दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर चुकलेलं आहे.
आता हिंटा देते
नायिकेच्या माहेरकडील 2 व्यक्ती मृत आहेत
प्रमुख भूमिकेतील व्यक्तीची पत्नी मृत आहे.
नायिकेच्या सासरकडच्या एका व्यक्तीचा 1 चित्रपट 2020 मध्ये आला(आणि गेला)

मलाही हे दो अन्जाने सिनेमातलं 'आई कर के सिंगार' गाणं ओळखू आलं. ही ओळ वाचून समहाऊ आई शिवण शिवतेय असं वाटतं.

अनुच्या या आधीच्या करण कपूरच्या फोटोत गाणं नाही पण ती बाई मंदाकिनी आहे हे ओळखू शकले.

लै भारी वाटतंय.

आता हिंटा देते
नायिकेच्या माहेरकडील 2 व्यक्ती मृत आहेत
प्रमुख भूमिकेतील व्यक्तीची पत्नी मृत आहे.
नायिकेच्या सासरकडच्या एका व्यक्तीचा 1 चित्रपट 2020 मध्ये आला(आणि गेला) >>> काजोल आहे का फोटोत?

करीनाच्या सासरकडच्या व्यक्तीचा (सैफ अलीचा :हाहा:) पण एक चित्रपट २०२० मधे येऊन गेला. तिच्या माहेराकडे ऋषी कपूर, राजीव कपूर अशा व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या आधी शशी कपूर, शम्मी कपूर. राज कपूर यांना जाऊन बरीच वर्षे झाली. पण दोन तर नक्कीच.
काजोलच्या माहेरी कोण मृत झाले इतक्यात ?

मामी, मंदाकिनी ला हो हो
मामी, रानभूली, आताच्या गेसेस ना नोनो Happy
रानभूलीच्या एका वाक्यात उत्तराची किंचित दिशा आहे.

मामी, आई कर के सिंगार वाला पंच वाचून फुटले Happy

अजून एक हींट:
नायिकेने खऱ्या आयुष्यात धर्मांतर केलं आहे.

नाही
2 कुटुंब सदस्य मृत वाला क्लॉज बघा
काही जणांना ही मरलीन मनरो पोझ मध्ये लाल फ्रॉकात आठवत असेल.

अरे देवा, हे काय आहे अल्लं अल्लं अल्लं... या विषकन्येने
पाताल भैरवी, अजुबा सगळ्यांना मागे टाकले , एरवी ऋषीमुनींचे रोल करणारा सुरेंद्र पाल जाळीचे बनियन घातलेला 'द लंपट गाय' झालेला दिसतोयं Lol

पहायला पाहिजे. सध्या मिथुनचे सगळे चित्रपट पाहण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानंतर मधून भांग पाडलेल्या गोविंदाचे. अधून मधून विषकन्या सारखे नितांतसुंदर चित्रपट पहायला हरकत नाही.

एव्हढा मोठा संकल्प नको. अ‍ॅडम (इव्हशिवायचे) यांची मर्जी फिरली आणि मधेच कुठे माबोबाह्य जगात जन्म झाला तर ?

Pages