Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>बिंदी-इर्शाद- जश्न रिवाज हे
>बिंदी-इर्शाद- जश्न रिवाज हे मुद्दे महत्वाचे नाहीत. त्याच्या बेसिसवर लोकांनी खरेदीचा निर्णय घेऊ नये.
पण शेफाली याना एक private citizen म्हणून स्वतःपुरतं असं म्हणण्याचा अधिकार नक्कीच आहे की मला ही जाहिरात आवडली नाही म्हणून मी तो प्रॉडक्ट विकत घेणार नाही.
नाही ! शेफाली ज्या एको सिस्टीम चा भाग आहेत ते पहाता त्यांनी असे म्हणणे म्हणजे भावी उपद्रवाची नांदीच असते. उगीच नाही मुनव्वर चा शो रद्द झाला !
मूळात स्वतःला मध्यममार्गी या
मूळात स्वतःला मध्यममार्गी या गोंडस नावाने संबोधणारे खरंतर भाजपा सपोर्टरच आहेत. फक्त राडेबाजी, उघड द्वेष दाखवायची लाज किंवा भिती वाटते म्हणून उगं आपलं "अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी" नाटक करतात. जायचंय यानाही तिकडेच. यांच्या तोंडंन कधीही निःसंदिग्ध विरोध होत नाही कितीही काहीही झाले तरी. अन कधी मोठ्या ऑनसटीचा आव आणून विरोध केला तर त्याची वाक्यरचना " हे चुकच आहे पण ते तमके...." अशी मखलाशी. यावरनं कळतं की आवडती बाजु कोणतीय.
किती ती मांजरेसारखी डोळे मिटून दुध प्यायची वृत्ती.
>>> 100 तृतीयपंथीयांचा मोर्चा
>>> 100 तृतीयपंथीयांचा मोर्चा हे तर फारच विनोदी आहे. कोणी आणि कुठे लिहिलंय?
हे बघा इथे. शंभर नाही, पन्नास लिहिलंय मात्र.
कार्यक्रम तर उगाच रद्द केलाय
कार्यक्रम तर उगाच रद्द केलाय !
जर संयोजक रिस्क घ्यायला तयार नव्हते, वा तुम्हालाही रिस्क घ्यायची नव्हती तर ईथल्यापुरते नाव बदलून कार्यक्रम करायचा होता. कम ऑन बी प्रॅक्टीकल. आणि त्यानंतर पुढचे शो आपल्या मूळ नावाने करायचे होते, जे करणार आहेतच.
आता समजा दरवेळी सणाच्या दिवशी हा कार्यक्रम असताना हाच राडा झाला आणि याच फेसबूक धमक्या आल्या तर काय करणार आहात? दरवेळी शो कॅन्सल करत बसणार.
ज्या मूळ शेफाली बाईंनी पोस्ट केलीय त्यांनीही गैरसमज झाला असे लेटेस्ट अपडेट म्हणून टाकलेय. तर कोण राडा करणार होते? ईथना कोणी गेले असते का दिवाळीच्या पैल्या सकाळीच घरचा फराळ खायचा सोडून तिकडे पोलिसांचे फटके खायला... वा घरी मस्त मोती साबणाने आंघोळ करायची सोडून पोलिसांकडून धुलाई करून घ्यायला..
आणि त्या वरच्या फेसबूक पोस्टमधील ५० तृतीयपंथांच्या धमक्या तर हास्यास्पद आहे. जेमतेम ४०-५० लोकं लाईक करणारे आहेत, त्यातले कित्येक तर हसलेच आहेत
‘इर्शाद’ नाव छान आहे पण
‘इर्शाद’ नाव छान आहे पण त्याने हा उर्दू गजल चा कार्यक्रम आहे असे वाटते इतकं ते नातं मनात घट्ट बसलंय. मराठी कवितांचा कार्यक्रम वाटत नाही. त्या नावाची नजाकत उर्दूलाच शोभते, इतर भाषांना नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्या दृष्टीने हे नाव मला विशेष भावलं नाही. पण हे त्या लोकांनी दिवाळी वा कोणाचा अपमान व्हावा म्हणून नक्कीच केलं नसणार.
पण स्वाती, हे सगळे इथे लिहुन जास्त फायदा नाही असं मला वाटलं. तिथे लिहिले तर त्यांना कळेल. (हे त्या लोकांपर्यंत पोचावं असं वाटत असेल तर, नाहीतर ठीक आहे. तु आधीच तिथे लिहिले असशील तर सॉरी कारण मी सर्व प्रतिसाद वाचले नाहीत ).
अर्र मी फारच उशीरा लिहिलं कारण काल वाचलं त्यानंतर खूपखूप प्रतिसाद आलेत.
मला सर्वात राग राहून राहून
मला सर्वात राग राहून राहून याचा येतो आहे की आउटकम काहीही असतं तरी शेफालीबाई आणि त्यांच्या समर्थकांनाच जितम् मया असं वाटणार होतं.
नाव बदललं तरी, कार्यक्रम रद्द झाला तरी, किंवा झाला असता आणि तिथे काही गोंधळ झाला असता तरी!
बरं इतकं होऊन या बाई 'मी बाई फक्त माझं वैयक्तिक मत मांडलं' असं म्हणून नामानिराळ्या!
पण 'मी हा कार्यक्रम बघणार नाही' म्हणणं आणि 'बघू या हा कार्यक्रम कसा होतो' असं म्हणणं यात फरक आहे की नाही? जर त्यांचे समर्थक असं म्हणत असतील तर त्यांना रोखायची जबाबदारी कोणाची?
शेफाली ताईंचा हा जॉबच आहे
शेफाली ताईंचा हा जॉबच आहे म्हटल्यावर तो मानधनासहित आहे का, हा पुढचा प्रश्न येतोच. जर कुणी अशी थोडीशी ' पिसं ' काढण्यासाठी पैसे देत असेल आणि अशी कामं करवून घेत असेल तर ही एक सुनियोजित व्यवस्था निर्माण केली गेली आहे हे येतंच. आणि पिसं थोडीशी विसकटवणं इतकं साधं नाहीय हे. द्वेषाचा आणि हिंसेचा आगडोंब उसळवणं आणि त्या आगीत आपली पोळी भाजून घेणं हाच मूळ हेतू राहात आला आहे ह्या प्रकारांचा. .... मला तर भक्त मंडळी बरी इतकी डेंजर
स्युडो न्यूट्रल वाटतात. व्हाट्स अप युनिव्हर्सिटी मधे पुरोगामी गहाळ होते त्या चा परिणाम बघतो च आहोत. विधानसभा झाली तेव्हा एकट्या राष्ट्रावादी ने स्वतः ची व्हाट्स अप आर्मी उभी केली . अफवा खोडून काढणार्या पोस्ट २ दिवसांनी का होईना येतात आता.
महाराष्ट्र कॉंग्रेस अजूनही तिथे निष्क्रिय आहे. ट्विटर उत्तरेकडील कॉंग्रेसी चांगला किल्ला लढवतात.
मला वाटते हे 24 तास 12 महिने लढाई मोड रहाण्या शिवाय ईतर राजकीय पक्षांकडे पर्याय नाही.
शेफाली ताईंचा हा जॉबच आहे
शेफाली ताईंचा हा जॉबच आहे म्हटल्यावर तो मानधनासहित आहे का, हा पुढचा प्रश्न येतोच. जर कुणी अशी थोडीशी ' पिसं ' काढण्यासाठी पैसे देत असेल आणि अशी कामं करवून घेत असेल तर ही एक सुनियोजित व्यवस्था निर्माण केली गेली आहे हे येतंच. आणि पिसं थोडीशी विसकटवणं इतकं साधं नाहीय हे. द्वेषाचा आणि हिंसेचा आगडोंब उसळवणं आणि त्या आगीत आपली पोळी भाजून घेणं हाच मूळ हेतू राहात आला आहे ह्या प्रकारांचा. .... मला तर भक्त मंडळी बरी इतकी डेंजर
स्युडो न्यूट्रल वाटतात. व्हाट्स अप युनिव्हर्सिटी मधे पुरोगामी गहाळ होते त्या चा परिणाम बघतो च आहोत. विधानसभा झाली तेव्हा एकट्या राष्ट्रावादी ने स्वतः ची व्हाट्स अप आर्मी उभी केली . अफवा खोडून काढणार्या पोस्ट २ दिवसांनी का होईना येतात आता.
महाराष्ट्र कॉंग्रेस अजूनही तिथे निष्क्रिय आहे. ट्विटर उत्तरेकडील कॉंग्रेसी चांगला किल्ला लढवतात.
मला वाटते हे 24 तास 12 महिने लढाई मोड रहाण्या शिवाय ईतर राजकीय पक्षांकडे पर्याय नाही.
मला सर्वात राग राहून राहून
मला सर्वात राग राहून राहून याचा येतो आहे की आउटकम काहीही असतं तरी शेफालीबाई आणि त्यांच्या समर्थकांनाच जितम् मया असं वाटणार होतं. >> कसं बोललात!! खरं आहे...
गझलेच्या कार्यक्रमाला ‘इर्शाद
गझलेच्या कार्यक्रमाला ‘इर्शाद’ नाव समर्पक आहे. सुरूवातीपासून हे नाव असणारा कार्यक्रम रद्द
झाला हे वाईट.
एका वर्गमित्राने शाळेच्या ग्रुपवर कमेंट टाकेपर्यंत ‘नो बिंदी नो बिझनेस’ प्रकार माहित नव्हता. मग शेफाली वैद्य यांच्या फेबू अकाउंटवर जाऊन ती पोस्ट वाचली. त्याचा व्हर्बॅटीम गोषवारा असा की “प्रत्येक महिलेने बिंदी लावावी असा मी फतवा काढलेला नाही. पण आमच्या सणात भुंड्या कपाळाच्या बायका सुतकी चेहेर्याने वावरत नाहीत. मग सणांच्या जाहिराती तरी अशा का? हॅशटॅग सुरू करताना स्पष्ट म्हटलं होतं की हा माझ्यापुरता निर्णय आहे. माझे कष्टाचे पैसे आहेत ते कशावर खर्च करायचे ते मी ठरवणार. हॅशटॅग ट्रेण्ड झाला तो इतर खुप लोकांना माझ्यासारखं वाटत होतं म्हणून”.
यातल्या ‘भुंड्या कपाळाच्या बायका’ या उल्लेखाला माझा आक्षेप आहे कारण सहसा तो डीरोगेटरी अर्थाने वापरला जातो..
बाकी पोस्टचं साम्य वाटतं ते दीपिका पदूकोणच्या ‘माय बॉडी माय चॉईस’वाल्या व्हिडीओशी. त्यातल्या काही मुद्द्यांवरून वादंग निर्माण झाला. पण कुणीही तिचा तो व्हिडीओ बनवण्याचं स्वातंत्र्य नाकारलं नाही. मग शेफाली वैद्य काय वेगळं करताहेत?
ज्यांना पटतय ते फॉलो करतील, ज्यांना नाही पटत ते नाही करणार. कुणावर जबरदस्ती नाहीये काही करण्याची किंवा न करण्याची.
हां कुणी असा किंवा अशा प्रकारचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला तर माझा १००% विरोध असेल.
मला सखेद आश्चर्य इथल्या
मला सखेद आश्चर्य इथल्या शेफाली ताईना डिफेंड करणार्या मंडळींच वाटतय .
बिंदी , इर्शाद याला टार्गेट करण्यामागचा अजेंडा अजूनही कळत नाहीये, का कळत नाही अस दाखवायच आहे
काहीही असतं तरी शेफालीबाई आणि
काहीही असतं तरी शेफालीबाई आणि त्यांच्या समर्थकांनाच जितम् मया असं वाटणार होतं.
>>>>
मग वाटू द्यायचे होते. त्याचे का ईतके मनाला लाऊन घ्यायचे होते. यांच्या खिशातले पैसे जाणार होते का. उलट कार्यक्रम रद्द झाल्याने गेले.
जर नाव बदलल्याने कार्यक्रम सुरळीत झाला असता तर तो तसा करायचा होता. नावात काय आहे ईतके हे आपणच स्वकृतीने दाखवून द्यायचे होते. उगाच भावनिक होण्यात काय हशील होते. ज्या लोकांची टाळकी भडकावून ब्रेनवॉश केले जाते ते सुद्धा आपल्या अस्मितेबाबत भावनिकच असतात म्हणून सॉफ्ट टारगेट असतात.
मराठी कार्यक्रमाला इर्शाद नाव
मराठी कार्यक्रमाला इर्शाद नाव शोभतं का हा प्रश्न आहे का इथे. प्रश्न हा आहे की भगतगणानी प्रतयेक गोष्टीत नाक खुपसून चिथवणीखोर वागणे बरोबरे काय. त्यावर निःसंदिग्धपणे हे करणं चुके म्हणता येत नाही तर मग शब्दच कसा चुकलाय, तो सुटच होत नैये असला उगा गुळमुळीतपणा कायको!
आपल्या आवडत्या लोकांच्या घाणेरडेपणाला विरोध करता येत नाही,
अणि सपोर्ट करायला लाज वाटते.. मग उगंच कायतरी फुसके पाॅइंट मांडायचे. "मध्यममार्गी" भगत स्पाॅटेड.
नाही ! शेफाली ज्या एको
नाही ! शेफाली ज्या एको सिस्टीम चा भाग आहेत ते पहाता त्यांनी असे म्हणणे म्हणजे भावी उपद्रवाची नांदीच असते. उगीच नाही मुनव्वर चा शो रद्द झाला !
मी दुसऱ्या बाजूची तीन उदाहरणे दिली.
त्यातील storia कंपनीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला गंभीर आहे कारण इथे कायदा हातात घेतलेला दिसतो. ती घटना कशाची नांदी आहे?
मुनव्वरचा शो आणि इर्शाद मुंबई पुण्यात होणार होते. तिथे कोणाचं सरकार आहे? कडक सिक्युरिटीत शो होऊ देणं, धमकी देणाऱ्यांना ट्रेस करून अटकाव करणं सरकारच्या हातात नव्हतं का? जुने कमिशनर आणि गृहमंत्री वनवासास गेले तरी आता नवीन बॉसेस आले आहेत. घाशीराम ते नथुराम आपली शो मस्ट गो ऑन ची परंपरा वगैरे वगैरे.
शेफाली आणि त्यांच्या भिंतीवरील चणेफुटाण्यांचा विरोध (अहिंसक मार्गाने) नक्कीच करायला हवा. दोन्ही बाजूंनी सगळ्या आक्षेपार्ह गोष्टींना विरोध करायला हवा.
तसा तो होत नाही याचा फायदा दुर्दैवाने शेफालीसारख्या लोकांचे फॉलोअर्स वाढण्यात होतो. सर्वसामान्य non-intellectual लोकांना सारखा दुसऱ्याने शहाणपणा शिकवलेला आवडत नाही. त्यात शहाणपणा शिकवणाऱ्या पुरोगामी विचारवंतांचे दुहेरी निकष दिसून आले तर लोक आणखी इरिटेट होतात.
Right wing= hindu nationalists हे समीकरण मांडलं जातं. पण ते right wing= hindu nationalists+ anti purogami असं आहे का?
कार्यक्रम किंवा मुला/मुलींची
कार्यक्रम किंवा मुला/मुलींची नावे ठेवण्या अगोदर ती जवळच्या संघाच्या शाखेतून अप्रुव करून घ्यावीत. हुकमावरून.
#masterstroke
इर्शाद आधीपासुनच आहे व त्यात
इर्शाद आधीपासुनच आहे व त्यात उर्दु शायरीपण आहे हे नंतरच्या प्रतिसादातुन कळले. कार्यक्रम रद्द झाला याचे वाईट वाटले.
पण आता इथे इर्शाद मागे पडून सरसकट झोडपणे सुरु झाले आहे (वरचा सुनिती. यांचा प्रतिसाद). मग दुसर्या बाजुने पण असंच सरसकट प्रतिसाद आले की पुन्हा वेगळं वळण लागेल. तशी वेळ येऊ नये.
सुनिती, मी फक्त काव्यप्रकाराला आठवून प्रतिसाद लिहिला होता. तुमच्यासारखं मला विखारी व तिरस्कारानं लिहिता येत नाही.
मी विखारी लिहीलय?? मग त्या
मी विखारी लिहीलय?? मग त्या फेबुताई अन त्यांच्या हजारो भगतांच्या भाषेला काय म्हणाल? उगंच विचरतेय, तिथे किंवा तिला तुम्ही काहीही म्हणणार नाही माहितेय.
सुनिती यांची आधीची पोस्ट मला
सुनिती यांची आधीची पोस्ट मला सुनिधी यांचीच वाटली... नामसाधर्म्य..
असो,
धाग्याला लवकरच राजकीय दळण आय मीन वळण लागेल.
शुभरात्री
सुनिती, मी माझा निषेध जिथे
सुनिती, मी माझा निषेध जिथे करायचा तिथे करते , भावना चिथवणार्यांकडे दुर्लक्ष करते… हिंदु असो वा अन्यधर्मिय.. माफ करा तुम्ही म्हणताय म्हणून इथे ते लिहून दाखवायला बांधिल नाही.
सुनिती, मी माझा निषेध जिथे
सुनिती, मी माझा निषेध जिथे करायचा तिथे करते , भावना चिथवणार्यांकडे दुर्लक्ष करते… हिंदु असो वा अन्यधर्मिय.. माफ करा तुम्ही म्हणताय म्हणून इथे ते लिहून दाखवायला बांधिल नाही. तुम्ही माझ्या पहिल्या प्रतिसादाला उत्तर दिले होतेत म्हणून मी तुम्हाला उत्तर दिले, नाहीतर दुर्लक्षच केले होते.
मी तुमच नाव तरी घेतलं का? मी
मी तुमच नाव तरी घेतलं का? मी एका विशिष्ट प्रवृत्तीविषयी अन त्यातल्या नमुन्यांविषयी लिहल होते. त्यावर तुमची अगदी उदाहरणार्थ पोस्ट आली ती मी दाखवली. तर तुम्ही माझ नाव लिहून विखारी, तिरस्करणीय वगैरे लिहून दुर्लक्ष केले. इथुन पुढे खरोखरचे दुर्लक्ष करा.
एवढं रामायण घडूनही फेबुतै चुक, विखारी, तिरस्करणीय आहेत हे नाहीच म्हणवत ना.. पण माझ्या पोस्टवर मात्र बरं पटकिनी विखारी, तिरस्करणीय वगेरे लिहता आल तसलं काही नस्ताना.
ओके. धन्यवाद.
ओके. धन्यवाद.
साहित्यिक कार्यक्रमाचे नाव
साहित्यिक कार्यक्रमाचे नाव बदलण्याचा निर्णय साहित्यप्रेमाने प्रेरित नसून व्यावसायिक धोरणीपणातून घेतला असावा असे वाटले. अर्थात व्यावसायिक गणितात संयोजकांनी कवींना हातचेच धरले असण्याची शकयता आहे. कवींसाठी वाईट वाटले.
'मराठीतले कविताप्रकार काय वापरून संपले का म्हणून मुसलमानांच्या कविता प्रकाराचे मराठीकरण करता' असा आरोप भटांवर झाला असता तर भटांनी काय केले असते?
'धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी' असे मायेने म्हणून पुढे एखादे थोतरीत मारणारे कडवे रचत 'हे असे कितीक खेळ पाहते मराठी' म्हणत एल्गार करत ह्या धर्मांध लोकांचे तख्त फोडले असते.
गझल सम्राट सुरेश भटांच्या सन्मानार्थ एक आख्खे सभागृह नागपुरात तेही रेशीमबागेत खुद्द गडकरींनी पुढाकार घेऊन ऊभे केले हे कोणीतरी वैद्य बाईंना सांगितले पाहिजे.
बाय द वे ईर्षाद की इर्षाद ?
बाय द वे ईर्शाद की इर्शाद ?
इरशाद बदललंय. धन्यवाद..
इरशाद
बदललंय. धन्यवाद..
आजकाल भाषेपेक्षा पैशाला महत्व
आजकाल भाषेपेक्षा पैशाला महत्व आहे, म्हणूनच महाराष्ट्रातले लोक मुकाट्याने इतर भाषा बोलतात. म्हणूनच मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटात काम करायची वेळ येते. म्हणूनच मग हिंदी चित्रपट व त्यातली भाषा जास्त लोकप्रिय होते.
मान्य करा - भाषा वगैरे काही नाही - पैसा हवा.
या सर्वात मला वाईट याचे वाटते की आपली मराठी भाषा इतकी सुंदर व समृद्ध असताना मुळात ती लोकप्रिय होत नाही. त्यातले शब्द वापरण्यापेक्षा इतर भाषातले शब्द वापरण्यात येतात.
त्यापेक्षा मान्य करा, की मराठी भाषेपेक्षा इतर भाषातले शब्द जास्त लोकप्रिय आहेत. जे काय बोलायचे लिहायचे आहे ते मराठीत प्रभावीपणे बोलता लिहिता येत नाही, इतर भाषेतले शब्द वापरावे लागतात. म्हणजे मराठी भाषा दुबळी आहे.
असे वाटत असेल तर माझी हरकत नाही, पण मग उगाचच इतर भाषेतले शब्द वापरले म्हणून बोंबलू नका!! मुकाट्याने मान्य करा.
कवी- आमच्या कार्यक्रमाचं
कवी- आमच्या कार्यक्रमाचं इर्शाद हेच नाव आधीपासून आहे. त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही. दिवाळी पहाट वगैरे नाव बदललेलं चालणार नाही. कार्यक्रम रद्दच करतो.
पुरोगामी- वाह वाह शाब्बास! ताठ कणा! अभिनंदन! झुकले नाहीत!
उपद्रवी ताई आणि समर्थक गाबडी- आमच्या सणाचं दिवाळी- दीपावली हेच नाव आधीपासून आहे. त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही. जश्न ए रिवाज वगैरे नाव बदललेलं चालणार नाही. खरेदीचा प्लॅन रद्दच करतो.
पुरोगामी- विखार! भयंकराचं दार! फ्याशिजम! गुडघ्यातले मेंदू! हिंदू तालिबान!
मी फक्त माझं मत मांडतेय
मी फक्त माझं मत मांडतेय म्हणणाऱ्या साळसूद शेफाली, economic cost ची धमकी देणारा तेजस्वी सूर्या आणि रस्त्यावर झुंडीने उतरून व्यवसाय करायची परवानगी देणारे वा नाकारणारे बजरंग दल हे एकाच साखळीचे आतून जोडलेले भाग आहेत त्यांची बाह्य रूपं वेगळी असली तरी आतला रंग एकच आहे.
एक भाषा, एक संस्कृती, एका प्रकारचं खानपान इ.इ. उद्दिष्ट आहे. Everybody has to fall in line with these norms. Those who don't will have to be taught a lesson and made an example out of them.
आपल्या वैभव जोशी संदीप खरेंना त्रास झाला म्हणून काळजी वाटणाऱ्या, फॅब इंडिया ठीक होतं, यांना कशाला झोडलं असं म्हणणाऱ्या आणि तशाच किंवा त्यापेक्षा गंभीर प्रकारांकडे आपला काय संबंध म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या आणि दस्तुरखुद्द त्या दोघांनाही Martin Niemöller ची कविता लक्षात ठेवायची गरज आहे.
प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद आवडला.
हो. सगळ्यांना संपवल्यावर पुढचा घाला माझ्यावरच असणार आहे हे ओळखायला हवे.
खरं आहे, भरत.
खरं आहे, भरत.
Pages