दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेलबॉटम आणि फुलाफुलांचा टॉप, नेलपॉलिश यावरून ओळखावं लागणार.
(नखांवरून हिरॉईन ओळखण्याइतकं शास्त्र प्रगत झालं असेल तर सुटलंच समजा) Lol

नीतूसिंग आहे का ही ?

हम बेवफा हर्कीझ न थे

शिन्मा : शालिमार>>>>>>

लगेचच उत्तर सांगू नये सर, बाकीच्या कुणीतरी ओळखलंच असतं. Happy

हिंदी गाणं नाही.. मराठी पण नाही.... तेलुगू, तमिळ, भोजपुरी, गुजराती, राजस्थानी, मल्याळम, पंजाबी नाही Proud

ओह
मला नसतं ओळखता आलं
खर तिची नखं, बेल बॉटम वगैरे वरुन ओळखायला हवं होतं.

लहान पणा पासुन गाणं ऐकत आली आहे. मोठा भाऊ लावायचा. आणी टीव्ही वर पण बघितल होतं. मृणाली बोलल्या म्हणुन डायरेक्ट हेच गाणं सुचलं आणि यू ट्यूब वर टाकलं. तर तेच निघालं

Pages