे. यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सांगणे शक्य नाही.

Forwarded:
"गजल पेश करण्यापूर्वी "मतलाअर्ज है" असे म्हणून अर्जी केली जाते आणि रसिक ईर्शाद ईर्शाद असा गजर करतात. इतकं सुंदर वाटतं म्हणून सांगू! या सगळ्या उध्दट माणसांना कंपलसरी उर्दूचे क्लास लावले पाहिजेत."

मला फॅब इंडियाची प्लॅटिनम मेंबरशिप मिळाली . त्यांनी मेसेज करून धन्यवाद पण दिलेत राडा झाला म्हणून ब्रँड काही बदलणार नाही. इथे दिवाळी साठी खूपच सुरेख सामान आले आहे सिरेमिकच्या पणत्या दिव्यांची झाडे, कपडे दागिने कॉस्मेटिक्स . परत एकदा चक्कर मारणार आहे. सर्व प्रकारचे कुर्ते लेगिन्ग सिल्कचे सूट्स शरारे साड्या उपलब्ध आहेत.

न्यूज सायकल संपले आता जरूर भेट द्या. दिवाळी सुखा ची जावो.

बिंदीचे म्ह णाल तर वट्ट एक बिंदी पाकीट होते घरात लॉकडाउन आधी. मग आणणे काही झाले नाही. आता दिवाळीची फुले सजावट आणायला मार्केट मध्ये चक्कर टाकणार आहे तेव्हा पंधरा वीस बिंदी पाकिटे आणून ठेवीन.

शेफालीचं मी एक बघितलं आहे. आगलाव्या पोस्टी टाकायच्या मग मधूनच एखादी घरगुती पोस्ट कुत्र्यांचे फोटो साडीतले फोटो टाकायचे.
हेच कंगना करायची. पब्लिकला होल सेल उल्लू बनवणे चालू आहे.

यावेळी फॅब मध्ये मला घ्यावेसे वाटतील या रेंज मध्येही बरेच कपडे मिळाले.(म्हणजे वेस्ट साईड सारखं).एरवी फॅब मध्ये पारंपरिक कला वाले कपडे बनवायला आलेल्या खर्चाने महाग मिळतात.
मोडल सिल्क चे स्टोल 2200 वगैरे ला रेशमी सुंदरच होते.पण ऑफिसला जाणे नाही म्हणून खर्च केला नाही.
मला किंमत रेंज म्हणून हा बदल बराच चांगला वाटला.
(आमच्या जवळचं फॅब इंडिया चुकीच्या जागी एका बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर कोपऱ्यात असल्याने बंद झालं.)

यावेळी फॅब मध्ये मला घ्यावेसे वाटतील या रेंज मध्येही बरेच कपडे मिळाले>> अहो तिथे सेल किंवा थोडेसे जुने म्हणजे लास्ट सीझन चे कपडे डिस्काउंट मध्ये कोपर्‍यात असतात. शोधून घेतले तर बरे मिळून जातात स्वस्तात. आमच्या इथे नाक्यावरच आहे फॅब.

हीरा (किंवा अजून कुणी उर्दु जाणकार), उर्दू भाषा कशी निर्माण झाली व विकसित झाली आणि ती कशी पसरली, उर्दू साहित्य, तसेच ही कुठल्या एका धर्माची भाषा नव्हे याबद्दल लेख लिहाल का?
लेखातून चांगली माहिती मिळेलच, पण उर्दू म्हणजे इस्लामची भाषा, ती परदेशातून आली वगैरे अनेकांचे गैरसमजही दूर होतील. उर्दूत रस घेणं म्हणजे आपल्या भाषा व संस्कृतीशी प्रतारणा असे समजणाऱ्या बऱ्याच जणांचे मत बदलु शकते.

लेखातून चांगली माहिती मिळेलच, पण उर्दू म्हणजे इस्लामची भाषा, ती परदेशातून आली वगैरे अनेकांचे गैरसमजही दूर होतील. उर्दूत रस घेणं म्हणजे आपल्या भाषा व संस्कृतीशी प्रतारणा असे समजणाऱ्या बऱ्याच जणांचे मत बदलु शकते. >> तुमच्या भाबड्या आशावादाला शुभेच्छा!

भ्रमर, ज्यांना मत बदलायचेच नाही त्यांच्यासाठी नाही सांगत आहे. तेव्हा यात कसलाही भाबडेपणा नाही.

इथे जी चर्चा सुरू आहे ती इथे इर्शादला अगदी ठामपणे विरोध करणाऱ्या काहींचे मत बदलवण्यासाठी सुरू आहे का? असेल तर तो भाबडा आशावाद आहे का?

उलट, जे काही पोलरायझेशन व्हायचंय ते १००% होऊन गेले आहे, आता कुणीच आपले मत बदलणार नाही हा निराशावाद नाही का होणार?

Hash tags मध्ये महत्त्वाचे शब्द (keywords) वापरतात असा माझा समज आहे. अनुप्रास जमावा म्हणून बिंदी शब्द वापरला म्हणणं ही सारवासारव आहे. शेफाली वैद्य यांना आपल्या हॅशटॅगचे सर्व connotations माहिती आहेत म्हणूनच तर ती विधवा बाईची ओटी भरण्याची पोस्ट आली.

त्या शेफाली ताईंनी अमुक एका दुकानातून मी खरेदी करणार नाही, तुम्हीही करू नका असे म्हटल्याने पोटशूळ उठलेल्या लोकांना 'Customer is King' हे तत्व माहिती नाही का??? आपल्या मेहनतीचा पैसा कशासाठी, कुठे, केव्हा, कसा खर्च करायचा याचा सर्वस्वी अधिकार संबंधित व्यक्तीला नको का???

फॅब इंडिया विदेशी कंपनी. त्यांच्या जाहिरातीत abrahamic शब्द. हिंदूंची symbols missing म्हणून विरोध.
डाबर तर भारतीय कंपनी. त्या बायका करवा चौथ साजरा करत होत्या. सगळी हिंदू प्रतीके ठळक दिसत होती. तरी विरोध.

वाघ म्हटलं तरी खातो. वाघ्या म्हटलं तरी खातो.
डाबरला तर मंत्री, पोलीस, कायदेशीर कारवाईची धमकी मिळाली.

डाबर तर भारतीय कंपनी. त्या बायका करवा चौथ साजरा करत होत्या. सगळी हिंदू प्रतीके ठळक दिसत होती. तरी विरोध.
डाबरला तर मंत्री, पोलीस, कायदेशीर कारवाईची धमकी मिळाली.

'आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू' असे म्हणण्याचीही आता सोय राहिली नाही का? कायदेशीर कारवाईची धमकी दिली, फ्रांसमध्ये व्यंगचित्राचा विरोध म्हणून Charlie Hebdo मासिकाच्या कार्यालयावर झाला तसा हल्ला करू असे कोणी म्हटलेले नाही हाच बेसिक फरक आहे. आणि म्हणूनच आपल्या कार्यक्रमाला 'भारतमाता की जय म्हणण्यास विरोध करणाऱ्या, वंदे मातरम म्हणण्यास विरोध करणाऱ्या, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या, भारतीय सैन्यावर दगडफेक करणाऱ्या समाजाची भाषा असलेल्या उर्दू तील नाव नको असे मलाही वाटते. उद्या त्यांच्यापैकी सर्वचजण डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे राष्ट्रप्रेमी झाले तर माझे मत बदलेलही!

डाबर तर भारतीय कंपनी. त्या बायका करवा चौथ साजरा करत होत्या. सगळी हिंदू प्रतीके ठळक दिसत होती. तरी विरोध.
डाबरला तर मंत्री, पोलीस, कायदेशीर कारवाईची धमकी मिळाली.

इथे विरोध झाला ते हिंदू सणांचा आधार घेऊन दोन युवतींना करवा चौथ साजरा करतांना दाखवल्यामुळे, म्हणजेच हिंदू सणांचा आधार घेऊन समलैंगिकता दाखवल्यामुळे. हेच जर नवरा-बायको दाखवले असते तर विरोध झालाच नसता. किंवा त्या दोन मुली मैत्रिणी आहेत आणि कसले तरी कॉलेजचे function आहे वगैरे दाखवले असते तर अजिबातच विरोध झाला नसता.

केवळ हिंदूंनी विरोध केला एवढे न पाहता त्यामागची कारणे समजून घ्या.

कळकट चेहर्याच्या म्हणजे काय? नक्की काय म्हणायचे आहे?
हे सगळे वाद वाचल्यावर मी ती अ‍ॅड पाहिली. मला कुठेही सुतकी, भकास, उदास, इस्लामी थाटाचे काहीही वाटले नाही.
<<
आनंद आहे. मग अशी जाहिरात देणार्या दुकानातून आपण यंदाच्या दिवाळीत भरपूर खरेदी कराल अशी खात्री आहे!>>>>

माझी खरेदी हा विषय नाही.

कळकट चेहरा, सुतकी, ईस्लामी थाट म्हणजे काय?
मुलगी सावळी आहे आणि फक्त टिकली लावली नाही म्हणून एवढी विशेषणे?

पुन्हा एकदा, इस्लाम हा तुमचा बेंचमार्क आहे. एकीकडे आमचा धर्म कसा प्रागतिक, सर्वसमावेशक म्हणताना इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचे दाखले द्यायचे आणि समलै़गिकतेलाही विरोध करायचा.

बॉम्ब फोडले नाहीत, दुकान फोडली नाहीत, हे उपकारच केलेत.

आता त्याची गरज पडत नाही. कारण सैंया भए कोतवाल. नाहीतर आधी लोकांना गोळ्याही घातल्यात आणि नाट्यगृहाच्या बाहेर बॉंबही फोडलेत.

का बरं ? आम्ही हिंदू आहोत आणि आमच्या धर्माच्या नावाखाली कुणी समलैंगिकांना दाबायला लागले तर आम्ही आक्षेप घेणारच. तुम्हाला कोर्टात जाण्याचा अधिकार कोण नाकारतंय ? जाऊन डोके बडवून घ्या for all we care. पण तुम्ही असंवेदनशील आणि bigots आहात हे आम्ही सांगणारच !

बरं विक्षिप्त मुलगा, अभिजीत अय्यर मित्रावर कायदेशीर कारवाई होईल का?
तो भारताच्या क्रिकेट संघाच्या पराभवासाठी होम हवन करायचं म्हणतोय. की कालपर्यंत भारतीय असलेला संघ आज बी सी सी आयचा झाला? मग सामन्याआधी त्यांना राष्ट्रगीताऐवजी bcci चं काहीतरी गा सांगा.

अभिजीत अय्यर मित्रावर कायदेशीर कारवाई होईल का?
तो भारताच्या क्रिकेट संघाच्या पराभवासाठी होम हवन करायचं म्हणतोय. .....

१००% व्हायलाच हवी. भारताच्या अहिताचा विचार करणारा, मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, भाषेचा असो, त्याच्यावर / तिच्यावर कारवाई व्हायलाच हवी.

करणार का? उ प्र चे मुख्यमंत्री अशावेळी देशद्रोहाचे कलम लावतात. याला लावतील का? की धर्म आणि विचारसरणी बघून नियम बदलेल?

की धर्म आणि विचारसरणी बघून नियम बदलेल?...
त्याचे twitter account पाहिले तर त्यात Beef-eater लिहिले आहे. Cover फोटो सुद्धा पाहून घ्या आणि मग वरील प्रश्न पुन्हा एकदा विचारा पाहू!!!
https://twitter.com/Iyervval

सगळ्याच ऍड पब्लिसिटी साठी बनवल्या गेल्या आहेत, असंच दिसत आहे. लाखभर rs च्या ऍड करायच्या आणि २ दिवसात controversy झाली कि काढायच्या. दर २ दिवसांनी नवीन काँट्रॅव्हर्सचे; very fishy.....
आता जस राजकारण एक campaign झालंय; तसेंच हेही.....काहीच खरं नाही

"आपल्या मेहनतीचा पैसा कशासाठी, कुठे, केव्हा, कसा खर्च करायचा याचा सर्वस्वी अधिकार संबंधित व्यक्तीला नको का???"
नक्कीच आहे. पण जर ती व्यक्ती कुणाच्याही मनोवैज्ञानिक दडपणापासून मुक्त असेल, कुठल्याही पीयर अथवा सामाजिक प्रेशर खाली नसेल तरच. सतत loaded प्रश्न आणि इतर इतस्ततः: भरकटवणाऱ्या लेखनाचा मारा होत नसेल, केवळ आणि केवळ तरच ती व्यक्ती आपले अभिव्यक्ति आणि निर्णयस्वातंत्र्य मोकळेपणाने वापरात आणू शकते.

मुसलमान द्वेष, हिंदू द्वेष, स्त्री/पुरुष द्वेष, दलित द्वेष, मराठा द्वेष, ब्राह्मण द्वेष, सर्व जाती मध्ये द्वेषच द्वेष - हे करणारे सर्वच जण एकसारखेच आहेत
हे मत नोंदवू इच्छिते.

जसं हे क रू नका तसंच ते ही करू नका. बी फेअर...
"those who have not sinned may cast the first stone" बदलून "पहिला दगड मारण्यापूर्वी आपलं आपलं अवलोकन करावं प्रत्येकानं. बाहेर बदल घडावं असं वाटतं तसा आपल्या आपल्या आतही बदल घडवूया. सजगतेनं घडवत राहुयात" असं सुचवावसं वाटतं. शून्याचे लगेच शंभर होणार नाहीत, पण १०-१५-२०-२५ तरी करत जाउयात.

आपल्याला जे त्यांच्या वर्तणुकीमुळे आणि स्वभावामुळे आवडत नाहियेत त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक राहुद्यात. नाहीतर ते होऊ घातलेल्या आपला आरसा आहेत - आपण मान्य केलं न केलं तरी. आणि कदाचित ते तसेच असतीलच असही नाही - काही काळाकरता पूर्वग्रह बाजूला ठेऊन संधी तर देऊन बघूयात!

आपण सगळ्यांनीच हा प्रामाणिकपणा दाखवला/समंजसपणा दाखवला तर आपल्याकडून तरी हेट कल्चरला बढावा मिळणार नाही.
अदरवाईज सगळाच नुसता दिखावा/अजेंडा.

Pages