इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण केवळ कायद्याच्या रक्षकांना (पोलिसांना) मदत केली म्हणून काही दिवसांपूर्वी मला 'शांतीदूतांकडून' दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या धमक्या मिळाल्यापासून
जेम्स बॉण्डच जणू

जेम्स बॉण्डच जणू
Submitted by झम्पू दामलू on 24 October, 2022 - 14:27

एवढा काही मी मोठा नाही ओ, फुटपाथवर दुचाकी पार्क केलेली दिसली की त्याचा फोटो काढून MumTrafficApp मध्ये अपलोड करायचो. त्यामुळे संबंधित दुचाकी वाल्याला 'Parking on Footpath' चे चलान लागायचे. एका ठिकाणी त्यांचे दुकान आणि त्यांच्या दुचाकी होत्या. त्यांनी मला बघितले आणि....
Twitter.png

बोरिवली मधील 'आपले' दुकानदार देखील अंगावर येतात, ते तर कपाळाला टिकली लावून असतात आणि स्वतःला शांतताप्रिय धर्मातील म्हणून इतरांना मांस खाण्यास बंदी करावी अशा मताचे आहेत.

मला वाटते वस्तूच्या गुणवत्तेविषयी ग्राहक कायद्यानुसार तक्रार करता येते. मास कँपेन करून व्हॉट्सॲप वर मेसेज पाठवून धार्मिक कारणांसाठी बहिष्कार घालणे हे घटनेच्या कलम ५१ ए नुसार योग्य नाही. अर्थात ५१ ए हे फक्त मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये सांगणारे कलम आहे. त्याच्या आधारावर फिर्याद करता येते की नाही हे ठाउक नाही. बहुधा.

https://www.thenewsminute.com/article/what-exactly-halal-certification-m...
इथे म्हटल्याप्रमाणे इस्लामी देश किंवा इस्लाम बहुल देश आपण आयात करत असलेली उत्पादने हलाल प्रमाणित असल्याचा आग्रह धरतात. ज्यांना या देशांना निर्यात करायची नाही, त्यांना हलाल प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही.
मुस्लिम कर्मचारी असलाच पाहिजे हा नियमही कठोरपण पाळणं शक्य नसतं, असंही मुस्लिम जाणकारांच्या हवाल्याने लिहिलं आहे.

"In January 2021, India under BJP dropped halal specifications from its export of red meat. Earlier, all animals that were slaughtered to be exported as meat had to comply with ‘the halal method to meet the requirements of Islamic countries.’ This requirement was changed with exporters now allowed to slaughter animals ‘to the requirement of the importing country/importer.”"
>> हे भयंकर आहे. म्हणजे २०२१ च्या आधी भारत सरकारनेच मांस निर्यात करण्याची परवानगी मिळण्यासाठी सरसकट हलाल सर्टिफिकेशन बंधनकारक केलं होतं ! म्हणजे कुठल्याही, अगदी ज्या देशाला हलालची गरज नाही तिथे निर्यात करायला सुद्धा हलाल सर्टिफिकेशन पाहिजेच! हा कुठला सेक्युलॅरिझम? सरकारने निर्यातीसाठी लागणाऱ्या दर्जा, स्वच्छता, चलन विनिमय, पर्यावरण, दळणवळण इत्यादी गोष्टी रेग्युलेट कराव्या. त्याउप्पर आयातदार देशांच्या अटी असतील तर ते निर्यातदार कंपनी आणि आयातदार देश ह्यांनी बघून घ्यावं. भाजप सरकारने केलेला बदल बरोबर आहे. ह्याआधीच्या नियमाविरुद्ध सेक्युलर मीडियाने आवाज उठवला नाही ह्याचं आश्चर्य वाटतं. उलट हा नियम बदलल्याबद्दल त्या लेखात तक्रारीचा सूरच दिसतोय.

मुस्लिम कर्मचारी असलाच पाहिजे हा नियमही कठोरपण पाळणं शक्य नसतं, असंही मुस्लिम जाणकारांच्या हवाल्याने लिहिलं आहे.
>> धन्य धन्य! म्हणजे धार्मिक आधारावर डिस्क्रिमिनेशन करणं हा आमचा नियम आहे. शक्य होईल तेवढं आम्ही डिस्क्रिमिनेशन करतोच. पण अगदी नाईलाज झाला तर आम्हाला नाही करता येत. लोक कसे वाईट्ट आहेत बघा, अशा प्रकारे केलेली प्रॉडक्ट्स आम्हाला नको म्हणतायत.

बोरिवली मधील 'आपले' दुकानदार देखील अंगावर येतात, ते तर कपाळाला टिकली लावून असतात आणि स्वतःला शांतताप्रिय धर्मातील म्हणून इतरांना मांस खाण्यास बंदी करावी अशा मताचे आहेत.
>> भ्रमर साहेब, तो एक प्रकार डोक्यात जातो. मागे कुणीतरी दक्षिण मुंबई व्हेजिटेरिअन झोन म्हणून जाहीर करा अशी मागणी केली होती. अशांना उठता बोंबील, बसता कोलंबी दिली पाहिजे. ह. घ्या.

999

१००० !!!
बोरिवली मधील 'आपले' दुकानदार देखील अंगावर येतात, ते तर कपाळाला टिकली लावून असतात आणि स्वतःला शांतताप्रिय धर्मातील म्हणून इतरांना मांस खाण्यास बंदी करावी अशा मताचे आहेत...
तुम्ही जैन समाजाबद्दल म्हणताय का? तर थोडी गल्लत होते आहे. 'शांतताप्रिय', 'शांतीदूत' या उपाध्या 'तलवारीच्या जोरावर' (समोरच्याला कायमचे शांत करून) शांतता प्रस्थापित करणाऱ्यांसाठी आहेत.

बाकी जैन लोक स्वतः शाकाहारी असल्याने इतरांना मांस खाण्यास बंदी किंवा अमुक एक झोन व्हेजिटेरियन म्हणून घोषित करा, या त्यांच्या मागण्या जशा अतार्किक आहेत अगदी तसेच आम्हाला 'हलाल' पदार्थ हवे म्हणून कंपन्यांनी हलाल प्रमाणपत्र घ्यावे, हा आग्रह अतार्किक आहे!
(मजेची गोष्ट अशी की त्यांच्या धर्मग्रंथात 'हलाल' ही संकल्पना केवळ आणि केवळ मांसासाठी दिलेली आहे, पण आता त्यांनी 'हलाल प्रमाणपत्र' मांसासोबतच इतर खाद्यपदार्थ, मिठाई, औषधे, कपडे, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपकरणे (oven इ.), residential complex, tourism आदी सर्वच क्षेत्रात सुरु केले आहे!)
[Covid ची लस आली तेव्हा या इस्लामी राष्ट्रांनी अमेरिकन कंपन्यांकडे 'Halal certified vaccine' ची मागणी केली होती, असे वाचनात आले होते. लिंक मिळाली की तो पूर्ण किस्सा टाकेन!!!]

पण केवळ कायद्याच्या रक्षकांना (पोलिसांना) मदत केली म्हणून काही दिवसांपूर्वी मला 'शांतीदूतांकडून'
वरील वाक्यावरून असे वाटले होते की एखादी अंमली पदार्थांची विक्री करणारी गॅंग किंवा बँकेवर दरोडा टाकणारी टोळी पकडून दिली की काय. पण फूटपाथवर लावलेल्या दुचाकींचा फोटो काढला म्हणून तुम्हाला मार खावा लागला ह्याबद्दल सहानभूती आहे. पुण्यात काही विशिष्ट भागात तुम्ही हा उपक्रम राबवला असता तर "ए बावळटा" अशा शिवीवरच निभावले असते.

आमची उत्पादने विशिष्ट लोकांनीच बनवलेली असली पाहिजेत, असा आग्रह धरणे चूक. त्याची कारणे कोणतीही असोत.

यापुढे 'पण' जोडून आणखी तीनचार मुद्दे, उदाहरणे जोडता येतील. पण मी ते करणार नाही.

हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या आणि त्यावर बक्कळ पैसा कामावणाऱ्या कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत
Submitted by भ्रमर on 25 October, 2022 - 11:16

Halal Certificate

विक्षिप्त भाऊ, तुम्ही नियमबाह्य प्रकारे पार्क केलेल्या गाड्यांची सनदशीर, शांततापूर्ण मार्गाने, स्वतः कायदा हातात न घेता, संबंधित यंत्रणेकडे तक्रार करता ह्याबद्दल तुमचे अभिनंदन. जिथे बरेच लोक नियम मोडणे म्हणजे शौर्य आणि नियम पाळणे म्हणजे बावळटपणा असे समजतात, तिथे दुर्दैवाने तुमच्यासारख्या सजग नागरिकांना त्रास सहन करावा लागला ह्याचे खरेतर आश्चर्य वाटले नाही, पण दुःख नक्कीच वाटले.

मायबोलीवरच्या विशिष्ट toxic आयडीजमुळे इथे न लिहिण्याचा नियम केला परंतु काही गोष्टी नमूद करणे गरजेचे.

ठाण्याच्या विवियेना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या वेळी राष्ट्रवादीच्या मंत्री व कार्यकर्त्यांनी हल्ला करून चित्रपट बंद पाडला. एका प्रेक्षकालाही मारहाण केली! संभाजी ब्रिगेडने पुण्यातील शोज बंद पाडले.
'मला अमुक चित्रपट/प्रॉडक्ट आवडत नाही म्हणून मी माझे पैसे खर्च करणार नाही' या राईट विंगच्या भूमिकेवरून छाती पिटणारे पुरोगामी वरील घटनांबद्दल अगदीच गप्प आहेत. एकजण तर या धाग्यावर 'पण वैद्यबाईंच्या भूमिकेमुळे हिंसाचार झाला तर? तर?तर?' असं स्पेक्युलेशन करत भयंकराच्या दाराच्या उंबऱ्यात बसुन होते. आता ज्या पक्षाचा प्रचार करतात त्यांनी हिंसाचार करूनच दाखवला तर गप्प. पुरोगाम्यांच्या अशा दुतोंडीपणामुळेच भाजपला पाशवी, राक्षसी बहुमत मिळते! Proud
हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम
वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता

विशेष टीप- आता हे वाचून टोकन निषेधाची वाक्य लिहून पुरोगाम्यांनी बोअर करू नये. त्यापेक्षा उखाणा घ्यावा-

थिएटरवरती हल्ला करणारी लाडकी लेकरं माझी
भयंकराच्या जिन्यात बसून म्हणतो शेफालीला नाझी

Theater मध्ये हिंसाचार??? छे!! काहीतरीच काय???
जितेंद्र आव्हाड 'साहेब' तर प्रेक्षकांची विचारपूस करायला गेले होते की, व्यवस्थित सुरू आहे ना movie? AC वगैरे नीट चालू आहे ना? इ.
ती शेफाली वैद्य का कोण ती 'जाहिरात आवडली नाही म्हणून प्रॉडक्ट घेणार नाही' म्हणते म्हणजे काय??? किती हा घोर अपराध!!!

आज खरं तर काही लोकांच्या प्रतिक्रिया येणार नाहीत, त्यांच्याकडे सुतक असेल.
अफझुल्ल्या नावाच्या राक्षसाच्या थडग्याजवळचे अनधिकृत बांधकाम आज तोडले ना!! तेही शिवप्रताप दिनाच्या मुहूर्तावर!!! जय शिवराय!!!!!!
#JCB_सबका_इलाज

हे काल फेबुवर वाचले आणि लोकसत्ता मधे शोधत होतो काल पण सापडले नाही. काय कारण आहे नक्की यावेळेस विरोधाचे?

काय कारण आहे नक्की यावेळेस विरोधाचे? >>> "बाजीप्रभू शिवाजी महाराजांवर चाल करून गेले / त्यांच्याशी युद्धा करायला गेले हे कुठल्या इतिहासात दिलं आहे? असा इतिहास ब. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे म्हणून ते खरं आहे असं म्हणता येणार नाही. "
अशा अर्थाचं लोकमत (बहुदा) मधे वाचलं होतं.

आत्ता लोकसत्तामधे एक सापडली लिन्क.

जेथे शकावलीप्रमाणेच दाखवा म्हणे. आता इतिहासाच्या प्रत्येक पिक्चरकरता सेन्सॉरनेच एक "प्रमाण पुस्तक" जाहीर करावे आणि पिक्चर त्याबरहुकूम आहे की नाही हे त्यांनीच बघावे Happy

आता इतिहासाच्या प्रत्येक पिक्चरकरता सेन्सॉरनेच एक "प्रमाण पुस्तक" जाहीर करावे आणि पिक्चर त्याबरहुकूम आहे की नाही हे त्यांनीच बघावे >> खरंच अशीच सजेशने अनेकांकडून सिन्सीयरली येत आहेत रे बाबा.

चित्रपटात सुबोध भावेला महाराजांचा रोल देणं हा in itself एक गुन्हाच आहे! इतरही ठिकाणी मेकर्सनी अशीच माती खाल्लीही असेल.
पण त्याचा विरोध वैयक्तिक बहिष्कार आणि/किंवा कोर्टकेस अशा सनदशीर मार्गाने करावा की हल्ला, मारहाण अशा? पुरोगाम्यांची कमाल आहे. त्यांचे नेतेकार्यकर्ते असे प्रकार करतात, तरीही पुरोगामी त्यांच्यासाठी इथे प्रचार करतात आणि वर वैद्यबाईंवर टीकाही करतात. दुतोंडी गांडुळही भयंकराच्या भुयारात लपून बसेल हो तुमच्यापुढे.

चित्रपटात सुबोध भावेला महाराजांचा रोल देणं हा in itself एक गुन्हाच आहे>>> कुतूहल म्हणून विचारते - का? म्हणजे त्याची तेव्हढी अभिनय क्षमता नाही, तो महाराज म्हणून अजिबात शोभत नाही की अजून काही कारण आहे?

आव्व्हाड मला कोणत्याही अंगाने पुरोगामी वाटत नाहीत. एखाद्याला पोलिसाकरवी उचलून बंगल्यावर आणणे व मारहाण करणे व प्रकरण अंगाशी शेकू लागताच 'मी गाढ झोपेत होतो' अशी सबब सांगणे ! अशा रितीने सिनेमा गृहात जाऊन शो बंद पाडणे निषेधार्ह आहे. त्या 'कार्यकर्त्यांना' एके ठिकाणी बसवून इतिहासाची अगदी सोपी परिक्षा घेतली असती तरीही ते नापस झाले असते.

कुतूहल म्हणून विचारते - का? म्हणजे त्याची तेव्हढी अभिनय क्षमता नाही, तो महाराज म्हणून अजिबात शोभत नाही की अजून काही कारण आहे?//

जस्ट वैयक्तिक मत. भावेकडे या रोलसाठी लागणारी टॉप लेव्हल अभिनयक्षमता नाही, पर्सनलिटी नाही. फिटनेस नाही. शरद केळकरने या रोलचा एक high bar आजच्या काळात सेट केला आहे.

विव्हियाना मधला प्रेमळ विचारपुशीचा कार्यक्रम झाल्यानंतर माजी मंत्रीमहोदय आणि राष्ट्रवादीची तमाम सिनियर म्यानेजमेंट राहुलजी गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. Proud
तुमची स्टोरीआ तर आमची विव्हियाना. जगाला प्रेम अर्पावे.

विव्हियाना मधला प्रेमळ विचारपुशीचा कार्यक्रम झाल्यानंतर माजी मंत्रीमहोदय आणि राष्ट्रवादीची तमाम सिनियर म्यानेजमेंट राहुलजी गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. ## yही पोटदुखी आहे का??

आव्हाडने जे केलं त्याचा निषेध, फडणं20 सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी.

चित्रपटात सुबोध भावेला महाराजांचा रोल देणं हा in itself एक गुन्हाच आहे! इतरही ठिकाणी मेकर्सनी अशीच माती खाल्लीही असेल.>>>> येस्स ! सुभा अज्याबात आवडला नाय महाराज म्हणून. शोभतच नाही तो. महाराजांचे काम करावे ते चंद्रकांत सुर्यकांत मांढरे बंधुंनी किंवा मग आताच्या शंतनु मोघेने.

Pages