इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेजार्‍यापाजार्‍यांकडे पाठवलेली फराळाची ताटे लाडवांना बेदाण्याची बिंदी नसल्याने परत आली तर स्वतःचा हिरमोड करून घेऊ नका.
तुम्ही लाजेकाजेस्तव लाडवांना पुन्हा बेदाण्याची टिकली लाऊन पाठवणार असणार तर आपले बेदाणे ईराण, अफगाणिस्तान मधले नाहीत ना ह्याची खात्री करून घ्या.

वाचाल तर वाचाल, नंतर त्याच धर्तीवर "टिकली तर टिकली" ही म्हण प्रसिद्ध होणार.
(कपाळावर) टिकली (असेल) तर (जाहिरात) टिकली (समजा).

मानव, हा असाच विनोद केल्यामुळे चिन्मयी सुमित ट्रोल झाली म्हणे.

<<<अमेरिकेत ५०% टक्के लोक मूर्ख असले
तुम्ही ५० टक्क्यात मोडता का?>>>

अर्थातच, म्हणून तर मला माहित आहे. आता हुषार लोक म्हणतात, ५० नाही ७० टक्के! पण म्या मूर्खाला टक्केवारी कळत नाही.
भारतात किती आहेत? मी २० लिहिले पण मला काय कळते? तुम्ही खूप हुषार तुम्ही सांगा.
का तुमची हुषारी फक्त लोकांना मूर्ख म्हणण्यात? असेल बुवा, भारतात हेच लक्षण असेल शहाणपणाचे!!

<<अदरवाईज सगळाच नुसता दिखावा/अजेंडा.>>

अहो नानबा हे सगळे असेच आहे. नुसता देखावा/अजेंडा.
उद्योग ना धंदा काहीतरी काढायचे सोशल मिडियावर लिहायचे. लोकांनाहि उद्योग नाही! प्रसिद्धि मिळाली तर पैसाच पैसा!
ज्यांना खरी संस्कृतीची, भाषेची कळकळ आहे ते या भानगडीत पडत नाहीत.

>>ते त्यांनी व्हीडिओ एडिट करुन त्या मॉडेल्सना बिंदी लावली म्हणुन हो. असे करताच त्या कळकट, उदास, भकास, सुतकी चेहऱ्याच्या जादू झाल्याप्रमाणे सोज्वळ, सुशील,, आनंदी, उत्साही दिसू लागल्या. मग का बरं नाही करणार लोक गर्दी?

कमीत कमी मगरप्ट्टा येथील पी एन जी मधल्या सोकू च्या फोटोवर बिन्दी नाहीय. आजही जाउन चेक करू शकता.

ज्यु सोकु मुळातच उदास दिसते, मग टिकली लावली काय नी नाही लावली काय, की फर्क पैंदा?

तिच्या ऐवजी प्राजक्ता गायकवाड / प्राजक्ता माळी किंवा तेजश्री प्रधानला घ्यायला पाहीजे होते.

टिकली लावणे, प्रसन्न दिसणे आणि सौंदर्य हे तिन्ही निकष अ‍ॅड मॉडेलला लावायचे असतील तर माझ्या मते कपिल शर्मा शो मधल्या रिंकू देवी पर्फेक्ट कास्टिंग आहेत.

तर इर्शाद चे काय झाले? त्यांचा कार्यक्रम झाला का? काय शीर्षक होते?
मी आपला धागारुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. उगीचच बिंदी काय नि कोण मूर्ख आहे असल्या गपा या धाग्यावर कशाला?
स्वाती_आंबोळे, धागा बंद करता येत असेल तर करून टाका.

तर इर्शाद चे काय झाले? त्यांचा कार्यक्रम झाला का? काय शीर्षक होते?>>>>> ईर्शाद घरी गेला. जाम कंटाळला तो या सगळ्या प्रकाराला. थंडीत कोणी आल्याचा चहा तरी देईल का?

रहेमत की निगाहोंका सहारा मांगो, दुनियांसे कोई शय ना खुदारा मांगो
दुनियांके वफा झुट सारे है फरेब, अल्लाह से अल्लाह का सहारा मांगो

धागा त्या कश्या बंद करणार? सदस्यांना करता येते का ते? बहुतेक प्रशासकांना करावे लागते ते काम. जाऊ द्या.

तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हुं मै
तेरे मासुम सवालोंसे परेशांन हुंन मै, हो परेशान हुं मै

गुलजार, जावेद अख्तर ह्यांच्या नावाला ब्राह्मण महासंघाचा विरोध.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन वादात.
एक बातमी व्हॉट्स ऍप वरची.

यांनी दिली आहेत त्या कारणामुळे विरोध नाही. सावरकर, नाशिक, हिंदू वगैरे काही संबंध नाही. जावेद व गुलजार (हे ही मुस्लिम वाटले की काय महासंघाला) यांच्या राजकीय मतांचाही काही संबंध नाही.

मला प्रश्न आहे तो या दोघांचा मराठी साहित्याशी काय संबंध आहे? तसा काही प्रिसिडन्स असेल तर बोलावू दे.

यापूर्वी अनेकदा इतर भाषांतील साहित्यिकांना साहित्य संमेलनाला उद्घाटक मृहणून बोलवलं गेलं आहे.
डोंबिवली - विष्णू खरे
बडोदा - रघुवीर चौधरी

यापूर्वी नयनतारा सहगल यांनाही असाच विरोध केला गेला होता.

इर्शाद जाऊन वेगळा विषय सुरू झाला काय? धाग्याचे नाव बदलून 'समावेशावरून कटीकटी' अशा अर्थाचे काही व्हावे.
(मी दिवाळी संपली तरी का चालू आहे अजून म्हणून बघायला आले तर... धागा बंद नको तर शब्दाचा, व्यक्तीचा, कलाकृतींचा असा कशाचाही समावेश inclusion केल्याने होणारी खिट्खिट असं काहीतरी ठेवा ही विनंती. )

यापूर्वी अनेकदा इतर भाषांतील साहित्यिकांना साहित्य संमेलनाला उद्घाटक मृहणून बोलवलं गेलं आहे. >>>
गुलजा़रने कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद केला होता ना? >>>

मग तर काहीच प्रॉब्लेम नाही.

ऋतुरंग दिवाळी अंक 'आजोळ' या विषयावर आहे. त्यात गुलजारांचा त्यांच्या नातवाबद्दलचा लेख आहे. त्याचं नाव समय. ते लिहितात, " राखीजी बांगलादेशातून आल्यात. मी पाकिस्तानातून आलो. मेघना इथली आहे. मेघना इथे जन्मली. समय इथे जन्मला. ते महाराष्ट्रीयन आहेत. मी तर पन्नास वर्षे इथे राहिल्यामुळे महाराष्ट्रीयन झालो. माझ्यामध्ये पंजाब आणि बंगाल दोन्ही सामावलेलं आहे. मेघना महाराष्ट्रीयन आहे. "

योगायोगाने त्याच अंकात ऋतुरंग प्रकाशनाच्या नवीन पुस्तकाची जाहिरात दिसली. गुलजारांचा 'सगे सारे' हा काव्यसंग्रह प्रथम मराठीत प्रकाशित झाला आहे! किशोर मेढे यांनी अनुवाद केला आहे.

अमिताभ बच्चन देखील कुठल्याशा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आले होते असे आठवते. आणि त्यांचे भाषण होताक्षणी मांडव ओस पडला अशी बातमी आलेली सुद्धा आठवतेय.

सीमंतिनी, 'बिंदी' हे जसं (जाहिरातींमध्ये न सापडणार्‍या) प्रतिकांचं प्रतीक झालं होतं (म्हणे! Proud ), तसा इर्शाद समावेशाचं प्रतीक झाला आहे असं मी या निमित्ताने डिक्लेअर करून टाकते. Proud Happy

गुलजार आधीच्या काही संमेलनामधेही आले होते असे आठवते.

Submitted by चीकू on 10 November,

होय. गुलझार पिंपरी चिंचवड मध्ये आले होते. स्थानिक संमेलनांमध्येही जात असतील. इतका मोठा माणूस आवर्जून मराठी संमेलनात येतो त्यामुळे दरवर्षी बोलावलं तरी छान आहे.

बाकी साहित्य संमेलनाचं लोकेशन बदलून "भुजबळ नॉलेज सिटी" केलं आहे. म्हणजे आता जावेद अख्तर, ब्राह्मण महासंघ, संभाजी ब्रिगेड etc ओघाने आलेच.
बिचारे नारळीकर!

"साहित्य सृष्टीत योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्ट्रात असताना नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या या विकृतांना बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना असाच एकदा सन्मान दिला गेला होता. आम्ही त्यावेळेस पण विरोध केला होता. आदल्या दिवसापर्यंत ठिकठाक असणारे दिब्रिटो ग्रंथदिंडीच्या वेळी आजारी पडले आणि नंतर पुन्हा मोठे भाषण करायला मोकळे होते. दिब्रिटो असो की गुलझार, जावेद अख्तर यांना अशा महत्वाच्या पदांवर बसवू नये. सन्माननीय जयंत नारळीकर साहेबांसारखा अध्यक्ष असताना वीर सावरकर यांच्या भूमीत या विकृतांच्या हस्ते हे उद्घाटन होण्यास आमचा विरोध राहील अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे."

हे माहीतच नव्हतं.

गुलजारनी अब्राहमिक भाषेतला शब्द स्वतः:चं नाव म्हणून निवडला . तिथेच त्यांच्यावर काट मारली पाहिजे. शिवाय जन्माने शीख म्हणजे खलिस्तानी दहशतवादी.

जावेद अख्तर तर मुसलमानच.

मग तर काहीच प्रॉब्लेम नाही.

यावर बिचारे नारळीकर काही बोलतात का हे पाहायचं.

हा विषय जर द्वेषपूर्ण भावनेतून काढला नसता ना, तर ऑब्जेक्टिव्हजली गुलजार अध्यक्ष होऊ दे का, का मराठीतला इतर कोणीतरी तरुण रक्ताचा लेखक अध्यक्ष होऊ दे हि चर्चा करता आली असती.

आता ते शक्यच नाही. गुलजार आणि जा.अ. ला फुल सपोट.

गुलजार यांचे साहित्यिक योगदान वादातित आहे. जावेद अख्तर यांची शायरीही आवडतेच. पण त्यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी बोलावले आहे की असोसिएटेड ग्लॅमरसाठी याबद्दल खात्री नाही.

राष्ट्रीय लेवलवरच्या मिडीआला आकर्षून घेण्यात अशा सेलेब्रिटींचा उपयोग होतो यात शंका नाही. शिवाय वाद-विवाद झाले तर फुकटची प्रसिद्धी मिळते आणि बर्याच लोकांना आपापले चेहरे बाईट्सच्या निमित्ताने मिरवता येतात.

मराठी साहित्यजगताला याचा कितपत फायदा होतो याबद्दल विचार करायला हवा. या लोकांना नुसते एका भाषणापुरते बोलावण्यापेक्षा नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा इ. आयोजित करता येईल का ते पहावे. आणि समस्त भारतातील कुठल्याही भाषेत लिहिणार्या साहित्यिकांना (उदा. त्या वर्षीचे ज्ञानपीठ विजेते) अशा उपक्रमात सामिल करता येईल.

आपण हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना झुकते माप देतो कदाचित ते जास्त ऍक्सेसिबल आहेत म्हणून. इतर भाषिक साहित्यिकांचाही विचार व्हावा.

कवी सौमित्र यांच्यावरही बहिष्कार टाकून पुढच्या सर्व साहित्यसंमेलनांच्या काव्यवाचन समारंभातून त्यांना वगळावे अशी मागणी करावी काय? यापुढे ज्या ज्या साहित्यिकांनी गजल लिहिली असेल त्यांची नावे मराठी साहित्यकार कोशातून काढून टाकावी. सर्वप्रथम माधव ज्यूलियान आणि सुरेश भट ह्यांच्यावर ' डिलीट मारावी '.

ओके, इर्शाद = समावेश. "नो बिंदी नो बिझनेस" हे कटरिनाच्या टीप टीप बरसा पानीला लागू होत नाही का? चार का चाळीस मिलियन हिट्स आहेत यूट्यूबवर.

Pages