वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्ये मध्ये काही काही संवाद फॅमिली फ्रेण्डली नाही वाटले >>> ते अतिच वाटतायेत. सतत दारू पिणेही अति वाटलं. कोणाला आल्या गेलेल्याला समजू नये म्हणून रत्नाने स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिणेही एकदा हसू आलं पण नंतर वाटलं, प्यायची असेल तर बिनधास्त पी, घाबरतेस कशाला, लपवाछपवी कशाला. चारच बघितले आहेत.

मी म्हटलं ना, लिपस्टिक अंडर माय बुरखा आणि माया साराभाई यांची भेळ करून रत्ना पाठक शाह चं हॅप्पी फॅमिली मधलं कॅरेक्टर बनलं आहे.अतुल कुलकर्णी कधीकधी ओढून ताणून.बालकटी बहू आणि ती मेड जास्त आवडते.

जाम च आवडली हॅप्पी फॅमिली. काही काही ठिकाणी अति झालंय पण ते कॉमेडी मधे असतच.. आठवा खिचडी Lol
रत्ना पाठक दुकानात आलेल्या एकीला स्कर्ट लांबी वरून बोलताना दाखवलिये आणि बाल कटी सून डिप नेक्/मिनि स्कर्ट घालते त्या बाबत न बोलता केस, मंगळसुत्र न घालणे अशा गोष्टी बोलत असते. गुजराथी माझ्या माहिती प्रमाणे मं.सू. होउसे खातर घालतात, ट्रॅडीशन म्हणुन नाही.

स्पॉइलर...

शेवटी संजॉय ला चीटींग केल्या बद्दल ओरडायला बहिण, आजोबा मागे पुढे का बघतात हे कळले नाही. शॉक होता हे मान्य, पण चीटींग तर केलीच त्याने..पुरूषासोबत असो वा स्त्रीसोबत. "समजून" घ्यायचा प्रयत्न वगैरे टू मच वाटले..

अतुल कुलकर्णी चं दो दिल एकाच ताला सुरात गाणं फार च हसू आलं. >>>>>
रत्ना पाठक -- "इसे कोईभी गाना दो ये सेम गाके सुना सकता है "
राज बब्बर -- "कोईभी गाना? ये तो हर गाना सेम गाके सुनाता है , पां। पां पां.. "

हॅप्पी फॅमिली वर कोणीतरी वेगळा धागा काढायला हवा...मी वारंवार वाचायला आणि लिहायला येईन... Lol
मी 'खिचडी' पाहिली नाहिये...पण इथे वाचून YouTube वर काही videos पाहिले...तर त्यातली कॉमेडी normal वाटली ओढूनताणून केलेली...पण हॅप्पी family मधले jokes एकदम natural वाटतात...
रत्ना पाठक तर धम्माल...काॅम्बोकाचं पहिल्यांदा नाव घेताना 'काम होगा की काम नही होगा '...तिच्याशी भांडण झाल्यावर 'ये मारेगी तो नही ?', 'कच्चा चाबा गई' ...हे आणि असे कितीतरी डायलॉग मध्ये perfect time आणि perfect effect साधलाय रत्ना पाठकने...दुसरा season येईलच पण मी हासुद्धा पुन्हा बघणार आहे...धम्माल आहे अगदी...

खिचडी मीही फार कमी बघितली आहे, तेव्हा केबल नव्हती माझ्याकडे.

रत्ना रॉकींग, अति म्हणजे अति सहज करते, तिला अवॉर्ड मिळायला हवं या भूमिकेसाठी.

पोकर फेस - मस्त. एक गिफ्टेड (पण सॉर्ट ऑफ लोलाइफ) तिच्या विलक्षण निसर्गदत्त देणगीमुळे गोत्यात येते, आणि जीव वाचवण्याकरता पळ काढते. पुढच्या १० एपिसोड्स्मधे प्रत्येक ठिकाणी गिफ्टचा वापर करुन गुन्हे सोडवताना होणारी तिची तारांबळ मजेशीर आहे. मिस्टरी+थ्रिलर्+कॉमेडि असा काहिसा जॉनरं आहे. आवर्जुन बघा - पिकॉक वर आहे...

पोकर फेस - >> पाहिली. छान आहे. पण कधी कधी वाटते कि पोलीस काहीच कसे करत नाहीत. सगळ्या केस हिच सोडवत फिरते.. पण तशीच मालिका आहे म्हणून चालतं.

पॉटलक चा सीझन -२ आलाय सोनी लिव वर . सायरस साहुकार , किट्टु गिडवानी , ईरा दुबे .
अतिशय उत्तम वगैरे नाही म्हणता येणार , विनोदही काही उच्च दर्जाचे नाहीत .
पण जेव्हा डोकं भयानक शिणलं असेल आणि काहीतरी साधं सोपं बघायची ईच्छा होते तेव्हा बघायची सिरिज आहे .

हो ते काम होगा की नही होगा धमाल आहे. स्लीवलेस मा और विगवाले पापा, ड्रेस के अंदर देखुंगा, प्लेट तो ले लो, कोनसी बेहोशी की दवा वगैरे एक से बढकर एक संवाद आहेत. तीनच भाग बघून झालेत.

नेटफ्लिक्सवरची ‘द नाईट एजंट‘ आवडली. जरी नवं काही नसलं तरी चांगली थ्रिलर वाटली. मला व्हाईटहाऊस संबंधीत थ्रिलर्स आवडतात हे पण एक कारण आहे. अजुन संपली नाही.>>>>>>
मी दोन दिवसात संपवली !
ज्यांना फौदा वेब सिरीज आवडते , त्यांना नाईट एजंट नक्कीच आवडणार .
प्रत्येक एपिसोड बऱ्यापैकी वेगवान ठेवला आहे .
अमेरिकन राष्ट्रपती आणि अमेरिकेतील सुरक्षा एजेंसी चे कुरघोड्या राजकारण कोणत्या थराला पोहचू शकते याबद्दल उत्तम दाखवलय.

Who Were We Running From?
नेटफ्लिक्स - इंग्लीश (मूळ टर्किश)

सुरुवातीला सस्पेन्स थ्रीलर वाटणारी मालिका पुढे सायको थ्रीलर बनते. पळण्यामागच्या कारणाचाही अंदाज यायला लागतो पण तरीही शेवटपर्यंत उत्कंठा टिकून राहते. त्या सायको बनण्यामागचे कारण म्हणजेच Who चे उत्तर आहे. मी आणि लेकीने बघितली - मला शेवट पटला तिला नाही पटला.

नायिका प्रत्येक भागात आपले राहण्याचे ठिकाण बदलत असते आणि ते प्रत्येक ठिकाण अतिशय सुंदर आहे हा अजून एक प्लस पॉइंट मालिकेचा.

सातच भाग असल्यामुळे पटकन बघून होते.

‘द नाईट एजंट‘ +१
राणा नायडु - वेन्कटेश ने मस्त काम केलय. हैद्राबादि ऐकायल मजा येते.

MH370...हे आठवले की काटाच येतो अंगावर...

हे तेच विमान आहे ना ज्यात एका maharashrian विद्यार्थ्यांचे आई वडील आणि भाऊ त्याच्या Ph D पदवीदान समारंभासाठी चालले होते ...

Happy family चा 9 वा आणि 10 वा एपिसोड इतक्यात आलेत का...मी आधी तर 8 पर्यंतच पाहिले होते...आठवा एपिसोड लास्ट होता ना?

Happy family चे 9 आणि 10 दोन्ही एपिसोड्स आलेत प्राईम वर. आणि दहावा बहुतेक लास्ट आहे. पार्ट 2 येऊ शकेल. मस्त सीरिज होती. खूप एन्जॉय केली. बऱ्याच दिवसांनी अशी मालिका पाहिली.

ह्याचा सातवा बघितला, एपिसोड एंड shocking, अर्थात सन्जॉय ने बहिणीला जे जाणवून दिलं ते खरं की खोटं नंतर समजेल.

बाकी माझ्यासारख्या टिपिकल मिडल क्लास मानसिकतेवालीला वेबसिरिज शॉक देऊन जातातच, ही हलकीफुलकी असूनही देतेय धक्यावर धक्के आणि तिथे किती सहज स्वीकारत असतात सगळे, आई वगैरे मुलीबाबत.

असो आता सात एपिसोडस बघितलेच आहेत, अजून तीनही बघेन.

तो डॉक्टर जावई आणि त्याचे फोटोज यांनी मात्र धमाल आणली या एपिसोडमध्ये.

आताच संपवली happy family. मस्त हलकीफुलकी, खुसखुशीत अगदी गुजराती फाफड्या सारखी. रत्ना पाठक as usual at her best. तिच्या भाषेत सांगायचं तर सबको कच्चा चबा गयी! राज बब्बर ला पहिल्यांदा अशा लाईट भूमिकेत पाहिलं. मस्त आजोबा उभा केलाय, असा एक तरी आजोबा घरात पाहिजे. अतुल कुलकर्णी नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या भूमिकेत गोंधळलेला निरागस साधा सरळ बाप अगदी छान साकारला आहे. आयेशा झुलका दिसते पण सुंदर आणि काम पण मस्त केलंय. तिच्या साड्या काय वर्णाव्या एकेक. बाकी नवीन कलाकार पण सगळे too good.
हसवता हसवता असं काही करतात की एकदम अंतर्मुख व्हायला होतं. एकत्र कुटंबातील घडू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा आढा वेढा मस्त घेतलाय.
अगदी title song प्रमाणे
पलभरमे कूछ ऐसि बात कर जाये रे
दिल काहे हाये रे
Crazy family
Happy family

नेट फ्लिक्स वर चार्ल्स शोभराज का सोभराज च्या जीवनावर आधारित द सर्पंट बघत आहे. ७० च्या दशकातील चित्रण परिणाम कारक आहे.
एक एक मर्डर अंगावर काटा आणतो. आम्ही पक्षी आमची पिढी - लहान असताना - ह्याला गोव्यातून पकडले आहे ते पुढे आहे अजून ते बघायची उत्सुकता आहे इ न्स्पेक्टर झेंडे " हलो चार्ल्स फेम" - ओ कऑकिरो गोव्यातले रेस्टॉरेंट.

थाय लँड पटाया फिरलेले असल्याने त्यातील ङ घडणा रे गुन्हे बघून कसे तरी होते. पण नेटाने बघत आहे. ताहार रहम का रहीम ह्या नटाने

चार्ल्स चे काम केले आहे तो जबर्दस्त हॉट आणि चार्मिन्ग आहे. नक्की बघा. त्याची गर्ल्फ्रेंड मॉनिक/ मारी आंड्रे चे काम केलेली नटी पण फार सुरेख आहे दिसा या. फ्रेंच मुलींचे सौंदर्य लक्षण अप टर्न्ड नोज . फार शोभुन दिसते तिला. सत्तर च्या दशकातले कपडे कार्स बघून बरे वाटते.
हरे रामा हरे क्रिश्ना मधील झिनत ची कधी मधी आठवन येते. हिप्पी चळवळीतील भटक्या लोकांचे चित्रण आहे. बिचारे काही डोक्यात घेउन येतात व असे क्रिमिनल्स च्या जाळ्यात अडकतात.

"ताज - डिवायडेड बाय ब्लड " (का ? ) पाहिली .

अनारकलीची ही ट्विस्टेड स्टोरी माहीती नव्हती . खरी आहे की (ईतकी ?? ) सिनेमॅटीक लिबर्टी ?
सलीम अय्याश दाखवलाय , अकबर पणे म्हणे कधीच लॉयल नव्हता . त्यांच्या अय्याशीच चित्रण ईतक किळसवाणं आहे की वैताग येतो .
सलीम झालेला अ‍ॅक्टर चांगला दिसतो , नसरुद्दीन शह सारखा बुजुर्ग माणूस अकबराच्या रोल साठी एक्दम अनफिट आणि अवघडलेला वाटतो .
आईन्स्ताईनसारखे पिंजारलेले सफेद केस घेउन फिरणारा अकबर काहीच प्रभाव पाडत नाही .
संध्या म्रुदुल फार गोड अभिनेत्री आहे , मला पहिल्यापासून आवडते . ईथे ती प्रचंड थोराड दिसते आणि सतत चेहर्यावर काहीतरी विचित्र भाव घेउन फिरते . अकबराच्या बाकीच्या राण्याही सी ग्रेड चित्रपटातील व्हॅम्प सारख्या दिसतात.
मानबाई , नळावर कचाकचा भांडणारी बाई वाटते. किती शिव्या देते.
सलीम - अनारकलीच उत्कट प्रेम कुठेच दिसत नाही . नुसतच infatuation आणि हल्ली कुठलीच सिरीज समलैंगिक संबंधाशिवाय पूर्ण होत नाही.
अकबरची तिन्ही मुले सादर करणारे अ‍ॅक्टर्स बरे वाटले - मुरादचा खूनशीपणा , सलीमचा रंगेलपणा आणि दानियालचा देवभोळेपणा - तिघांनी बरा निभावलाय.
लढाया लांबल्यात आणि रोचकही नाहीत. नुसतीच हाणामारी , कापाकापी , रक्तपात .

Who Were We Running From?
संपवली. माधव +१. शेवट पटला मला. रादर हाच शेवट होणार हे दोन भाग आधी पासून समजू लागलेलं. बहुतेक क्राईम इ. कथांचा आम्ही चालवू हा पुढे वारसा हाच शेवट असतो आणि तो फारफार क्लिशे शेवट आहे.
मला कंटाळा येऊ लागलेला पण हाती घ्याल ते तडीस न्या नियमांत संपवली एकदाची. पहिलीच टर्किश सिरिअल बघत होतो त्यामुळे उत्सुक्ता होती. अगदी सफाईदार कामं आणि एकुणच सगळं आहे. फार आवडली अशी नाही, पण ठीक आहे.

स्पॉयलर असतील माझ्या पोस्टमध्ये.

हॅपी फॅमिलीमधे मला त्या सन्जॉयचा प्रचंड राग आलाय, चीड येतेय, त्याच्या बहिणीचाही राग आलाय. त्याच्या बायकोला सत्य समजायलाच हवं आहे, twins होणार असतात आता. तुमचं काहीही असुदे एक्स्ट्रा मॅरीटल, कधीही, कोणाशीही होऊदे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला फसवता कामा नये. मुळात करुच नये अफेअर पण अशी सिच्युएशन निर्माण झाली तर जोडीदाराला सांगायला हवं.

ते आजोबा हुशार असतात, रमेश बिचारा बुद्धु असतो.

रमेशची बहीण पेट घेऊन येते, तेव्हा रमेश घाबरुन इथे तिथे लांब जातो, ते मी टोटली रीलेट केलं. मी अशीच घाबरते.

Pages