इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात तुम्हाला एखाद्या मुस्लिमाचे काळे कृत्य समोर आणले की त्याला defend करायला हिंदूने केलेले कृत्य का आणावे लागते?? मी कधीही म्हटले नाही की सगळे हिंदू धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत किंवा आजपर्यंत सगळेच मुस्लीम वाईट आहेत असेही म्हटलेले नाही. (म्हटले असेल तर screenshot टाका). पण एकूण लोकसंख्येचे प्रमाण आणि गुन्हेगारीचे प्रमाण यांची टक्केवारी पहा ना!

म्हणजे 'हिंदूंची लोकसंख्या सरासरी ८०-८५% आणि त्यापैकी गुन्हेगारी करणारे हिंदू vs मुस्लिमांची लोकसंख्या सरासरी १५% आणि त्यापैकी गुन्हेगारी करणारे मुस्लीम' असा तुलनात्मक अभ्यास करून तो इथे मांडा बरे.

आणि हो, तुम्हाला जर मुस्लीमाने केलेली गुन्हेगारी vs हिंदूने केलेली गुन्हेगारी असेच हवे असेल तर मी हजारो उदाहरणे देऊ शकतो पण समस्या ही आहे की तुम्हाला सनातन प्रभात, सामना, ओप इंडिया, तरुण भारत, पांचजन्य आदी मधील बातम्या चालत नाहीत (आणि इतर मिडिया अशा बातम्या समोर येऊ देत नाही).

जर खरोखर defend करायचेच असेल तर मुस्लिमाने केलेली गुन्हेगारी vs मुस्लिमाने केलेले चांगले कृत्य असे करा ना!!!
--- सहमत ... काही id इथे त्यासाठीच आहेत हे प्रत्यर्षाने जाणवते. आणि या मायबोली चे कर्तेधर्ते सुद्धा अश्याच लोकांना पाठीशी घालते हे सुद्धा तितकेच सत्य आहे.

रश्मी ताई, सही पकडे है!!!
आता RBI कडे RTI टाकावा लागेल!!!
RBI - RTI हे पण मस्त जुळले की!!!!!!!

दिल्लीहून विशाखापट्टणम ला जाणार्‍या 'स्वर्ण जयंती एक्स्प्रेस' मध्ये निवृत्त लष्करी जवानाला मारहाण
सोर्स - Twitter (व्हिडिओ सह)

मनुस्मृतीमध्ये वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांशी संबंधित अपरा धांसाठी वेगवेगळ्या शिक्षा होत्या. पीडित आणि अपराधी व्यक्तीचा वर्ण यानुसार त्या बदलायच्या. तोच अमृतकाल आता येऊ घातला आहे. बलात्कारी ब्राह्मण असेल आणि /किंवा पीडता मुस्लिम असेल तर बलात्कारी आरती ओवाळून , हारतुरे घालून स्वागत होते. आणखीही अनेक उदाहरणे आहेत.
ते अनेक बलात्कारी असतात आणि त्यांनी अनेकांचे खूनही केलेले असतात, हे विशेष.

गोवंडी एस बी आय बद्दल बोलताय का? चक्क शुक्रवारी सुट्टी ठेवलीय म्हणे. >>> अलीकडे बदल झाला असल्यास माहीत नाही. पण गोवंडी - देवनार मध्ये असलेल्या दोन्ही शाखा आधी रविवारी बंद असायच्या.

मनुस्मृतीमध्ये वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांशी संबंधित अपरा धांसाठी वेगवेगळ्या शिक्षा होत्या. पीडित आणि अपराधी व्यक्तीचा वर्ण यानुसार त्या बदलायच्या. तोच अमृतकाल आता येऊ घातला आहे. बलात्कारी ब्राह्मण असेल आणि /किंवा पीडता मुस्लिम असेल तर बलात्कारी आरती ओवाळून , हारतुरे घालून स्वागत होते. आणखीही अनेक उदाहरणे आहेत.
ते अनेक बलात्कारी असतात आणि त्यांनी अनेकांचे खूनही केलेले असतात, हे विशेष.>>>>>>> रिस्पेक्टेड सर तुमचा ब्राह्मणांवर खूपच राग आहे हे माहीत आहे. तरीही आज सारे उच्चवर्णीय हिंदु मनुस्मृतीनुसार चालतात असे बोलणे फारच धाडसाचे होईल नाही का? की चालतात? मनु हा ब्राह्मण नव्हे तर क्षत्रिय होता हे चोथा वेळा सांगुन झालयं. तरीही तुमचे मेरी मुर्गी एकच टांग.

कुठलीही समंजस व्यक्ती हा ब्राह्मण, तो मराठा, हा दलित , तो क्षत्रिय असा भेदभाव बलात्कार्‍यांमध्ये करणार नाही. आणी बलात्कारी हे फासावर लटकवण्याच्याच लायकीचे असतात असे माझे ठाम मत आहे. याला दुसरी शिक्षा नकोच, मग वयाने आरोपी लहान असला तरी त्याला फाशीच द्या. कारण वयान लहान आहे तरी ते कृत्य करतांना त्याचे वय त्याला आठवत नाही का? मग खड्ड्यात घाला ती मनुस्मृती. भारतीय कायदा हा सर्वोच्च. त्या बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीच्या कृत्याचा कितीही निषेध करावा तितका कमीच आहे. त्याचे स्वागत करणे पण विकृतीच आहे, मग ते कोणी का असेनात.

सुसु ताई, आर्यनला अटक झाल्यावर , मी पण एक आई आहे असे म्हणत रडल्या होत्या.श्रद्धा प्रकरणात अवाक्षर नाही. पप्पा रागवले की काय? Uhoh

बाय द वे, शरीयत नुसार बलात्कार्‍याला ठेचुन मारतात म्हणे.

आदरणीय रश्मीजी,

१ माझी पोस्ट सुटी वाचू नका. वर सूर्या यांनी आधीच्या एका पोस्टमधला मजकूर उद्धृत करून त्याला दुजोरा दिला आहे. त्या पोस्टचा अर्थ मुस्लिमांनी केलेले गुन्हे हे मुस्लिमांनी केलेत असं समजून त्याच्याकडे बघा असा मला लागला. तशाच प्रकारचे गुन्हे हिंदूही करतात. श्रद्धासारख्याच दोन घटना याच महिन्यात घडल्यात. तिथे आरोपी हिंदू आहे. मागच्या पानावर मी अशाच एका बातमीची लिंक दिली आहे. त्याबद्दल तुम्हां मंडळींना त्रास झाल्याचे दिसत नाही. इथे फक्त आरोपी मुस्लिम आहे म्हणून तुमचा कळवळा जागा झाला का?

२ दिलेल्या उत्तराचा संदर्भ हा आहे. तुमच्या वाचनात आला नसेल किंवा स्मरणातून सुटला असेल.
https://www.hindustantimes.com/india-news/now-bjp-mla-says-bilkis-bano-s...
They are good people – Brahmins. And Brahmins are known to have good ‘sanskaar’. It might have been someone's ill intention to corner and punish them," the MLA said,

३ कथुआमध्ये लहानग्या आसिफावर बलात्कार करणार्‍यांच्या समर्थनार्थ भाजप मंत्र्यांनी मोर्चे काढले होते. हिंदुत्ववाद्यांनी ट्विटर ट्रेंड्स चालवले होते. तेव्हा तुमचे हे धडे तुम्ही तुमच्या आवडत्या पक्षाला द्या किंवा तो पक्ष आता नावडता झाला असे जाहीर करून तशी कृती करा.

४ माझ्या पोस्टमध्ये मी न लिहिलेल्या गोष्टी तुम्ही वाचल्यात किंवा तसे अर्थ लावलेत, तर तो दोष माझा नाही.

५ आज उमर खालिद दोन वर्षे तुरुंगात आहे आणि गोली मारो अशी घोषणा देणार्‍या भाजप मंत्र्यावर साधी केसही नाही. अशी अनेक उदाहरणे देऊ शकेन. हे मनुस्मृतीसारखंच झालं . त्यात वर्णाच्या जागी धर्म आणि विचारसरणी आली.

६ आर्यनची अटक चूक होती, त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नव्हता, असं न्यायालयाने म्हटलं. तुम्ही त्याला तेव्हा दोषी ठरवून मोकळ्या झाला होता. त्याबद्दल तुम्ही खेद व्यक्त केलात का?
श्रद्धा प्रकरणात आरोपीला अटक झाली. चौकशी होते आहे. याबद्दल बोलायची गरज काय? जर पोलिस गुन्हा नोंदवून घेत नसतील, आरोपीला अटक करत नसतील, उलट पीडित लोकांवर दबाव आणत असतील तर बोलायची गरज असते. उदा : उन्नाव, हाथरस, कथुआ.
निर्भया , कोपर्डी यासारखे प्रकार तेव्हा पहिल्यांदाच समोर आले होते, त्यामुळे त्यावर मिडिया - लोक बोलले. इथे श्रद्धासारख्याच आणखीही केसेस आहेत. पण मीडिया फक्त हीच केस का उचलून धरतंय?

श्रद्धा ची हत्या झाल्याचा रश्मी ताईंना फारच आनंद झालेला दिसतो !

या प्रकरणावर सुप्रिया सुळे (किंवा अन्य कोणी) प्रतिक्रिया दिलाच पाहिजे हा आग्रह चुकिचा आहे. एका गुन्हेगाराने गुन्हा केला आहे, तपास सुरू आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर नक्कीच प्रतिक्रिया द्यावी.

श्रद्धा ची हत्या झाल्याचा रश्मी ताईंना फारच आनंद झालेला दिसतो...
असा विकृत विचार तुमच्याच मनात येऊ शकतो.

आम्हांला खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा एकही हिंदू मुलगी 'लव्ह जिहाद'ला बळी पडणार नाही.

भाजपचे मोठे नेते शाहनवाझ हुसेन ह्यांनी पक्षात राहून, केंद्रीय पद भुषवून, विचारसरणीच्या नाकावर टिच्चून केला की लव्ह जिहाद... मग कुठे दु:ख व्यक्त केले बरं तुम्ही?

श्रद्धा ची हत्या झाल्याचा रश्मी ताईंना फारच आनंद झालेला दिसतो !
नवीन Submitted by vijaykulkarni on 22 November, 2022 - 21:47

रश्मी ताई आणि वि_मु जुळी भावंड असावीत का?
नवीन Submitted by भ्रमर on 22 November, 2022

झालं यांचं ad hominem सुरू. इथे या धाग्यावर तरी हे करू नका ना. इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तत्सम गोष्टींवर चर्चा असू द्यात.

भाजपचे मोठे नेते शाहनवाझ हुसेन ह्यांनी पक्षात राहून, केंद्रीय पद भुषवून, विचारसरणीच्या नाकावर टिच्चून केला की लव्ह जिहाद... मग कुठे दु:ख व्यक्त केले बरं तुम्ही?>>>
इंटरनेटवरील माहितीनुसार त्यांचा विवाह १२ डिसेंबर १९९४ ला झाला. १९९४ मध्ये मी सुमारे ५ वर्षांचा होतो!!! आणि तेव्हा कोणत्याच हिंदुत्ववादी संघटनेला 'लव्ह जिहाद' या कारस्थानाचा सुगावा लागला नसेल ! (जरी ते आधीपासूनच सुरु असले तरी)

खरा लव्ह जिहाद धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी केला.>>>
मला चित्रपट क्षेत्राविषयी फारशी माहिती नाही पण आत्ताच इंटरनेटवर शोधले त्यानुसार धर्मेंद्र यांचे एक लग्न झाले होते (हिंदू असतांना) आणि त्यांना पहिल्या पत्नीस सोडायचेही नव्हते परंतु हेमा यांनाही दूर करायचे नव्हते. आणि हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असतांना तिला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही म्हणून त्यांनी धर्म बदलला आणि ते मुस्लीम झाले. कारण मुस्लीम विवाह कायद्यात एक पुरुष एका वेळी ४ पत्नीसोबत संसार करू शकतो.
याला 'लव्ह जिहाद' म्हणणे तितकेसे योग्य नाही कारण परधर्मीय (हिंदू) स्त्रीला आपल्या (मुस्लीम) धर्मात आणण्यासाठी प्रेमाच्या जाळ्याचा वापर झालेला नाही. याला खरेतर 'धर्माभिमानाचा अभाव' तसेच 'कायद्यातील पळवाटांंचा फायदा घेणे' म्हणता येईल. एकीकडे कल्पनाही करवत नाही, वाचले तरी अंगावर काटा उभा राहतो अशा मरणप्राय यातना तब्बल ४० दिवस सोसूनही आपला धर्म न बदलणारे 'धर्मवीर संभाजी महाराज' आणि दुसरीकडे.....

इंटरनेटवरील माहितीनुसार त्यांचा विवाह १२ डिसेंबर १९९४ ला झाला. १९९४ मध्ये मी सुमारे ५ वर्षांचा होतो!!! आणि >> तुम्ही नेहरू, गांधी, आंबेडकरांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल लहान सहान गोष्टी ऐरणीवर आणून अधिकारवाणीने जनजागरण करता तर शाहनवाझ हुसेनांच्या बाबतीत मी ५ वर्षांचा होतो वगैरे कारण का द्यावे लागावे बरं.

तेव्हा कोणत्याच हिंदुत्ववादी संघटनेला 'लव्ह जिहाद' या कारस्थानाचा सुगावा लागला नसेल ! (जरी ते आधीपासूनच सुरु असले तरी) >> आणि असा सुगावा धर्माचे राजकारण करणारे जहाल हिंदुत्ववादी सत्तेत आल्यावरच लागला हे फारच सोयीचे झाले नाही का?

बरं ठीक आहे तेव्हा हुसेनांच्या लव्ह जिहाद बद्दल दु:ख/निषेध व्यक्त करता आले नाही, आता तर करता येईल. करून टाका पाहू.

आणि हे जिहादी आणि त्यांचा अजेंडा जगासमोर मांडून हिंदूंचे ऊत्थान करण्याचे काम हिंदुत्ववाद्यांनी आपल्या घरातून/ पक्षातूनच सुरू करावे की. हुसेनांसारखी अनेक ऊदाहरणे सापडतील आणि पुढे बळी जाऊ घातलेल्या अनेक श्रद्धांना वेळीच वाचवता येईल.

वि मु, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीवर अन्याय झाला की नाही?
धर्मेंद्र आणि हेमामालिनी हे दोघेही भाजपचे खासदार आहेत /होते. म्हणजे भाजपने या प्रकाराला समर्थन दिले ना? ही गोष्ट तुम्हांला माहीत नव्हती म्हणजे तुमचे वाचन किती एकांगी आहे आणि तुम्ही जे वाचता ते पुरवणारे किती एकांगी आहेत ते दिसते. त्यामुळेच तुमच्यापुढे एकांगी चित्र निर्माण करून द्वेषाची पेरणी केली जाते,. बघा विचार करून.

<आम्हांला खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा एकही हिंदू मुलगी 'लव्ह जिहाद'ला बळी पडणार नाही.> एकही स्त्री पुरुषी अत्याचाराला बळी पडणार नाही. - असं मी म्हणेन.

आधी ते आले...मुस्लिम मुलाशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलींसाठी.
नंतर ते आले क्रिस्टीयन "". "". "'. ""
"". "". बौद्ध. "' " ". ". ". "" " "
". ". " """" हिंदू ओ बी सी
हिंदू मराठा
""'""'' ब्राह्मण. मुस्लिम
कम्युनिस्ट लोकांसाठी
लिब्रांडू. " "
आता ते आलेत, ..................... माझ्यासाठी.

..

कोणाकडे जनयुग नावाचे साप्ताहिक येते का? (कोकणातील मालवण मधून प्रसिद्ध होणारे एक लोकल साप्ताहिक आहे, परंतु वर्गणीदार असल्यास अगदी मुंबईतही पोस्टाने येते.)
त्याच जनयुगच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात 'शहामृग' नावाची एक कथा आहे, अंक मिळाल्यास नक्की वाचा. (पृष्ठ क्रमांक ८०)
मला त्यातील सर्वात शेवटचे वाक्य खूप आवडले.
शहामृगाने वाळूत तोंड खुपसले म्हणून वादळे यायची थांबत नसतात!!!

> रिस्पेक्टेड सर तुमचा ब्राह्मणांवर खूपच राग आहे हे माहीत आहे.
हे खोटे आहे. मी ब्राह्मण आहे आणी त्यांचा माझ्यावर राग वगैरे नाही. आगरकर, दाभोलकर वगैरेंवरही राग नाही.
> तरीही आज सारे उच्चवर्णीय हिंदु मनुस्मृतीनुसार चालतात असे बोलणे फारच धाडसाचे होईल नाही का?
राजस्थान हायकोर्टा च्या आवारात त एक पुतळा १९८९ मध्ये बसवला गेला. कोणाचा होता बरे तो ? आंबेडकरांचा? राजस्थानात होऊन गेलेल्या एखाद्या सुधारकाचा? सारे उच्चवर्णीय हिंदु नसतील, पण हिंदुत्ववादी मात्र नक्कीच मनुबद्दल nostalgic असतात.
> मनु हा ब्राह्मण नव्हे तर क्षत्रिय होता हे चोथा वेळा सांगुन झालयं. तरीही तुमचे मेरी मुर्गी एकच टांग.
याचा काय संबंध ? क्षत्रियांनी लिहिलेले सारे काही पाळलेच पाहिजे का ? मुळात मनु नावाचा एकच कुणीतरी होता आणी त्याने मनुस्मृती एक टाकी लिहून काढली हेही खरे नसावे.


सुसु ताई, आर्यनला अटक झाल्यावर , मी पण एक आई आहे असे म्हणत रडल्या होत्या.श्रद्धा प्रकरणात अवाक्षर नाही. पप्पा रागवले की काय? >>>>>>

https://www.abplive.com/states/maharashtra/nationalist-congress-party-le...

वैनींनी इथे काही लिहिले आहे आणि ते खरं निघालं आहे असे फार कमी वेळा होते नै.
किती वेळा तोंडघशी पडणं ते

बाळ झंपु जेव्हा बरीच टीका तेव्हा सुसु ताई बोलल्या. सुसु ताईच काय चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, वायंदे बाई, पेडणेकर बाई, अंधारे बाई अश्या विवीध पक्षीय राण्या त्यांच्या वर टीका होते तेव्हा तोंड उघडतात. आधी हे सर्व पक्षीय कुठे डुलक्या घेत असतात माहीत नाही.

भरत, तुमच्याशी या बाबतीत सहमत आहे की अजूनही भाजपने ( किंवा केंद्र सरकारने ) ज्या ठोस प्रमाणात अ‍ॅक्शन घ्या यला हवी होती ती घेतली नाही. अश्या पद्धतीने मविआ सरकार सुद्धा वागले आहे.

विकु, आपण लहानपणी वा तारुण्यात बरेच झोके खेळतो, पण काय आहे ना, वयाच्या चाळिशी नंतर ते जरा जड जाते. डोक्याला मार लागला की मग जाम पंचाईत होते. श्रद्धा असो वा अन्य कन्या जी मुस्लिम तरुणाबरोबर पळुन गेलीय, तिचे हाल झाले तर मला आनंद होईल किंवा झालाय हे तुमचे विधान निव्वळ खोडसाळपणाचे आणी विकृत आहे. मला पण मुलगी आहे. इथे मी सुसुताईंबद्दल लिहीले ते तुम्हाला का झोंबले कळले नाही?

मुस्लिमच काय इथे ( बंगाल व दिल्ली मध्ये ) हिंदु व्यक्तींनी सुद्धा स्वतःच्या बायकोला , बापाला मारुन टाकले आहे. यात काय आले हिंदु मुस्लिम? खुनी तो खुनीच. एका हिंदु बाईने तर चक्क नवर्‍याला गळा दाबुन जीव घेतला. मग हा काय लव्ह जिहाद होता का?

राजस्थान मध्ये तुमचे कॉम्गी सरकार आहे, मग तिथे मनुचा पुतळा का उभारु दिला? पाडा की तो मग आता. ज्या काळात क्षत्रियांचे प्राबल्य होते, त्या काळा मध्ये जर ते बाष्कळा सारखे काहीही लिहीत असतील, तर त्याला बाकी जबाबदार कसे? भारताचे लोक ते बघुन घेतील. तुम्ही आधी तुमच्या अम्रीकेतले प्रश्न सोडवा. कोणीही उठते आणी धाड धाड गोळ्या घालुन निरपराधांना उडवते. आधी त्याच्यावर काहीतरी करा मग इथले प्रश्न सोडवा.

एका हिंदु बाईने तर चक्क नवर्‍याला गळा दाबुन जीव घेतला.
बाबो. अहिल्येने गौतमाचा बदला घेतला की काय?
वैनी असली विधाने करू नका. काही लोक असा निष्कर्ष काढतील की सर्व हिंदू स्त्रिया हिसंक असतात.
बाकी, पुढच्यावेळी सर्व स्त्री राजकारण्यांनी निषेध त्वरित नोंदवावा आणि वैनींची पोचपावती घ्यावी.

लोकहो,
हा धागा गेल्या वर्षीच्या दिवाळीत संदिप खरे यांनी कार्यक्रमाला इर्शाद नाव दिले नि त्यावर, उपासाला बटाटे खाणारे लोक, दिवाळीला फटाके उडवणारे, लोक भडकले न्हणून सुरु झाला ना?
च्यायला सगळे ढोंगी हो! इर्शाद सोड, इतर किती परभाषातील शब्द रोज वापरतात.
मग हा हिंदू मुस्लिम वाद इथे कशाला? दुसरा धागा काढा ना!

आमच्या ,दिवाळीसारख्या अतिशय मंगल सणा निमित्त्य होणाऱ्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला तशीच सांस्कृतिक नावे असावीत की अन्य भाषिक नावे चालतील, अन्य धर्मीय ज्या भाषेत प्रामुख्याने व्यक्त होतात त्या भाषेतले म्हणजे ' त्यांच्या ' भाषेतले नाव अशा मंगल प्रसंगी आम्हाला चालणार नाही. ह्यावरून गदारोळ झाला. ही हिंदू आणि मुस्लिम अशी धार्मिक तेढ होती.

Pages