Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोक संदीप खर्यांच्या कविता
लोक संदीप खर्यांच्या कविता ऐकायला तयार नाहीयेत, तर Martin Niemöller च्या कुठल्या ऐकताहेत?
नाव-बदल प्रकारात वरची तुलना पटली नाही. त्यांनी एका कार्यक्रमाचं नाव बदलणार नाही असं म्हटलं आहे. तुम्ही त्या कार्यक्रमाला काव्य पहाट, दिवाळी पहाट वगैरे काहीही म्हणायला त्यांनी बंदी घातली नाही. इथे ग्राहक/प्रेक्षक तुम्हीच आहात आणि तिथे जावं की नाही हे तुम्हीच ठरवू शकता. जश्ने रिवाझ प्रकारात सुद्धा ग्राहक तुम्हीच आहात. विकत घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे पहिल्या उदाहरणात (इर्शाद) नाव न बदलू इच्छिणारा ग्राहक नाही, तर दुसर्या प्रकारात (दिवाळीचं) नाव न बदलू इच्छिणारा ग्राहक आहे. ह्या मूलभूत फरकामुळे ही तुलना बाद ठरते.
आक्षेप हा त्या खरेदी स्वातंत्र्यावर नाहीच आहे. ज्यांनी तसा तो घेतला आहे, त्यांच्या बाजूने मी नाही. शिवाय इतर लोक आक्षेप घेतायत म्हणून मी मुद्दाम जाऊन तिथेच खरेदी करणार - ह्यालाही काही अर्थ नाही. तुम्हाला आवडतं तर तुम्ही करा खरेदी. त्यात काही समाजोपयोगी आहे असं मला वाटत नाही.
आक्षेप हा त्या विरोधामुळे वाटणार्या भीतीबद्दल आहे. जिज्ञासा ह्यांनी मला दिलेल्या एका उत्तरात मला तो लक्षात आला. कार्यक्रम रद्द का करावासा वाटला, जाहिरातींचं नाव का बदलावंसं वाटलं, मॉडेल्सना फोटोशॉप करून टिकली का लावाविशी वाटली - ह्या सर्वांचं उत्तर 'व्यवसायावर आर्थिक परिणाम होईल म्हणून' असं नसून 'समाजकंटकांची भीती आहे म्हणून, मोडतोड/जाळपोळ करतील म्हणून, पोलिसांची नसती उठाठेव सुरू होईल म्हणून' ह्यापैकी असावं. आक्षेप हा त्या तयार होणार्या अदृश्य भयकारक प्रवृत्तीला आहे. माझा तोच आक्षेप 'शिवाजी महाराज' असं नाव घेतलंच पाहिजे - हे म्हणणार्यांवरही आहे. एखाद्याने तुम्हाला पाहिजे तसं नाव घेतलं नाही, तर तंगड्या तोडायची भाषा होते. विरोध करण्याची पुढची पायरी म्हणजे हातघाईवर उतरणे, खळ्ळखट्याक करणे - हेच समीकरण झाल्यामुळे एखाद्या गोष्टीला जेव्हा विरोध वाढायला लागतो तेव्हा ही एक भीती मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरायला लागते. ह्यात उजवे-डावे-पुरोगामी-प्रतिगामी सगळे एकाच माळेतले मणी. 'ते करतात ते चालतं आणि आम्ही केल्यावर गळा काढायचा' असली समर्थनं इथे निरर्थक आहेत. आक्षेप हा ह्या सर्वांच्या सहज हिंसक होऊ घातलेल्या प्रवृत्तीला आहे. सक्ती ही भावी हिंसेच्या भयातून आपसूक, कुणी न सांगता होते आहे. कदाचित हिंसा करणारे हात आणि विरोध सुरू करणार्या व्यक्ती ह्या वेगवेगळ्या असतील. पण त्यांनाच त्यांच्यामधला परस्परसंबंध लक्षात आलेला नाही, ही वाईट गोष्ट आहे.
शेफाली व खरे यांच्यात false
शेफाली व खरे यांच्यात false equivalence शोधणारे असेही म्हणतील की बिचारा वाघ आपण बरे व आपले काम बरे या वृत्तीने हरणाला खात होत तर त्या वाघाचा सारे निषेध करतात पण हरणने मरत मरता वाघाला मारलेल्या लाथा कुणाला दिसत नाहीत.
ह.पा., अगदी पते की बात!
ह.पा., अगदी पते की बात!
बाय द वे, जश्न-ए-रिवाज हे फॅबच्या एका क्लोदिंग कलेक्शनचं नाव होतं - ते तरी तुमच्या सणाचं नाव बदला असं कुठे म्हणत होते?
ह्यात उजवे-डावे-पुरोगामी
ह्यात उजवे-डावे-पुरोगामी-प्रतिगामी सगळे एकाच माळेतले मणी. 'ते करतात ते चालतं आणि आम्ही केल्यावर गळा काढायचा' असली समर्थनं इथे निरर्थक आहेत.
तेही हेच करतात हे त्यांनी accept तरी करावं. भीती वाटणं हे कधीच योग्य असू शकत नाही आणि त्यावर उपाय करायला हवा. पण त्यासाठी दोन्ही बाजूच्या लोकांनी ते मान्य केलं पाहिजे. नवरात्रीतला महाराष्ट्र बंद किती लोकांनी मनापासून पाळला आणि किती लोकांनी भीती, दडपणामुळे पाळला? मग त्या भीतीवर पुरोगामी लोक काही कृती करणार का? Storia कंपनीवरच्या हल्ल्याचं काय?
एका बाजुला वैद्य बाई आता द्वेषात वहावत चालल्या आहेत. दुसरीकडे पुरोगामी नेहमीप्रमाणे लबाड, दुटप्पी भूमिका घेत आहेत. सामान्य माणूस मध्ये फसलेला असतो.
हरचंद पालव, सहमत.
हरचंद पालव, सहमत.
सक्ती ही भावी हिंसेच्या
सक्ती ही भावी हिंसेच्या भयातून आपसूक, कुणी न सांगता होते आहे. >>
सक्ती ही दाद मागायला (रिकोर्स) काही नाही ह्याने होते. सामान्य माणसावर अन्याय झाला तर न्यायालय, पोलिस, लोकप्रतिनिधी, निदर्शने करणार्या एन्जीओ अशी सगळी एकूण सिस्टीम सडलेली असेल तर मग ह्या बाईने, त्या गटाने असे केले, तसे केले होते इ बिले फाडणे होते. जानेवारी ६ ला हिंसा झाली नि नोव्हेंबर १७ ला शिक्षा झाली अशी बर्यापैकी लवकर कार्यरत प्रणाली असती तर जरातरी धाक होता.
भारताबाहेर राहून भारतातील लोकांनी कसे वागावे हे सांगणे सोपे आहे. मी ते टाळते. त्याने इरिटेट होत असेल तर मनापासून क्षमस्व आणि कविता सुचवल्याबद्दल धन्यवाद
. इथे कसे पोहोचलो हे ज्याचं त्याला कळणं महत्त्वाचे.
जानेवारी ६ ला हिंसा झाली नि
जानेवारी ६ ला हिंसा झाली नि नोव्हेंबर १७ ला शिक्षा झाली अशी बर्यापैकी लवकर कार्यरत प्रणाली असती तर जरातरी धाक होता. >> सहमत. योग्य वेळेत न्याय न मिळू शकणे, गुन्हेगार वशिल्यावर/आर्थिक/राजकीय बळावर सुटणे, फिर्यादीलाच भोगावे लागणे - हे होते आहे, हे तर आता सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे निदान आपल्यामुळे अश्या हिंसक लोकांना पोषक नवीन माल मिळू नये ह्याची खबरदारी सर्वांनीच (जाहीर वक्तव्ये करताना) घ्यायला हवी.
आता पाहिले प्रतिसाद... मला
आता पाहिले प्रतिसाद... मला देखील इर्शाद नाव योग्य वाटत नाहीय, त्यापेक्षा अर्ज किया है किंवा दीवाली महफ़िल जास्त भारी वाटते...
भरत, हरचंद पालव, तुमच्या
भरत, हरचंद पालव, तुमच्या मतांशी सहमत आहे. हा काळ आपण सोकावू देतो आहे हे भयकारी आहे.
WHITEHAT, राज, तुमचे बरोबर आहे. काँग्रेसने जर विद्वेषातून एखादे कृत्य केले असेल तर त्याचा निषेध केला गेला पाहिजे. तुम्ही लिहिलेल्या घटना माझ्या वाचनात आल्या नव्हत्या.
जिथे तुम्हाला पोटतिडकीने काही सांगावेसे वाटते तिथे ते मांडले पाहिजे. स्वाती आंबोळे यांनी जसा हा धागा काढला तसा तुम्ही देखील काढावात. तिथे त्या गोष्टींची चर्चा होईल.
We can not wear the "activist hat" all the time and for all the issues but each of us can take up at least one thing that she/he is passionate about and create awareness.
आपल्याकडचे सोशली
आपल्याकडचे सोशली काँसर्व्हेटिव्ह=राईट विंग असे समीकरण आहे. And social conservatism is the worst and dumbest aspect of being RW.
प्युअर बिनडोकपणा.
https://kreately.in/its
https://kreately.in/its-brazen-a-conference-on-dismantling-global-hindutva/
इर्शाद
असे कार्यक्रम होत असतील..तर इर्शाद ला ही काही हरकत नसावी
आणखी काही लिहायचं नव्हतं. पण
आणखी काही लिहायचं नव्हतं. पण शेफाली वैद्य आणि त्यांच्यासारख्यांची modus operandi दाखवणारी ही ताजी घटना.
दैन दिवसांपासून बरेच उजवे केरळमधल्या एका नॉन हलाल रेस्टॉरंट चालवणाऱ्या महिलेवर झालेल्या हल्ल्याची बातमी पसरवत होते. शेफालींनीही त्या आशयाचं अन्य कोणाचं ट्वीट रिटवीट केलं. त्यांच्या फॉलोअर्सनी ते वाचून गळा काढला. What's app वरही गेलं असेल.
आता ते मूळ ट्वीट डिलीट केलं गेलं आहे. कारण दोन हॉटेल व्यावसायिकांमधल्या वाद आणि मारहाणीनंतर नॉन हलालचा बनाव केला होता.
पण शेफालींचं काम झालं. सत्य पायात चपला घालून तयार होईपर्यंत..... वगैरे वगैरे
https://twitter.com/ShefVaidya/status/1452819176570200064
बातमी
https://www.newindianexpress.com/cities/kochi/2021/oct/29/assault-over-n...
मला या शेफाली बाई महिती नाहीत
मला या शेफाली बाई महिती नाहीत. आणि या टॉपीक वर एव्हढं बोलता पण येणार नाही. पण काल बघीतले फोटोझ, त्यात सोनाली कुलकर्णी आहे दीवाळी चे फोटो तर मॉडेल्स ना असाच चेहरा ठेवावा लागतो नां? सुतकी नाही पण तो अॅटीट्युड चेहर्यावर दाखवावा लागतो नां?
आता नविन वाद येतोय - सब्यसाची
आता नविन वाद येतोय - सब्यसाची मंगळसूत्र collection.
FabIndia काय किंवा सब्यासाची; मुद्दामून अश्या campaign चालू करतात असे वाटायला लागलय.
पावणेदोन लाख + ने किमती सुरू होतायेत मंगळसूत्राच्या; लग्नसराई आणि श्रीमंत लोकांनीच collection बघितलं असत पण आता फुकटात प्रसिद्धी, अभिव्यक्ती स्वातंरय आणि व्हिक्टिम कार्ड पण.
Personally मला दोन्ही ब्रॅन्ड्स आवडतात आणि दोन्ही adds विचित्र /cheap वाटलया.
सब्यसाची चे designs मस्त आहेत पण मंगळसूत्र प्रकरणच आवडत नाही.
सब्यसाची मंगळसूत्र collection
सब्यसाची मंगळसूत्र collection
मंगळसूत्र कलेक्शन साठी वाद का होतील?
ज्यांना असं वाटतं की मुद्दाम
ज्यांना असं वाटतं की मुद्दाम वाद व्हावा म्हणूनच अशा जाहीराती बनवतात, त्यांना हे मान्य आहे म्हणजे की कशाहीवरनं बेताल वाद, राडे घालणे हा एक प्रेडिक्टेबल ट्रेन्ड बनत चाल्लाय. तो वाद उकरणारे कोणेत हेही माहीतच आहे. मग "त्या" लोकांना का सांगत नाही दुर्लक्ष करा म्हणून? म्हणजे हे जे लोक "फुकटात" प्रसिद्धी मिळवतात असा राग येतो, त्यांची खोड मोडेल?
असं करत नाही कारण मनातून माहीतेय की राडे घालणारे कशाहीवरून राडे करतात, तसे ते व्हावे म्हणून कोणीही जाहीराती बनवत नाही. पण चीत भी मेरी, पट भी मेरी असा अटिटुड राडेबाज व समर्थकांचा आहे.
जाहिरातींवरील कॉंट्रोव्हर्सी
जाहिरातींवरील कॉंट्रोव्हर्सी मुळे त्या ब्रँडव्हॅल्यू वर काही परिणाम होतो का? जाहिरातदार लोकांना नक्की काय पाहिजे हे ध्यानात न घेताच जाहिराती करतायत? एखाद्या कॉंट्रोव्हर्सीमुळे लोक लगेच जाहिरात मागे घेतात. याचा अर्थ त्यामागे कोणताच विचार नसतो? एखाद्या सणाची जाहिरात करणे म्हणजे त्याची तत्व बदलणे असा होतो का? कॉंट्रोव्हर्सी करणाऱ्या जाहिरातीच फक्त चालतात? एखाद्या धर्माच्या रूढी-परंपरा जाहिरातीत दिसणं हा अट्टाहास बरोबर की चूक?
सेतू ॲडव्हर्टाइसिंग चे संचालक ऋग्वेद देशपांडे यांची मुलाखत.
https://youtu.be/3YlqbutojWI
भरत, कविता अगदीच चपखल आहे.
भरत, कविता अगदीच चपखल आहे. विकु, अड्ड्यावरची जर्मनी/ हिटलरची कमेंट ही कविता वाचून परत करावीशी वाटते आहे का?
ह.पा., भीती आणि कायदा सुव्यवस्था नसणे याने अशा कंटकांचे फावते +१
नसती उठाठेव सुरू होईल म्हणून'
नसती उठाठेव सुरू होईल म्हणून' ह्यापैकी असावं. आक्षेप हा त्या तयार होणार्या अदृश्य भयकारक प्रवृत्तीला आहे.>>>> +१.
@च्रप्
@च्रप्
सुचवलेली दोन्ही नावं ठीक वाटली.
नाव बदलायला हरकत नाही पण काळ सोकावतो !
साती(स्वाती) ताईंचा एक
साती(स्वाती) ताईंचा एक अफलातून पोस्ट वाचनात आली. कॉपी पेस्ट केल्याशिवाय राहावत नाहीय.
"२०२५ ची एक सकाळ.
बेडरूममधून खाली येण्यापूर्वी आरशात परत एकदा पाहिलं.
कुंकू, मंगळसूत्र सगळं जागेवर होतं.
स्टायलीश मंगळसूत्र सोडून एक काळ्या मण्यांचं पोवळं असलेलं, दोन वाट्यांचं मंगळसूत्र मागच्या वर्षीच बनवून घेतलं आहे. पहिलं मंगळसूत्र फारच आधुनिक आणि पाश्यात्य धाटणीचं आहे असं नारीसुरक्षा समितीच्या बाई म्हणाल्या होत्या.
भारतीय संरक्षण संघाची (बी एस एस )ही एक शाखा आहे.
यांच्या आदरणीय ताया कधीही तुमच्या घरी किंवा कामाच्या जागी येऊन तपासणी करू शकतात. आपल्या राष्ट्रीयतेच्या आणि संस्कृतीच्या आड येऊ शकतील अशा गोष्टी बदलायला भाग पाडतात. सुरूवातीस सौम्य शब्दात, मग कडकपणे. न ऐकल्यास सात दिवस निराहार ठेवण्यात येतं. ते ही न ऐकल्यास कारागृहात बंद करून चांद्रायण व्रत करायला लावतात. याला शिक्षा न म्हणता ‘प्रायश्चित्त’ म्हणतात.
मुली मोठ्या झाल्यात. त्यांना केवळ मुलींच्या शाळेतच जायला परवानगी आहे.
शाळेचा पिनॅफोर बदलून आता परकर पोलका (पट्टू) चौथीपर्यंत आणि दहावीपर्यंत अर्धी साडी आहे.
अकरावी बारावीला पूर्ण साडी आहे.
तरी बरंय की महाराष्ट्रात नऊवारी नेसावी लागते.
आमच्याकडे कानडी संस्कृती असल्याने ते एक नाही.
अस्पृश्यता वगैरे सध्या उघड नसली तरी आपापल्या जातीधर्माची बी एस एस ने ठरवलेली चिह्ने घालावी लागतात.
आमच्या कुटुंबाला गळ्यात एक चांदीचा चौका घालणे आवश्यक आहे.
कपाळाला विभूतीचे पट्टे आणि त्याखाली कुंकू असल्याशिवाय आम्ही बाहेर जाऊ शकत नाही.
कर्नाटकात सगळ्या महिलांनी साडी नेसणे गरजेचे आहे.
पंजाबातही साडी नेसायला लावतात.
मी नेसत नाही, घालते. हल्ली नासुसच्या महिलांना आक्षेप घेता येणार नाही अशी स्कर्टसारखी घालायची साडी मिळते.
पैंजण, जोडवी, बांगड्या , कानातले आदी घालायची सवय करून घ्यावी लागली.
घरी आल्यावर पहिल्यांदा ते काढून टाकते. ते ही मुख्य दरवाजा बंद करून. नासुसं च्या बाया कधीही घरी तपासणीला येऊ शकतात.
२०२२ च्या होळीत सगळ्यांनीच आपल्याकडचे पाश्चात्य कपडे जाळले .
आता पुरूषही लुंगी लावतात. (महाराष्ट्रात धोतर किंवा पंचा)
श्रीमंत लोक पगडी घालतात तर गरीब रूमाल बांधतात.
उत्तरीय, दस्ती, गमछा पुरूषांनाही आवश्यक आहे.
सकाळी विभागाची सुरक्षासेविका पहाणी करते.
त्यात घरापुढे सडासंमार्जन हवे, रांगोळी हवी मुला मुलींचे कपडे पारंपारिक हवे याचे परीक्षण केले जाते.
नसल्यास वेगवेगळ्या प्रकारची ‘प्रायश्चित्त’ आहेत.
पण सगळ्यात जास्त लोक भितात ते संजयसंचावर (टिव्हीवर) आपले नाव जाहिर होण्याला.
त्यात इज्जत जाते. लोक हसतात.
संदेश नावाचे एक मेसेजिंग ॲप आहे, त्यावर आपल्या गावाच्या/राज्याच्या समूहावर आपली निंदा होते.
कुटुंबे याला खूप घाबरतात.
आमच्या शुश्रूषागृहात परधर्मियांना पहाण्याची खास वेळ आहे.
त्या लोकांचा पेहराव आमच्यापेक्षा वेगळा असल्याने त्यांना कामावर ठेवता येत नाही.
परधर्मीयांसाठीचे वॅार्डस वेगळे आहेत.
परधर्मीयांवर उपचार करायला एक स्पेशल लायसेंस घ्यावे लागते. ते बरेच महाग असूनही आम्ही घेतलंय.
हॅास्पिटलला जाताना गाडी मीच चालवते कारण आपल्या संस्कृतीत बायकांनी सारथ्य केल्याची उदाहरणे आहेत हे नासुसं ने मान्य केले आहे.
चालक ठेवल्यास वाहतूक सुरक्षा संघाच्या कार्यकर्त्यांना त्याचे धर्मजाती प्रमाणपत्रही दाखवावे लागते.
त्यापेक्षा स्वत: गाडी चालवणे परवडते.
टू व्हीलर चालवायला बायकांना परवानगी नाही कारण ती काचा लावून बंद करता येत नाही. पण रस्त्याने चालत जायचे असल्यास डोक्यावरून पदर किंवा वेगळा घुंघट घेणं गरजेचं आहे.
लेडी डॅाक्टर्स फक्त बायकांनाच ट्रीटमेंट देऊ शकतात, त्यामुळे माझे अर्धे पेशंटस गेलेत.
त्याचबरोबर स्त्रिया फक्त लेडी डॅाक्टर्सनाच दाखवतात म्हणून बाकीच्या पुरूष डॅाक्टरांकडिल पेशंटस माझ्याकडे आल्यात.
दरदिवशीच्या रंगाचा कोड असतो , तो भासंसं आपल्या वेबसाईटवर तसेच संजयवाणीवर टाकते, त्या त्या दिवशी ते कपडे घालावे लागतात.
व्रतवैकल्ये, ड्राय डेज वगैरे तिथीनुसार अपलोड होतात, ती करावी लागतात. एखाद्याला प्रकृतीमुळे शक्य नसेल , तर तसे मेडिकल सर्टिफिकेट दाखवावे लागते.
मुलांची नावे ठेवताना भासंसं चा परवानगी घ्यावी लागते. आपल्या संस्कृतीत न बसणारी नावे ठेवता येत नाहीत.
संजयसंचावर चारपाचच प्रवाह(चॅनेल्स) चालू आहेत, बाहेरदेशाचे प्रवाह इथे दिसत नाहीत. हे चॅनेल्स काही ठराविक सरकारप्रेमी कंपन्यांचे आहेत.
कार्यक्रम भासंसं कडून संमती घेऊन मगच प्रदर्शित करता येतात.
अजून बरेच काही आहे. पण असो. काही संघटनांना मात्र हा मार्ग आवडत नाही. त्यांच्यामते हे जे नियम आहेत, ते एक ठराविक मुहल्ला सोडून लागू आहेत, ते तसे असू नयेत.
‘त्यांना’ आमचे अनुकरण करा किंवा देश सोडून जा इतकेच दोन पर्याय द्यायला हवेत.
जे आपल्या संस्कृतीला नडतात, त्यांना शिरच्छेद किंवा किमानपक्षी फटक्यांची शिक्षा द्यायला हवी. ‘प्रायश्चित्ताचे उपवास’ कामाचे नाहीत.
मवाळमतवादी भासंसं आणि जहालमतवादी सेनांचे सतत एकमेकांत खटके उडत असतात.
जहालवाले मनुस्मृती लागू करा, अस्पृश्यांची वस्ती वेगळी ठेवा , आंतरजातीय विवाह बंद करा इतकेच नव्हे , तर इंग्रजी शाळा बंद करा, शाळेत फक्त राष्ट्रीय शिक्षणच द्या असे म्हणत असतात. कधी कधी एखाद्या शाळेवर, संस्थेवर , परधर्मीयांच्या वस्तीवर हे लोक बाण तलवारी घेऊन हल्लेही करतात. मवाळ सरकार यांच्याकडे सध्यातरी दुर्लक्ष करतंय, पण कधीतरी हे लोक सत्तेवर येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे करणार हे नक्की!
*साती स्वाती*'
त्यामुळे निदान आपल्यामुळे
त्यामुळे निदान आपल्यामुळे अश्या हिंसक लोकांना पोषक नवीन माल मिळू नये ह्याची खबरदारी सर्वांनीच (जाहीर वक्तव्ये करताना) घ्यायला हवी. >>> +१ परफेक्ट, हरचंद पालव.
आक्षेप हा त्या विरोधामुळे वाटणार्या भीतीबद्दल आहे. जिज्ञासा ह्यांनी मला दिलेल्या एका उत्तरात मला तो लक्षात आला. कार्यक्रम रद्द का करावासा वाटला, जाहिरातींचं नाव का बदलावंसं वाटलं, मॉडेल्सना फोटोशॉप करून टिकली का लावाविशी वाटली - ह्या सर्वांचं उत्तर 'व्यवसायावर आर्थिक परिणाम होईल म्हणून' असं नसून 'समाजकंटकांची भीती आहे म्हणून, मोडतोड/जाळपोळ करतील म्हणून, पोलिसांची नसती उठाठेव सुरू होईल म्हणून' ह्यापैकी असावं. आक्षेप हा त्या तयार होणार्या अदृश्य भयकारक प्रवृत्तीला आहे. >>> या ही पॅराशी सहमत.
साती ताईंची पोस्ट +११११११
साती ताईंची पोस्ट +११११११
धन्यवाद जिज्ञासा. त्या
धन्यवाद जिज्ञासा. राज तुमचेही आभार. त्या कंपनीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याची बातमी फारशी मीडियाने दाखवली नाही. पण महाराष्ट्र बंदच्या वेळी काय परिस्थिती होती हे लोकांना माहीत आहे.
आपल्या पक्षांनी केलेल्या गुंडगिरीबद्दल पुरोगामी लोक एकतर 'चूप तुम रहो चूप हम रहे' असे गप्प राहतात किंवा 'या लोकांना ही असलीच भाषा कळते, असंच करायला हवं' असं समर्थनही करतात.
वैद्यबाई आणि मंडळींच्या कट्टरपणाला विरोध करायलाच हवा. पुरोगामी गुंडगिरी करतात म्हणून उजव्यांचा कट्टरपणाही चालवून घ्यावा असं नक्कीच नाही.
पण एका व्यक्तीच्या फेसबुक पोस्ट वरून पुरोगामी चार दिवस ग्यान वाटप करत फिरतायत. अमेरिकेत असं आणि जर्मनीत तसं, अमकी कविता तमका लेख नाझी तालिबान यांव न त्यांव. आणि त्यांच्या गल्लीतील दुकानदार ऐन नवरात्रीत भीतीपोटी दुकान बंद करून बसले होते, सामान्य नोकरदार, छोटे उद्योजक इच्छा असूनही कामावर पोचू शकले नव्हते याबद्दल गप्प!
उजव्या कट्टरवादाला सामान्य लोकांनीच विरोध करावा आणि ते करतीलच. डाव्या कट्टरवादाला पाठीशी घालणाऱ्यांवर विश्वास ठेवणे शक्य नाही.
सहमत whitehat!
सहमत whitehat!
पुरोगामी == मविआ सरकार असा
पुरोगामी == मविआ सरकार असा कांगावा का करताय ?
मी स्वतःला पुरोगामी समजतो, पण वरील पैकी एकाही घटनेचे समर्थन करत नाही.
>पण एका व्यक्तीच्या फेसबुक पोस्ट ...
एखाद्या सामन्य व्यक्तीची असती तर वेगळे असते. आयोजक इतके घाबरले नसते. समजा गुजरात मध्ये एखाद्याने "अब्दुल इडली सेंटर" उघडले व बाबू बजरंगी ने आपल्या फेसबूक वरून "मी तिथे जाणार नाही" असे लिहिले तर तो अब्दुल जिवाच्या भितीने गाशा गुंडाळेलच ना ?
whitehat >> ज्यांचा
whitehat >> ज्यांचा कोणत्याही पक्षाचे समर्थन किंवा विरोध करण्याचा अजेंडा नाही, त्यांना या सगळ्याच घटना तितक्याच चुकीच्या वाटतील. लिस्ट करायची म्हंटली तर अजून बर्याच घटना आहेत. खुद्द महाराष्ट्रात एका गावात दलित लोकांना गाव सोडून जावे लागले व दुसरीही तितकीच गंभीर घटना - गेल्या दोन आठवड्यात वाचल्या आहेत. त्याची सोशल मीडियामधे दखलही नाही.
तालिबानसंदर्भात दुसर्या बाफ वर लिहीलेली ही पोस्ट जशीच्या तशी इथे. तितकीच लागू.
तालिबानचा विरोध करणार्या किती जणांना भारत सेक्युलर राहावा, भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे हे मान्य आहे? त्यांनाच तालिबानला विरोध करायचा नैतिक अधिकार आहे. मथुरेतील मांस विक्री वर बंदी, गोहत्याबंदी रँडम लोकांनी राबवणे, एखादा मुस्लिम अगदी गाय कापून नेताना दिसला तरी त्यांच्या मारहाणीचे समर्थन न करणे, सावरकर, शिवाजी महाराज, धार्मिक बाबी/सण/श्रद्धास्थाने, ब्राह्मण, मराठा, बहुजन, राजपूत ईं ना सन्माननीय असलेले नेते यांचे उल्लेख असलेले स्टॅण्ड अप कॉमेडी वाल्यांचे विनोद, त्यापुढेही जाउन त्यांच्यावरही केलेले विनोद - याबद्दल तोडफोड, मारहाण करणे, भांडारकर मधली तोडफोड - अशा असंख्य घटनांबद्दल ज्यांची मते ठामपणे विचारस्वातंत्र्याच्या, आहारस्वातंत्र्याच्या व कायदा कोणीही हातात न घेण्याच्या बाजूला आहेत त्यांनाच तो नैतिक अधिकार आहे. (विचारस्वातंत्र्याच्या मर्यादा मला माहीत आहेत. त्या कोणी शिकवण्याची गरज नाही. पण त्या व्यक्तिनिहाय, धर्म/जातनिहाय बदलत नाहीत हे नक्की).
मी स्वतःला पुरोगामी समजतो, पण
मी स्वतःला पुरोगामी समजतो, पण वरील पैकी एकाही घटनेचे समर्थन करत नाही.
तुम्ही त्यातले नसाल तर स्वतःवर घेऊ नका.
उद्देश काय कोणा एकाकडे बोट दाखवण्याचा नाही. पुरोगामी शब्द भारतात जसा वापरला जातो त्या अर्थाने वापरला आहे.
डाव्या गुंडगिरीबद्दल चकार शब्द न काढणारे लोक इथे साने गुरुजींच्या थाटात लेक्चर दिऊ लागले म्हणून दुसऱ्या बाजूचा हिंसाचार, दहशत याची आठवण करून दिली.
फारएन्ड मी आपल्या लिखाणाशी
फारएन्ड मी आपल्या लिखाणाशी सहमत आहे.
खुद्द महाराष्ट्रात एका गावात दलित लोकांना गाव सोडून जावे लागले व दुसरीही तितकीच गंभीर घटना - गेल्या दोन आठवड्यात वाचल्या आहेत. त्याची सोशल मीडियामधे दखलही नाही.
दलितांची गाव सोडण्याची बातमी ओझरती वाचली होती. दुसरी बातमी कोणती ते कळलं नाही. मराठी मीडियाला नवाब मालिकांच्या पीसीमधून वेळच मिळत नाही.
दिवाळी पहाट म्हणजे मूठभर उच्चभ्रू लोकांचे भरल्या पोटचे चोचले सोडून दुसरं काय आहे! कधी जाऊन पाहिलं नाही काय असतं ते. आणि त्याच्या शीर्षकावरून इतक्या प्रदीर्घ intellectual चर्चा घडतात.
दलितांच्या गाव सोडण्याबद्दल अशीच तावातावाने चर्चा करण्याइतका आपला समाज सुसंस्कृत नाही.
दिवाळी पहाट म्हणजे मूठभर
दिवाळी पहाट म्हणजे मूठभर उच्चभ्रू लोकांचे भरल्या पोटचे चोचले सोडून दुसरं काय आहे! कधी जाऊन पाहिलं नाही काय असतं ते. आणि त्याच्या शीर्षकावरून इतक्या प्रदीर्घ intellectual चर्चा घडतात.
दलितांच्या गाव सोडण्याबद्दल अशीच तावातावाने चर्चा करण्याइतका आपला समाज सुसंस्कृत नाही.
>>>>>
जळजळीत आहे, पण वास्तव आहे
Pages