Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>चक दे मध्ये जेव्हा शाहरूख
>चक दे मध्ये जेव्हा शाहरूख खान उर्फ कबीर सिंगला जेव्हा गद्दार म्हटले गेले तेव्हा वाटले छे असे कधी होते का..
>मोहम्मद अझरुद्दीन जो फिक्सिंगमध्ये अडकला त्याबद्दल सुद्धा कधी तो मुसलमान असल्याचे विचार मनाला शिवले नाही..
>शमी बाबत तर मुसलमान आहे हे ध्यानातही नव्हते. हे ट्रोल प्रकरण समोर आले तेव्हा जाणवले की त्याचे पहिले नाव मोहम्मद आहे
चकदे मध्ये जे कबीर सिंगचे पात्र आहे ती व्यक्ती मुळात पूर्णतः हिंदु आहे.(रंजन नेगी )
म्हणजे त्या चित्रपटाच्या निर्मात्याने/दिग्दर्शकाने (कबीर खान. ) मुद्दामुन गल्ल्याकडे डोळा ठेवुन हेतुपुरर्सर त्या पात्राला मुद्दामुन मुस्लीम दाखवले वर जे अत्याचार त्याच्यावर झालेच नाहीत ते दाखवुन हात धुवुन घेतले. (चित्रपट जेव्हा रिलिज झाला तेव्हा भाजप सत्तेवर नव्हती ) तिथे किती फुरोगाम्यांनी हिंदु/शीख लोकांना असे दाखविल्याबद्दल निषेढ नोंदवला बरे.
ह्याच्या अगदी उलट छपाक चित्रपटात केले आहे. नायिकेवर अत्याचार करणारे पात्र हे शांतिप्रिय धर्माचे आहे पण त्याचे काही अगम्य कारणाने
हिंदुकरण केले आहे. किती ढोंगी फुरोगाम्यांनी ह्याबद्दल आवाज उठवला बरे आणि हे असे प्रकार सारखे सारखे होत असताना कुणा हिंदु स्त्री/पुरुषाने निषेधाची भूमिका घेतली तर त्यात त्यांचे काय चुकले?
विशेषतः जे चित्रपटात दाखवले (विषेषतः शारुख असलेल्या) तेच सत्य असे मानणार्यांची संख्या दिवसेंदिवस मोठी होत असताना अश्या प्रवृत्तींबद्दल आवाज उठवणार्या वर्गाला पाठींबा देणे आवश्यक आहे.
मोहम्मद शमीबद्दल वाईट वाटते पण गेल्या काही दिवसापासुन पत्नीसोबत चव्हाट्यावर आलेल्या वादामुळे काही अपप्रवृत्तींनी त्याला टारगेट केले असावे आणि हे नक्कीच निषेधार्ह आहे.
मोहम्म्द अझरुद्दीन बद्दल सागांयचे तर अझहरुद्दीन साहेब मॅच फिक्सींग चे आरोप होत असताना केवळ माझ्या धर्मामुळे मला टारगेट केले जातेय असे बरळले होते आणि तेव्हा गावसकर कपिल देव आदींनी त्याची कानउघाडणी केली होती. म्हणजे फायदा होतो तोवर गुणवत्ता आणि काही अडचण आली कि धर्म असे सोयीचे राजकारण करणार्यांना चपराक लावली होती.
आमिरराव खान आणि किरण राव ह्यांचे उदाहरण ही ताजे आहे. आमिररावांना हा देश माझ्या पत्नीला(त्यावेळच्या बरं का) आणि मुलांना असुरक्षित वाटत होता आणि मग आमिररावांनी केले काय? तर पत्नीलाच तलाक तलाक तलाक दिला. आता महाशय तिसर्या का चौथ्या पत्नीचय शोधात आहेत (आणि शक्यता आहे कि त्यांना त्यांच्या शांतिप्रिय समाजातुन ती मिळणार नाहीच कोणी हिंदु पुरोगामी स्त्रीशी निकाह करतील.)
मिशी वाले, छपाक चित्रपट
मिशी वाले, छपाक चित्रपट पाहिलात का? तुम्ही जे लिहिलंय ते खरं आहे जबाबदारीने सांगताय का?
छपाक बद्दल खोटे आहे.
छपाक बद्दल खोटे आहे.
विराट कोहलीने आधी फटाकेमुक्त
विराट कोहलीने आधी फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन केलं. मग शमीला धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावले. त्यामुळे त्याला पाकिस्तानला जायचा सल्ला मिळाला आहे. तसंच येत्या सामन्यांत भारताचा पराभव व्हावा अशीही इच्छा व्यक्त केली जात आहे. याबद्दल कोणावर देशद्रोहाची केस होणार नाही.
आजच्या पेपरात अनुष्काची गोदरेज हेअर कलर ची जाहिरात आहे. त्यात दिवाळीचा उल्लेख आहे. पण बिंदी नाही. घाला बहिष्कार.
शेंडेनक्षत्र, you are
शेंडेनक्षत्र, you are downplaying Shefali Vaidya's statement to a large extent. कुंकू न लावलेल्या किंवा लावू न शकणाऱ्या बायका यांना मोठ्या भेदभावाचा सामना करायला लागला असा इतिहास आहे. हा सामाजिक बदल ज्यांनी घडवून आणला त्यांना समाजसुधारक म्हणतात म्हणजे हा बदल चांगला, समता आणणारा आहे.
<<
आपण शेफालीबाईंची भूमिका समजून न घेता कांगावा करत सुटला आहात. त्यांनी असे कुठेही कुठेही कुठेही म्हटलेले नाही की समस्त बायकांनो कुंकू टिकली काहीतरी लावा नाहीतर माझ्याशी गाठ आहे.
पुन्हा एकदा प्रयत्न करतो. वाक्ये हळुहळू वाचा.
दिवाळीच्या प्रसंगाच्या निमित्ताने केलेल्या जाहिरातीत दिवाळीशी संबंधित काहीतरी मग आकाशकंदील, दिवे, समया, हार, फुले, फटाके, फराळ, लक्ष्मीची प्रतिमा (हे सगळे नाही ह्यातले काहीतरी) आणि जर जाहिरातीत स्त्री असेल तर असे काहीतरी ज्यातून ही स्त्री दिवाळी साजरी करत असेल असे वाटावे. चेहर्यावर आनंदी भाव, आजचे हिंदू रितीरिवाज मानले जातात असे काहीतरी दिसावे (वेद काळातले वा अजिंठा एलोरा वा खजुराहोच्या काळातले नाही) अशी माझी अपेक्षा आहे.
ही अपेक्षा पूर्ण न करणार्या उद्योगाकडून मी काही खरेदी करणार नाही. ह्याचा हॅशटॅग नो बिन्दी नो बिझ्नेस. ह्यचा अर्थ हा उपक्रम समस्त हिंदू स्त्रियांनी कुंकू लावावे म्हणून केलेला नाही. दिवाळीकरता केल्या जाणार्या जाहिराती हा विषय केंद्रस्थानी आहे. बिंदी हा एक चमकदार टॅगचा भाग म्हणून वापरला आहे. एक शीर्षक म्हणून. पूर्ण धडा नाही.
तुम्हाला जर दिवाळी आहे असा संशयही येणार नाही अशा सुतकी, भकास, उदास, इस्लामी थाटाच्या जाहिराती आवडत असतील तर तुम्हाला ती जाहिरात देणार्या दुकानातून हवी तेवढी हवी ती खरेदी करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
दुकानाच्या दारात शेफालीताई अडवायला उभ्या असतील अशी यत्किंचितही शक्यता नाही. तुम्ही तुमचे सगेसोयरे, मित्रमैत्रिणी ह्यांना अशा जाहिराती कशा पुरोगामी आहेत आणि भारताचे तालिबानिकरण टाळायचे असेल तर अशाच जाहिरातींना कसे प्रोत्साहन दिले पाहिजे असे पटवू शकलात तर तेही करण्याचे आणि त्या संबंधित उद्योगाला भरभराट मिळवून द्यायचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. तिथेही शेफालीबाई खोडा घालण्याची यत्किंचित ही शक्यता नाही.
नंतर नेहमीचे पक्ष कार्यकर्ते
नंतर नेहमीचे पक्ष कार्यकर्ते वादात उतरल्यावर हा धागा विषयाला सोडून आपापले पक्षीय अजेंडे रेटत नेहमीच्या टिपिकल राजकीय धागे ज्या वळणावर येऊन पोचतात तिथे येऊन पोहचला आहे... काहीही.. एक पक्ष या विचारसरणीचा उघड सपोर्ट करतो, त्यांची निवडणूक जिंकण्याची ती रणनीती आहे तर पक्षीय उल्लेख होणारच. राहता राहिला चर्चेचा प्रश्न तर ती ट्रॅकवरच आहे.
ती so called, self declared
ती so called, self declared तटस्थांची नेहमीची टेप आहे.
शेंडेनक्षत्र, तुम्हाला
शेंडेनक्षत्र, तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे का? Shefali did not say no smile no business. Her hash tag is quite specific to bindi. बाकी आनंद, सण वगैरे फुलोरे are secondary. बिंदी नाही म्हणून जर तुम्हाला ती जाहिरात सुतकी आणि भकास मूडची वाटत असेल तर तुम्ही अजूनही कुंकू सौभाग्याचे प्रतीक यात अडकलेला आहात असाच अर्थ मला तरी लागतो.
शमी- गेट इथेही आलं.
शमी- गेट इथेही आलं.
मॅच संपल्यानंतर दुःखात ट्विटरवर बराच वेळ टाईमपास केला. राईट विंगर पब्लिक फक्त चिकूवर तुटून पडले होते. त्यात त्याच्या captaincy इतकाच 'हिंदूना शहाणपणा शिकवण्याऐवजी woke कोहलीने आपल्या गेमकडे लक्ष द्यावे' हा मोठा भाग होता. त्याचा बिचारा कुत्रा पण ट्रोल झाला. कोहली का कुत्ता हा दर दिवाळीला राईट विंगच्या रडारवर असतो. त्याखालोखाल अमित शाहचा पोऱ्या, रोहित शर्मा आणि पांड्या ट्रोल झाले. शमीचा उल्लेखही कुठे दिसला नाही. सगळे कोहल्यावर भडास काढत होते. आणि शाहच्या मुलावर भाजपचेच लोक भयंकर उखडले होते.
त्यामुळे कांगावा करता यावा यासाठी विशिष्ट मीडियाने शमीचा ट्रोलिंग ट्विटर स्टॉर्म इंजिनियर केला असावा हे मला टोटली पटतं.
सुरुवातीला शमीला ट्रोल करू नका असा कांगावा ट्विटरवर करण्यात आला. अरे पण कोण करतंय ट्रोल असं लोक विचारू लागले तेव्हा तो इंस्टावर ट्रोल झाला अशी सारवासारव झाली. मग शमी-गेटचे सूत्रधार ट्विटरवर का amplify करत होते?
शमी खरंतर राईट विंगर्सचा आवडता आहे.त्याची बायको मुलगी बुरखा घालत नाहीत, भारतीय-वेस्टर्न पेहराव करतात म्हणून त्याला ट्रोल केलं जायचं. त्याच्या बाजूने बरेच हिंदू बोलायचे.
शमी-गेट बद्दल लेख : Who actually trolled Shami?
https://www.indiatoday.in/news-analysis/story/who-actually-trolled-mohd-...
>>राहता राहिला चर्चेचा प्रश्न
>>राहता राहिला चर्चेचा प्रश्न तर ती ट्रॅकवरच आहे.
शुभेच्छा
>>>> नाही तर माझ्या शी गाठ
>>>> नाही तर माझ्या शी गाठ आहे. असे म्हटले नाही
करेक्ट पण एक इन्फ्लुअन्सर या नात्याने त्यांनी जबाबदारीने विधाने करावीत. अशी अपेक्षा ठेवणे चूकीचे म्हणता येणार नाही.
अशी विधाने मुद्दाम व वारंवार केली जातात का माही त नाही.
———————-
स्वाती चा बी एल एम ची व सवर्णांनी दलितांवर केलेल्या अन्यायाची तुलना - बिनतोड, मुद्दा वाटला.
——-————
बाकी भयंकर फीअर माँगरींग चालू आहे. सती काय, केशवपन काय.
माझ्या सारख्या टिकली न लावता
माझ्या सारख्या टिकली न लावता सण साजरे करणाऱ्या व्यक्ती कडून तुम्हाला चालत असेल तर, तुम्हाला व कुटुंबातील सर्वांना पण दिवाळी च्या शुभेच्छा
बाकी तो सात्विक सोल आय डी
बाकी तो सात्विक सोल आय डी कशावरुन फेक नाही? मुद्दाम उचकवण्याकरता लिहीले असेल्ही.
तो आय डी उजवा नसेल् ही
https://mobile.twitter.com
https://mobile.twitter.com/satviksoul
Check the number of followers and go through her tweets , retweets.
तरीही फेक असू शकतो. म्हणजे स्त्री रूप घेतलेला पुरुष असू शकतो. अशा बऱ्याच केसेस आहेत.
भरत कदाचित एखाद्या मोदी
भरत कदाचित एखाद्या मोदी विरोधकाने मुद्दाम ते अकाउंट काढ्ले असेल फिअर माँगरींग करायला.
तेव्हा खात्रीशीर लोक जसे शेफालि वैद्य वगैरे लोकांपुरति चर्चा सीमीत असू देत. असे म्हणायचे होते.
तरीही फेक असू शकतो. म्हणजे
तरीही फेक असू शकतो. म्हणजे स्त्री रूप घेतलेला पुरुष असू शकतो. अशा बऱ्याच केसेस आहेत. >> हो माबोवरच याचा डेमो पाहिलाय
मोदी समर्थक असं काही लिहूच
मोदी समर्थक असं काही लिहूच शकणार नाहीत हा विश्वास आवडला.
शेफाली वैद्यला परंपरेचा उत्सव
शेफाली वैद्यला परंपरेचा उत्सव या शब्दांच्या उर्दू रेंडिशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे ?
तेजस्वी सूर्या ? रिअली ?
तेजस्वी सूर्या ? रिअली ? सिरियसली ? त्याचे एका शब्दात वर्णन करायचे तर evil हा शब्द निवडेन. वर लिहिलेच असेल पण पुन्हा लिहितो.
बंगलूरू मध्ये कोरोनाचे थैमान सुरू होते. ऑक्सिजन चा तुटवडा. बेड्स चा तुटवडा. बरेच लोक आपापल्या परीने मदत करत होते. दिशा रवी ( जिला दिल्ली पोलिसांनी "टूल़्कीट" साठी पंधरा दिवस आत टाकले होते) ती ही बिचारी २४ * ७ ट्विटर वर होती व मदत करत होती.
बीबीएम्पी ने कोविड सेंटर सुरू केले होते व तिथे शंभर एक टेंपररी माणसे कामाला होती. हा खासदार त्यतल्या बारा तेरा मुस्लीम तरुणांची नावे असलेली लिस्ट घेऊन मेडिया सह तिथे पोहोचला व त्याने घडाघडा ती लिस्ट वाचून दाखवली. हा काय मदरसा आहे काय ? अशी विचारणा केली व ते मुस्लीम बेड्स चा काळा बाजार करत आहेत असा आरोप करून सर्वाना कामावरून काढले !
खरी मजा तर पुढेच आहे, ते मुस्लीम काळा बाजार करत नव्हतेच मुळी, तेजस्वी सूर्याचा एक सहकारीच करत होता, व तोही त्यावेळी सूर्या बरोबर होता.
अहो मिशीवाले, फेक न्यूज चिकटवायची इतकी हौस आहे तर निदान नवी तरी चिकटवा, छपाक ला किती दिवस पिळणार ? ९९ वर्षे लीज वगैरे नवा माल आहे उपलब्ध .
कुळकर्णी साहेब. आमचा पास.
कुळकर्णी साहेब. आमचा पास. दिवाळी वाया घालवायची नाही आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा!
तुम्हाला दिवाळीला कळकट
तुम्हाला दिवाळीला कळकट चेहर्याच्या, दुर्मुखलेल्या शोकमग्न चेहर्यांच्या बायका दाखवणार्या जाहिराती आवडत असतील तर तुम्ही अशा लोकांकडून दागिने, कपडे, आणि अन्य वस्तू घ्यायला स्वतंत्र आहात. >>>>
सुतकी, भकास, उदास, इस्लामी थाटाच्या>>>>
कळकट चेहर्याच्या म्हणजे काय? नक्की काय म्हणायचे आहे?
हे सगळे वाद वाचल्यावर मी ती अॅड पाहिली. मला कुठेही सुतकी, भकास, उदास, इस्लामी थाटाचे काहीही वाटले नाही.
ती मुख्य जाहिरात मी पाहिली
ती मुख्य जाहिरात मी पाहिली होती.टिकली बिकली हे सर्व प्रकरण वाचलेलंही नव्हतं तेव्हाही ते भाव 'काय करावं आता किती मोठा प्रॉब्लेम हा' आणि 'असुदे गं, प्रॉब्लेम मोठा खरा, पण निभावून नऊ दोघी मिळून' असे काहीसे वाटले.मॉडेल्स हसल्या नाही तर चेहऱ्यापेक्षा कपड्यांकडे जास्त लक्ष वेधलं जाऊन मूळ कपडे मार्केटिंग हेतू साध्य होईल असा काही नवा मॉडेलिंग मधला फंडा असल्यास माहीत नाही.(अमेझॉन वरच्या मी पाहिलेल्या वेगवेगळ्या ब्रँड च्या कुर्ते सेक्शन मधल्या पण कोणीच बाया हसत नाहीत.पण आता पर्यंत मोठ्या फ्लेक्स वरच्या बाया हसायच्या.)
हे ईर्शाद बद्दल.
हे ईर्शाद बद्दल.
शेंडे - तुमच्यामाझ्यासारख्याने काहीही माहिती न काढता "हे काय मुद्दाम दिवाळी पहाट कार्यक्रमाला हे असले नाव ठेवले आहे?" छाप पोस्ट टाकली. त्याला चार-दोन आक्रमक समर्थने, एखाद दुसरी समजंस प्रतिक्रिया आली. काही बिघडत नाही. दोन दिवस लोकांच्या फीड वर ते राहील, नंतर हवेत विरून जाईल.
पण तुमचे समजा हजारांत फॉलोअर्स आहेत. तुमच्या पोस्टवर लोक जर डायरेक्ट या सादरकर्त्यांचे आईबाप काढू लागले. अर्वाच्य प्रतिक्रिया येउ लागल्या, तर त्यांना आवर घालण्याची जबाबदारी तुमची नाही काय?
त्यानंतर तुम्हाला समजले की हा कार्यक्रम आवर्जून या नावाने दिवाळीला केलेला नाही. तो आधीपासूनच होत आहे. तो करणार्यांची हिंदूंना कमी लेखण्याची कसलीही हिस्टरी नाही. एवढेच नव्हे, तर या वादाचे झेंगट नको म्हणून त्यांनी तो कार्यक्रमच रद्द केला. थोडेफार वाईट वाटावे? दिलगिरी वगैरे? एक चांगला कार्यक्रम उगाचच रद्द केला गेला?
बस्स इतकाच हा प्रश्न आहे. कोणीही हिंदुंना नरकचतुर्दशीला पहाटे गजला गा व सेक्युलर व्हा सांगत नाहीये.
वामन हरी पेठे ज्वेलर्सची
वामन हरी पेठे ज्वेलर्सची जाहिरात पाहिली नाही वाटतं इथे कुणी. सुंदर मेकअप केलेली, छान कपडे व दागिने घातलेली आणि खूप गोड हसणारी मॉडेल.... फक्त कपाळावर टिकली नाही.
रच्याकने, हल्ली जाहिरातीचं मूळ प्रॉडक्ट सोडून बाकी गोष्टींचं पण निरीक्षण केलं जातंय , माझ्याकडून. सोमि संन्यास घेण्याची गरज आहे.
मला चालेल गोड हसणारी आणि
मला चालेल गोड हसणारी आणि टिकली नसणारी मॉडेल.
हो खरंच.आता जरा जाहिराती निरखून बघितल्या जातायत.(हल्ली लहान मुलांना चित्राचे पाच वाक्यात वर्णन लिहा होमवर्क असतो तसं.)
यांच्याशी संबंधित नाही, पण इतर बरीच जुनी खटकलेली बाब: बऱ्याच मोठ्या बिल्डिंग स्कीम च्या जाहिरातीत ब्लॉन्ड किंवा एकंदर बराच विदेशी/अँग्लो इंडियन चेहरा दिसेल अश्या बायका मुलं असायची.आता हे बरंच बदललंय.आधी बहुतेक कोणतेतरी चेहरे कॉपी पेस्ट करत असतील.आता खरे मॉडेल घेऊन फोटोशूट करत असतील.
>>
>>
पण तुमचे समजा हजारांत फॉलोअर्स आहेत. तुमच्या पोस्टवर लोक जर डायरेक्ट या सादरकर्त्यांचे आईबाप काढू लागले. अर्वाच्य प्रतिक्रिया येउ लागल्या, तर त्यांना आवर घालण्याची जबाबदारी तुमची नाही काय?
<<
हजरो फोलोअर्स आहेत म्हणून त्या व्यक्तिला अभिव्यक्तीस्वातंत्र्यच नाही का? कुठल्या दुकानातून स्वतःच्या पैशाने काय घ्ययचे ह्याचे स्वातंत्र्य नाही? आणि ते कारण व्यक्तही कराय्चे नाही? काहीच्या काही! आपणास योग्य ती कायद्यात दुरुस्ती करुन अशा अनेक फोलोवर्स असणार्या लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे बिल पास करायचे असल्यास त्याकरता शुभेच्छा. पण तसे होणार नाही अशी खात्री आहे आणि मी माझ्या परीने अशा विधेयकाला विरोध करीन हे नक्की!
फोलोअर ने वाईट कॉमेंट केली तर त्याची जबाबदारी त्या फोलोवीवर कायदेशीर रित्या पडते का? पडत असेल तर जरूर कारवाई व्हावी. पण नैतिक दृष्ट्या काय परिस्थिती आहे? एक बटण दाबले की कुणीही फोलोवर बनतो. त्याकरता गंडा बांधला, रजिस्ट्रेशन केले, नियम मान्य केले असे काहीही नसल्या मुळे तमाम फोलोवर्स ची पालक म्हणून शेफालीबाईंवर सगळी जबाबदारी ढकलणे हा काय बिनडोक प्रकार आहे?
इर्शाद नामक कार्यक्रम काय होता आणि कसा होता ह्याविषयी मला माहिती नाही. दिवाळीत ह्या नावाने कार्यक्रम होत असेल तर मला त्या नावाचा तिटकारा आहे. परंतु त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रम रद्दीसाठी शेफाली बाईंना जबाबदार ठरवले आहे का? किंवा काही तरी विधान केले आहे का? कायद्याचे दार ठोठावले आहे का? पोलिसांकडे तक्रार केली आहे का? मग आपण शेफालीबाईंना जबाबदार ठरवून शाब्दिक झोडपायचे काय कारण?
इर्शाद कार्यक्रम रद्द करण्याचे आयोजकांनी काही अधिकृत कारण दिले नसेल तर निव्वळ अंदाजपन्चे दाहोदरसे काहीतरी ठोकणे आणि आपल्या विरोधकांना त्याची सबब वापरुन ठोकणे योग्य नाही.
तसे दिले असेल तर त्याची लिंक जरुर द्या.
>>
>>
कळकट चेहर्याच्या म्हणजे काय? नक्की काय म्हणायचे आहे?
हे सगळे वाद वाचल्यावर मी ती अॅड पाहिली. मला कुठेही सुतकी, भकास, उदास, इस्लामी थाटाचे काहीही वाटले नाही.
<<
आनंद आहे. मग अशी जाहिरात देणार्या दुकानातून आपण यंदाच्या दिवाळीत भरपूर खरेदी कराल अशी खात्री आहे!
हे सगळे वर्णन व्यक्तीसापेक्ष आहे आणि शेफालीबाईंचा निर्णय हा व्यक्तीगतच आहे. त्या मंत्री, मामलेदार, आमदार, खासदार, कुठल्या (म्हणजे त्या एका पक्षाच्या) सरचिटणीस, प्रवक्ता, कार्यकर्ता वगैरे काही नाहीत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांचा आहे. तुम्ही वेगळा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहातच.
>>
>>
शेंडेनक्षत्र, तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे का? Shefali did not say no smile no business. Her hash tag is quite specific to bindi. बाकी आनंद, सण वगैरे फुलोरे are secondary. बिंदी नाही म्हणून जर तुम्हाला ती जाहिरात सुतकी आणि भकास मूडची वाटत असेल तर तुम्ही अजूनही कुंकू सौभाग्याचे प्रतीक यात अडकलेला आहात असाच अर्थ मला तरी लागतो.
<<
हो, मी आजही इंग्रजी शिकतोच आहे. परंतू आपण हॅश्टॅग हा पूर्ण विषय नसतो हे जरूर समजवून घेण्याची गरज आहे. अगदी थोडी अक्षरे वापरुन काहीतरी चमकदार टॅग बनतो. त्यात बिन्दि, बिझ्नेस असा अनुप्रास होतो म्हणून त्यांनी तो वापरला. तेवढाच वापरून शेफालीबाईंना झोडपायचे असे आपण ठरवले असेल तर आपण स्वतंत्र आहात. परंतु त्यांनी स्वतःने याविषयी भूमिका स्पष्ट मांडली आहे. आणि ते समजून घेतले तर निव्वळ बिंदी केंद्रस्थानी ठेवून हे केलेले नाही असे लक्षात येईल. दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या जाहिराती हाच केंद्रबिंदू आहे आणि मी ह्या मुद्द्यावर ठाम आहे. जाहिरात सुतकी वाटण्याचे कारण चेहर्यावर मयताला आल्यासारखे भाव हा आहे. (निदान मी ज्या जाहिराती पाहिल्या त्यात). दिवाळी हा एक आनंद सोहळा नसून मोहरम सारखा मातम वाला सण असावा असे ते भाव आहेत. आणि दिवाळीत जे काही दिसते त्यातले काही औषधालाही दिसत नाही हे खरे कारण आहे.
ज्यांना हे असले आवडत असेल त्यांनी ते उचलून धरावे. ज्यांना आवडत नाही त्यांना त्या दुकानातून काही खरेदी करायची नाही. सिम्पल!
क्रिसमस किंव्वा Thanksgiving
क्रिसमस किंव्वा Thanksgiving च्या ads असेच सुतकी कपडे अणि भाव घेऊन केले तर काय reaction असतिल असा prashna पडलाय
वैयक्तिक मत म्हणून सोशल
वैयक्तिक मत म्हणून सोशल मीडियावर भडका उडेल असे लिखाण करायचे आणि वर मला काही म्हणायचे नाही असे म्हणत हात वर करायचे ही सुरुवात आहे
आणि यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही असे मत आहे
ठीक आहे नाहीये यात आक्षेप घेण्यासारखे मग आक्षेप घेईपर्यंत हातावर हात धरून बसावे आणि मग जेव्हा खरोखरच झळ बसायला लागेल तेव्हा मग अरुण्यरुदन करावे असे काहीसे आहे का?
जसे तुम्ही म्हणता तसे शेफाली ताईंनी खबरदार असल्या दुकानातून खरेदी केलीत तर बघाच असा काही इशारा दिला नाहीये तसाच त्यांना सोमी वर झोडपणाऱ्या लोकांनीही तुम्ही याच दुकानातून खरेदी केलीच पाहिजे नाहीतर घरावर दगडफेक करू असेही म्हणलं नाहीये
अद्याप तरी त्यांच्या शब्दांना विरोध हा शब्दानेच होतो आहे मग प्रॉब्लेम काय आहे
उद्या त्यांना मारहाण झाली तर बघू ना
(मारहाण व्हावी असे माझे मत नाही पण पुढे परिस्थिती उदभवली तर बघू म्हणणाऱ्यांना आहे)
परिस्थिती उदभवू नये म्हणून तर सुरू आहे ना का ठिणगीच तर आहे, आग लागून घर जळल्यावर मग आक्रोश करा हा कुठला प्रकार आहे
Pages