वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समांतर वरचा आजचा वाचलेला जोक!
"समांतर सिरीजचा genre हॉरर आहे म्हणे"
.
.
.
"नाही, गूढ आहे"
.
.
.
"पण त्यात स्वप्नील जोशीचा सेक्स सीन आहे म्हणे"
.
.
.
"मग बरोबर आहे, genre हॉररच आहे."

भारतात मधून प्राईम वर fringe आणि manifest सुरु केलीये बघायला Ray च्या पहिल्या दोन कथा पाहिल्या. हसीन दिलरुबा कोणी ?

Rmd, भारतातील नेटफ्लिक्सवर पण मला दिसत नाहीये >>> अरे देवा! हा फॅक्टर विसरले. इकडे आहे ते नेफ्लिवर म्हणून सांगितलं.

Bard of blood पाहिली netflix वर.. मस्त आहे.. family man च्याच वेळेत release झाल्यामुळे आणि त्याच धर्तीवर फार चालली नाही वाटतं.. इम्रान हाश्मी ची पण चांगली अॅक्टींग for a change

stage of siege झी ५.
पहिला सिजन बघितला नाही , तर दुसरा सिजन समजेल का?

इथे कोणी The Mentalist पाहिली आहे का? ७ season आहेत पाहायला चालू करू का नको?

इथे कोणी The Mentalist पाहिली आहे का >>> इथे, The Mentalist (unofficial) fan club पण आहे. Wink
House MD बघायला घेऊ का ??
सध्या Chuck बघतेय. अगदीच काही नव्हतं बघायला.

हाऊस एमडी बघायला घेता येईल.
कधीकधी ते पाहून मला आपण हाऊस च्या तुसड्या स्वभावा बद्दल तिरस्कार युक्त आकर्षण वाटत असल्याने आपणही जास्त वेळा बघून हाऊस होऊ असं वाटायला लागतं Happy

The Mentalist>> कशावर आहे? भारतिय आहे की बाहेर ची?>>>बाहेर ची आहे, डिटेक्टिव्ह types खुनी चा शोध घेत असतो तो पण वेगळ्या पद्धतीने

The Mentalist>> कशावर आहे? भारतिय आहे की बाहेर ची?>>>बाहेर ची आहे, डिटेक्टिव्ह types खुनी चा शोध घेत असइथे कोणी The Mentalist पाहिली आहे का >>> इथे, The Mentalist (unofficial) fan club पण आहे. Wink
House MD बघायला घेऊ का ??
सध्या Chuck बघतेय. अगदीच काही नव्हतं बघायला>>>धागा आहे का? इथे शोधायचा कसा तो धागा please some १ guide

Virgin River सिझन 3 रिलीज झाला आहे. इथे 2-3 जण फॉलो करत होते, म्हणुन माहिती दिली

झाला बघुन व्हर्जिन रिव्हरचा सिझन ३,
पहिल्या दोन्ही सिझनपेक्षा हा सिझन थोडा कमी अपिलिन्ग वाटला पण अनेक सिन सुन्दर आहेत, डॉकच होपला मिस करण, रिटायरिन्गची घालमेल वैगरे फार सुन्दर दाखवलिये छोट्याश्या गावात सगळ्याचा एकमेकाबद्दल असेलेला जिव्हाळा , एकेम्कासाठी धावुन जाण्, सपोर्ट सिस्टिम उभ करण फार टचिन्ग आहे.
नेत्रसुखद चित्रीकरण, बॅकग्राउन्डला वाजणारी प्रसन्गारुप गाणी , जॅक मेलसाठी काही मोमेन्ट्स क्रियेट करतो त्या अतिव रोमॅन्टिक आहेत.

Never have i ever चा सिजन 2 आलाय. << हा पण मस्त झालाय. ईन्डियन पॅरेन्ट्स काही पटले नाहीत पण...

द वॉकिंग डेड चा १० वा सीझन नेफिवर २६ जुलै ला येतोय. मी सध्या रिकॅप करतोय. नीगन आणि युजीन चे संवाद व स्वतंत्र कोट्सही भन्नाट आहेत Happy

झाला बघुन व्हर्जिन रिव्हरचा सिझन ३,
पहिल्या दोन्ही सिझनपेक्षा हा सिझन थोडा कमी अपिलिन्ग वाटला >>>> हो , मला पण .
थॅंक्यु मीरा, आठवणीने सांगितल्याबद्दल.

Never have i ever चा सिजन 2 आलाय. ......मी फर्स्ट season सुरु केलाय अजून तरी चांगला वाटतोय engaging आहे

अॅपल प्लस टिव्ही वर The mosquito coast सिरीज बघत आहे 3 तिसरा ऐपिसोड सुरू आहे...जबरदस्त सिरीज आहे पिक्चररायजेशन एक नंबर कथा वेगवान आहे व बघणार्याला खिळवून ठेवते. पुढे काय होईल याची उत्कंठा लागून राहते .... भविष्यात नेफी ला जोरदार टक्कर मिळणार..!

City Of Dreams सीझन २ ३० जुलै ला येतोय!! मी उशीराच पहिला सीझन पाहिला पण आवडली होती ही सीरीज. सगळे चांगले अ‍ॅक्टर्स.
ट्रेलर : - https://youtu.be/uf-I9GPnf_M

manifest बघितली आहे का कोणी neflix वर , क शी आहे? 2 episodes आवडले पण पुढे अ & अ होण्याची शक्यता दिसतेय...

Pages