Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यांनी आपल्या मताला चिकटत नाव
यांनी आपल्या मताला चिकटत नाव बदललं नाही.
त्यांच्या मताला मान देत कार्यक्रम रद्द केला.
झाला की मध्यममार्ग.
रद्द झालेल्या कार्यक्रमाच्या जागी शेफाली वैद्य यांचा प्रबोधनपर ( हिंदू ओ को जगाने के लिये) कार्यक्रम ठेवायचा. म्हणजे कोणाचं आर्थिक नुकसान व्हायचं नाही.
पण त्याहीपेक्षा नाकावर
पण त्याहीपेक्षा नाकावर टिच्चून ‘ईर्शाद’ हेच नाव ठेवून कार्यक्रम केला असता तर आणखीन बरं वाटलं असतं.>>+१ त्यासाठी प्रायोजक खमके असायला हवेत आणि रसिकही.
अगं, ती पोस्ट मिडल पाथची
अगं सामो, ती पोस्ट मिडल पाथची खिल्ली उडवायला उगाच आहे/असावी. त्यात खरंच आधी इर्शाद असे अभिप्रेत नसावे. असो, आता दोन्ही बाजूंना त्यांच्या मनासारखं मिळालेलं आहे तेव्हा वादावर पडदा पडायला हरकत नाही.
>कलाकार व शेफालीबाई त्यांच्या
>कलाकार व शेफालीबाई त्यांच्या त्यांच्या तत्त्वाशी प्रामाणिक राहिले बद्दल त्यांनाही शुभ दिपावली.
पुन्हा तेच ! ग्लोरिफाय का करताय ? मागच्या उदाहरणात दुकानदाराने नाईलाजाने ५००० वर तडजोड केली असती तर दुकानदार व गुंड दोघेही
त्यांच्या त्यांच्या तत्त्वाशी प्रामाणिक राहिले असे म्हणाल ?
सी मीही खवचटपणे लिहीलय ग
सी मीही खवचटपणे लिहीलय ग
आता डोळामारु बाहुली टाकली.
विकु, अमितव, भा, स्वातीताई
विकु, अमितव, भा, स्वातीताई उत्तम पोस्ट्स.
सी, शेफाली वैद्य सारखे लोक मिडल पाथ शोधू वाले नसतात गं! त्यांचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहेच ना. Have you ever seen these guys apologize for their posts? विद्वेषाच्या आगी लावणे हेच त्यांचे काम.
भारताच्या अनेक राज्यांची
भारताच्या अनेक राज्यांची कार्यालयीन कामासाठी मुख्य भाषा असते आणि काही वेळा अजून एक जास्तीची भाषा असते. बिहार, तेलंगणा, उत्तरप्रदेश, बंगाल, दिल्ली केंद्रशासीत प्रदेश येथे माझ्या माहितीनुसार ही जास्तीची भाषा उर्दू आहे. थोडक्यात ही भारतात शासकिय पातळीवर मान्यता असलेली भाषा आहे. असे असताना उर्दू वरुन एवढा तमाशा कशासाठी?
स्वाती उत्तम मुद्दा.
स्वाती उत्तम मुद्दा.
सूर्या हा कर्नाटक राज्यातील
सूर्या हा कर्नाटक राज्यातील असला तरी पॅन इंडिया पॉप्युलर आहे. तो काय किंवा शेफाली आणि एक नग आहे पल्लवी जोशी चा नवरा मला नाव नाही आठवत ट्विटरवर सतत भडक लिहित असतात. त्याचा मोबदला मिळत असणार. उगाच नाही कोणी खोड्या काढत.
>>> ही ध्रुविकरणामुळे मोजायला
>>> ही ध्रुविकरणामुळे मोजायला लागलेली किंमत आहे. त्याचे बील सातत्याने ध्रुविकरणासाठी झटणार्यांवर नाही फाडायचे तर मग कुणावर?
अनुमोदन!
मतंमतांतरं असायचीच. पाठीराखे शेफालीबाईंनाही आहेत आणि ईर्शादलाही - तीच कथा विरोधकांची. 'कसले हो कवी! बदललेनीतच ना नाव शेवटी! शेपूटघालू कुठचे!' अशाही पोस्ट्स होत्या फेसबुकवर काल त्या चुकीच्या जाहिरातीनंतर.
कादंबरीतलं तुकारामांचं चित्रण आवडलं नाही म्हणून जिवे मारायच्या धमक्या आल्या होत्या यादवांना. आणि दिवाळी पहाटेला राडा करू, शंभर तृतीयपंथियांचा मोर्चा नेऊ कार्यक्रमावर (हे तर महान आहे!) अशा ईर्शादला.
तुम्हाला आल्या धमक्या तर तुम्ही काय कराल?
शंभर तृतीयपंथियांचा मोर्चा
शंभर तृतीयपंथियांचा मोर्चा नेऊ कार्यक्रमावर (हे तर महान आहे!).. लोल
हे लोक स्वत एलजीबीटी साठी लढत असताना त्यांनाच केवढा डिसक्रिमिनेशला सामोरं जावे लागलय .
खबरदार दिवाळीत कुणी जिलबी खाल
खबरदार दिवाळीत कुणी जिलबी खाल तर.
अरेरे! खबरदारचं काय करू? वार्तावान ?
अरेरे. शंभर तृतीयपंथीयांना
अरेरे. शंभर तृतीयपंथीयांना मोर्चासाठी पैसे मिळाले असते.त्यांचं आर्थिक नुकसान होणार.
नाव बदलून प्रयोग करण्याऐवजी
नाव बदलून प्रयोग करण्याऐवजी नाव तेच ठेवून प्रयोग रद्द केला हा निर्णय आवडला!
नाव तेच ठेवून प्रयोग झाला असता तर जास्त आवडलं असतं.
(No subject)
तेजस्वी सूर्या आणि शेफाली
तेजस्वी सूर्या आणि शेफाली वैद्यना नवं मिशन मिळण्याची चिन्हं आहेत.
त्यांच्या रोजगाराची चिंता मिटली.
https://twitter.com/DineshKarthik/status/1453719323613143059
नाव बदलून प्रयोग करण्याऐवजी
नाव बदलून प्रयोग करण्याऐवजी नाव तेच ठेवून प्रयोग रद्द केला हा निर्णय आवडला!
नाव तेच ठेवून प्रयोग झाला असता तर जास्त आवडलं असतं>>> + 10000
कबीर आणि झिआन ... दिनेश
कबीर आणि झिआन
... दिनेश कार्तिकला पण हा कार्यक्रम रद्द करावा लागतोय आता
तेजस्वी सूर्या आणि शेफाली
तेजस्वी सूर्या आणि शेफाली वैद्यना नवं मिशन मिळण्याची चिन्हं आहेत.

त्यांच्या रोजगाराची चिंता मिटली.
जोशीखरेंचा स्टॅन्ड आवडला. असं
जोशीखरेंचा स्टॅन्ड आवडला. असं केल्याशिवाय लोकांनाही या बाई अन तिच्या देवाच्या भगतगणाचं उपद्रवमुल्य कळत नाही. निरनिराळ्या प्रकारे अडवणुक, विखार, द्वेष हेच अन एवढंच येतं. सोमिवर लाख फाॅलोवर असताना पोस्ट टाकायची आणि मग म्हणायचं की माझं पर्सनल मत आहे. मग पर्सनल आहे तर इतरांनाही तसं करायला चिथवायचं कशाला? ज्यांच्या डोक्यातही नवतं त्यांना तालिबानी चेकलिस्टीत अजून एक चेकपाॅइंट घालून दिलाय राडे करायला.
आता प्रत्येक उत्पादन, कार्यक्रम, कलाकार यांना ही एक फुकटची ब्याद! बरं इतक्यवर थांबेल म्हणता का? अशक्य! पुढच्याच आठवड्यात नवीन कायतरी खुसपट काढते की नाय बघा. कारण आता पाॅवर वाढत चाल्लीय. तिच्याच वाॅलवर लोक लिहीताहेत की आम्ही टोपीवाल्याकडून फळ घेणार नाही, बिनाटिकली बाईकडून भाजी घेणार नाही वगैरे. या चिथावणीखोर लोकांना काय शिक्षा? रामराज्यात बळी सीतेचा, आपलं निरागसत्व सिद्ध करण्यात. बोट उचलणारे लोक मजेत नामानिराळे.
आणि काही सतत मध्यममार्ग शोधणारे "दोन्ही बाजु बरोबर" वाले लोक फक्त दिशाभुल करत रहातात. स्वतःला अन दुसर्यांनाही फसवणे. सतत मध्यमच्या नावाखाली कणाहीन वागणं चुक आहे. राडे घालणार्यांच्याही मनासारखे होऊ द्या म्हणताना काळ सोकावतोय हे नजरेआड का करायचं? हे असले राडे का आणि किती काळ सहन करायचे? पुर्वी वर्षातनं एखाद्यावेळी व्हायचे, आता दरदिवशी नवीन राडे.. झुंडशाही नुसती! अन त्याला अले अले, शोनी माजी रागवली का, जौदे, तुझ्याच मनासारखं करू हां आपण म्हणणारे मध्यममार्गी! कट्टर परवडले, इतके हे मध्यममार्गी नतद्रष्ट आहेत देशाची वाट लावण्यात. सोबर इमेज जपायची अन कट्टरपंथीयांना पाठीशी घालायचे हेच सुरूय साताठ वर्षं झाली.
कार्यक्रम रद्द करण्याचे कारण
कार्यक्रम रद्द करण्याचे कारण काय?
वैद्यबाईंच्या पोस्टवर धमक्यांची भाषा दिसली नाही. मी या कार्यक्रमाला जाणार नाही इतकंच त्यांचं म्हणणं होतं. त्यातही जेव्हा त्यांना कळलं की हा जुना कार्यक्रम आहे, दिवाळी पहाटसाठी मुद्दाम इर्शाद नाव ठेवलेलं नाही तेव्हा त्यांनी आपला चुकीचा समज झाल्याची भाषा वापरलेली दिसली. उलट त्यांनाच काही पुरोगामी बायकांनी **रीत मारेन, कानफटात फटकावेन अशा भाषेत धमक्या दिल्या आहेत ज्याचे स्क्रीनशॉट्स त्यांनी टाकले आहेत.
100 तृतीयपंथीयांचा मोर्चा हे तर फारच विनोदी आहे. कोणी आणि कुठे लिहिलंय?
इर्शाद कार्यक्रमाला आणि फारुकीच्याही कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणं , धमकी देणाऱ्यांना शोधून काढून कारवाई करणं हे राज्य सरकारने करणं खरं तर अपेक्षित आहे. विशेषतः 100 तृतीयपंथी वाला जो कोणी आहे त्याला पब्लिकसमोर आणा!
मी एक स्टँड घेत आहे, तुम्हाला पटल्यास तुम्हीही तसं करा- हे सांगण्याचा हक्क लोकशाहीत आहे की नाही? (इथे तो स्टँड हिंसाचार किंवा जातीयवाद, धर्मवादाचा नसावाच.) नवरात्रीच्या काळात अनेक पुरोगामी मंडळी स्वतः रंग फॉलो करत नव्हती आणि इतरांनाही त्याबद्दल सांगत होती की तुम्हीही फॉलो करू नका. त्यांना दुसऱ्याला influence करण्याचा तो हक्क आहे तर मग शेफालीलाही तो हक्क द्या.
काही डोकेफिरु बायकांनी 'मी मुस्लिम व्यक्तीकडून खरेदी केली नाही' असं लिहिलं आहे ते खरं तर जास्त धोकादायक आहे. यावर काहीतरी कायदा असायला हवा. पण मग तो मुस्लिमच नाही तर सर्वच जातीधर्माच्या लोकांना असं लक्ष्य करण्याला अयोग्य ठरवणारा असावा. आणि ते पुरोगामी गोटाला जमेल का कारण त्यांचेही वेगळे पंचिंग बॅग आहेतच.
त्यांच्या रोजगाराची चिंता
त्यांच्या रोजगाराची चिंता मिटली. >>
सर, उपरोधाने लिहीत आहात पण ज्यांचं नुकसान होतं त्यांनाच माहिती. कुठल्याही बाजूचे असलो तरी a little empathy may be good. थेटर जळालं असतं तर इ रिस्क्स सहसा अनमॅनेज्ड नसतात. विमा असतो. पण ज्यांना हातावरचे पोट आहे, कोव्हीड काळात रोजगार नव्हता त्यांना जे काय पाच-पन्नास रूपये मिळाले असते त्याचे किती अप्रूप इथे ध्रुवीकरण नि कलाकराचे स्वातंत्र्य इ बोलणार्यांना कदाचित कळणारही नाही. नाव तेच ठेऊन किंवा नावात इर्शाद बरोबर अजून काही टॅगलाईन घेऊन कार्यक्रम झाला असता तर जास्त आवडले असते. असो...
>>बिंदी-इर्शाद- जश्न रिवाज हे
>>बिंदी-इर्शाद- जश्न रिवाज हे मुद्दे महत्वाचे नाहीत. त्याच्या बेसिसवर लोकांनी खरेदीचा निर्णय घेऊ नये.
पण शेफाली याना एक private citizen म्हणून स्वतःपुरतं असं म्हणण्याचा अधिकार नक्कीच आहे की मला ही जाहिरात आवडली नाही म्हणून मी तो प्रॉडक्ट विकत घेणार नाही.
She isn't forcing others. She isn't inciting violence or law and order disruptions. She isn't targeting any religion or caste as a whole.
Can't she speak for herself?
अशा प्रकारच्या गोष्टी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी अशा दोन्ही गोटातून होत असतात. त्यामुळे हा जणू काही exclusively हिंदुत्ववाद्यांचा प्रॉब्लेम आहे असा आव आणण्याचा प्रकार विनोदी आहे. दुसऱ्या बाजूने बघितले असता-
2021 च्या जानेवारीपासून शेफाली वैद्य एका मराठी वृत्तपत्रात सदर लिहू लागल्या. तेव्हा हे सदर बंद करा, अन्यथा आम्ही बहिष्कार घालू असा विरोध पुरोगामी गोटातून झाला. ते लेख राजकीय विषयांवर नाहीत. तरीही वैद्यबाईना प्लॅटफॉर्म आणि लेखिका म्हणून legitimacy देण्यास पुरोगामी लोकांचा विरोध होता.( ही मोहीम फेल झाली, सदर अजूनही चालू आहे.)
पुण्यात एका ठिकाणी साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान अशी पाटी बघून काही काँग्रेस समर्थकांनी त्याचा मुद्दा बनवला. साध्वी शब्दाला विरोध केला. हे भाजपचं कारस्थान आहे वगैरे खोटा कांगावा केला गेला. नंतर सत्य समोर आलं की ती पाटी काँग्रेसच्याच कार्यकाळात लावलेली आहे आणि भाजपचा काही संबंध नाही. आपणच लावलेल्या पाटीबद्दल outrage करण्याचा विनोदी प्रकार बघून जनतेची दोनचार तास करमणूक झाली. नंतर बहुधा पाटी बदलली गेली. साध्वी, साधू हे शब्द खटकण्याचा आणि डिलीट करण्याचा अधिकार मान्यच आहे. इतरांना इतर शब्द(उदा- इर्शाद) खटकले तर त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार मिळेल का?
Storia नावाच्या एका beverage ब्रँडच्या विनोदी जाहिरातीत राहुल आणि सोनिया यांच्याशी साधर्म्य असलेली पात्रे असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंपनीच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला केला. आम्ही जाहिरात मागे घेऊ , हल्लेखोरांवर चार्जेस प्रेस करणार नाही आणि लेखी माफीनामा देतो असं कंपनीने मान्य केल्यावर प्रकरण मिटलं.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/congress-workers-ransac...
मुळात शेफाली आणि तत्सम लोकांना फॉलो करणाऱ्या सगळ्यांना ते सगळं लिहिलेलं अगदी मान्यच असतं असं नाही. पण storia वरचा हल्ला खटकत नाही आणि शेफालीबाईनी मी अमुक ब्रँडचे कपडे घेणार नाही म्हटलं की जगबुडी झाल्यागत outrage करायचं या पुरोगामी दुटप्पीपणाला लोक वैतागलेले असतात.
दोन्हीकडच्या लोकांनी एकत्रपणे दोन्हीकडच्या कट्टरतेला विरोध करायला हवा. पण आमच्याकडे आहे बुवा कट्टरता असं उजवीकडची गाबडी निदान मान्य तरी करतात.
Submitted by WHITEHAT on 28 October, 2021 - 02:15<<
वरचा प्रतिसाद जाणुन्बुजुन कॉपि-पेस्ट केला आहे. १००+ प्रतिसादांत मला तरी तो सेंसिबल वाटला;
कदाचित त्यामुळेच दुर्लक्षित झाला असेल का?. अरे, शेफालीताईचा जॉबंच आहे - रफल फ्यु फेदर्स. आपण त्या ट्रॅपमधे पडायचं कि नाहि हा ज्याचा-त्याचा प्रश्न. शिवाय यात काळ सोकावतो असं म्हणणारेच "त्या" टोकाला जाताना दिसतात; अँड देन ऑल हेल ब्रेक्स लुज...शेफालीताईंवर उद्या फतवा जाहिर झाला तर आश्चर्यचकित होउ नका...
अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे
अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे कधीच विनाअट किंवा अमर्याद नसतं. एक लाख लोकांसमोर तुम्ही बोलता आहात तर घरात बोलता तसं बोलाल का? बरं आपल्या बोलण्यातून चिथावणीखोर संदेश जात आहेत, हे न कळण्याइतक्या ह्या बाई भाबड्या नाहीत. उलट चिथावणी हाच त्यांचा उद्देश असतो हे सरळ सरळ दिसतं. लोकांना भडकावून आपले द्वेष पेरण्याचे हेतू साधायचे, त्यातून ध्रुवीकरण करवून एकगठ्ठा मते मिळवायची हाच कार्यक्रम गेली सात वर्षं सुरू आहे.
ही बया सुखाने झोपेल आज आणि
ही बया सुखाने झोपेल आज आणि परत उद्या काहीतरी नवीन गरळ ओकेल. @भरत ..लोल. सूर्या तर त्या आपल्या ह्यांचा अगदी उत्तराधिकारी शोभतो उद्या ह्यांच्या नन्तर तोच डोक्यावर बसायला नको म्हणजे मिळवली. फेबुवर कमेंट टाकायची अक्कल आहे पण सद -असद विवेक कधी येणार नाही आपल्याकडे 'शिकून' सुद्धा.
सूर्या तर त्या आपल्या ह्यांचा
सूर्या तर त्या आपल्या ह्यांचा अगदी उत्तराधिकारी शोभतो उद्या ह्यांच्या नन्तर तोच डोक्यावर बसायला नको म्हणजे मिळवली.
आपले तेहे, मग ते योगी आणी मग सूर्या, आप क्रोनोलोजी समझिये !
विकु, हेच लिहिणार होतो.
विकु, हेच लिहिणार होतो.
शेफाली ताईंचा हा जॉबच आहे
शेफाली ताईंचा हा जॉबच आहे म्हटल्यावर तो मानधनासहित आहे का, हा पुढचा प्रश्न येतोच. जर कुणी अशी थोडीशी ' पिसं ' काढण्यासाठी पैसे देत असेल आणि अशी कामं करवून घेत असेल तर ही एक सुनियोजित व्यवस्था निर्माण केली गेली आहे हे येतंच. आणि पिसं थोडीशी विसकटवणं इतकं साधं नाहीय हे. द्वेषाचा आणि हिंसेचा आगडोंब उसळवणं आणि त्या आगीत आपली पोळी भाजून घेणं हाच मूळ हेतू राहात आला आहे ह्या प्रकारांचा.
राज +1
राज +1
पुरोगामी दुटप्पीपणा असतो बर्याचदा अगदी बरोबर.
तिकडे कुठे पाळतात तसल्या
तिकडे कुठे पाळतात तसल्या गोष्टी सध्या?? जाऊदे त्या गोष्टी ईथे नकोत. तो कार्यक्रम मात्र त्याच नावे व्हायला हवा होता असे अजून वाटते. ही बया अशा कृतीचा वेगळाच अर्थ काढेल आणि आणखी सोकावेल.
Pages