दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या सर्वांसाठी सोपेच आहे.
Picture1.jpg

मी डिंपल ओळखली
हिरो हाय फाय वेस्टर्न संस्कृती वाला कोणी आहे इथवर आले.नंतर अडकले.

माझ्या मनात इतकी दया करूणा मला ढेकळं कळलं नाही पण कुणाला तरी आले असेल म्हणून तीनदा येऊन बघून गेले.
मला रणबीर कपूर वाटला ... :ओओ: पुन्हा अल्ट्रा इतका जुना नाही तो हे लक्षात आले.

गेस एडिट केला.एक चूक गेस मुद्दाम ठेवलेय.
(नाहीयेत असं वर कळलं.मिस्टर खिलाडी मधले अक्षय जुही असू शकतात. असे लाल कापडे तो घालायचा.)

येस
मला वाटलेच आयेशा चा पांढरा घागरा आणि आमिर चे फिचर्स एकदम सोपा क्लू ठरणार,
आत्मा यांना रेशमी उपरणे.

गजरे लक्षात राहीले होते. नेमकंच ते दृश्य आलं.
उपरण्याबद्दल धन्यवाद. धोतर बंडी नव्ह्तं म्हणून आभार.

साष्टांग नमस्कार
2 पैठण्या घ्या
आणि कसं ओळखलं तेही लोकांना सांगा.

Pages