वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सद्ध्या फॅमिली मॅन सीझन १ बघत होते..तसंही पुण्याला गेले तेव्हा सगळ्या च सिरीज ना ब्रेक लागला. काहीच बघत नव्हते. (टिव्ही सोडून Lol ) रविवार पासून फॅमिली मॅन सुरू करून संपवला. आता सावकाश दुसरा सिझन बघीन

नेफिवर "रे" नांवाची चार एपिसोडची लिमिटेड सिरीज आली आहे. सत्यजीत रे यांच्या शॉर्ट स्टोरीजवर आधारीत आहे. तिन ठिकठाक आहेत, एक मात्र आउडस्टँडिंग - मनोज बाजपेयीची. जरुर बघा...

ग्रहण बघितली दोन बैठकीत. जबरदस्त आहे. चौरासी ह्या कादंबरीवर आधारित आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांची जी कत्तल झाली त्या कालखंडात बिहार (सध्या झारखंड) मध्ये झालेल्या कत्तलीचा धागा राजकारणामुळे पुन्हा जागवला जातो त्याचे ग्रहण एका शीख महिला पोलीस अधिकाऱ्यांवर कसे झाकोळते त्याचे प्रत्ययकारी चित्रण आहे.
अतिशय सुंदर अशी लव्हस्टोरी आहे फ्लॅशबॅक मध्ये. १९८४ चां काळ व्यवस्थित उभा केला आहे(एका ठिकाणचे फ्लेक्स वगळता) वासेपुरमधील नवाज हुमाची लव्हस्टोरी आठवते.
राजकारणी, त्यांच्या निर्दय चाली, माणसे आणि त्यांचे वेगवेगळे रंग, पोलीस असे नेहमीचे यशस्वी घटक असतानाही कथेची बांधणी सुरेख. सस्पेन्स शेवटापर्यंत टिकवून ठेवला आहे.
कलाकार मांदियाळीत पवन मल्होत्रा हे एकमेव परिचित नाव त्याला सवयीची अशी शीख पित्याची भूमिका कमी बोलून जगला आहे. अनुराग कश्यप ची फाईंड झोया हसन मुख्य भूमिकेत आहे. ती आणि व्यामिका गब्बी आणि अजून कुणी आयुष्यमान म्हणून आहे त्यांचा अभिनय दृष्ट लागण्याजोगा. एकदा अवश्य बघण्याजोगी सिरीज.

रे मस्त आहे. फर्गेट मी नॉट, शेवटाला जरासा अंदाज येतो पण बांन्ध्णी मस्त आहे कथेची.
बहुरूपी मला सर्वात जास्त आवडली, केके मेनन इज व्हेरी अंडररेटेड. जबरदस्त भाव आणतो डोळ्यात आणि कॅरॅक्टर मधे पुर्ण घूसून अभिनय करतो. शेवट अतर्क्य असला तरी रूपक आहे..
मनोज वाजपायी कथा साधी आहे पण सशक्त अभिनेते आणि प्लॉट चेंज अवाक करतात. मवा च्या कॅलीबर च्या मानाने त्याच्यासाठी हा रोल एकदम सोपा आहे असे वाटले..
स्पॉट्लाईट कथा एकदम वेगळी आहे, अनिल क. च्या मुलाने चांगले काम केलेय पण शेवट अतर्क्य आहे अगदीच.. हर्षवर्धन ची चित्रपट चॉइस आणि अभिनय त्याच्या बहिणी पेक्षा उजवी आहे..

रे बघतेय. मस्त आहे. छोट्या मोठ्या भूमिकांमधे चांगले चांगले कलाकार आहेत. एकून स्टोरी टेलिंग, डायरेक्शन पण हट के वाटले मला. केके आणि मनोज वाजपेयी च्या गोष्टी खूप आवडल्या.

खूप उशिरा चालू केले, पण ब्लॅकलिस्ट फायनली काल बघायला घेतली.. एका झटक्यात ६ एपि सम्पवले.. रेड चे कॅरॅक्टर एकदम भारी आहे. ८ सीझन्स आहेत..विकी न बघण्यासाठी फार कष्ट घ्यायला लागतायेत. सस्पेन्स छान बिल्ड केलाय.

कलाकार मांदियाळीत पवन मल्होत्रा हे एकमेव परिचित नाव त्याला सवयीची अशी शीख पित्याची भूमिका कमी बोलून जगला आहे. अनुराग कश्यप ची फाईंड झोया हसन मुख्य भूमिकेत आहे. ती आणि व्यामिका गब्बी आणि अजून कुणी आयुष्यमान म्हणून आहे त्यांचा अभिनय दृष्ट लागण्याजोगा. एकदा अवश्य बघण्याजोगी सिरीज.
<<
ती ‘झोया हसन’ असेल असं वाटलच नव्हतं, एकदम ऑथेंटिक ‘सरदारनी’ पर्सनॅलिटी आहे , तिचा आणि पवन मल्होत्राचा अभिनय आवडला, चांगली आहे सिरीज !

अथेना, ब्लॅकलिस्ट माझी फेवरीट सीरीज आहे . मी आता ९ व्या सिझनची वाट बघतेय. जेम्स स्पेडरने रेंमंड रेडीग्टन मस्त साकारलाय. त्याखालोखाल मला आरामच पात्र निभवणारा अभिनेता आवडतो.

ग्रहण बघतेय..जबरदस्त आहे एकदम..
पाच भाग झालेत.. खुप वाईट वाटतयं तेव्हाची परिस्थिती पाहून.. मग थोडा ब्रेक घेतला..
आता परत सुरु ..

ग्रहण बघतेय..जबरदस्त आहे एकदम..
पाच भाग झालेत.. खुप वाईट वाटतयं तेव्हाची परिस्थिती पाहून.. मग थोडा ब्रेक घेतला..
आता परत सुरु ..>>>>> सेम

ग्रहण डीप्रेसिंग आहे का?.. .. नाही.. पण बघितल्यावर वाईट नक्की वाटते..
आत्ताच पाहून संपवली.. सुन्न झालं एकदम..
सिरीज मात्र जबरदस्त..! कलाकार..कथा, अभिनय, पार्श्व संगीत, डायरेक्श्न .. सगळच छान..! त्यावेळचा काळ मस्त उभा केलाय.. .!
सस्पेन्स शेवटापर्यंत टिकवून ठेवला आहे..एकदा अवश्य पहाच...!
ग्रहण..आवडली..

समांतर - २ बघतोय. ठीक आहे. मराठीत इतक्या बोल्ड दृश्याची गरज आहे का? काहींसाठी पर्वणी असेल म्हणा. पण मराठी कथेत जराही श्रृंगार चालत नसलेल्यांना हे कसे चालेल?
सई साठी नवीन नाही पण तेजस्विनी कडून अशी दृश्ये पाहताना अवघडलेपण जाणवतं.
मुलांसमोर चुकूनही पाहू नये.

ओके शा मा
आम्ही वीकेंड ला फॅमिली व्ह्यू ठरवत होतो.
आता मुलांना अँग्री बर्डस लावून दुसरीकडे पाठवून बघू.
ती दृष्य 'आम्ही पण काय कमी नाय, बघा मराठीचं पण मिरझापूर केलं' वाटतात.

समांतर ही कथाच इतकी सशक्त आहे की अशा प्रकारच्या पब्लिसिटी स्टंट ची गरज नव्हती. लोक खोळंबून राहिले आहेत. ही मालिका या दृष्यांमुळे गाजली तर कथेवर अन्याय होणार आहे. मिर्झापूर मध्ये ती गरज म्हणून ठीक आहेत.
यावरून वाद पेटवणे वगैरे सर्व खेळ होतीलच. ऋन्मेष टेक्नॉलॉजी!

कथेतल्या सई च्या रोल ला थोडीफार बेड सीन्स ची गरज लागेल कथेत.
पण तरीही सूचकता आणि मुद्दाम रंगवून रंगवून जास्तीत जास्त ड्युरेशन चा प्रदीर्घ सीन करणे यात फरक.

कथा खूप ताणली आहे, लवकर पुढे सरकत नाही.
अर्थात एका चांगल्या सशक्त कथेवर वेब सिरीज बनली या आनंदात बाकी सगळं पचवून घेतो,वरुन खालून, वाइड, झूम इन झूम आउट कॅमेरा शॉट अगदी साध्या घटनेला वगैरे Happy

Pages