वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीहअजून एका वेब सिरीज चं नाव आठवतेय. हिंदी होती. रायटर डायरेक्टर च मेन हिरो होता. लिव्ह इन रिलेशन मध्ये राहात असतात नंतर लग्न करतात. हिरोइनच्या वडलांना पण लग्न करायचं असत. असरानी आहे त्यात मुलाचा आजोबा. चांगली धमाल होती सिरीयल.>>>> आठवली मलाच " पर्मनंट रूममेट "

हाउस आणि गुड डॉक्टर लागोपाठ पाहिले म्हणून त्याची तुलना स्वाभाविकपणे होतेय Happy

हाउसला कधी आपल्या टीम ला प्रोत्साहन देताने पाहिले नाही . कधी त्यान्चे कौतुकही करत नाही . तो दूसर्यान्ची अक्कल काढायला बसलेला असतो . कौतुक केलं तरी उपहासाने बोलतो .
त्यामानाने , मेलेन्देझ respects others opinions .
हाउसची टीम सर्व गुणसंपन्न आहे . इथे डॉ . मेलेन्डेझ पण oncologist , neurologist ची मतं विचारतो .
इथला जेराड तिकडे असता तर हाउसचे हात-पाय, दात तोडले असते त्याने . इथे डॉ कॉयल ला फक्त कॉलर पकडून सोडून दिलं .
ईथे पेशन्टच्या नातेवाईकांना उपचाराची आणि परिणामाची माहिती देतात , कन्सेन्ट घेतात , तिथे डॉ हाउस बोले तो कायदा Happy . फार कमी
केसेस मध्ये नातेवाईकाना विश्वासात घेतलेलं बघितलं . तब्यएत बिघडली की औषध बदलतात .
ईथे काही काही पेशन्ट्स मरतात , तिकडे सगळे शेवटच्या क्शणाला बरे होतात .

अर्थात हाउसचा स्वभावच तसा दाखवला आहे म्हणा .
मर्फी खरंच क्युट आहे. >>> हो . किती भोळेपणाने तो अ‍ॅन्ड्रुज कडे टक्सीडोची चौकशी करतो . आणि डॉ , अ‍ॅण्ड्रुज पण त्याला प्रामाणिक सल्ला देतो Happy

डॉ . कडी दिसली इथे आणि डॉ कॉयल म्हणजे मेन्टलिस्टमधला ग्रेस चा होणारा नवरा .

हो
आणि विल्सन पण आहे.
गुडघ्यात मासा घुसलेला पेशंट
मेंटलिस्ट मधला एजंट वायली पण अगदी चिमुकल्या रोल मध्ये आहे.
हाऊस हे आयुष्यातल्या सिनिकल अँगल वर आहे.
मेंटलिस्ट ऑटीझम वर असल्याने थोड्या ऑप्टिमिस्ट साईड ला.

मला हाउस आवडली , गुड डॉक्टर पेक्शा. अर्थात गुड डॉक्टर चा पहिलाच सिझन चालु आहे. हाउस बघतान कायम वाटायच कि जे डॉक्टर होउ घातलेत त्यना किती आवडेल हि सिरिझ.

नेटफ्लिक्स वरच्या मला आवडलेल्या..
Hit & Run
Behind her eyes
Caliphate
SHE
Bombay Begums
Ajeeb Dastaans (कोंकणा सेन वाली स्टोरी तर खूपच कमाल आहे)

परवा टीव्हीवर व्हर्जिन रिव्हर सुरू होती आणि त्यातली एक लीड ("मेलिंडा") ओळखीची वाटली. नंतर लक्षात आले की ती द वॉकिंग डेड च्या मधल्या सीझन्स मधे होती.

हॉटस्टार वर स्पेशल ऑप्स पहिली. सहज एक एपिसोड बघायला गेले आणि मालिकेने खिळवून ठेवले. मग binge watch करून काल संपवली. मस्त सस्पेन्स राखला आहे शेवटपर्यंत !
केके मेनन चे काम नेहमीसारखेच छान. बाकीचे बरेच चेहरे माझ्यासाठी नवीन होते, पण रोलमध्ये फिट बसले... हाफीज झालेला ऍक्टरही छान आहे.
थ्रिलर आवडणाऱ्यानी नक्की पाहण्यासारखी आहे.

थँक्स मी अनु.

फारेन्ड वॉकिंग कशी वाटली सांग की.

स्पेशल ऑप्स खरंतर मस्त असणार नक्की पण मी तरी बघितली नाही कारण नवरोबांनी ‘काय भारी‘ करत करत सगळी श्टोरी ऐकवली, मग म्हटलं राहुद्यावी आता. Proud

सुनिधी - द वॉकिंग डेड वर मागच्या काही पानांवर चर्चा आहे Happy मी पहिले दहा सीझन रेकमेण्ड करतो Happy ११ वा अजून पाहायचा आहे.

झॉम्बी हा प्रकार (genre) असलेले सिनेमे/सिरीज पूर्वी मला अजिबात आवडत नसत. यात झॉम्बी वगैरे आहेच आणि लीड कॅरेक्टर्स त्यांच्याशी लढताना एकदम कल्पकपणे रचलेले आणि थरारक सीन्स आहेत. पण अन्न, पाणी, सुरक्षितता वगैरेंचे प्रश्न निर्माण झाले की एरव्हीचे नॉर्मल लोकही कसे वागतात, त्यांच्या निर्माण होणार्‍या टोळ्या, त्यातील शत्रुत्व वगैरे सुद्धा खूप एंगेजिंग आहे.

हल्ली 'फॉर लाईफ' बघतोय.
न केलेल्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा झालेला एक कैदी तुरुंगात राहुन कायद्याची पदवी आणि बार मेंबरशिप मिळवतो आणि बर्‍याच इनमेट्सना रिप्रेझेंट करुन चुकीच्या गुन्ह्यातून सोडवतो आणि शेवटी स्वतःलाही (हे अजुन झालं नाहीये.. पण होईलच) सोडवतो. लीगल ड्रामा आहे. बरोबर एनवायपीडी, करप्शन, लीगल आणि तुरुंगातील न बदलू इच्छिणार्‍या सिस्टिम, ते मॅन्युप्युलेट करुन बदलणारा फोर्स, डिएची निवडणूक... आणि जेंडर, सेक्शुअल आयडेंटिटीत डायव्हर्सिटी दाखवुनही ती अजिबात ओव्हरव्हेल्मिंग न ठरता मॅटर ऑफ फॅक्ट दिसते. मला आवडली सिरीज.
नेफ्लिवर आहे. आत्ता बघितलं तर दोन सिझन आलेत आणि नेफ्लिवर एकच दिसतोय. दुसर्‍यानंतर एबीसीने बंद केली आहे, सो क्लिफ हँगर असेल तर डोक्याला ताप. पण असो, आवडली आहे तर हा तर सिझन बघणार!
निकोलस पिनॅक आणि इंदिरा वर्मा (ल्युथर, पॅरेनॉईड) दिसले म्हणून चालू केली. दोघेही आवडतात आणि सगळ्यांचीच कामं छान आहेत. हाऑका मधला वॉशिग्टन पोस्टचा एडिटर निगेटिव्ह भूमिकेत आहे. फक्त निराशाजनक गोष्ट म्हणजे निकोलस आणि इंदिरा वर्माला ब्रिटिश अ‍ॅक्सेंट बोलायला न सांगितल्याने अगदीच फुकट दवडल्याचं फीलिंग आलं सुरुवातीला. Wink

फारएन्ड थँक्स. झॉम्बी मलापण आवडत नाही

>>> मलापण

इतके दिवस म्हणूनचं पाहीली नव्हती.
२-४ भाग पाहून ठरवेन पुढे कंटिन्यू करायची कि नाही

नवरसातला प्रत्येक रस घेऊन त्यावर कथा सादर करायचा प्रयोग याआधी सोनी लिव ने केला आहे. द हर्टब्रेक हॉटेल नावाने यूट्यूबवर मोफत पाहता येईल.

भाडिपाची शांतीत क्रांती कुणी बघितली का?>>>> मी आज सकाळी पहायला सुरुवात केली आणि 2 एपिसोड्स पाहुन झाले सुद्धा. मला आवडते आहे.
पहिले 2 भाग तरी दिल चाहता है चे मराठी व्हर्जन वाटले. पण कॉपी नाहीए,

गूड डॉक्टर बघून संपवली .
शेवट बराचसा अपेक्षीतच झाला .
सीझन ३ , शॉन पेक्षा जास्त डॉ . ब्राउनचा वाटला .
ती मला पहिल्या सीझनपासूनच आवडली .

गूड डॉ , गूड वाईफ आणि ईतर काही सिरिज बघून वाटलं , ही लोक आयुश्यात किती चटकन move on होतात .
प्रेम प्रकरण , रिलेशन्शीप , ब्रेक अप - कोणी जास्त अडकलेलं बघितलं नाही .

next recommendation ???

ओके मनमानसी, मीरा. भाडीपाच्या कंटेटमधले ओढून ताणून विनोद बघून कंटाळा आला होता म्हणून प्रश्न पडला. त्यातल्या त्यात गेम ऑफ थ्रोन्सवरचा भाग आवडलेला.

भाडीपा आणि त्याचे सगळेच व्हिड्यू हल्ली फार बोर असतात. अजिबात हसायला येत नाही. नाविन्य संपलं, आणि त्यांचा माल ही संपलाय बहुतेक.

Pages