इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> गेले शंभर वर्षे जनमानसात दिवाळी ह्या सणाची जी प्रतिमा आहे त्याला अनुसरून लोकांना काही अपेक्षा असल्या तर काय चूक आहे?
१०० वर्षांहून अधिक काळ उर्दू ही भारतीय संविधानाने राजभाषा (२२ पैकी १) म्हणून स्वीकारली आहे, त्याचं काय?

+11

आपणा सर्वांस चिदानंदमय दिवाळी! अर्थात सळसळते चैतन्य आणि विशुद्ध निर्भेळ आनंद तुमच्या तनमनात ओसंडून राहो. आनंदमय दिवाळी. हॅपी दिवाळी.

१०० वर्षांहून अधिक काळ उर्दू ही भारतीय संविधानाने राजभाषा (२२ पैकी १) म्हणून स्वीकारली आहे, त्याचं काय?>> न्युज लाँड्री नावाची ए क वर्गणी भरून आपण्च बातम्या ऐकायची साइट आहे. हे लोक सरकारी किंवा इतर जाहिराती घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा पिओव्ही स्वतंत्र आहे.
तर ह्यांचा एक वीकली हप्ता म्हणून पॉडकास्ट असतो. दोन हप्त्यामागील पॉड्कास्टात ह्या विशयाव र डिस्कशन होते. जरूर ऐका. तीनशे रु महिना वर्गणी आहे. पे पाल वर करता येते.

मी इथे गेम चेंजर मेंबर आहे.

ही जाहिरात नव्हे. पन भारतातील बातम्या कळतील.

१०० वर्षांहून अधिक काळ उर्दू ही भारतीय संविधानाने राजभाषा (२२ पैकी १) म्हणून स्वीकारली आहे >> हा मुद्दा समजला नाही. संविधान इतकं जुनं आहे? मला वाटलं १९४९-५० असेल.

ऊप्स! काहीतरी गडबड झाली आहे पोस्ट सेव्ह करताना. क्षमस्व.
१०० वर्षांहून अधिक काळ भारतात बोलली जाते आहे आणि राजभाषाही आहे असं हवं ते.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

अमा, पॉडकास्ट चेक करते.

धर्मा बरोबरच भा षा ही एक जन समुदायाला वेगवेगळे पाडायचे व फूट पाडून राज्य करायचे साधन आहे व हे प्रयत्न निदान गेली शंभर वर्शे चालू आहेत. असे त्या पॉडकास्टातील एक्स्पर्ट चे निरी क्षण आहे. हे तर आपल्याला दिसतेच आहे.

अमा , सहमत.
भाषावार प्रांतरचनेमुळे दुही आणि दूरीच वाढली. त्यापूर्वी अनेक लोक बहुभाषक असत. मराठी, गुजराती, कोंकणी, कन्नड, तेलुगू, उर्दू अशा अनेक भाषांत बृहन महाराष्ट्राचा व्यवहार चाले आणि पुष्कळांना आपल्या मातृभाषेसोबत एक दोन स्थानिक भाषा चांगल्या बोलता वाचता येत. त्या त्या समाजांत काय घडतंय ते एकमेकांना कळे. सामंजस्य राही.

भाषेवरून होणाऱ्या फूटीवरून आठवले.
मला धोनी आवडतो त्यामुळे तू मराठी माणूस असून आयपीएलमध्ये पिवळी लुंगीवाल्या चेन्नईला सपोर्ट करतोस असे सिरीअस टोमणे ऐकावे लागतात Happy

हे असे एक धर्म एक संस्कृती एक वे ऑफ लाइफ असे प्रयत्न पूर्वी पण झाले आहेत व सर्व फेलच गेलेले आहेत. डायवर्सिटी हाच निसर्गाचा नियम आहे. हिंदू धर्माची अशी एक भाषा आहे का? शेवईला विचारले पाहिजे. परत मिक्स भाषांचे काय? मल्टी ले यर ड संस्कृती, गंगा जमनी तहजीब वगैरे चे काय? हे सर्व उखडून तिथे काय लावायचा प्लान आहे ह्यांचा? हैद्राबादी दक्खनी डायलेक्ट मध्ये हिंदी उर्दू मराठी व तेलुगु शब्द आहेत.

फुकट सोशल इंजिनिअरिन्ग करायचे बेत आहेत.

अमा. + १११.
फुकट सोशल इंजिनिअरिंग!

नानबा -+१; पण मायबोलीवर उघडउघड जातीय द्वेष चालतो, rather तो ठिक आहे; हिंदू-मुस्लिम द्वेष नको - अश्या typ चे लोक जास्ती वाटतात.
दोन्ही प्रकारचे द्वेष नको; अशी लोक खूप कमी असतील.

भारताची diversity हा एक अनोखा प्रकार आहे; जगात कुठल्याही राष्ट्र या प्रकारचे नाही. यामुळे वेस्टर्न राष्ट्र संकल्पनाची पट्टी आपलीकडे चालणार नाही.
बऱ्याच प्रमाणात आपली लोक सामाजिक जीवनात डिव्हर्सिफाइड असतात पण घरातल culture बदलाच्या विर्रुध्द असतात. साधे एकाच सणांचे पदार्थ प्रांतागणिक बदलतात. Typ-रोटी-बेटी व्यवहार म्हणतात त्या प्रकारचे ; मेट्रो cities मंध्ये आता खूप फरक नाही दिसत पण छोट्या शहरात किंवा गावात जाणवतो.
त्यामूळे अन्यायकारक पध्दतीच्या विरुध्द बरंच काम केल गेलं पण पुर्ण diversify करण्याचा प्रयत्न हवा तितका नाही केला गेला.

१)इतक्या हिंदी मुळे पूर्ण वाचू शकले नाही.
Submitted by धनवन्ती on 20 March, 2021 - 10:०

२)वाचवलं नाही अगदिच.
इथे हिंदी कथा अपेक्षित नाही. आवरा!
Submitted by सनव on 20 March, 2021 - 11:०३

३) वाचायला सुरुवात केली पण हिंदी संपेचना ! अर्धवट सोडली.
Submitted by पराग on 22 March, 2021 - 21:१३
.......

>>>>> पण मायबोलीवर उघडउघड जातीय द्वेष चालतो, rather तो ठिक आहे; हिंदू-मुस्लिम द्वेष नको

जातिय द्वेष म्हणायचा तर, आय हॅव्ह गिव्हन अप. झोपलेल्यां चे ढोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही. शिवाय डुकराचि विष्ठा, शेण, छिनाल, वास घेत ग्फिरणे - असल्या सेप्टिक टॅंकिय वादात कोण उडी घेणार? Sad

हिंदू-मुस्लिम वादांबद्दल अजुन ही आशा आहे. भाषा तरी उत्तम असते. मुद्दे डिसेंटली मांडले जातात. मला शेंडे, स्वाती, विकु, फारेन्ड, टवणे, भरत यांचे व अन्य कित्येकांचे मुद्दे व भाषा आवडते. प्रतिसाद बहकलेले नसतात. शिवराळ तर अजिबातच नसतात.

शिवाय डुकराचि विष्ठा, शेण, छिनाल, वास घेत ग्फिरणे - असल्या सेप्टिक टॅंकिय वादात कोण उडी घेणार? >>
सिरियसली.. चुकून दुसरा धागा उघडला.. तिथे अशी चर्चा वाचून वाटले, देवा! मी काय पाप केलं म्हणून हा असला धागा उघडायची बुद्धी झाली! असं का बोलावसं वाटत असेल आणि कस बोलवत असेल असं - असही वाटल! मुद्दा मांडायचे इतर मार्ग नाहीत का? इतका कमालीचा द्वेष वाटतो का हे बोलणं वाईट आहे हेच वाटत नाहिये - काय माहित!

स्वाती_आंबोळे ,
माफ करा, पण तुम्ही फारच तार्किक विचार करता.
इथे चार वर्षे ट्रंपची पाहिल्यावर अजूनहि जनता तार्कीक विचार करते असा संशय तुम्हाला कसा येऊ शकतो?
अमेरिकेत ५०% टक्के लोक मूर्ख असले नि भारतात फक्त २० टक्के असले तरी ते २० कोटीहून अधिक होतात. त्यांना भडकवायला काहीहि मूर्खासारखे केले तरी मज्जा. आपले नाव होते. भाजपची सत्ता राहिली तर उद्या पर्वा आमदार, खासदार, मंत्री झाले की पाच पिढ्यांची ददात मिटली. कसली हिंदू संस्कृति नि कसली काय? मग मतांसाठी इफ्तारचे जेवण घालतील हे लोक!! नमाज पण पढतील!!

>> मग मतांसाठी इफ्तारचे जेवण घालतील हे लोक!! नमाज पण पढतील! >> आधीच्या पोस्ट मध्ये फुगलेला फुगा टर्रकन फुटला ना!!! Biggrin

यावरून आठवलं
काल रस्त्यावरून जाताना सोकु ज्युनिअर ची अजून एक जाहिरात दिसली.त्यात अरुणा इराणी सारखा बंजारन गेटअप आणि वर केसात मोठी बिंदी मांगटिका आहे
चेहऱ्यावरचे भाव जरा गोंधळलेले आहेत, 'मै कहां हूं' असे काही.
ते कलेक्शन मी घेणार नाही, पण गेटअप म्हणून चांगले दिसतेय.

आपण उगाच इतका उहापोह करतोय. काल मगरपट्टा रोड च्या पी एन जी च्या पार्किन्ग मध्ये १०-१५ गाड्या, रास्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला २५-३० गाडया आणि अजून नवीन लोक पार्किन्ग शोधत होते. दुकान खच्चून भरलेले होते ते वेगळे. बहुतेक बाकिच्या शो रूम ची या पेक्शा काही वेगळी परिस्थिती नसावी. म्हणजे एकतर त्यान्च्या रिसर्च टिम ने बरोबर काम केलय किन्वा bindi or no bindi, nobody gives a f***.

ते त्यांनी व्हीडिओ एडिट करुन त्या मॉडेल्सना बिंदी लावली म्हणुन हो. असे करताच त्या कळकट, उदास, भकास, सुतकी चेहऱ्याच्या जादू झाल्याप्रमाणे सोज्वळ, सुशील,, आनंदी, उत्साही दिसू लागल्या. मग का बरं नाही करणार लोक गर्दी?

Pages