दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी हीरोइन च्या नाकावरुन,बांगड्यावरुन ओळखायचे आता पार्श्वभागावरून ओळखता येऊ लागले. लोकांची अभ्यासाची पातळी बरीच वाढली. आता अवघड पेपर काढावे लागणार.

आधी हीरोइन च्या नाकावरुन,बांगड्यावरुन ओळखायचे आता पार्श्वभागावरून ओळखता येऊ लागले>>> अरे देवा Lol

तब्बू वाटतेय. ममता कुलकर्णी सुद्धा असू शकते. कॅटरीना पण असू शकेल.
किंवा करीना कपूर. यापैकी कुणी नसेल तर मग कोण ?

डिंपल कापडिया ?
जिला घुंघट नाही ती नायिका असण्याची शक्यता जास्त आहे.

किमान इथे समोसे - चटणी , आमरस पुरी देऊन तरी जायचं. खात खात जरा विचारांना चालना मिळाली असती. Proud

ग्रेसी नाहीये
लगान आणि मुन्ना भाई दोन्ही मध्ये असे गाणे नाही
महिमा फुगे वाल्या हेअरस्टाईल करायची.महिमा नाहीये.
माय मनी ऑन प्रीती झिंटा, राणी मुखर्जी, सोनाक्षी,परिणती,माधुरी(असे ब्लाउज देवदास मध्ये आहेत, पण असा हेअरकट नाही.माधुरी कटाप)

इथे आलेल्या नावांपैकी एकही नाही बरोबर हिरोईन! Happy हिरॉईनचा डेब्यु सिनेमा, फारशी हिट नाही झाली हिरोईन.. सध्या तर कामही करत नाही. गाणी चांगली आहेत सिनेमातली.

पूजा बत्रा नाही. ही जेमतेम काही वर्षं टिकली बॉलीवूडमध्ये. हिरोचाही हा जेमतेम दुसरा सिनेमा आहे. (आता सोपे होईल जरा.)

ती सुनील शेट्टीच्या क्रोध मधली आहे का जी त्या परदेस वाल्या हीरो सोबत लव मॅरेज करते? किंवा तत्सम कोणीतरी. वाटलेच की ही नेहमीच्यांपैकी कुणी नाहीये.

प्रतिभा लोहानी
चांदनी
कीर्ती रेड्डी
सबिहा
साबा
रिंकी खन्ना

Pages