वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी डबिंग मध्ये स्वजो चा मराठी अकसेंट जाणवतो.
मला तेलगू डबिंग आवडले.पहिल्या सिझनचे 5 भाग तेलुगुत पाहिले.खुप संस्कृत शब्द आहेत तेलगू मध्ये.

काही चित्रपट / वेमा या एखाद्या मूळ कलाकृतीवरून ढापलेल्या असतात ज्यात मूळ कलाकृतीला श्रेय दिलेले नसते. तर काही चि / वेमा हे सरळ सरळे अमूक एका कादंबरीवर आधारीत आहे अशी जाहीरात करून भलतेच काही तरी गळ्यात मारले जाते. यातला पहिला प्रकार जास्त परवडला असे वाटते. ग्रहण या पजो च्या मालिकेचा आणि धारपांच्या कथेचा काही एक संबंध नाही तसेच सुशींच्या कथेचा आणि या स्वजोच्या मालिकेचा काहीच संबंध नाही. मध्यवर्ती कल्पना सारखी आहे हा योगायोग.

फक्त ३
हिंदी १ भाग, मराठी सगळे आणि तेलुगु ५
(तेलुगु बॉस ला लिंक दिली, तेव्हा कुतुहल म्हणून १ भाग बघायला घेतला आणि मग ५ पाहिले.)

प्रत्यक्ष पुस्तक आणि त्याचे चित्रपट्/सिरीज रुपांतर यात बरेच काही बदलावे लागते.
पुस्तकात जो ३ पानांचा भाग वाचायला जबरदस्त वाटतो तो दृष्यात ५ मिनीटात निपटतो.
मग उरलेला वेळ काय म्हणून नितिश भारद्वाज च्या पायातून कॅमेरा, स्व जो च्या २ केसातल्या गॅप मधून कॅमेरा शॉट, ५० फूटावरुन खाली एरियल शॉट, स्लो मो असे उद्योग करावे लागतात Happy

तुला तेलगु समजतं अनू? कि सबटायटल, मी कोरियन बघते तसं?
मला कोरियन ऐकायला आवडतं, त्यांचे हेल वगैरे. थोडे शब्द ही समजतात.

समजत नाही
आपल्याला ऐकून कळतं का हे बघायलाच बघत होते. Happy
2-3 वेळा ऐकलं तर पॅटर्न वरून समजता येईल.

समांतर चे कॅमेरा:
नितीश भारद्वाज: "एका दिवशी एकच पान"
कॅमेरा आडवा तिडवा.
स्वजो "मला मान्य आहे"
कॅमेरा खालून वर
नितीश भारद्वाज: "तू यात फसवणूक केलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत"
कॅमेरा त्यांच्या डोक्यावर 50 फूट, मग 30 फूट
स्वजो: "ठीक आहे"
कॅमेरा स्वजो च्या कानामागून पुढे

सई चा मराठी मध्ये कोल्हापुरी अ‍ॅक्सेंट पण बराच चुकलाय.मी ऐकलेले खरे असे नाहीयेत.
तिने फिल्मी गावठी बोली अधिक अनासपुरेची वर्‍हाडी बोली अधिक थोडे कोल्हापुरी शब्द असा स्वतःचा वेगळा अ‍ॅक्सेंट बनवलाय. तिला याचे पेटंट घ्यायला हवे.

अनु कॅमेरा Lol

इथे वाचून असं वाटतं की जितके एपिसोड्स आता केलेत त्यातल्या अर्ध्या एपिसोड्समध्ये बसली असती ही सिरीज. बोअर होणार बघायला.

नेटफ्लिक्सवर Ray मधल्या तिसऱ्या पार्टमध्ये मनोज वाजपेयीची शेरोशायरीच्या वेळची अदाकारी फारच आवडलेली आहे... _/\_
उदाहरणार्थ हे..
छूटती कहां है काफिर.. मुंह से लगी हुई.. Wink

ग्रे'ज anatomy सुरू केली. अजून पहिलाच एपिसोड बघतोय.. छान असेल बहुतेक

ग्रहण चांगली मालिका आहे. दंगली कशा होतात याचे छान दर्शन घडवले आहे. ती दंगल एका कुटुंबाच्या दृष्टीकोनातून दाखवली असल्याने त्या कुटुंबाची कहाणी आणि फ्लॅशबॅक हे आवश्यक आहे. पण ते जास्त झाले आहे. किंचित फिल्मी मसाला शेवटी आहे. अर्थात क्लायमॅक्स नसता तर शेवट कसा करायचा हे एक कोडंच असतं. नाहीतर मग ती डॉक्युमेंटरी झाली असती.
ही मालिका कोणताही राजकीय दृष्टीकोण दाखवत नाही. राजकारणातून होणारी दंगल, दुभंगणारी मने याचे दर्शन सखोलपणे दाखवले आहे हे मालिकेचे यश आहे. काही काही चुका आहेत. पण त्याकडे डोळेझाक केलेली बरी. म्हणजे जन्माचे गूढ अनावश्यक आहे. ते रहस्य टिकवण्यासाठी नायकाने गप्प राहणे इत्यादी.

ग्रे'ज anatomy सुरू केली. अजून पहिलाच एपिसोड बघतोय.. छान असेल बहुतेक>>> चांगली आहे. पण तेच-तेच बघते असे वाटायला लागले म्हणून ६-७ सिजन नंतर बघायची सोडली.

प्राइमवर आहे. नवीन सीजन्स बहुतेक हॉटस्टार वर आहेत.
एका ठराविक पॉइंटनंतर ग्रेज बोअर होऊ लागली. नवे सीजन्स पाहिले नाहीत मग.

रे मधली शेवटची कथा सत्यजित रे यांनीच लिहीली असेल का ? दीदी हे पात्रं तर कुठल्या तरी मां शी साधर्म्य दाखवतं. तेव्हां सत्यजित रे नसावेत. जोपर्यंत कथानायक आणि दीदीची भेट होत नाही तोपर्यंत हा एपिसोड भयानक कंटाळवाणा वाटतो. त्याचं फ्रस्ट्रेशन पाहणे हे अजिबातच मनोरंजक नाही. दीदी ला भेटल्यानंतर दीदी ज्या खुलेपणाने त्याला भेटते तो भाग सर्वात चांगला झाला आहे.

पण नंतरचं सर्व अ आणि अ आहे. आता सत्यजित रे लेखक असल्याने त्यांना वेगळंच काही म्हणायचे असेल या प्रेशरखाली त्याचे अर्थ लावत बसणे आले. जर या एपिसोडचे लेखक भलतेच कुणी असतील तर क्लायमॅक्स आपण स्विकारू शकलो असतो का ?

ती कथा कालच पाहिली.एकाच वेळी मजेशीर, कायच्या काय आणि ताणलेली वाटली(संमिश्र भावना)
हर्षवर्धन कपूर,चंदन सन्याल आणि राधे माँ बनलेली मुलगी तिघांचा अभिनय जबरदस्त आहे.
या कथा रे स्टाईल मध्ये कोणीतरी लिहिलेल्या मॉडर्न कथा आहेत.चार भाग चार वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले आहेत.(ते म्हणजे थोडया चांगल्या दचकवणाऱ्या हॉरर आता कोणी लिहून त्याला 'हीचकॉक' नाव द्यावे तसे.)

तसे नसावे अनू. रेंच्या कथाच आहेत. थोडेफार (?) काळानुरूप बदल केले आहेत. कारण, ती पहिली आणि बहुरुपिया या रेंच्या कथा आहेत. फेसबुकवर बंगाली समुदायाने 'रें' च्या कथांची वाट लावली आहे असा आरोप केला आहे. त्यात या दोन कथांचा उल्लेख आहे.

तेच ना.
काळाशी कथा जुळवून घेताना हे थोडेफार बदल 'कुऱ्हाडीची खीर' झाले असावेत.त्याला इलाज नाही.
मला रे आवडली एकंदर.बहुरूपी कथेत खूप अंधारे शूटिंग आणि काही अनावश्यक तपशील सोडता कथा जबरदस्त आहे.मला त्यात खूप वेगवेगळी प्रतीके पण दिसली कॉर्पोरेट वर्ल्ड ची.
ओरिजिनल कथा कोणत्या इ बुक मध्ये वाचता येतील?

Pages