वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hit & Run.... नेफि... High Octane वाली आहे... फाउदाचा नायक इथेही नायक आहे.. पहिला सिझन पाहीला.. आवडला...

गुल्लक मस्तच आहे. सगळी लोक छान आहेत.
ती आई उगाचच सोशिक वगैरे नाही.एकदम खमकी आहे.
गोष्टी पण छान आहेत, उगाच रडवणार्या नाहीत.

The good doctor चा ४ सीझन Sony Liv वर आहे.. सुरुवातीचे २ एपिसोड कोविड बद्दल आहेत

ओके
सोनी लिव्ह वर पेड असेल ना?
बघू नेटफ्लिक्स वर येईलच काही महिन्यात चौथा सिझन.

गूड डॉक्टर - दुसरा सीजनही नॉनस्टॉप उरकला.. तोच फ्लो आहे, तेवढीच मजा आली.
दुसरा संपताच त्यानंतर तिसराही आहे हे बघून बायको आनंदीत झाली. मी लगेहाथ तिला चौथाही भारताबाहेर आलाय ही बातमी दिली. बातमीचा सोर्स मायबोली सांगितला. तिलाही बरे वाटले. आपला नवरा ऑनलाईन उकीरडे फुंकायला जात नाही हे कळले Happy

<<<<<<
इथे पण शॉन च्या वागण्या बद्दल, लिमिटेशन्स बद्दल घोळ आहेच सुरुवातीला. प्रश्न उत्तर कधी देतो कधी नाही, स्पर्श कधी आवडतो कधी नाही.अर्थात ऑटिझम हा समजायला खूप मोठा एरिया असल्याने तितके जस्टीफाईड आहे.
>>>>>>

त्याच्याच तोंडी एक डायलॉग आहे, वुई ऑल आर नॉट सेम
त्याचेच डायलॉग मला छान समजतात, सबटायटल्स न वाचता Happy

House MD सोडून आता Good doctor बघायला घेतली आहे.
Presentation मध्ये House पेक्षा फारच उजवी वाटली. त्यांचे कपडे , O.R मधल्या surgeries House पेक्षा जास्त realistic वाटल्या.
यातही तो dr . Melendez arrogant आहे, पण तो एकदम professional वाटतो. Dr. Andrew पण.

नवरस चांगली हाताळणी. सर्वच गोष्टी काही छान नाहित, काही छान आहेत Happy
मणीरत्नम, ए आर रेहमान यांची नावे पाहून बघायला घेतली.

‘गुड डॉक्टर‘ आमच्या नेटप्लिक्सवर दिसत नाही नेमकी. तिथेच ‘वॉकिंग डेड‘ मालिकेचे तब्बल १० सिजन दिसत आहेत. चांगली आहे का इतकी?

मी reign मालिका बर्‍याच दिवसांपासून पहात होते जी मला फार म्हणजे फारच आवडली. (२०१३-२०१७ ची आहे म्हणजी मीच शेवटची असेन पहाणारी). स्कॉटलंड, फ्रांस व इंग्लंड हेच जग झाले होते काही काळ. मेरी, कॅथरीन, नार्सिस.. काय कामं केलीयेत या लोकांनी. मेरी झालेली किती सुंदर दिसते! खरीखुरी राणी शोभते. यात खरा इतिहास नाही पण एकुणच राजे राण्या व त्यांचे आयुष्य म्हणजे शांतता, सुख नाहीच. सतत जीवाची धास्ती, राज्यावर कोण कधी चालुन येईल, कोण घरभेदी निघेल त्याची धास्ती, कारस्थानं, कारवाया, लग्न म्हणजे फक्त राज्याचे भले कसे होईल ते पाहुन केलेली तडजोड. (आपण सामान्य आहोत ते किती बरं आहे ही जाणीवही होते हे पाहुन).
खूपच रितेपणा आलाय मालिका संपल्यावर. कसलीतरी हूरहूर लागलीये इतिहासातुन वर्तमानकाळात आल्यावर.
आता नवी ऐतिहासिक मालिकाच पहावीशी वाटते आहे.

चांगली आहे का इतकी?
>>>>
ईतकीचे माहीत नाही, पण हो चांगली तर आहे. कारण आठवड्याभरात आज आम्ही तिसरा सीजनही संपवला Happy
माझी आठवड्याभराची सुट्टी धारातिर्थी पडली. पोरगीही आजोळी गेल्याने पोरांचेही टेंशन नव्हते या आठवड्यात. पण तरीही ५५ वगैरे एपिसोड म्हणजे खूपच पाहिले..
तरी माझे तिसर्‍या सीजनचे अधूनमधून काही एपिसोड डोक्याचे सॅच्युरेशन झाल्याने तुटक बघणे झाले. कारण बायकोला म्हटले जरा ब्रेक घे तर तयारच नव्हती. अ‍ॅडीक्शन लागल्यासारखे बघत होती.
शेवटचे दोन एपिसोड मात्र मी पुर्ण बघितले. भूकंप झाला. काही मेले. काही जगले. हिरोची तर लाईफ बनली. एकूणात हॅपनिंग होते.
त्यानंतर बायको लगेच चौथा सीजन बघायला सोनी लाईव्हचे सबस्क्रिप्शन घेत होती, महिन्याचे ३०० की काहीतरी, . मीच हात जोडून गयावया करून पुढच्या विकेंडला बघूया म्हटले Happy

आता नवी ऐतिहासिक मालिकाच पहावीशी वाटते आहे. >>>> मग Bridgerton पहायला सुचवेन. काल्पनिक आहे. मी याच धाग्यावर या मालिकेबद्दल लिहिलं होतं.

हो, प्राईम वर आहे हे आताच पाहिलं
4था सिझन नेटफ्लिक्स आणि प्राईम वर नाही.लिव्ह वर असेल तर मी तेवढ्या साठी सबस्क्रिप्शन घेणार नाहीये Happy (आय ड्रीम ऑफ जिनी साठी कितीही घ्यावं वाटलं तरी.युट्युब वरचे एपिसोड अतिशय घाण आवाज आणि दृश्य वाले असतात.)

गुड डॉक्टर चा हिरो चार्ली अ‍ॅड चॉकलेट फॅक्टरीत पण होता. त्यात त्याने गरीब मुलाचे बेअरींग पकडले आहे. तेच बेअरींग ह्यात पण ठेवले आहे असे वाटते.

Good doctor सुरू केलीये बघायला, पण एक फारच बेसिक भाबडा प्रश्न पडलाय, एकाच डॉक्टरला सगळ्या प्रकारच्या सर्जरींचं नॉलेज असतं?? सगळीकडे तो एकटाच लढतोय आपला , मेलेंडेज , म्हणजे as a lead. ये डॉक्टर है या भगवान ?

गुल्लक दोन्ही सिझन बघुन झाले. फार आवडली. अगदी बिट्टू की मम्मी सकट Lol
ती गितांजली कुलकर्णी म्हणजे अतुल कुलकर्णी ची बायको ना? मस्त काम केलं आहे. तिला कधी याआधी कोणत्या पिक्चर मध्ये वगैरे बघितलं नाहीये. पण तिची सततची चिडचिडी आई, बायको नंतर जरा बोर झाली. बाकी सगळी मस्तच आहे एकदम.

>>पण तिची सततची चिडचिडी आई, बायको नंतर जरा बोर झाली.
+१ कधी तरी थोडं सुखानी घ्यायच्या की गोष्टी. सततची कडकड बरी नाही वाटत. इतकीही काही ती दु:खात जगत नाहीये.

गुल्लक बघायला मस्त आहे एकदम. हिंदीतपण staircase ला "जिना" म्हणतात हे नविन कळलं. सिडीयाँ माहित होतं.

मेलेंडेज , म्हणजे as a lead. ये डॉक्टर है या भगवान ? >>>> exactly . मलाही हाच प्रश्न पडला. आणि dr.Andrew सांगतो , he is best cardiac surgeon. पण तो brain surgeries पण करतो.
But he is best . जाम आवडला मला. He is arrogant but professional and thorough "

"Whatever happens in this room is my responsibility" आणि शेवटी त्या रिझविक ला subtlely ऐकवतो
तो एपि जाम आवडला.
हे सगळं , house Md मध्ये missing होतं.
त्याची team कधी team वाटलीच नाही.

थँक्स ऋन्मेष. तुमचा मालिका पहायचा वेग अफाट आहे.
मीर, Bridgerton बद्दल (बहुतेक) भलंबुरं ऐकलं होतं म्हणून पाहिली नाही अजुन.

स्वस्ती प्राईम माझ्याकडे नाही.

खरंतर प्राईम इतके फेमस आहे पण मला user-friendly वाटत नाही. नुसती गिचमिड असते. खच्चून माल नुसता भरून ठेवलाय ज्याचा उपयोग करून घेताच येत नाही. धड काही सापडत नाही. recommended based on watch history बेकार काहीतरी असतं. कशाचा कशाला संबंध जोडतात देवजाणे. अजुनही कारणं निघतील पण साराभाईची माया बनत नाही. Happy Happy त्यामुळे कधीकधी ते एक महिन फुकट ऑफर देतात तेव्हा घेते व पहाते एकदम. मागच्या वर्षी माँक इतके पाहिले की इंटरनेट वापर खूप जास्त झाल्याची वार्निंग आली. Proud

नेटप्लिक्स मस्त. भन्नाट interactive app आहे ते.

अजुनही नवी मालिका पहायला सुरु नाही केली. एक युट्युबवर मुक्ता बर्वे आहे म्हणून पहात आहे. बरी आहे, फार खास अजुन तरी नाही वाटली.

हाउस एमडी चे आठही सिझन कॉम्प्युटर मध्ये सेव्ह केले होते. 2018 मध्ये बघितले त्यापैकी पाच की सहा सिझन. त्याची टिम सगळी बदलल्यावर मला कंटाळा आला बघायचा. पण मी त्याची जबरदस्त फॅन होते. Everybody lies. हे त्याचं आवडतं वाक्य. आता मला कोणाची नावही आठवत नाहीत. नंतर सुटस् पण असंच कॉम्प्युटर वर सेव्ह करून बघितले आठ कि न ऊ सिझन. हार्वी स्पेक्टर आणि माईक. पण मी ऑनलाईन काही बघत नव्हते. माझा मुलगा कॉपी करून आणायचा. आता नेटफ्लिक्स घेतलं. लॉकडाऊन मध्ये.
मी अजून एका वेब सिरीज चं नाव आठवतेय. हिंदी होती. रायटर डायरेक्टर च मेन हिरो होता. लिव्ह इन रिलेशन मध्ये राहात असतात नंतर लग्न करतात. हिरोइनच्या वडलांना पण लग्न करायचं असत. असरानी आहे त्यात मुलाचा आजोबा. चांगली धमाल होती सिरीयल.

नेटप्लिक्स मस्त. भन्नाट interactive app आहे ते.>>>>>>> भारतात नेटफ्लीक्स चे चार्जेस किती आहेत?? टिव्हीवर हवं असेल.

But he is best . जाम आवडला मला. He is arrogant but professional and thorough " >>>> येस् . मलाही आवडला उत्तम अभिनय आहे. त्याची पूर्ण टीमच आवडतेय. डॉ. शॉन मर्फी तर मर्फीच्या बाळासारखे गोड आहेत Happy

मर्फी खरंच क्युट आहे.
आय ऍम अ सर्जन वाल्या सीन मध्ये(त्याला पॅथॉलॉजी लॅब ला ट्रान्स्फर करणारा बॉस) त्याचा अभिनय खूप सुंदर आहे.
आश्चर्य असं की हाऊस एमडी आणि हा मर्फी, डेव्हिड शोर च्या दोन्ही अमेरिकन सिरीज मध्ये उत्तम अभिनय करणारे मूळ लीड ब्रिटिश आहेत.

हाऊस एमडी थोड्या निगेटिव्ह स्वभावांवर भर देऊन आहे.
गुड डॉक्टर मधली अगदी निगेटिव्ह वागणारी माणसं पण बरीचशी सभ्य आहेत.

Pages