Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
It seems my earlier replies
It seems my earlier replies were lost to you. त्यामुळे आता पास.
समसमान नाहीतच. तेव्हा इथे तो
समसमान नाहीतच. तेव्हा इथे तो मुद्दा आणून (आणायला काहीच हरकत नाही, पण पुढे:) त्याची इथल्या आधीच्या चर्चा व भूमिकेशी तुलना कोणी केली? ती तुलना केली म्हणुन तर माझी ती पोस्ट आहे.//
कारण त्या केसमध्ये हिंसाचार केलेला नसतानाही प्रचंड थयथयाट पुरोगाम्यांनी केला होता. पार मोदींपर्यंत पोचले होते. वाट्टेल ती दूषणं राईट विंगर्सना दिली होती. तालिबान blah blah.
इथे ठाण्यातील घटनेचा, पुण्यातील प्रकारचा टोकन निषेध करताना मात्र ते passion दिसत नाही. हिंसेचं अधिकृत समर्थन करणाऱ्या आपल्या आघाडीच्या लाडक्या नेत्यांना हिटलर , तालिबानी म्हणवत नाही. शिवाय मार्ग चुकीचा पण मुद्दा बरोबर हे सांगत partial समर्थनच चालू आहे. म्हणजे फेसबुकवर चित्रपटाच्या बहिष्काराचं आवाहन केलं असतं तर पुरोगाम्यांना चाललं असतं. मग वैद्यबाईनी तेच केलं तेव्हा का चाललं नाही?
खाली या अश्विनी आयडीने केलं
खाली या अश्विनी आयडीने केलं तसं 'मार्ग चुकीचा पण मुद्दा बरोबर' असं समर्थन करत आहेत. >> माझे वैयक्तिक सोडा आशुचँप ह्यांच्या धाग्यावर जवळपास सर्वच मायबोलीकरांनी ईतिहासाच्या अशा विद्रुपीकरणाला आक्षेप घेतला आहे.
जो धागा आव्हाड प्रकरणाआधी आला होता.
मुद्द्याला समर्थन ह्याचा अर्थ आव्हाडांना समर्थन करतो आहोत असाही होत नाही. ईतिहासाचे विद्रुपीकरण ह्या मुद्द्यावर काही आव्हाडांचा प्रताधिकार नाही. सिनेमा पाहून कोणालाही आपली मते ठरवता येतात त्याला आव्हाडांच्या कृतीच्या पोचपावतीची गरज नाही.
होपफुली तुम्हाला सिनेमातून शिवकालीन ईतिहासाचे विद्रुपीकरण हा व्यापक मुद्दा आणि त्याबाबत आलेला जनक्षोभ (जो आदिपुरूष सिनेमाबाबत सुद्धा दिसला कदाचित तुम्हीही नोंदवला असेल) कळला असेल.
पुन्हा सांगते हा मुद्दा मांडणे म्हणजे आव्हाडांना समर्थन नाही.
(आव्हाडांबद्दल वा त्यांच्या पक्षाबद्दल आदर वगैरे नाहीच..काही असेल तर रागच आहे. कोविड काळात शक्य असूनही त्यांनी व त्यांच्या पक्षाने माझ्या माहितीतल्या ठाणेकरांच्या मदतीच्या हाकेला रिस्पॉन्स दिला नाही.. पण तो भाग अलाहिदा)
<<<आशुचँप ह्यांच्या धाग्यावर
<<<आशुचँप ह्यांच्या धाग्यावर जवळपास सर्वच मायबोलीकरांनी ईतिहासाच्या अशा विद्रुपीकरणाला आक्षेप घेतला आहे. Happy जो धागा आव्हाड प्रकरणाआधी आला होता.>> आणि तिथेही नंतर आव्हाड प्रकरण बातमी आली आणि त्याचा निषेध केला गेला.
मी इथे व्हाइटहॅट यांच्याशी
मी इथे व्हाइटहॅट यांच्याशी सहमत आहे. भरत्,मानव, कॉमी अशा माबोकरांनी आवर्जून निषेध केला की नाही हा मुद्दा नाही. त्या लॉजिक ने बघितलेत तर याच धाग्याच्या पहिल्या पानावर जा. तेथील प्रतिक्रिया बघा. एकाही माबोकराने तेथे इर्शादच्या विरोधाचे समर्थन केलेले नाही. तरीही त्याविरोधात प्रतिक्रिया आल्या आहेत. का? तर सर्वांना उघड दिसत होते की सोशल नेटवर्क वर किती आउटरेज झाले आहे व तसेच समर्थनाच्या पोस्ट्स देखील आलेल्या आहेत. तेथे तर फक्त सगळे व्हर्च्युअल चालले होते.
मग इथे रस्त्यावर लोक उतरले आहेत तरी तशा प्रकारचे आउटरेज दिसले नाही. ज्यानी "आमचा निषेधच आहे" लिहीले आहे त्यांच्यावर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. पण जनरल आउटरेज मधल्या फरका बद्दल ही चर्चा आहे. आताही जनरल सोशल नेटवर्क्स वर विरोध कमी व समर्थन जास्त आहे. इतकेच नव्हे, तर पुरोगामीपणाची टिमकी गाजवणार्या पक्षाच्या नेत्यांकडूनही समर्थन आलेले आहे.
एका बाबतीत अनक्लाविफाइड निषेध आणि दुसर्या - आणि लोक रस्त्यावर उतरल्याने जास्त गंभीर असलेल्या बाबतीत "निषेधच आहे, पण..." मधला पण आला की गेम ऑफ थ्रोन्स मधले ते प्रसिद्ध वाक्य आठवते
ही पोस्ट फक्त माझ्या भूमिके
ही पोस्ट फक्त माझ्या भूमिके बद्दल आहे.
मी फक्त मायबोलीवर चर्चा/प्रतिक्रिया याबद्दल लिहिले आहे. (इतर सोमी स्थळे मी वाचत नाही, थोड्या बातम्या ऑनलाइन वाचतो, टीव्हीवर क्वचित बघतो.)
हा धागा निघाला आणि त्यावर इर्शाद विरोधाचे कुणी समर्थन न करण्या पूर्वी आलेल्या प्रतिक्रिया जशा आल्या तेवढया आव्हाड प्रकरणावर वेगळा धागा निघाला असता तर आल्या असत्या असे मला वाटते. प्रतिसाद संख्या आणि ते देणारे सभासद संख्या अशी तुलना करून. (हे फक्त एक वेगळा धागा आला असता तरी.)
दुसरे म्हणजे हल्ली चित्रपटात दाखवणारा इतिहास यावर वेगळा धागा (आशुचॅम्प यांचा) आला होता त्यावर त्या विषयावर चर्चा झाली होती आणि बहुतेक लोक लेखकाशी सहमत होते.
आता इर्शाद आणि आव्हाड प्रकरण दोन्ही मध्ये फरक असा की इर्शाद विरोध इथे बहुतेकांना मान्य नव्हता. त्यात इर्शाद विरोधाला समर्थन आहे/नाही पण मार्ग चुकीचा असे दोन वेगळे कंगोरे नव्हते.
तर चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या खाली इतिहासात काहीही दाखवणे यावर सगळ्यांनीच आधीच विरोधाची भूमिका नोंदवली आहे. तिथेही आधी "विरोध आहे पण मार्ग चुकीचा" वगैरे प्रश्न नव्हता. आता याचीच तुलना इर्शाद सोबत करायची असेल तर तो वेगळा मुद्दा आहे.
पण नंतर आव्हाड प्रकरण घडले. आणि मग सिनेमॅटिक लिबर्टी खाली इतिहास कसाही दाखवणे याला विरोध पण त्यासाठी असला गुंडागर्दीचा विरोधाचा मार्ग चुकीचा असे दोन कंगोरे आले. त्या बद्दल त्या धाग्याबर लेखकाने तीव्र प्रतिक्रिया देऊन त्या मार्गाचा निषेध केला, पण न लावता. त्याला मी मम म्हटले , पण न लावता. बहुतेकांनी त्या प्रकरणाचा निषेध पण न लावता केला आहे. आव्हाड प्रकरणाचे इथे कुणी समर्थन केलेले मी पाहिले नाही. या धाग्यावर तो विषय निघाला तेव्हा इर्शादच्या तुलनेत इथे आव्हाड प्रकरणावर तेवढे आउटरेज का नाही यावर ती माझी पोस्ट आहे.
माबो व्यतिरिक्त इतर सोमीवर लोकांनी अथवा प्रत्यक्षात राजकारण्यांनी यावर काय भूमिका घेतलीय, वक्तव्ये व समर्थन केले आहे यावर मी टिप्पणी केलेली नाही. करायची असल्यास मला ते सर्व वाचावे/पहावे लागेल.
35
35
मानव - नोटेड. तुम्ही, कॉमी व
मानव - नोटेड. तुम्ही, कॉमी व भरत यांच्या स्टॅण्ड बद्दल मला काहीच शंका नाही. बाकी इतरांचे लेखन इथे व एकूणच माबोवर इतके वाचलेले नाही त्यामुळे नक्की अंदाज नाही.
आता इर्शाद आणि आव्हाड प्रकरण
आता इर्शाद आणि आव्हाड प्रकरण दोन्ही मध्ये फरक असा की इर्शाद विरोध इथे बहुतेकांना मान्य नव्हता. त्यात इर्शाद विरोधाला समर्थन आहे/नाही पण मार्ग चुकीचा असे दोन वेगळे कंगोरे नव्हते. ///
अहो पण तो मार्ग चुकीचा नव्हताच ना. अन्यथा वैद्यबाईना मविआ सरकारने ताबडतोब जेलमध्ये घातलंच असतं की. That's the whole point. कसलाही गुन्हा केलेला नसताना इतका थयथयाट आणि इथे मात्र कसाबसा नाईलाजाने केलेला टोकन निषेध.
इतिहासाबद्दल धागा ज्या आशुचाम्प यांनी काढला त्यांनीही इथे स्पष्ट लिहिले आहे की आव्हाडांनी घेतलेले आक्षेप आणि त्यांचा मूळ लेख हे वेगळे विषय आहेत. त्यामुळे ते उदाहरण तुम्ही इथे देणं योग्य नाही. तसंही प्रत्येकाचं मत यात वेगवेगळं असतं. भन्साळीच्या चित्रपटाचा वेळी पुरोगामी creative liberty चे दाखले देत होते. इतर वेळी त्यांना ती लिबर्टी नकोशी होते.
की गेम ऑफ थ्रोन्स मधले ते
की गेम ऑफ थ्रोन्स मधले ते प्रसिद्ध वाक्य आठवते>>can you write here I am not remembering it..
दोन्ही सारखेच झाले की मग.
दोन्ही सारखेच झाले की मग. संस्कृतीच्या सब्जेक्टिव्ह आकलनातून ऑफेण्ड होणे, आणि इतिहासाच्या सब्जेक्टिव्ह आकलनातून ऑफेण्ड होणे दोन्हीत काहीच फरक नाही. दोन्ही बाबतीत कलाकारांनी जे केले ते योग्य आहे की नाही हे पूर्णपणे इररिलेव्हंट आहे. दोन्ही ठिकाणी कलाकारांचे स्वातंत्र्य आहे. >>
संस्कृती प्रवाही असते असे ऐकून होते, मोती साबण आणि बिसमिल्ला खानांची शेहनाई घराघरात दिवाळी संस्कृतीचा भाग कशी झाली, कधी झाली? ती होतांना कोणी ऑफेंड झाले का?
नातवांना आग्रहाने भल्या पहाटे ऊठवून ऊटण्याने रगडून, कढत पाण्याने आंघोळ घालणारी आजी, नातू शिकून सवरून अमेरिकेला गेल्यावर त्याने दिवाळीच्या दिवशी ऊटण्याच्या साबणाने शॉवर घेतला तर ऑफेंड होईल का? मला वाटते ती नातवाच्या जेस्चरने सुखावून जाईल.
त्याच धर्तीवर ईतिहास आणि त्याचे दृष्य प्रदर्शन सुद्धा प्रवाही असावे का म्हणजे त्यात हवे तसे बदल करता यावेत का? (मला पडलेला जेन्यूईन प्रश्न आहे)
शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंबरोबर Mano a Mano लढाई केली...अफझल खान आठ फुट हवेत ऊडून शिवाजी महाराजांच्या मांडीवर येऊन पडला आणि महाराजांनी नरसिंहाने हिरण्यकशिपुचा कोथळा काढून वध करावा तसे अफझलखानाला मारले वगैरेला ईतिहासाचा प्रवाहीपणा म्हणता येतो का? मनोरंजनासाठी असे स्वातंत्र्य पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांना असावे का? मांजरेकरांनी ३०० च्या मेकर्सना बोलावून पावनखिंडीची लढाई चित्रित केली किंवा महाराजांना लिओनायडससारखे मास्टर स्वोर्ड्समन दाखवलेले चालावे का? आपल्याला ते बघायला आवडले तर मनोरंजनासाठी आपण ईतिहास हवा तसा वाकवू शकतो का? कितपत वाकवू शकतो? स्वांतसुखाय सगळेच चालत असेल तर मग ईतिहासकारांची गरजच काय ऊरते?
सिनेमाला ईतिहासाच्या फुटपट्य्या लावाव्यात का ह्या बाबतीत माझा वैचारिक स्टँड (सध्या तरी) सिनेमात किती ऐतिहासिक कंटेट आहे ह्यावर बेतलेला आहे.
मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे किंवा लगे रहो मुन्नाभाई ह्यात घेतेलेला ईतिहास त्याचे स्पिरिट राखून होता .. लोकांना ते सिनेमे फक्त आवडलेच नाही तर लोकांनी ते डोक्यावर घेतले.
कंटेंटच्या बाबतीत १००% ऐतिहासिक सिनेमा ईतिहासाचे स्पिरिट राखून का नसावा? तसा तो असल्यास तो लोकांना आवडणार नाही असे मेकर्सना का वाटते हे न कळे. थोडक्यात जो ईतिहास आहे तो काही फार ड्रामॅटिक नाही आणि मनोरंजनासाठी त्याचे ड्रामॅटायझेशन करणे आपले आद्य कर्तव्य आहे, ज्या ऐतिहासिक पुस्तकातून आपण हा ईतिहासाचा पाठ ऊचलला आहे त्याचे चित्रीकरण करतांना मनोरंजनासाठी त्यातल्या तथ्यांशी प्रामाणिक राहण्याची कुठलीही जबाबदारी आपल्यावर नाही असाच विचार ते करत असावेत ना? सेट, वेषभुषा, भाषा ह्या सगळ्यांसाठी तज्ञ पडद्यामागे कार्यरत असतात पण ईतिहासाचा तज्ञ अभ्यासक तर सोडा ईतिहास शिकवणारा साधा सातवीचा मास्तर सुद्धा रेफरंसला पडद्यामागे नसतो? असे का असावे?
ज्या रांगड्या ईतिहासाशी बांधिलकी, अभिमान, गर्व आहे म्हणून सिनेमा बनवण्याचा घाट घातला त्यालाच असे व्हीएफ्क्स आणि सिनेमॅटिक लिबर्टीची आरास बनवायचे? का?
आणि ईतिहासाचे सुशोभिकरण (थोडक्यात विद्रुपिकरण) करणारे सिनेमे बनवण्यात बॉलिवुडच अग्रेसर आहे असे नाही.
ऊदाहरण द्यायचे झाल्यास ट्रॉय हा ऐतिहासहिक सिनेमा, त्यात मुख्य भुमिका करणार्या पीटर ओ टूल आणि ब्रॅड पिट सारख्या दिग्गज कलाकारांनी सिनेमा बघितल्यानंतर त्याच्या कमर्शिअल, मॉडर्न ट्रीटमेंट बद्दल मेकर्सची निर्भत्सना केली. टूल ने तर काही मिनिटात सिनेमा सोडून देऊन आपण ह्या विदुषकपटाचा भाग असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
आता ह्या वरच्या मुद्द्यांमध्ये ईर्षाद विषय बसवून बघा आणि तो आणि हा वाद एकच आहे की कसे हे तुम्हीच तपासून पहा.
पुन्हा वैद्य काय आणि आव्हाड काय.. पॉलिटिकल गेन साठी काहीही करणार त्यांना बाजुला सारून वॉटअबाऊट्री न करता मुद्द्यांवर चर्चा करू शकतोच आपण.
बरं ते वैद्य बाईंनी केलेल्या
बरं ते वैद्य बाईंनी केलेल्या boycott च्या आवाहनामुळे हिंसाचार झाला तर??? वगैरे स्वप्नरंजन करणारी विचारवंत (की विचारजंत) मंडळी दिल्लीत प्रत्यक्ष 'झालेल्या' हिंसाचाराबद्दल काही बोलणार आहेत की नाहीत??? की बहिष्काराचे आवाहन करणे हा मृतदेहाचे 35 तुकडे करण्यापेक्षाही गंभीर गुन्हा आहे???
Sigh.
Sigh.
Ithe mala whitehat che
Ithe mala whitehat che patatey.
Thodi bhitee aahe ka pratyaksha hinsachar karanaranchi, mhanun gulamilit, samarthan nahich yetey?
एर्हवी स्त्रीयांच्या
एर्हवी स्त्रीयांच्या हक्कासाठी सतत आपले थोबाड चॅनेलवर दाखवणार्या बायका श्रद्धा मर्डर केसवर काहीच बोलल्या नाहीत. नवाबजादा आत गेला तेव्हा त्याच्या घरी एक स्त्री हक्क वाली छाती पिटत गेली होती त्याच्या मुलीचे व बायकोचे सांत्वन करायला. आता दातखीळ बसली की हातखीळ?
सगळे पक्ष सारखेच. जाम शेपूटघालु लोक. नशेडी आणी गंजेडी पण.
अहो रश्मीताई, TV चे जाऊ द्या.
अहो रश्मीताई, TV चे जाऊ द्या. इथे मायबोलीचेच पहा. इर्शाद , तनिष्क, सिएट टायर, हलाल सर्टिफिकेट या विषयांवर आभाळ हेपालणारे आयडी श्रद्धा मर्डर केसमध्ये चिडीचूप आहेत! विषय काढून पण कोणाचीही बोलायची इच्छा नाही.

I hope, आता तरी विचारजंतांना कळले असेल, 'तनिष्क' च्या जाहिरातीला हिंदुत्ववादी का विरोध करत होते ते!
श्रद्धा मर्डर केस ना? मग?
श्रद्धा मर्डर केस ना? मग? कुठलाही मर्डर हा वाईटच असतो की. त्याला वेगळे कसे काय काढता येईल ? कोणी समर्थन केलेले आढळले का??
इथे अपेक्षित गुर्हाळ चालू
इथे अपेक्षित गुर्हाळ चालू आहे हे प्रतिसादांवर धावती नजर टाकल्यावर कळलं.
पुन्हा एकदा - , मी कोणालाही दाखवण्यासाठी निषेधाची टिकली लावणार नाही- कुठल्याच बाबतीत.
इथल्या हिंदुत्ववाद्यांना श्रद्धाच्या खुनापेक्षा खुनी मुस्लिम असल्याचा झालेला विकृत आनंदही अपेक्षितच. इथला वरचा ताजा प्रतिसाद केवळ despicable आगे.
हिंदुत्ववाद्यांची आणखी एक गोष्ट कधीचीच जाणवली आहे. आता स्पष्टपणे लिहितोय इतकंच.
शेफाली वैद्य,
संभाजीमनोहर भिडे यांच्या सारख्यांच्या वक्तव्यावर काहीही मत व्यक्त न करता त्यांना तसं बोलायचा अधिकार आहे,त्यात बेकायदेशीर काही नाही असं म्हणत राहायचं (हे त्या मताचं अप्रत्यक्ष समर्थन ठरतं , पण भलते मुद्दे हॅमर करून त्याकडे दुर्लक्ष होईल हे पाहायचं) आणि कशावरून काहीही झालं किंवा झालं नाही तरीही त्यावरून लिबरल लोकांवर तोंडसुख घ्यायचं. यांचा उद्देश कशाबद्दलही स्वतःला काय वाटतं हे सांगणं हा कधीच नसतो, आताही श्र द्धा हत्या प्रकरणी त्यांना दु:ख बि:ख झाल्याचं दिसतंय का बघा.तर लिबरल लोकांना ट्रोल करणं हाच असतो. न्युज चॅनेलपासून ते फेसलेस विखारी ट्रोल्सपर्यंत हे एक व्यवच्छेदक लक्षण असल्यासारखं दिसतं.
परजीवी प्राणी.
पुन्हा एकदा - कोणालातरी दाखवायला म्हणून निषेधाची टिकली लावायची मला गरज नाही.
> इथल्या हिंदुत्ववाद्यांना
> इथल्या हिंदुत्ववाद्यांना श्रद्धाच्या खुनापेक्षा खुनी मुस्लिम असल्याचा झालेला विकृत आनंदही अपेक्षितच.
सहमत. इथे धावत धावत येऊन लिहिण्याआधी एखाद्या देवळात जाऊन मनोभावे नमस्कार करून नारळ वगैरेही फोडत असतील.
मी त्या फ्रीजमध्ये तुकडे
मी त्या फ्रीजमध्ये तुकडे प्रकरणात काही लिहिलं नाही कारण honestly आता मला यामध्ये ते लव्ह जिहाद वगैरे लेबल लावणं पटत नाहीये.
ते दोघे अत्यंत woke होते. पुरोगामी होते. लव्ह जिहादबद्दल इतका awareness गेल्या काही वर्षात आहे तरीही कोणी बाय चॉईस त्या वाटेने जात असेल तर मग त्यासाठी कोणाही मुस्लिम व्यक्तीला किंवा कोणत्या धर्माला दोष देणं योग्य नाही.
त्यामुळे यात राईट विंगर्सनी memes करणं वगैरेही bad taste मध्ये आहे.कशाला यात पडायचं? जे झालं ते तर वाईटच झालं. तितकंच म्हणा आणि move on.
मिम्स सोडा,हे मुसलमान असेच
मिम्स सोडा,हे मुसलमान असेच क्रूर असतात, हलाल खाणारे म्हणून त्यांच्यात असले क्रौय येतं असली मुक्ताफळे सुशिक्षित मित्र उधळतात त्यावेळी काय बोलावे हे कळत नाही
धागा प्रत्येक प्रतिसादागणिक
धागा प्रत्येक प्रतिसादागणिक स्ट्रॉमन आणि व्हॉटअबाऊट्रीच्या कक्षा रुंदावत आहे.
दिल्ली मर्डर केस मधल्या हिंसाचारासाठी मुस्लिम समजाला शिकवणीला जबाबदार धरून त्यांना जाब विचारायचा असेल तर.... ही २०१० मधली केस रेफरंसला घेऊयात का? की ही व्हॉटअबाऊट्री होईल का? नाही म्हणजे कोर्टात असे चालते ना आधी घडून गेलेल्या केसचा/गुन्ह्याचा नव्या केस मध्ये दाखला देणे.
२०१० मध्ये ऊत्तराखंडमध्ये गुलाटी नामक ईसमाने त्याच्या विधीवत लग्न झालेल्या बायकोचे ७० की काय तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. ते दांपत्य ऊच्चशिक्षित, फॉरेन रिटर्न्ड असल्याचे आणि त्यांना एक की दोन मुले असल्याचे सुद्धा बातमीत वाचल्याचे आठवते.
ना ते दोघे वोक कल्चरचे होते, ना नवरा मुस्लिम होता, ना लव जिहादचा मामला होता. (नात्यातल्या तणावातून मर्डर झाला तरी विक्टिम व अक्युज्ड व्यक्तीचे वोक, मुस्लिम, लव जिहाद वगैरे गुणविशेष मॅटर करतात हे फार ईंट्रेस्टिंग आहे.)
गर्लफ्रेंडला चॉप करून मारणारा मुस्लिम तरूण जास्त हिंसक की लग्नाच्या बायकोला आणि आपल्या मुलांच्या आईला मारणारा हिंदू व्यक्ती जास्त हिंसक ठरवू या. ३५ जास्त हिंसक की ७० ही महत्वाची माहिती ध्यानात घेऊ या. त्या हत्येच्या सुतावरून व्हॉटअबाऊट्री करत आपण धर्माचा स्वर्ग गाठूयात.
अशा घटना काँग्रेसच्या राज्यात होतात असे म्हणतांना २०१० मध्ये तिथे सत्तेवर कोण होते हे सुद्धा बघुया.
> ते दोघे अत्यंत woke होते.
> ते दोघे अत्यंत woke होते. पुरोगामी होते.
या दोन शब्दांचा तुम्हाला अर्थ माहित नसेल असे नव्हे. पण जाता जाता पुरोगाम्यांवर एखादा दगड मारायची संधी का सोडाल ?
एखाद्या मुस्लिम नवर्याने आपल्या हिंदू बायकोला मारहाण केली व ती आय सी यू मध्ये आहे अशी बातमी आली तर हिंंदुत्ववादी ती मरावी म्हणून देव पाण्यात घालतील नक्कीच !
Woke पुरोगामी होते हे तर खरंच
Woke पुरोगामी होते हे तर खरंच आहे ना पण. त्या मुलाचे woke इन्स्टाग्राम पोस्ट्स समोर आले आहेत. आणि परधर्मीय मुलांसोबत घरच्यांचा विरोध असताना लिव्ह इन मध्ये राहणारी मुलगी सुधा मूर्तींसारखी जुन्या विचारांची नव्हती हे उघड आहे.
पुढे जी tragedy झाली ते वाईटच आहे. पण त्यामुळे ते पुरोगामी होते हे सत्य का नाकारायचं.
एखाद्या मुस्लिम नवर्याने आपल्या हिंदू बायकोला मारहाण केली व ती आय सी यू मध्ये आहे अशी बातमी आली तर हिंंदुत्ववादी ती मरावी म्हणून देव पाण्यात घालतील नक्कीच !//
हे मात्र तुमचं नेहमीप्रमाणे केवळ स्पेक्युलेशन आहे आणि तेही विकृत. तुमच्या पक्षाच्या लोकांनी प्रत्यक्ष हिंसाचार केला, तुमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्या कृत्याला जाहीर पाठिंबा दिला, त्यावर कारवाई करणाऱ्या सरकारला दोष दिला. तरी त्यांना हिटलर म्हणण्याचा, त्यांचा प्रचार करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकाना नाझी म्हणण्याचा प्रामाणिकपणा तुमच्यात नाही.
तुम्ही फक्त राईट विंगबद्दल 'असं झालं तर, तसं झालं तर' 'ते असं करतील तर, तसं करतील तर' टाईप स्पेक्युलेशन करत राहा. पण आता लोकांना दिसतो तो विरोधाभास.
त्या माणसाला जन्मठेप झाली आणी
त्या माणसाला जन्मठेप झाली आणी मुदतीपूर्वीच एखाद्या निवडणुकीच्या तोंडावर त्याची सुटका झाली तर आम्ही त्याच्या तोंडात पेढे भरवायला धावणार नाही किंवा त्याच्या सुटकेचे whataboutism आणी स्ट्रॉमॅन वगैरे वापरून समर्थन करणार नाही याची खात्री देतो ! पुरोगामित्वाची इतकी बालीश व्याख्या वापरली तर हेमा मालीनी वगैरे अनेक लोक पुरोगामी ठरतील.
त्याची सुटका झाली तर, मग
त्याची सुटका झाली तर, मग आम्ही तसं करणार नाही- हे सगळं पुन्हा स्पेक्युलेशनच.
सध्या उघड हिंसाचार करणाऱ्या व त्याचं थंडपणे समर्थन करणाऱ्या पक्षांचं आणि नेत्यांचं प्रमोशन व समर्थन इथे करत आहात ही झाली फॅक्ट.
नरोदा पाटिया , गुजरात. २००२.
नरोदा पाटिया , गुजरात. २००२. ९७ मुस्लिमांची हत्या. एक आरोपी मनोज कुकरानी . जन्मठेप झाली. मुलगी भाजपतर्फे विधानसभेला उभी. बाप कामिनावर बाहेर . मुलीचा प्रचार करतोय. अमृतकाल.
त्याची सुटका झाली तर, मग
त्याची सुटका झाली तर, मग आम्ही तसं करणार नाही- हे सगळं पुन्हा स्पेक्युलेशनच.
हे स्पेक्युलेशन नाही. बलात्कार्यांचा सत्कार करण्यासाठी लागणारे धाडस आमच्यात नाही.
दोने रुपये वाले ट्रोल्स परवडले. आम्ही बलात्कार समर्थक आहोत हे ते प्रांजळपणे ब अभिमानाने सांगतात
हिंसाचार , बलात्कार हा
हिंसाचार , बलात्कार हा राजमार्ग , तो आम्ही निवडलाय, हे उघडपणे सांगणार्या पक्षाचे समर्थक इतरांना त्यांनी कुठल्याही हिंसाचाराचे समर्थन केलेले नसताना , म्हणजेच स्ट्रॉमनगिरी करून शब्दबाण मारताना फार क्युट दिसतात.
इथे इर्शादच्या context मध्ये-
इथे इर्शादच्या context मध्ये-
तुमच्या लाडक्या पक्षांच्या तुमच्या लाडक्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक- संबंधित व्यक्तीचा अभिमान असल्याचं जाहीर पाठिंब्याचं स्टेटमेंट अधिकृतपणे दिलंय- आणि दुसऱ्याने- संबंधित व्यक्तीला दुसऱ्याचदिवशी आपल्या सोबत अगत्याने यात्रेत स्थान दिलंय- हे हिंसेचं समर्थन, पाठीशी घालणं नाही तर काय आहे?
आणि तुम्ही त्या पक्षांचे इथले प्रचारक आहात. त्यामुळे हिंसेचं वावडं तुम्हाला अजिबात नाही हे तर सिद्ध झालं आहे.
बाकी या धाग्याच्या context मध्ये नसलेल्या तुमच्या पोस्ट इथे इग्नोअर करत आहे.
Pages