वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधे कंटाळून बंद केलेली द क्राउन पुन्हा सुरू केली. तिसर्‍या सीझनच्या सुरूवातीला "मार्गारेटॉलॉजी" नावाचा एपिसोड आहे. तो संवाद, पटकथा वगैरेच्या दृष्टीने फार जबरदस्त एपिसोड आहे. वन ऑफ द बेस्ट. त्यात मधेच एक भन्नाट विनोदी सिक्वेन्सही आहे. मार्गारेट अमेरिकेत आलेली असताना लिंडन बी जॉन्सन च्या आमंत्रणावरून व्हाइट हाउस ला येते आणि तेथे जे काय होते ते प्राइम मिनिस्टर हॅरॉल्ड विल्सन क्वीनकडे येउन कमालीच्या गंभीर चेहर्‍याने सांगत असतो. पण एकूणच तो सगळा प्रकार टोटल लोल आहे. पाहाच.

'द क्राऊन' मी सुद्धा एका सीझननंतर बंद केली. अ‍ॅक्टिंग, आर्ट डिरेक्शन वगैरे सगळं छानच आहे, पण राजघराण्यातल्या आणि राजकारणातल्या भानगडी, स्कँडल्स काय बघायची एकापुढे एक, असं झालं होतं मला.

कोटा फॅक्टरी दुसरा सिजन पण मस्त आहे
ती वर्तिका ज्या काही कातील नजरेने बघते ना, खलास च व्हायला होतं
अफाट बोलके डोळे आहेत तिचे
आयुष्यात असं बघणारी कोणी आली असती तर काय पाहिजे होतं राव Happy

हो कोटा फॅक्टरीचा दुसरा सिझन मला पण आवडला.
दोन्ही सिझन अचानक संपल्यासारखे वाटले पण. एकूण रॅट रेस भारी दाखवलीये पण.
जितू भय्या एकदम भारी..

हो, अचानक संपल्यासारखी झाली खरे
पण तिसरा सिजन येईल बहुदा
वैभवची रँक बघितल्याशिवाय लोकं काही गप्प बसणार नाहीत.
टॉप मारेल असे काही वाटत नाही पण पोरगं लई हुशार आहे, कदाचित तो जितु भय्या कडे येईल आणि त्याच्या रँक मुळे क्लासचा पण रँक वाढेल वगैरे, पण हे फारच फिल्मि झालं

नेफ्लिक्सची Squid Game संपवली. शेवटपर्यंत उत्सुकता रहाते. या विषयावर सिनेमे पाहिलेत पण मालिकेभर उत्सुकता राहणे , तेही एकेक भाग तासाचा असताना , हे मला आवडले. काहीकाही वेळा मला पळवावे लागले कारण मला तो ताण नको होता Happy पण हा माझा प्रॉब्लेम आहे म्हणा. Happy यात उगाचच भावनातिरेक नाही दाखवला. मालिका रेंगाळत नाही कुठेही. ढाणढाण संगीत कमी, व्हिलन उगीच अतीखलनायकगिरी केलेले नाहीत, उलट व्हिलनचे मालिकेभर दाखवलेले रूप (?) परिणामकारक आहे… वगैरे वगैरे मुळे मला मालिका आवडली.

नेफिवर "द कोमी रूल्स" नावाची लिमिटेड सिरीज आली आहे. गेल्या ५-७ वर्षांतील अमेरिकन राजकीय घडामोडींशी संबंधित. त्या काळात एफबीआय चा डायरेक्टर असलेल्या जेम्स कोमी च्या एका पुस्तकावर आधारित. खूप इंटरेस्टिम्ग आहे. जेफ डॅनियल्स मुख्य रोल मधे आहे व इतरही बरेच आहे. गॉट मधली ती रॉब स्टार्क जिच्या प्रेमात पडतो तीसुद्धा आहे (ऊना चॅप्लिन तिचे नाव, विकिवर सापडले). अ‍ॅपरंटली चार्ली चॅप्लिनची नात आहे ती!

Squid Game चा विषय काय आहे?>>>> काही अतिश्रिमंत लोक असतात त्यांच्या कडे पैसा खुप असतो पण त्यांच्या जीवनात ऐक्साइटमेंट नसते मग ह्या अश्या लोकांच्या मनोरंजन करीता खेळला जातो squid Game हे खेळणारे असतात समाजातील गरीब, कर्जाच्या ओझ्याखाली दबलीली ज्याचं जीवन हे पैसा नसल्याने नर्क झालं आहे अशी जनता हेरली जाते प्रचंड पैसा मिळत
असल्याने ते पण खेळायला तयार होतात ...हे खेळ एकदम साधे आहेत जी लहान मुले खेळतात तेच खेळ खेळायचेत पण येथे आऊट होणार जिवंत राहत नाही...मनुष्य स्वभावाचे अनेक कांगोरे यात बघायला मिळतात...अवश्य बघण्या सारखी सिरीज

महेशकुमार, या थीम वर दूरदर्शन वर 'फक्त एका रुपयासाठी' अशी एक सिरीयल होती असं आठवतं. राजा गोसावी होते त्यात.गरीब माणसाला काहीतरी धोका पत्करायला लावतात पैजेसाठी.

नेफिवर कालच आलेली "Maid" नावाची त्यांच्या शब्दांत "लिमिटेड" सिरीज लगेच पकड घेणारी आहे. फुल्ल रेको.

quid Games भयंकर आहे.......बहुदा पुढचं नाही बघवणार.....पण सुनिधी म्हणतेय त्यावरून बघवीशी पण वाटते आहे!

Bates motel बघून संपवली. सुन्न झाले काही दिवस . किती ती वाताहात Sad .

खरंच.मुळात पहिल्या 2-3 एपिसोडस मध्येच कळत होतं त्यांना की हे गाव लाभण्यासारखं नाहीये

कोटा फॅक्टरी चा दुसरा सिझन बघितला . आशुचॅम्प यांच्याशी सहमत . अर्धवट संपवला असा वाटले . जितू भैय्या ना आयत्या वेळी त्या टीचर क्लास ला नाही म्हणतात तेव्हा वाईट वाटले . माहेश्वरी पक्का मॅनेजर वाटला त्याने म्हणल्याप्रमाणे . पुढचा सिझन बघायला आवडेल पण . वैभव चे काय रँकिंग येते याची उत्सुकता आहे.

व्हँपायर डायरीज सीझन सहा परेन्त संपवले सीझन सात व आठ जरा फिलर आहेत सिरीज फिनाले बघित्ला आधीच आता कॅच अप करत आहे.

नेट फ्लिक्स वर इन्स्पिरेशान फोर मिशन चा एक काउंट डाउन म्हणून शो आला आहे. मी आधी वेब कास्ट बघितलेला पण आता सर्व क्रू ची माहिती आहे व जास्त डि टेल वारी आहे. मला तर आव्ड ला. लै भारी. व झिरो ग्राविटी इंडिकेटर म्हणून एक गोल्डन रिट्रीवर डॉग चे स्ट फ टॉय आहे. लै भारी. नासाची इमारत व मिश न कंट्रोल व सर्व लोक खरेच एकदम स्फूर्तिदायक आहेत.

‘मेड’ आहे यादीत.
नेटफ्लिक्स्वरच ‘मिडनाईट मास‘ दुसर्‍या नंबरवर होती म्हणून सुरु केली पण ३ भाग संपले तरी पकड येईना म्हणून थांबवली. कोणी पाहिली, आवडली तर लिहा.

Squid Game-> जॉनरं - हंटर गेम्स , लक सिनेमा असा आहे पण मस्त आहे. वरील सुनिधी च्या प्रतिसादशी सहमत .

Squid Game - थोडं विचित्र वाटते ही संकल्पना आणि पहिला एपि. शॉकिंग.. पण उत्कंठावर्धक सुद्धा आहे.. काही ठिकाणी predictable scenes आहेत.. पण ^^मनुष्य स्वभावाचे अनेक कांगोरे यात बघायला मिळतात...^^ हेही खरयं.. म्हणून च पुढचे एपिसोड बघितले.. एकदा नक्कीच बघू शकता.

मी संपवली squid game कशीतरी..... भयंकर आहे आणि उगाच बघितली असंही वाटलं नंतर....पण उत्कंठावर्धक आहे हे बरोबर!
संपल्यावर बराच वेळ अस्वस्थ वाटत होतं.
त्याचा season 2 येणार आहे असं वाटतं! पण कोरियन सिरीज चा एकच सीजन असतो (अस टीना) म्हणे!

नेटफ्लिक्सवर मेड बघायला सुरवात केली आहे. एकच एपिसोड झाला. बघूया complete करीन का माहित नाही. पण सध्या तरी ठीक वाटली

कोणी 'the untamed' पहिली का? प्रचंड पॉप्युलर सिरीझ आहे. माझे करंट ऑब्सेशन

Squid Game-> खेळात एक सभासद पाकीस्तान चा असतो . एक कोरिअन विचारतो ..कुठे आहे पाकीस्तान? दुसरा उत्तर देतो कि भारताच्या उत्तरेला. ओरिजिनल सन्वाद काय आहे ते नाहि माहिती पण एक गम्मत. Happy

Pages