दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी, अस्मिता, सोनाली एक एक पैठणी स्कार्फ Happy
पूजा बेदी च्या माहेरचे 2 लोक म्हणजे प्रोतिमा बेदी आणि कबीर बेदी चा मुलगा हे मृत आहेत
लग्न करून इस्लाम धर्म घेऊन मेहरूंनीसा नाव
तिच्या सासरच्या नातेवाईक म्हणजे मुलगी आलिया फर्निचरवाला चा जवान जानेमान मागच्या वर्षी येऊन गेला.

मला स्कार्फ नको अनु , मी फक्त खिदळले आहे , ओळखले नाही. Happy प्रामाणिक लाकूडतोड्या सारखे मी पैठणी स्कार्फ परत करतेयं. Proud

मग तुला तो परत करण्याच्या प्रामाणिकपणाबद्दल एक पैठणी, एक मोडल सिल्क आणि एक चंदेरी स्कार्फ पण भेट देऊ का? Happy

अनु यांच्याशी कट्टी. मी कोडं ओळखलं तर पैठणी वाटून घ्या म्हणाल्या त्या. Sad
आत्ता पण मी अ‍ॅटेम्प्ट केला तरी पैठणी काही मिळाली नाही. Sad
पार्शलिटी Wink

अर्रर्र
रानभूली चिडू नकोस.तू पण घे पैठणी पर्स.
(बाकी कृष्णधवल कोड्याला माझा पास)

अपलोड च्या पुढे सेंड टू एडिटर ची स्टेप करावी लागते.
इमेज अपलोड म्हणजे फक्त मायबोली स्टोरेज मध्ये ती गेली.
त्यानंतर सेंड टू एडीटर केलं की ती प्रत्यक्षात स्टोरेज मधून काढून वापरली गेली.

गाडी चली बरोडा से जाने को रतलाम
मै थी अपने नींद मे खोई कर गया काम
लूट गया मेरा सामान दैय्या लूट गया मेरा सामान

मला अशी आचरट गाडी इंजिन वाली दोन तीन गाणी आठवत होती म्हणून हेच थेट गुगल केलं Happy
हे नसतं तर अंजन फुके सिटी मारो मन डोले सर्च करणार होते

Pages