Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाजीप्रभू शिवाजी महाराजांवर
बाजीप्रभू शिवाजी महाराजांवर चाल करून गेले / त्यांच्याशी युद्धा करायला गेले हे कुठल्या इतिहासात दिलं आहे? असा इतिहास ब. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे म्हणून ते खरं आहे असं म्हणता येणार नाही. ">>>>
असेंकुठंही बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही
असेंकुठंही बाबासाहेबांनी
असेंकुठंही बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही >>> आशुचँप ते त्यांनी लिहीलेले असायची गरज नाही (मलाही आठवत नाही वाचल्याचे). पुरंदर्यांबद्दल फेकाफेकी गेली १५-२० वर्षे चालू आहे. यातल्या बहुतेकांनी पुरंदरेच काय पण कोणतेही पुस्तक वाचलेले नाही. ज्यांनी वाचले त्यांनी काय खाउन ते वाचले असा प्रश्न पडेल ते गोत्राबद्दलचे प्रश्न बघून.
असेंकुठंही बाबासाहेबांनी
असेंकुठंही बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही >>> आशुचँप ते त्यांनी लिहीलेले असायची गरज नाही>>>> +१
आव्हाड बाबासाहेब पुरंदर्यांबद्दल सतत निगेटिव्ह बोलत असतात. कारण त्यांनाच माहित.
“असेंकुठंही बाबासाहेबांनी
“असेंकुठंही बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही” - हे लिहिलं आणी नंतर पब्लिशही करावसं नाही वाटलं.
फा, इथे ती बातमे आहे बघ.
फा, इथे ती बातमे आहे बघ.
"“या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं आहे ते सगळं इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. जेधे शतावलीमध्ये जे लिहिलं आहे त्याच्याबरोबर विरोधात चित्रपटामध्ये आलं आहे. मावळा असा गोरापान, दिसायला चिकणा असा मावळा कधी होता?” असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला होता. “शिवाजीमहाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय. तसेच, बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांशी लढायला गेले होते असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. पण हे इतिहासात कुठे दिसलं? बाजीप्रभू हा शिवाजी महाराजांचा सच्चा सेवक होता”, असंही आव्हाडांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं."
आणि इथे आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदर्यांच्या नावानं फोडलेले खडे.
ठाण्याच्या थिएटरमधला प्रकार
ठाण्याच्या थिएटरमधला प्रकार अनेक व्हिडियोजमध्ये कैद आहे. तरीही आजच्या अटकसत्रानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया- आव्हाड यांची भूमिका योग्य आहे व पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे- अशी आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्हाला आव्हाडांचा अभिमान आहे! ठाण्यातील प्रकारानंतर राहुल गांधींनी आव्हाड याना भारत जोडो यात्रेत अगत्याने सामील करून घेतले.
यावरून हे स्पष्ट आहे की ठाण्यातील प्रकार हा आव्हाडांचा वैयक्तिक इश्यू नसून त्यांना राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा अधिकृत पाठिंबा आहे.
इथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणारे- अगदी परदेशात बसून करणारेही- कार्यकर्ते-विचारवंत आहेत.
शेफाली वैद्य यांच्या भूमिकेवरून हेच लोक पार नाझी, हिटलरपर्यंत पोचले होते. यापुढेही हे लोक काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करत राहतील आणि तो त्यांनी जरूर करावा. आव्हाड सुटून येतील व पुन्हा सक्रिय होतील त्यानाही शुभेच्छा.
पण पुरोगामी प्रचारकांनी थोडीफार लाजलज्जा शिल्लक असल्यास यापुढे एखाद्या प्रॉडक्टवर वैयक्तिक बहिष्कार घालणाऱ्या राईट विंगर्सवरून कांगावा करू नये. तसा कांगावा करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का आता?
फा, इथे ती बातमे आहे बघ. >>>
फा, इथे ती बातमे आहे बघ. >>> हो तीच बातमी मिळाली होती मला काल.
कोणाला दाखवण्यासाठी निषेधाची
कोणाला दाखवण्यासाठी निषेधाची टिकली लावायची मला गरज नाही.
हिंसाचार करणार्यांना डोक्यावर बसवण्याच्या बाबतीत इथे सगळेच हमाम में नंगे आहेत. प्रशांत भूषण यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण करणारा , दीपिका पदुकोणचं सर तन से जुदा करणार्याला दहा करोडची बक्षिसी ठेवणारा , हे दोघे आज एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. इतर उदाहरणं यापेक्षाही भयाण आहेत.
पुरंदर्यांच्या लेखनाबद्दलचे आक्षेप हे आताच सुरू झालेत किंवा त्यामागे फक्त मतासाठी जातीचं राजकारणच आहे, असे नाही. ब्राह्मण मराठी संघर्ष /आकस/ द्वेषाचं एक मूळ महाराज आणि मराठ्यांचं इतिहासात आणि अन्य लेखनात रंगवलं गेलेलं चित्र आहे आणि हे सगळं खूप मागे जातं. उदा : विष्णूशास्त्री चिपळूणकर. म्हणजे किमान दीडशे वर्षे. त्याआधीच्या इतर गोष्टी सर्वज्ञात आहेतच. मी दोन्ही बाजूचं काही लेखन मुद्दाम म्हणून वाचायला गेलो नाही. पण किस्त्रीम दिवाळी अंकात यावर सातत्याने लिहून येत असे, त्यामुळे कळलं.
पुरंदर्यांचं किंवा अन्य कोणाचं लेखन न वाचताच त्यावर आक्षेप घेतला हे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हाणामारी करणार्यांच्या किंवा त्यांच्या म्होरक्यांच्या बाबतीत खरं असेल. त्याला आणि चित्रपटांतल्या आक्षेपार्ह वाटलेल्या गोष्टींना विरोध करायचा हा मार्ग चुकीचा आहे, हे लिहायची गरजही नाही.
मात्र हे आक्षेप नोंदवले गेले आहेत. डॉ अ ह साळुंकेंनी पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर हे पुस्तक लिहिलं आहे. कॉ पानसरेंनी महाराजांबद्दल पुस्तिका लिहिली, ते व्याख्याने देत.
मी थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत नाही, त्यातून असले चित्रपट टीव्हीवर आले तरी असह्य वाटतात. पण याबद्दल जो आक्षेप वाचनात आला तो सांगतो. अफझलखानाला मांडीवर घेऊन कोथळा काढण्यातून नृसिंह - हिरण्यकश्यपू दिसतात. म्हणजे इथे महाराजांचं दैवतीकरण होतं. त्यांच्यातले माबवी गुण बुद्धिमत्ता, साहस, नियोजन, इ. झाकोळले जातात. अफझलखानाला कोणीतरी दिलेल्या शापामुळे तसा मृत्यू आला, असंही चित्रपटात दाखवल्याचं वाचलं. तसं केल्यानेही महाराज हे केवळ निमित्तमात्र ठरतात, असा लिहिणार्याचा आक्षेप होता. इतर अनेक गोष्टींबद्दल आशुचँप यांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे.
हे सगळं चित्रपट न पाहता लिहिणं म्हणजे वर म्हटलेला पुरंदरेंचं लेखन न वाचताच त्यावर आक्षेप घेणं हाच प्रकार होतो, हे मान्य. म्हणूनच हे सगळं मी अन्यत्र वाचलंय हे स्पष्ट करतो.
कोणे एके काळी सेन्सॉरने पास केलेल्या करण जोहरच्या सिनेमावर सुपर सेन्सॉर म्हणून बसणार्या राज ठाकरेंचा पक्ष आज सेन्सॉरचं नाव घेतोय; हीही एक गंमत आहेच.
त्याला आणि चित्रपटांतल्या
त्याला आणि चित्रपटांतल्या आक्षेपार्ह वाटलेल्या गोष्टींना विरोध करायचा हा मार्ग चुकीचा आहे, हे लिहायची गरजही नाही.
इथे- या धाग्याच्या context मध्ये तोच एकमेव मुद्दा आहे. पुरदरेंवर माबोवर अनेक वेळा चर्चा होऊन गेली आणि त्यासाठी सेपरेट धागे आहेत.
इर्शाद कार्यक्रम बघायला नकार देणे, लालसिंग चद्धा चित्रपट बघु नये असं आवाहन, जाहिरात आवडली नाही म्हणून दुकानात न जाणे हे गंभीर गुन्हे, ते करणारे नाझी, तालीबानी, गुंड- या थाटात या धाग्यावर चर्चा चालू होती. कसलाही हिंसाचार झाला नसला तरी झाला तर, झाला तर असं स्पेक्युलेशन चालू होतं.
आणि थिएटरवर हल्ल्याच्या बाबतीत मात्र- 'मार्ग चुकीचा आहे हे लिहायचीही गरज नाही (म्हणजे let's not even discuss it further!). चला आपण ब्राम्हण मराठा वादावर बोलू आणि पुरंदरेंची पीसं काढू. Simply brilliant
इर्शाद कार्यक्रम बघायला नकार
इर्शाद कार्यक्रम बघायला नकार देणे, लालसिंग चद्धा चित्रपट बघु नये असं आवाहन, जाहिरात आवडली नाही म्हणून दुकानात न जाणे हे गंभीर गुन्हे, ते करणारे नाझी, तालीबानी, गुंड- या थाटात या धाग्यावर चर्चा चालू होती. कसलाही हिंसाचार झाला नसला तरी झाला तर, झाला तर असं स्पेक्युलेशन चालू होतं.
आणि थिएटरवर हल्ल्याच्या बाबतीत मात्र- 'मार्ग चुकीचा आहे हे लिहायचीही गरज नाही (म्हणजे let's not even discuss it further!). चला आपण ब्राम्हण मराठा वादावर बोलू आणि पुरंदरेंची पीसं काढू. Simply brilliant Proud
Submitted by WHITEHAT on 12 November, 2022 - 08:49 +११११११११
आता एका बातमीचा फोटो टाकतो, कशा प्रतिक्रिया येतात ते पहा!!!

थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा शो
थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा शो बंद पाडणं, प्रेक्षकांना मारहाण करणे ही गुंडगिरीच आहे. प्रश्नच नाही. चुकीचंच आहे.
काय आहे हे हलाल शो?
काय आहे हे हलाल शो?
इथे- या धाग्याच्या context
इथे- या धाग्याच्या context मध्ये तोच एकमेव मुद्दा आहे. >>> +१ पिक्चर मधे काय दाखवले आहे हे इररिलेव्हंट आहे.
बाकी हमाम मे नंगे बद्दल नो आर्ग्युमेण्ट्स. पण व्हाइटहॅट यांचा तोच तर पॉइण्ट आहे ना, की तेव्हाचे आउटरेज आणि आत्ताचे यात किती फरक आहे. हा धागाच ज्याबद्दल होता - त्या इर्शादच्या वेळेस कोणी शो बंद पाडला नव्हता. आव्हाडांनी पिक्चरबद्दल त्यांचे आक्षेप फेसबुक वर लिहीले असते तर त्याबद्दल कोणाला वाद असायचे कारण नव्हते.
इथे एरव्ही सेन्सिबल वक्तव्ये करणार्या सुप्रिया सुळ्यांनीही आव्हाडांचे समर्थन केले आहे. महाराष्ट्रात कोणताच राजकीय पक्ष लिबरल नाही हेच मी पूर्वीही लिहीले होते.
भरत - पानसर्यांच्या जोडीने साळुंख्यांचे नाव घेण्याआधी ते "...बखर" पुस्तक व त्यातली विचाररत्ने एकदा वाचाच
"जिजाबाई सह्याद्रिकडे पाहात होती" (मूळ पुस्तकातील वाक्य आहे) यात गेल्या पन्नास वर्षांत इतर सर्व वाचकांना न दिसलेला अर्थ लेखकाला दिसला आहे. हे असले "आक्षेप" आहेत त्यात.
आणि पानसर्यांचे पुस्तक व भाषणे दोन्ही वाचली/ऐकली आहेत. ते आक्षेप पुरंदर्यांबद्दल नाहीत. त्यांनी इतिहासकारांनी शिवाजी महाराज कसे रंगवले म्हणून जी उदाहरणे दिली आहेत तसे "राजा शिवछत्रपती" मधे मुळातच नाही.
बाकी मराठा लोक गोरे नसतात हा दिव्य शोध कोणी लावला? चांगले गोरेपान आणि देखणे - किंवा आव्हाडांच्या भाषेत "चिकणे" ही पाहिले आहेत
आता त्यांना "काटक मावळा" असा दिसण्याची शक्यता कमी आहे म्हणायचे असेल. पण मग तो अर्नॉल्ड श्वारझेनेगर सारखा तरी कोठे दिसतो. त्याबद्दल त्यांना कधी आक्षेप दिसले नाहीत.
मला वाटतं की मावळा कसा असावा,
मला वाटतं की मावळा कसा असावा, याबद्दल चूक की बरोबर हा मुद्दा नाहीये. जे काही असेल ते त्यांनी आपापल्या आकलनाप्रमाणे मत मांडायला काहीच हरकत नाही. परंतू हिंसात्मक मार्गाने शो बंद पाडणे ह्याचं कुठलंच समर्थन होऊ शकत नाही.
हो तो आहेच. मला ती कॉमेण्ट
हो ते आहेच. मला ती कॉमेण्ट "अम्युझिंग" वाटली म्हणून ती एक साइड नोट आहे
मी पुरंदरे किंवा साळुंखे
मी पुरंदरे किंवा साळुंखे दोघांचीही पुस्तके वाचलेली नाहीत. एवढ्यासाठी वाचायची तर इतक्यात तरी वाचणार नाही. पण हे आक्षेप फक्त पुरंदरेंपासून सुरू झालेले नाहीत आणि त्यांच्यापुरते नाहीत. या धाग्यावर ते सगळं लिहिणं शक्य नाही आणि उचित नाही.
मायबोलीवर गुंडगिरीचे समर्थन
मायबोलीवर गुंडगिरीचे समर्थन करणारे कोणीही दिसत नाही आणि पुरोगाम्यांना टोकन निषेध करण्याची गरज वाटत नाही,कारण मुळात सपोर्ट करणारे कोणीच नाहीये.
कॉमी, सहमत. अशा रितीने
कॉमी, सहमत. अशा रितीने गुंडागगर्दी / मारहाण करून शो बंद पाडणे यावर बहुतेक सगळ्यांनीच इथे अथवा/आणि इतर स्थळांवर निषेध विरोध करून झालाय, सेना मनसे वेगळी होण्या आधी पासून.
आता आव्हाडांचा विषय इथे जिथे जिथे निघाला तिथे सुद्धा सर्वांनीच निषेध नोंदवला आहे.
इर्शाद प्रकरणांत त्याचे समर्थन करून व्हॉट अबाउटरी झाल्याने इथे खडाजंगी झाली.
आव्हाडांचे समर्थन इथे कुणी केले असते तर त्यावरही इथे खडाजंगी झाली असती.
मानव मस्त कांगावा करता तुम्ही
मानव मस्त कांगावा करता तुम्ही. टॉप लेव्हल!
इर्शाद प्रकरणात कसलाही हिंसाचार झालाच नव्हता. त्यामुळे त्या हिंसाचाराचं समर्थन तरी कोण करत होतं? जी गोष्ट झालेलीच नाही त्याचं समर्थन कुठे केलं गेलं??? तरीही इथे नाझी, तालिबानी, गुंड अशी भाषा वापरली गेली. भरपूर पोस्टी लिहिल्या गेल्या.
आता चित्रपट हल्ला प्रकरणात इथे आणि इतरत्रही पुरोगाम्यांनी मौन पाळलं. विषयच टाळला. तर काही पुरोगाम्यांनी हिंसाचाराबद्दल न बोलता पुरंदरे आणि तत्सम विषय काढले. म्हणजे मार्ग चुकीचा पण भूमिका बरोबर- असं सांगितलं.
वैयक्तीक टिका करण्यात मला
वैयक्तीक टिका करण्यात मला स्वारस्य नाही. आणि माझ्यावर वैयक्तीक टिका केली म्हणुन पेटूनही उठत नाही.
सगळा धागाच इर्शादचा आहे. इर्शाद वरून सुरू केलेल्या धार्मिक वादाचे समर्थन कोणी केले मागच्या पोस्ट्स वाचून कळेल.
एखाद्या वैयक्तिक भूमिकेचं -
एखाद्या वैयक्तिक भूमिकेचं - रादर- भूमिका घेण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं समर्थन करणं (कसलाही हिंसाचार न करता)
आणि
रस्त्यावर उतरून हिंसाचार करणं- आपल्याला न आवडलेला चित्रपट इतरांनी बघू नये म्हणून प्रेक्षकांना मारहाण करणं
यात फरक आहे का? लोकशाहीत यापैकी काय बसतं? काय नाही? पुरोगाम्यांनी यापैकी कशाबद्दल outrage केलंय आणि कशाबद्दल गप्प बसलेत?
वरील दुसऱ्याचं कुणी समर्थन
वरील दुसऱ्याचं कुणी समर्थन केलंय इथे? या धाग्यावर आणि इतर धाग्यावर हा विषय निघाला होता तिथेही कुणीही समर्थन न करता निषेध केला आहे.
उरला मुद्दा "आऊटरेज" म्हणत आहात त्याचा. तर इथे आव्हाडांचे समर्थन केले असते तर इथेही खडाजंगी झाली असती.
की मुळात इर्शादवरील हा धागा काढणे हेच आउटरेज आहे असे म्हणणे आहे तुमचे?
रच्याकने: मी इथे मायबोलीबरील कुठला ठरावीक समुह अथवा ठरावीक सदस्य हिशेबात धरून पोस्ट करत नाहीये हे नमूद करू इच्छितो.
नुसते strawman आणि
नुसते strawman आणि whataboutry.
मुळात या दोन गोष्टी तुलना
मुळात या दोन गोष्टी तुलना करण्यासाठी समसमान नाहीत- दोन गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे हे तुम्हाला मान्य आहे का?
आव्हाडांच्या बाबतीत पुरोगाम्यांनी एकतर हिंसाचाराबद्दल बोलणं टाळलं आणि नुसतंच चित्रपटावर टीका करत राहिले किंवा मार्ग चुकीचा असला तरी त्यांचे मुद्दे बरोबर आहेत अशी सारवासारव केली. काँग्रेस राष्ट्रवादी युतीने तर जाहीर समर्थन केलं आहे.
याउलट इर्शाद प्रकरणात बहिष्कार घालणाऱ्या व्यक्तींनी कायदा हाती घेतला नव्हता. तरीही त्यांना नाझी, तालिबानी, गुंड ठरवण्यात आलं.
इर्शादबद्दल भरपूर थयथयाट करणं, त्याचवेळी आव्हाड प्रकरणात - १. गप्प बसणं २. मार्ग चुकीचा पण आपण मुद्दे बघू- हे बघा पुरंदरे काय लिहितात- असं pivot करणं.
इर्शादबद्दल मोदी फडणवीस यांनी काहीही कमेंट केलेली नसताना भाजपला त्यात ओढणं. त्याचवेळी आव्हाडांना काँग्रेस राष्ट्रवादी युतीने जाहीर समर्थन केलेलं असताना त्या पक्षावर टीका करणं तर सोडाच त्यांचा प्रचार करत राहणं.
हे सगळं तुम्हाला योग्य आणि लॉजिकल वाटत असेल तर तुम्हाला शुभेच्छा.
मुळात या दोन गोष्टी तुलना
मुळात या दोन गोष्टी तुलना करण्यासाठी समसमान नाहीत- दोन गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे हे तुम्हाला मान्य आहे का?
>>>आहे की फरक, गुंडगिरी आणि जबरदस्तीने सिनेमा बंद पाडणे जास्त वाईट आहे. इथे कोणीही त्या विरुद्ध काही मत दिले नाहीये.
मुळात आव्हाडांचा बोलवता धनी
मुळात आव्हाडांचा बोलवता धनी वेगळाच आहे
तान्हाजी पासून इतिहासाची मोडतोड करणारे अनेक चित्रपट इतक्यात आले
पण याच चित्रपटाबाबत इतका दंगा का?
कारण उघड आहे
आणि यात चित्रपटाचे समर्थन मुळीच नाही, त्याबद्दल तर पूर्ण वेगळा धागाचं काढला आहे
पण आता जे आव्हाड करत आहेत ते निव्वळ राजकारण आणि ब्राह्मणांना खलनायक ठरवण्याचा अट्टाहास इतकंच आहे
नुसते strawman आणि
नुसते strawman आणि whataboutry. >> अगदीच.
आपल्या कार्यक्रमाला ईर्षाद म्हणायचे की दिवाळी पहाट हे व्यक्तीस्वातंत्र्य.. झालंच तर साहित्यिक स्वातंत्र्य आहे हे समजून न घेता त्याला ओढून ताणून धार्मिक रंग देत सोशल मिडियाच्या माध्यमातून रान ऊठवून समाजस्वास्थ्य बिघडवायचे.
आव्हाडांची कृती ते निषेधार्हच आहे. त्यांचा आक्षेप समाजमान्य ईतिहास (जो ईतिहासकालीन पुस्तकातून सर्वज्ञात आहे) तो डावलून त्याचे विडंबन प्रदर्शित करण्याला आहे.
पहिला मुद्दा अभिव्यक्ती दडपण्याबद्दलचा आहे दुसरा ईतिहासाचे विद्रुपीकरण करण्याबद्दल आहे दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध नाही.
आव्हाडांची कृती आणि वैद्यवाईंचा ईर्षादला असलेला आक्षेप (त्यांनी आणि सहकार्यांनी कुजबूज मोहिमेतून ऊठवलेले रान ह्याकडे दुर्लक्ष करून) स्ट्रॉमॅन तुलना शक्य आहे हे कसे सुचू शकते आणि त्यापुढेही एक पायरी जाऊन 'हे चालले नाही तर ते कसे चालते' अशी व्हॉटअबाऊट्री करणे... ब्रेनवॉश झाल्यासारखे बोलणे नाही का हे.
तुलनाच करायची असल्यास ... आपले राजकीय महतव वाढवण्यासाठी आव्हाडांसारखे खळ फ्टट्याक करणे जास्त फायदेशीर आणि ईफेक्टिव की सणांच्या निमित्ताने सोशल मिडियातून सामाजिक दुही पसरवणे जास्त फायदेशीर आणि ईफेक्टिव अशी करा.
पण त्यांचा आक्षेप समाजमान्य
पण त्यांचा आक्षेप समाजमान्य ईतिहास (जो ईतिहासकालीन पुस्तकातून सर्वज्ञात आहे) तो डावलून त्याचे विडंबन प्रदर्शित करण्याला आहे. >>> दोन्ही सारखेच झाले की मग. संस्कृतीच्या सब्जेक्टिव्ह आकलनातून ऑफेण्ड होणे, आणि इतिहासाच्या सब्जेक्टिव्ह आकलनातून ऑफेण्ड होणे दोन्हीत काहीच फरक नाही. दोन्ही बाबतीत कलाकारांनी जे केले ते योग्य आहे की नाही हे पूर्णपणे इररिलेव्हंट आहे. दोन्ही ठिकाणी कलाकारांचे स्वातंत्र्य आहे.
पण इर्शादच्या वेळेस सगळे व्हर्च्युअल चालले होते. लोक आपले घरबसल्या लिहीत होते काय ते. इथे जाउन शो बंद पाडला, मारहाण वगैरे.
समसमान नाहीतच. तेव्हा इथे तो
समसमान नाहीतच. तेव्हा इथे तो मुद्दा आणून (आणायला काहीच हरकत नाही, पण पुढे:) त्याची इथल्या आधीच्या चर्चा व भूमिकेशी तुलना कोणी केली? ती तुलना केली म्हणुन तर माझी ती पोस्ट आहे.
परत तेच शेवटचं लिहितो. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल डिसऍग्रिमेंट होते तेव्हाच खडाजंगी होते. गुंडागर्दी , मारहाण करून शो बंद करण्याचा इथे सगळ्यांनीच निषेध केला आहे. त्यामुळे डिसऍग्रिमेंट नाही आणि त्यावर खडाजंगी नाही.
रादर नव्हती म्हणावी लागेल आता.
>>>आहे की फरक, गुंडगिरी आणि
>>>आहे की फरक, गुंडगिरी आणि जबरदस्तीने सिनेमा बंद पाडणे जास्त वाईट आहे. इथे कोणीही त्या विरुद्ध काही मत दिले नाहीये.
Submitted by कॉमी on 15 November,
जर ते 'जास्त वाईट' आणि शिवाय बेकायदेशीर पण आहे तर त्याविरुद्ध outrage जास्त व्हायला हवं होतं. तसं झालेलं नाही. पुरोगामी गप्प आहेत किंवा मग खाली या अश्विनी आयडीने केलं तसं 'मार्ग चुकीचा पण मुद्दा बरोबर' असं समर्थन करत आहेत.
वैद्यबाईंच्या मुद्द्यावरून थेट नाझी वगैरेपर्यंत पुरोगामी पोचले होते. इथे काँग्रेस राष्ट्रवादीने जाहीर समर्थन दिलं आहे तरीही त्या पक्षाच्या बॉसेसवर कोणत्या पुरोगाम्याने टीका केलेली, हिटलर म्हटलेलं दिसत नाही. उलट आपल्या आघाडीचा प्रचार चालूच आहे.
Pages